प्रामाणिक मत

आपुलकी, प्रेमभाव, माया ममता हे शब्द नुसत्या कानालाही किती गोड वाटतात. शब्दांचा स्पर्शही आकर्षक, मनोवेधक वाटतो. अनुभव तर सोडाच मायेची दोन शब्दासुद्धा दोना जन्मीचे पारणे फेडून जातात. शरीराची कसकस, मनाची धगधग शांत करुन एक मऊ मुलायम पांघरूण घालून जातात. सुखावून जीवाला पुनश्च धड़पडण्याची , जगण्याची जिद्न्यासा देतात.

याउलट तितकारा, तिरस्कार, घृणा , मत्सर हवा हे शब्द उच्चारतानाच जिभेची सुद्धा घालमेलच होते ना. मग प्रत्यक्षातल्या अनुभवांचे काय. एखाद्याचा तिटकारा, तिरस्कार करणे, घृणा वाटणे, मत्सर किंवा हेवा करणे या सर्व भावनिक व्याधींच्या आधीन आपण का व्हावे? हां तर प्रत्यक्षात स्वत:चाच आजार. ज्या व्यक्तीचा आपण तिटकारा करतो, हेवा करतो त्यात त्या व्यक्तीचा दोष किती व स्वत:चा किती त्याचा आपण साधक बाधक विचार केल्यावरच आपण किती टक्के बरोबर आहोत हे लक्षात येईल.तो विचार करताना आपण शंभर टक्के निपक्षपाती आहोत याचेसुद्धा स्वपरीक्षण करूँ घेणे जरुरीचे आहे. हे सर्व झाल्यावर ज्या व्यक्तीशी आपण असे वर्तन करतो ते कितपत योग्य हाही विचार करावा व त्याचा समोरच्या व्यक्तीवर, त्याच्या मानसिक स्थितीवर आपण कितीसा घाला घालतोय अणि ते स्वत:स किती शोभायमान आहे याचा किंचितसा तरी उहापोह करावा असे माझे प्रामाणिक मत आहे. आपल्याला न आवडणारी, न चालणारी , न भावलेली किंवा अपेक्षित नसलेली, नको असलेली गोष्ट अनेक वेला अनेकांच्या हातूनही होत असेल म्हणून त्याचा चांगल्या/योग्य शब्दात ही उलगडा करता येतो न? मग तसे का करू नये ?
अगदी आपल्या कुटुंबातील व्यक्ती व नातीगोती ते शेजारपाजार, समाज आशा सर्वच क्षेत्रात आपला अन्य व्यक्तींबरोबर कधी भावनिक तर कधी व्यावहारिक संबंध येताच असतो.प्रत्येक वेळी प्रत्येक ठिकाणी आपण कितीसे समतोल राहू शकतो त्याची परीक्षाच असते म्हणा ना. तेव्हा चोवीस तासातील काही क्षण आपण आत्मपरीक्षणाला देऊ शक्लो तर आताचे हे धावपळीचे वेगवान जीवन कही अंशी तरी सुखकर करण्याचा आपण प्रयत्न करू शकू असे वाटते.

field_vote: 
3.333335
Your rating: None Average: 3.3 (3 votes)

प्रतिक्रिया

सासूबाईनी लिहिलेला लेख टाकलेला आहे. "इंद्रधनुष्य" या आया डी वरुन त्या लिखाण करतील. धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>आपल्याला न आवडणारी, न चालणारी , न भावलेली किंवा अपेक्षित नसलेली, नको असलेली गोष्ट अनेक वेला अनेकांच्या हातूनही होत असेल म्हणून त्याचा चांगल्या/योग्य शब्दात ही उलगडा करता येतो न? मग तसे का करू नये ?<<
इथे चांगल्या/ योग्य शब्द म्हणजे नेमके कोणते हे ठरवण्याचा अधिकार स्वतःकडे न राहता तो दुसर्‍याकडे जातो ना! इथे संस्कार व संवेदनशीलतेचा प्रश्न येतो. म्हणतात ना शहाण्याला शब्दाचा मार मूर्खाला जोड्याचा मार! कधी कधी काही बाबतीत आपण इतके संवेदनशील असतो कि त्याची कुणी चिरफाड केली तर आपण दुखावले जातो. समोरच्याचा तसा उद्देश नसतो हि कदाचित. अर्थात याचे प्रामाणिक उत्तर त्याची सदसदविवेकबुद्धीच देउ शकते.
असो एकूण मनाची प्रामाणिक स्पंदने आवडली. स्वागत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

आपल्या प्रतिसादाला उत्तर देण्यास उशिर झाल्याबद्दल माफ करा.मला अस म्हणायच आहे कि क़टू शब्द न वापरता चर्च्या करावी. मत प्रामाणिक असेल तर शब्दच पुरे. नाहितर समोरच्याचि पात्रता समजुन गप्प होणॅ बरे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Every time, every time it rains, it's gonna rain pennies from heaven
Don't you know every cloud contains lots of pennies from heaven
You'll find your fortune's fallin', baby, all over the town
Be sure, be sure that your umbrella is upside down