आसमाऽऽन में... लाऽऽखों तारें...टॅडॅड्यॉव...

सिनेमातल्या मुख्य पात्रांवर बरंच बोललं जातं. पण एखाददुसर्‍या दृश्यातून नाहीतर एखाद्या वाक्यातून लक्षात राहून गेलेल्या पात्रांची आठवण ना समीक्षक काढत, ना सिनेअभ्यासक.

'सरफरोश'मधला 'आसमाऽऽन में... टॅडॅड्यॉव.. लाऽऽखों तारें...टॅडॅड्यॉव..' या एका ओळीसह लक्षात राहिलेला 'फटका' असो; नाहीतर 'दीवार'मधे 'मैं क्यूं दूंगा? मैं नही दूंगा अपने पैसे...' या ओळीमुळे लक्षात राहिलेला हमाल. हा हमाल म्हणजे सत्यदेव दुबे आहेत, हे मला हल्लीच काही वर्षांपूर्वी कळलं! अशी कितीतरी लहानसहान पात्रं. 'रंगीला'मधला हिरॉईनच्या कपाळावर 'सिर्फ चार बाल...' हवे असणारा डायरेक्टर काय किंवा 'वोह देख मिली.. तू यहाँ दिख रही है...' असं ओरडणारा मिलीचा भाऊ बाबूलाल काय. या व्यक्तिरेखा इतक्या अचूक लक्षात राहण्याचं कारण पटकथेतलं त्यांचं पक्कं स्थान असेल, कलाकाराची ताकद असेल ('एक थी हसीना'मधली रसिकाची भूमिका आठवतेय?) किंवा संवादलेखकाचं कसब ('अरे ओ सांबा!'). पण या मंडळींना त्यांच्या वाटचं श्रेय मिळत नाही, इतकं खरं.

हा धागा त्यांना समर्पित. निर्मात्याच्या कुंचल्याच्या चार-दोन फटकार्‍यांसह लख्ख उभ्या राहिलेल्या चित्रपट, नाटक वा साहित्यातल्या व्यक्तिरेखांबद्दल गप्पा करण्यासाठी.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

धाग्याची कल्पना मजेशीर आहे. अंदाज अपना अपनाला २० वर्षे पूर्ण झाल्याचे कळले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अरे कहना क्या चाहते हो ??

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'मशीन का डेफिनिशन' विचारणार्‍या या प्रोफेसरांची एक जुनी भूमिका आठवते.
'अंगार' या चित्रपटात त्यांच्या वाट्यास काही मोजकीच दृश्ये आहेत. पण प्रत्येक दृश्यात ते त्यांच्या मुलाला (जॅकी श्रॉफ) 'जग्गूऽऽऽ' अशी ते एक वेगळ्याच स्वरात हाक मारत असतात. नंतर एक क्षण असा येतो (रहस्यभेद करीत नाही) की ती हाकच त्यांची डेफिनिशन बनून आपल्या लक्षात राहते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

टीव्हीवरच्या 'ये जो है जिंदगीमधले गाजलेले संवाद'
- थट्टी यिअर का एक्स्पिरियन्स है
- अरे भै ये क्या हो रहा है? (हा आधी आला की 'जाने भी दो यारों' मधला 'बेटा दुर्योधन, ये क्या हो रहा है?' आधी आला हे माहीत नाही.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"अरे भै ये क्या हो रहा है?" हा बहुधा 'टिकू तल्सानिया' या कलाकाराच्या तोंडी आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऐसीकर 'गुंडा'प्रमाणेच मराठी सिनेमेही पाहतात हे कळून डॉले पाणाव्ले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

"यांना आपलं म्हणा"

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

सत्यामधील चंदरचा उल्लेख वर आलाच आहे. चंदरइतकीच आवडलेली एन्ट्री म्हणजे संजय मिश्रा या कलाकाराने केलेला 'विठ्ठल मांजरेकर'या कॉन्ट्रॅक्ट किलरचा रोल. चित्रपटाच्या सुरुवातीलाच 'दुबै से फोन आया था' हे निरागस चेहऱ्याने सांगणाऱ्या कलाकाराचे हे दृश्य प्रदीर्घ काळ लक्षात राहिले.

'माय कझिन विनी'मधील तोतरा वकील ('कायद्याचं बोला' मधला पुष्कर श्रोत्री) , हाही बराच हसवून गेला.

साईनफेल्डमधील न्यूमन, माँकमधील रँडी डिशर, ब्रेकिंगबॅड मधील जेसीचे दोन यडपट मित्र, हाऊस ऑफ कार्ड्स मधील फ्रेडी ही देखील लक्षात राहिलेली पात्रे आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धागा आवडला.

एकंदर धाग्यामधे ज्यांचं वर्णन आलंय त्यांचं वर्णन "स्टॉक कॅरॅक्टर्स" असं केलं जातं. त्यांची काही वैशिष्ट्यं :

- लकबी, विक्षिप्त सवयी.
- पुनरावृत्त होत असणारे घटना प्रसंग
- प्रेक्षकवर्गाशी जवळीक साधू पहाणारी स्वभाववैशिष्ट्ये
- व्यक्तीरेखेमधल्या खोलीचा - म्हणजे डेप्थचा, रूमचा नव्हे - अभाव.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

अंदाज अपना अपना मधले बाप (जगदीप आणि देवेन वर्मा) दोघांनीही मस्त काम केलंय. देवेन वर्मांची सगळीच वाक्य अफलातून आहेत.
याशिवाय, जाने भी दो यारों मधे कमिशनर डिमेलो, नवीन कमिशनर श्रीवास्तव, तर्नेजा आणि त्याचा चमचा कम् सेक्रेटरी अशोक नंबूदरीपाल, आहूजा यांचेसुद्धा मस्त रोल आहेत. द्रौपदी-चीर-हरण सीन मधला अर्जून (धनुष तोड दिया , तीन रुपये का नुकसान कर दिया), युधिष्टीर (शांत गदाधारी भीम शांत), धृतराष्ट्र (ये क्या हो रहा बेटा दुर्योधन) आणि इतर मंडळीही लक्षात राहतील अशीच आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-------------------------------------------

'ओय लक्की, लक्की ओये' चित्रपटात लहानपणीचा लक्की त्याच्या 'डेट'ला घेऊन 'न्यू अमर' हाटलात जातो. त्यावेळी जो वेटर त्यांची ऑर्डर घ्यायला येतो त्याने जब्बरदस्त काम केले आहे. 'राजीव गौर' त्याचे नांव.
"ऐसा करो पनीर पकौडे मँगवा लो; पाँच आते हैं, अढाई-अढाई बाँट लेना"किंवा " पानी फ्री हैं; और 'वह'वाला पानी चाहिये तो घंटे के सौ रुपये लगेंगे " हे म्हणताना त्या संवादफेकीतले बारकावे अतिशय पाहण्या-ऐकण्यासारखे आहेत. दुवा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

१९८८-८९ सालच्या 'फौजी' या हिंदी मालिकेतला उंच, सडपातळ कमान्डो चौहानचे वाक्य, "आय् से चॅप्स् !".
'अभिमन्यू' शाहरुखच्या बडबडीपेक्षा या चौहानचे कायम थंड, आरामात उच्चारलेले 'आय् से चॅप्स् !' ऐकायला आमचे कान आसूसलेले असत. कलाकाराचे नांव : विक्रम चोप्रा. नंतर कधी दिसला नाही तो कुठे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मुन्नाभाई एम.बी.बी.एस. मधला डॉ. रुस्तुम म्हणजे तोच का जो ," एक्स्क्युज मी, रूम बदलने का प्रोसिजर क्या है?" असं विचारतो...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नाही. तो वेगळा.
हा रुस्तुम म्हणजे जो फोनवर मुन्नाबहईला कॉप्या पुरअवतो तो.
शेवटी बघअ एक म्हातारा पारशी आजारी असतो, कॅरम खेळताना क्वीन - कव्हर च्या मागेच पडलेला असतो, त्या म्हातार्‍याचा मुलगा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

घासू गुर्जी के के पठ्ठे ही पचीस सालसे ऐसी पे प्रतिसाद दे रहे है वो batman/ जंतू आके मारके जाता मा कि किरकीरी.

उस्ताद जरा अच्छा श्रेणी तो दे देणा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

The frequency of Rejection is measured in Hurtz.

आपले मत आपल्या पार्श्वभागात (गांडीत) घालावे स्पेशली जर व्याकरण विषयी असेल तर!

धन्यवाद. या धाग्याच्या निमित्ताने अनेक आठवणींची उजळणी झाली.

'माय कझीन विनी' मधला जज आणि पब्लिक डिफेन्डर(https://www.youtube.com/watch?v=ZYCvn7pqEHI)
'नॉटींग हिल' मधला ट्रॅव्हल बुक शॉपमधे विनी द पू मागणारा ग्राहक, बहीण आणि स्पायकी हेही आठवले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'नॉटींग हिल'मधली स्पायकीची बरीच वाक्य तोंडपाठ आहेत. त्याची पुन्हा उजळणी केली. उदा -

"Thunk you, thunk you God."

प्रसिद्ध अभिनेत्री आपल्या घरात टबमध्ये डुंबते आहे हे पाहून परत एकदा बाथरूममध्ये डोकावून "Just checkin'"

आणि सगळ्यात आवडतं ते म्हणजे, "I knew a girl at school called Pandora.... never got to see her box though." तो आख्खा संवादच मजेशीर आहे. (आणि या वाक्यावर स्पायकी हसतो तेव्हा मात्र मला ह्यू ग्रांटचं फार कौतुक वाटतं. इथे न हसणं, काही झालेलंच नाही अशा चेहेऱ्याने "राईट" म्हणणं फारच कठीण काम आहे.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

स्पायकी हे एक प्रकरणच आहे. त्यातला शेवटच्या प्रसंगातला हॉटेल मॅनेजरही लक्षात राहतो. खरं म्हणजे 'नॉटिंग हिल'मधल्या अनेक लहान सहान व्यक्तिरेखा चांगल्याच लक्षात राहिल्या आहेत. उदा. पुस्तकचोर, "गेल्या चित्रपटाकरता तुला किती पैसे मिळाले?", असं विचारणारा मित्र, फ्रूटेरियन मैत्रिण, 'हॉर्स अँड हाउंड'करता मुलाखत देणारी मुलगी व स्पॅनिश माणूस, भेटणारा पत्रकार("तिने तुझ्या आजीकरता आणलेली फुलं ठेऊन घेतली?" असं विचारणारा). आता परत एकदा 'नॉटिंग हिल' बघावासा वाटत आहे.

हॉटेल मॅनेजरवरून आठवलं, 'प्रिटी वुमन' आणि 'जब वुई मेट'मधले(http://www.youtube.com/watch?v=Ey8drp4acLw) हॉटेल मॅनेजरही मजेदार आहेत. 'जब वुई मेट'तला टॅक्सी ड्रायवरही लक्षात राहिला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"खारं.. लक्श्या!" असे म्हणून चुलीसमोर बसुन तव्यावरच्या गरम भाकर्‍या हमखास ताटात टाकणार्‍या अलका इनामदार!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अब्बा चब्बा डब्बा

जुदाइ चित्रपटात त्या एका बाईचा डबल रोल आहे. आई आणि मुलगी असा.
त्यातल्या मुलिचे ब्रीदवाक्य.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

स्थळ- 'रतलाम'की गलीयां. 'तसल्या' लॉजमधलं रिसेप्शन.
रिसेप्शनवाला- कहां मिली?
शाहीद- ट्रेनमे
रि- ट्रेनमे? ट्रेनमे?
शाहिद- सुनो, माल कैसा है?
रि- एकदम कडक, बियुटी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रिसेप्शनवाला -त्याचं नाव टेडी मौर्य आहे.. इम्तियाझ अलीच्या बहुतेक चित्रपटांत आहे तो, बहुधा प्रोडक्शन सांभाळत असावा..
रॉकस्टार मधल्या "फिर से उड चला" च्या डिस्कोत नाचताना, किंवा "शहर मे हू मै तेरे" तल्या स्टूडिओत आहे तो Dirol

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पाने