शैक्षणीक वळण

साक्षात्कार वगैरे मला कधीच होत नव्हते पण गेल्या शुक्रवारी आमच्या एचआर डिपार्ट्मेंटनी एका एक दिवसीय झंझावाती कार्यशाळेला मला पाठवल्यानंतर हे असं काहीतरी मला व्हायला लागलं आहे.
आयुष्यात शिकायचं थांबू नका-आयुष्य तुम्हाला रोज काहीतरी शिकवत राहील असं काहीतरी एक मुलायम कोमलांगी सांगत होती.
आता खरं सांगायचं तर हे दिवस काही शिकण्याचे आहेत यावरून विश्वास उडलेल्या लोकांसाठी ही कार्यशाळा होती, म्हणजे आमच्या कंपनीने "पुढील शिक्षणास निकामी" असा शेरा मारलेल्या लोकांचा एक जथ्था या कार्यशाळेला पाठवला होता.
"अ वन डे मॅरॅथॉन इन्स्पीरेशनल कोर्स फॉर लोअर मिडल मॅनेजमेंट सिनीअर्स " चे हे खूळ आमच्या कंपनीत सध्या बोकाळलं आहे.आमच्या कंपनीत या खूळाला बेबीज डे आउट म्हणतात
माझ्या शेजारी बसलेले गुप्ते पुढच्या आठवड्यात सेवा निवृत्त होणार्‍यांच्या यादीतलेहोते.ह्यालाच म्हणतात एचआर. त्यांच्या डाव्या हातानी घेतलेला निर्णय उजव्या हाताला कळत नाही.
समोर येणारा प्रत्येक क्षण हा एक लर्नींग कर्व्ह आहे हे मात्र त्या मुलायम कोमलांगीकडे बघून सगळ्यांनाच पटलं.
पन्नाशीनंतरचे प्रत्येक वर्षं नुकत्याच विसर्जीत झालेल्या पंधराव्या लोकसभेसारखं आहे असा साक्षात्कार मला त्याच दिवशी झाला.आपलं नशिब मिराकुमार सारखं एका उंच खुर्चीवर बसून फक्त हसतंच आहे असं काहीसं फिलींग आताशा रोज येतं.जड जड वाटायला लागतं.
संध्याकाळी जेवणानंतर "बरं वाटतंय आता" असं बायकोला सांगायला जावं तर ती फणकारून म्हणते,"उग्गाचच चिडचिड करता. ... तुम्हाला भूक लागलेली कळत नाही आजकाल " वगैरे म्हणते.
पन्नाशीनंतरच्या नविन शैक्षणीक वळणाचे हे ताजे अनुभव.
*********************************************************************************************
चिरंजीव इंजीनीअरींगच्या सहाव्या वर्षाला आहेत.
सिक्स इअर्स इंटीग्रेटेड ग्रॅज्युएशन कोर्स .दोन फुल केटीसकट.
सकाळी आठ वाजता आंघोळ करून नखशिखांत कपडे घालून त्यांचे दर्शन मला विस्मयकारी वाटले.
एरवी त्यांना या वेळेत त्यांच्या झोपेत आलेला व्यत्यय जरा पण खपत नाही.
अशा वेळी त्यांना ऊठवणार्‍याचा ते जो अपमान करतात तो त्यांची आईच फक्त सहन करू शकते.
(डु नॉट डिस्टर्ब. यु विल बी इन्सल्टेड.)
छातीच्या डाव्या बाजूला (त्यांच्या) उजवा हात ठेवून ते मला म्हणाले ,
"बाबा प्रणाम "
माझा चश्मा नाकाच्या शेंड्यावरून गळून खाली पडला. तो उचलून मी परत जागच्याजागी लावेपर्यंत ते मला म्हणाले,
"बाबा, मी निर्णय घेतला आहे ...
त्यांच्या आवाजातला ठाम निर्धार मला जाणवून मी प्रतिक्षिप्त प्रश्न विचारला ,
"चेक चालेल का ?"
यावर त्यांनी मंदसे स्मित केले.
"नाही, बाबा आता मला पैशाची गरज नाही."(मला उगाचच " मॉ, मैने बीए पास किया है " आठवलं.)
पण एखाद्या जबाबदार पित्यासारखं मी त्याला विचारलं ,
"अरे, कॉल सेंटरच्या नोकरीची घाई करू नकोस .आधी ग्रॅज्युएशन पूर्ण कर."
नंतर कॉल सेंटरचीच नोकरी मिळणार आहे असं मला म्हणायचं होतं पण सत्य परीस्थितीची जाणीव करून देणे हा त्यांचा अपमान झाला असता.
या वाक्यावर ते पुन्हा एकदा मंद हास्य करीतसे होऊन मला म्हणाले .
"बाबा, मी आता सोशल एंजीनीअर होणार आहे."
माझ्या डोक्यात प्रकाश पडला. हे वाण नक्कीच ह्याच्या आईकडून आलं असावं. आमच्याकडे खापर पणजोबांपासून सगळे खत्रूड म्हणून नावाजलेले आहेत.
लग्न झाल्या दिवसापासून याच्या आईचं माणसाळून टाकण्याचं कौशल्य कधीकधी फार्फार कौतुकाचं वाटतं.
आमच्या सोसायटीतल्या सी विंगमधल्या हिप्परगीकरांची कामवाली बाई त्यांच्याकडे खाडा करून हिच्या केसाला रंग वगैरे लावत बसते आणि ही तिच्या नखांना रंग लावते.
पण हे तसं आता आताशाचं.पोस्टमन घरापर्यंत टपाल आणून द्यायच्या काळात ही माउली पोस्टमनला कोथींबीर मिरच्या आणायला पण पिटाळायची.
पण वास्तवाचे भान राखा हा संदेश मला आठवला आणि मी त्यांना विचारलं.
"बाप रे ! म्हणजे तू घर सोडून जंगलात जाणार का क्काय ? ते नर्मदा आंदोलना सारखं ? अँ ? "
माझा आवाज जरा चिरकलाच असावा.
चिरंजीव नकारार्थी मान हलवून म्हणाले
"बाबा ,मला ते तुमच्यामुळे शक्य नाही."
"तुम्ही मला लहानपणापासून पॉटी -पॉटी ची सवय लावली.नॉर्मल शी करायला शिकवलंच नाही. जंगलात जायचं म्हणजे उकीडवं बसावं लागेल ..माझा नाईलाज आहे "
मी जरा रीलॅक्स झालो.
नर्मदा नाही -म्हणजे छत्तीसगड नक्कीच नाही.
त्यावर ते पुढे म्हणाले की " मी अर्बन सोशल एंजीनीअर होणार आहे."
आता ह्या प्रकरणात इतके बारकावे असतात हे माझ्या ज्ञानकक्षेच्या बाहेरच होतं.
"म्हणजे ?
"म्हणजे मी घरी राहूनच कोर्स करणार आहे."
(-म्हणजे ते दिवसभर अंथरुणात पडून राहणार आहेत.
-म्हणजे अठ्ठ्यात्तरव्या हाकेला पण ते ओ देणार नाहीत.
-म्हणजे त्यांना जन्मजात पाण्याची अ‍ॅलर्जी आहे हे लक्षात ठेवून तुम्ही त्यांना आंघोळीचा आग्रह करायचा नाही.
केलाच तर बाथरुंअमध्ये त्यांनी काढून टाकलेल्या चड्डीचा "ळ" उचलून टाकण्याची जबाबदारी आग्रहकर्त्याची असेल.
-म्हणजे त्यांनी भरलेल्या जीमच्या पैशाचे स्मरण त्यांना वारंवार करून द्यायचे नाही.
-त्यांचा कॉल चालू असताना तुम्ही त्यांच्या पंधरा फुटाच्या परीघात फिरकणार नाही.
-म्हणजे ते जॅमींगसाठी घराबाहेर पडलेच तर ते तुमचे कॉल सतत कट करतील याला तुमचा आक्षेप नसेल हे ते गृहीत धरतील.वगैरे वगैरे ...)
हे सगळं मला उगाचच आठवलं.
"मग याची सिएमटी -जीएमटी वगैरे असेल ना ? त्याचे क्लास पण असतील ना ?"
त्यांच्या अकाली सुटलेल्या पोटावरून टीशर्ट ओढत ते म्हणाले
"बाबा तसं काही नाही .त्यांच्या सिंपल टेस्ट मी आधीच पास झालोय."
काय काय विचारतात रे हे सोशल एंजीनीरींग वाले "
"व्हेरी सिंपल डॅड. त्यांनी फक्त एक एसे लिहायला सांगीतला. "मिसअंडरस्टुड सोशल एंजीनीअर या विषयावर...
म्हणुन मी अब्दुल करीम तेलगी साहेब यांच्यावर एसे लिहून टाकला."
तेलगी आणि सोशल एंजीनीअर ?
"ऑफकोर्स डॅड !!! हि वॉज मिसइंटर्प्रेटेड. खरं म्हणजे सरकार खाजगीकरणाला प्रोत्साहन देते. तेलगी साहेबांनी सरकारी परवानगीची वाट न बघता छापखान्याला न झेपणार्‍या डोलार्‍याचे खाजगीकरण केले. आता त्यांचे कागद जास्त खपायला लागल्यावर सरकारचा जळफळाट झाला आणि स्पर्धेला घाबरून त्यांना जेलमध्ये टाकलं. आता आतमध्ये ते तुरुंगाचं खाजगीकरण कसं करता येईल याचा अभ्यास करणार आहेत."
आता मला सात्वीक म्हणतात असा संताप आला. आणि मी म्हटलं म्हणजे " उद्या कचेरीत तेलगी आणि टिळक यांचे फोटो सोबत लावायचे का ?"
माझ्या प्रश्नामुळे आणखीच खूष झाले.
कानातल्या डुलाला हलकेच स्पर्श करत मला म्हणाले
"डॅड -तुम्ही फार लवकर गोंधळता."
(हे मात्र अगदी खरं आहे. आम्ही सगळे फार लवकर गोंधळून जातो.याच्या बहीणीच्या आणि याच्या वयात पाच वर्षाचं तरी अंतर असावं अशी आमची अपेक्षा होती... पण गोंधळाच्या मनस्थितीतून बाहेर येण्यापूर्वीच याचा जन्म झाला होता. असं मला उगाचच सारखं सारखं आठवायला लागलं.)
मग ते पुढे बोलतच राहीले...
"सोशल एंजीनीअर आणि क्रिमीनल यांच्या कक्षा ठरवणार्‍या रेषा फार धूसर आहेत.आजचा सोशल एंजीनीअर उद्याचा क्रिमीनल होऊ शकतो. सप्टेंबर पर्यंत तेजपाल सोशल एंजीनीअर होते -ऑक्टोबर मध्ये क्रिमीनल झाले की नाही ?
आणि समाजाला याची जाणिव असल्यामुळे प्रत्येक सोशल एंजीनीअरच्या नावाने एक रस्ता आणि एक पोलीस स्टेशन असते."
"बघा लोकमान्य टिळक मार्ग -एल.टी मार्ग पोलीस स्टेशन ---दादासाहेब भडकमकर मार्ग-डि.बी मार्ग पोलीस स्टेशन ..."
माझ्या घशाला आता कोरड पडली होती. मी पाण्याचा एक घोट घेतला.
बेंबीला थुंकी लावत त्यांना शेवटचा प्रश्न मी विचारला.
"माझ्याकडून काय अपेक्षा आहेत तुमच्या ? "
तुमची गेल्या तीन वर्षाच्या फॉर्म-१६ च्या प्रती हव्या आहेत.ही एकच कंडीशन फुलफील करायची बाकी आहे .
"पण फॉर्म १६ कशाला "
त्यांनी खिशातून एक कागद काढून वाचून दाखवला.
" सहारा इंस्टीट्युट ऑफ सोशल मॅनेजमेंट अँड सोशल एंजीनीअरींगच्या विद्यार्थ्याचा किमान एक पालक -गरज भासल्यास- जामीन देण्याच्या लायकीचा आहे याचा पुरावा प्रवेश देण्यासाठी अत्यावश्यक आहे. "
माझा चेहेरा वेडावाकडा झाला. माझा हात अचानक माझ्या छातीच्या डाव्या बाजूला गेला.
आता ते घाबरले आणि त्यांनी विचारलं
"डॅड ..काही होतंय का तुम्हाला ?
मी मान हलवत इतकंच बोलू शकलो..
"काही नाही. सहारा प्रणाम "

field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (2 votes)

प्रतिक्रिया

__/\__
दंडवतच!

त्यातही ते चड्डीचा "ळ" वगैरेला तर फु ट लो!

ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

+१

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

+२

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

+३

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

+४

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रामदासकाकांनी टंग-इन-चीक वगैरे लिहिलं असेल, पण पुण्यातल्या एका प्रख्यात शिक्षणसम्राटांची "क्षयझ स्कूल ऑफ गवर्मेंट" खरंच पालकांच्या उत्पन्नाचे पुरावे मागते असं ऐकून आहे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

चड्डीचा ळ.... ROFL लोळले-मेले-ठार झाले! ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

दंडवत घ्या काका

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ROFL लै भारी! _/\_

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चड्डीचा "ळ" ....माझ्या मुलाची प्रचण्ड म्हणजे प्रचण्ड आठवण आली...

आमच्याकडे तो घरी असताना शर्ट चा ओ आणि चड्डी पँटचा ळ अशी ओळ पडलेली असते...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चड्डीचा ळ हे बाकी अशक्य निरीक्षण आहे हां काय रामदासकाका ROFL _/\_

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

चड्डीची 'ळ'ची बाजू वाचून हहपुवा झाली. बाकी लेख, निरीक्षणे आणि अनेक वाक्ये मजेशीर.
धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मजा आली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

:D> छान लेख

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'ळ'ई खुमासदार लेख आहे.
भरपूर पैसा देणारं करिअर करायची इच्छा असलेल्या पोरांना सोशल इंजिनिअरिंगचाच सहारा आहे हे बाकी खरं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हासू हासू मेलो कनी झोपायच्या वक्ती ओ राम्दास्काका....
लयीच खन्ग्री...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मस्तं लिहिलय! मजा आली वाचून...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

मजा आली!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मजाच ...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

है और भी दुनिया में सुखनवर बहोत अच्छे...
चड्डीच्या 'ळ' बाबत बाकी प्रताधिकार कुणा दुसर्‍याचे आहेत असे ऐकून आहे. किंवा 'है उन्हें भी मेरी तरह जुनूं तो फिर उनमें मुझमें ये फर्क क्यूं' असेही असेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

फेसबुकावर प्रोफाइल पिक चेंज करुन फरक संपवला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सुट्या-सुट्या वाक्यांत लिखाण आवडले. मध्यमवर्गीय बाबा, मुलगा, आई वगैरे अंमळ श्लेष्मल झाले आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

__________
श्रेणिव्यवस्था जिंदाबाद - मालकशाहि जिंदाबाद

माझ्या मैत्रिणीचा भाऊ इन्ग्रजी 8 आकारात पायजमा फरशीवर काढुन ठेवायचा. भाऊ बाहेरुन घरी येइपर्यन्त
पायजमा तसाच पडु द्यायचा असा नियम होता . मग आल्यावर त्या 8 मधे पाय ठेवुन भाउसाहेब पायजमा चढ्वित असत .
लेख , बाप लेक सम्वादामुळे अतिशय आवड्ला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऑप्टिमायझेशन हो ऑप्टिमायझेशन...हेच गणितात केलं की लोकं लय भारी म्हंटात अन दैनंदिन जीवनात केलं की शिव्या घालतात. यामुळेच भारत मागे पडलाय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

सहमत आहे. अजून एक ऑप्टीमाझशन म्हणजे मच्छरदाणीची घडी न करणं . घडी न करता तोटा काही होत नाही पण करायला त्रास होतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

अन असे ऑप्टिमायझेशन करणे हा खास पुरुषी ट्रेट आहे हेही जाता जाता नमूद करतो Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ऑप्टिमायझेशन मोस्टली पुरुष करतात असं म्हणल्यानंतर देव तुमचं रक्षण करो असं म्ह्णावसं वाटतय

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

परिप्रेक्ष्य अन संदर्भ म्याटर्स हो. दरवेळेस डिस्क्लेमरांचा कंटाळा येऊ लागलाय, करू तरी काय? मुद्दा खोडता येत नसेल तर श्रेणी देऊन गप्प करायचा प्रयत्न करतात, पण त्याने मुद्दा खोडला जात नै हे त्या अज्ञ श्रेणीदात्यांस कळणार कसं?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

असंच एक ऑप्टिमायजेशन:

नुकतेच धुतलेले, पण न इस्त्री केलेले बाहेर वापरायचे शर्ट-प्यांट हँगरला लावून स्नानगृहात लटकवायचे. आंघोळ करतानाच्या वाफेमुळे आपोआप सुरकुत्या निघतात. इस्त्रीचे कष्ट वाचतात.

---
गार पाण्याने आंघोळ करत असाल तर ईश्वर तुमचं भलं करो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

रोचक!!!! पण डज इट वर्क? अंमळ साशंकच आहे मी त्या बाबतीत, यद्यपि कधी करून पाहिले नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

विनोदी पण क्लीशेड

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

The frequency of Rejection is measured in Hurtz.

आपले मत आपल्या पार्श्वभागात (गांडीत) घालावे स्पेशली जर व्याकरण विषयी असेल तर!

तरीही ललित आवडलं

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कपडे घड्या करण्यात मौल्यवान वेळ जातो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

The frequency of Rejection is measured in Hurtz.

आपले मत आपल्या पार्श्वभागात (गांडीत) घालावे स्पेशली जर व्याकरण विषयी असेल तर!

काही हिरविणींना तर कपडे घालण्यातही मौल्यवान वेळ जातो असे वाटते! Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काही हिरविणींना तर कपडे घालण्यातही मौल्यवान वेळ जातो असे वाटते!

अहो , त्या हिरवणी जुन्या झाल्या ज्यांचा कपडे घालण्यात वेळ जाइ.
हल्ली तर कपडे न घालण्यातही त्या वेळ घालवू शकतात!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

दोहोंचेही बरोबर आहे. यात जो फादर आहे तो क्लीशेड आहे. कपडे धुवा , इस्त्री करा या सगळ्यातच वेळ जातो.
त्यापेक्षा जापनीज किमानो घालून फिरणे सोयीस्कर आहे. आला घरी किमानो अडकवला खुंटीला.

नागडी माणसे खोटे बोलू शकत नाहीत.-बल्बेर्त चामू

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

The frequency of Rejection is measured in Hurtz.

आपले मत आपल्या पार्श्वभागात (गांडीत) घालावे स्पेशली जर व्याकरण विषयी असेल तर!

'चड्डीचा ळ' केवळ हुच्च !
__/\__
मग अखेर चिरंजीव कुठे पोचले ? तेलगीकडे तर नाही ना ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

क्लास्सिक!
मुद्दाम निवांत वाचावं म्हणून थांबलो होतो.
सार्थक झालं .

फक्त "बेंबीला थुंकी लावत " हे कळ्ळं नै.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars