साजण / काही चोरोळ्या

हिंदीत अमीर खुसरो यांनी 'साजन ' या विषया वर कित्येक मनोरंजक पहेलियाँ (चारोळी स्वरूपात लिहिल्या होत्या) त्याच धर्ती वर आजच्या परिस्थिनुसार काही 'साजण' चोरोळ्या (कोडे स्वरूपातल्या)

(१)

लपत छपत तो बिछान्यात येतो
गोड गोड गाणी कानात म्हणतो
कधी चुंबितो कधी चावतो
सारी रात्र मला तो छळतो

का सखी साजण?
ना सखी डास.

(२)

कधी काळी येतो
गोड गोड बोलतो
खोटी वचने देऊनी
सर्वस्व लुबाडीतो

का सखी साजण?
ना सखी नेता.

(३)

कधी येते, कधी जाते
सारी रात्र मला ती छळते.
तिच्या विना न चैन मिळे
तिच्या साठी आसुसले डोळे.

का सखा साजणी ?
ना सखा वीज

field_vote: 
2
Your rating: None Average: 2 (1 vote)

प्रतिक्रिया

चारोळ्या आवडल्या. मात्र तिसर्‍या चारोळीतला साजण लेस्बीयन आहे का ? नाही "वीज" मराठीत स्त्रीलींगी असते म्हणून विचारले. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पुन्हा वाचा

का सखा साजणी ?
ना सखा वीज

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

स्तुत्य प्रयत्न. आमीर खुस्रो च्या mukariyaa अन पहेलीया "http://hindisamay.com/" वरती वाचल्या आहेतच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0