चालत राहणार

चालणे प्रवाह जीवनाचा
थांबणे मरण यातना
पर्याय नाही दुसरा
शिवाय चालण्याचा.

चालता चालता भेटले
वाटेत जे सगे-सोयरे
अनोखळी वाटसरू निघाले.
क्षणभराची साथ तयांची
देऊन गेली अनेक जखमा
कवटाळूनी त्या जखमांना
एकटाच मी चालत राहणार.

दमलेल्या शरीरानी
थकलेल्या मनानी
निरुदेश्य मी
भटकत राहणार.
चालत राहणार, चालत राहणार.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

दमलेल्या शरीरानी
थकलेल्या मनांनी

इथे अनेकवचन करण्यात काही उद्देश आहे का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

धन्यवाद. आधीच ३ नंबरचा चष्मा आणि google च्या मदतीने मराठी लिहिताना चुका होतात आणि लिहिण्यचे काम रात्रीच करतो. मराठी शब्दकोश ही घरात नाही. घरात बोलताना कुठल्याच शब्दावर अनुस्वार देण्याची पद्धत नाही. पोर तर मराठीत कमीच बोलतात. लिहिण्याचा प्रश्नच येत नाही. या सर्व समस्या आहेतच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छान इतके निराशावादी नको

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

™ ग्रेटथिंकर™