भारतीय प्रजासत्ताक चिरायू होवो.

भारतीय प्रजासत्ताक ६५व्या वर्षात पदार्पण करतआहे.२६जानेवारी१९५०रोजी भारतीय घटना हि अमलात आणली गेली.नि भारत हा एक प्रजासत्ताक राष्ट्र बनला. ह्यापूर्वी आपला हा देश एकसंघ नव्हता. ह्या देशाच्या तुकड्या तुकड्यावर अनेक राजे राज्य करत होते त्यांची जि संस्थाने होती ती सार्वभौम होती. हि संस्थाने म्हणजे वेगळे देशच होते. त्यांच्या सतत आपापसात लढाया होत दुसर्याचे राज्य बळकावून आपले राज्य मोठे कसे करता येईल ह्या दृष्टीने ते प्रयत्न करत. इंग्रजांनी ह्या साऱ्या राजांना हरवून आपला एकछत्री अंमल सुरु केला तेव्हा त्याला एका अखंड देशाचे स्वरूप आले.

१९४७साली जेव्हा स्वातंत्र्य दृष्टीक्षेपात आले. देश लोकशाहीच्या दिशेने चालू लागला तेव्हा देशातील जवळपास ५६१संस्थानातील राजघराणी हि अस्वस्थ झाली . स्वतंत्र भारताशी त्यांना काही घेणे देणे नव्हते. इंग्रज निघून गेल्यावर आपले संस्थान हे स्वतंत्र राष्ट्र होणार ह्याच स्वप्नात ते होते. परंतु संस्थानातील बहुसंख्य जनतेला आता राजेशाही नको होती तर हवी होती लोकशाही. पुढे हि संस्थाने भारतीय संघराज्यात
सामील झाली.

देशाची घटना अमलात आणून आज ६५ वर्षे झाली आपल्या देशाने बरीचशी प्रगती केली काही आघाड्यांवर तो मागेही राहिला. परंतु देशाची लोकशाही मात्र एकसंघ राहिली. अनेक स्वातंत्रसैनिकांचे बलिदान ह्यातून आपला देश उभा राहिला आहे.. आपण विकासाच्या दृष्टीने बराच पल्ला गाठला आहे.लोकशाही बळकट असणे हे देशाच्या दृष्टीने महत्वाचेअसते.

भारतासारखे निरनिराळे धर्म, भाषा, जवळपास ६००० जाती असलेल्या देशात लोकशाही टिकून राहणे हि खरोखरच एक अदभूत गोष्ट आहे.ह्याचे श्रेय आपल्या घटनेला नि राज्यकर्त्यांना जाते हे निर्विवाद सत्य आहे. लोकशाही विरोधी प्रवृत्ती ह्या कितीही ताकतवर भासत असल्या तरी त्यावर मात करून आपली लोकशाही हि जगातली सर्वोत्कृष्ट लोकशाही म्हणून चिरायू होवो हीच सदिच्छा.

तमाम भारतीयांना प्रजासत्ताकदिनाच्या शुभेच्छा नि हे प्रजासत्ताक निर्माण करण्यास झटणाऱ्या सर्व ज्ञात अज्ञात व्यक्तींना विनम्र अभिवादन .

भारतीय प्रजासत्ताक चिरायू होवो.

field_vote: 
3.285715
Your rating: None Average: 3.3 (7 votes)

प्रतिक्रिया

चांगल्या लायनीवरच्या लेखाचा प्रयत्न.
स्तुत्य. लेखाला माझ्याकडून तीन तारका/स्टार लागू.
इतरत्र दिलेला प्रतिसाद इथे जशास तसा देत आहे.
भारत nation की country?
nation आणि country हे शब्द कैकदा एकमेकांना पर्याय म्हणून वापरात दिसत असले तरी ह्या संज्ञांमध्ये सूक्ष्म फरक आहे.
" राष्ट्र "‍ व "देश " ह्या शब्दांत आहे तसाच तो फरक आहे.
the state* किंवा प्रशासन्/राज्यव्यवस्था ही तर अजूनच एक भानगड आहे.
(हे राज्य/state म्हणजे महराष्ट्र्,कर्नाटक ह्या नावाची राज्य ह्या अर्थाने नाही, तर administrative अर्थाने state हा शब्द जसा ध्वनित होतो, तसा तो आहे. पूर्णतः वेगळा.)
हिंदी-उर्दू मध्येही "ऐ वतन ऐ वतन...तेरी राहों में हम..." ह्यातलं "वतन " म्हणजे देश.( "वतनदार" शब्दातल्या वतनपेक्षा तो जरा वेगळाच)
"वतन"च्या जवळ जाणारा "मुल्क" हा शब्द.
"कौम" हा शब्द nation /राष्ट्र च्या जवळ जाणारा. तो लोकसमूह आणि पर्यायाने राष्ट्र दर्शवतो.
"कौमी दंगे हुए" असं उर्दूत ऐकतो communcal riots बद्दल.
गांधी "राष्ट्रपिता" आहेत तसे मुहम्मद अली जिनांना "बाबा इ कौम" ; आमच्या जमातीचा/राश्ट्राचा पिता म्ह्टले जाते.
.
.
प्रतिसाद अतिसंक्षिप्त असल्याने काहिसा विचित्र भासेल.
अधिक तपशील मी वेगळ्या,स्वतंत्र धाग्यात टंकलेत :-
http://www.aisiakshare.com/node/1104
तिथे फक्त मूळ धाग्यात नाही, तर प्रतिसादातूनही माझ्याकडे असलेली माहिती/विचार टंकलेत.
.
.
.
अर्थात ह्यात दुरुस्ती सुचवणारा न वी बाजू ह्यांचा प्रतिसाद होता. तो सुद्धा जशास तसा देत आहे :-
State हा शब्द administrative अर्थाने ध्वनित होतो, असे वाटत नाही. आणि state म्हणजे प्रशासन/राज्यव्यवस्था तर नव्हेच नव्हे. किंबहुना state हे प्रशासन/राज्यव्यवस्था/administration/शासन/सरकार यांच्यापासून distinct आहे, भिन्न आहे.

आपण ज्या state संकल्पनेचा उल्लेख करीत आहा१, ती संकल्पना मला वाटते काहीशी political entity अशा अर्थाने घेता यावी. म्हणजे, वेब्स्टरच्या व्याख्येप्रमाणे, a politically organized body of people usually occupying a definite territory; especially : one that is sovereign (व्याख्या ५अ). किंवा, या विकीदुव्यावरील पहिल्याच वाक्यात म्हटल्याप्रमाणे, A state is an organized community living under one government. (या वाक्यातून राज्य आणि शासन/प्रशासन यांची भिन्नता अधोरेखित व्हावी.)

भारतात राष्ट्रपती हा हेड ऑफ स्टेट असतो, तर पंतप्रधान हा हेड ऑफ गवर्मेंट असतो. त्याचप्रमाणे, ब्रिटनमध्ये (तूर्तास) राणी ही हेड ऑफ स्टेट असते, तर पंतप्रधान हा हेड ऑफ गवर्मेंट असतो. ऑस्ट्रेलिया, कॅनडा आदि देशांत राणी ही हेड ऑफ स्टेट असते (आणि गवर्नर जनरल हा तिचा स्थानिक प्रतिनिधी असतो), तर पंतप्रधान हा हेड ऑफ गवर्मेंट असतो. याचा अर्थ काय?

भारताचे उदाहरण घेऊ. भारत ही एक एंटिटी असते. तिला एक सरकार असते. सरकार बदलू शकते, नव्हे अनेकदा बदलते. आज याचे येते, तर उद्या ते जाऊन त्याचे येते. पण भारत बदलत नाही; तो एंटिटी म्हणून वर्षानुवर्षे, सरकारानुसरकारे टिकून राहतो.

राष्ट्रपती हा या भारत नावाच्या टिकाऊ एंटिटीचा (स्टेटचा) प्रमुख असतो, तर पंतप्रधान हा त्या भारत सरकार नावाच्या सदैव बदलत्या, नाशवंत हंगामी एंटिटीचा (गवर्मेंटचा) प्रमुख असतो.

(तूर्तास इत्यलम्|)
.
.
.
भारताची कोनत्या निकशावर काय प्रगती आहे, ह्याबद्दल ऐकायला आवडेल.
भारत अजूनही socialist republic असेल तर socialist असण्यातली किती उद्दिष्टं साध्य झालित हे जाणून घ्यायची इच्छा आहे.
republic असणं कितपत साध्य झालय, नुसत्या लोकप्रतिनिधींच्या नेमणूका लोकांकडून निवडणुकांमार्फत होणं म्हणजेच republic की अजून काही ?
ती accountability व transparency आलेली आहे का? त्या आघाडीवर काय प्रगती आहे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

किंचित त्रोटक झालेला आहे पण योग्य वेळेला योग्य भावना व्यक्त करणारा लेख.

तमाम भारतीयांना प्रजासत्ताकदिनाच्या शुभेच्छा नि हे प्रजासत्ताक निर्माण करण्यास झटणाऱ्या सर्व ज्ञात अज्ञात व्यक्तींना विनम्र अभिवादन .
भारतीय प्रजासत्ताक चिरायू होवो.

असंच म्हणतो.

भारताची कोनत्या निकशावर काय प्रगती आहे, ह्याबद्दल ऐकायला आवडेल.

बस काय मनोबा, मी इतके चार-पाच लेख लिहिले त्यावर...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुमच्याकडूनच अजून अधिक माहिती मिळाली तर बरच आहे. उदा :- संरक्षण व्यवस्था व उरलेल्या अजून काहे बाबी.
तुमच्याशिवाय इतरही मंडळींनी आपापली मतं दिली तरी हरक्त नाही.
सचिनशेठ चाम्गल्या लायनीवर जाताहेत तर म्हटलं त्यांच्या गाडीला आपणही जरा धक्का मारावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

प्रजासत्ताकदिनाच्या शुभेच्छा !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या निमित्ताने ऋषिकेशचा धागा सर्वोच्च कोण? : घटना व तिचे 'बेसिक स्ट्रक्चर' आठवला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

तमाम भारतीयांना प्रजासत्ताकदिनाच्या शुभेच्छा नि हे प्रजासत्ताक निर्माण करण्यास झटणाऱ्या सर्व ज्ञात अज्ञात व्यक्तींना विनम्र अभिवादन .

अभिवादनात सहभागी आहे

भारतीय प्रजासत्ताक चिरायू होवो.

आमेन!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!