झोप

प-यांच्या राज्यातले कोणी
पापण्यांवर लावी इवले रोप
होता बहरूनी गर्द विशाल
या वृक्षाला म्हणती झोप!

लहान असो वा थोर
असो खास आणिक आम
जहागीरदारही असो कुठचा
या झोपेचे सारे गुलाम!

धरता अडवून डोळ्यांपाशी
जांभईची येते हाक
म्हणते सुस्कारीत, पापण्यांना
दिवे सारे मालवून टाक!

जेव्हा नाकातले ते पहारेकरी
नकळत लोटून देती वायुद्वार
चढतो मग घोरण्याला
कसा बहकता नशीला खुमार!

पहुडणे, लोळणे, लवंडणे
हे झोपेचे नातेवाईक
आळसवाण्या दिवसांना
यांच्याशिवाय नसे गि-हाईक!

मनोभावे करता उपासना
मिळते खास पारितोषीक
या झोपेचे आराध्य दैवत
कुंभकर्णाचे लाभते आशीष!

डुलक्यांच्या खेळात हरणारा
दचकून उठतो मग सावरतो
जिंकणारा मात्र अगदी मजेत
निवांतपणे, झोपी जातो!

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

छान आहे की.

- जुने धागे उसवल्याबद्दल क्षमस्व पण ऐसी वर खूप सकस साहीत्य आहे. आतिवासांचा पाचवी सावित्री, त्रिपुरामय घ्या, वाघमारे, अदिती, बेफिकीर - सुंदर लिखाण आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0