श्यामलेचे उत्तर

Formattingच्या मोठ्या अडचणीमुळे "श्यामलेचे उत्तर" ही माझी २०१ क्रमांकाची (किंवा इतर कुठलीही) "गंमतिका" इथे मी नमूद न करू शकल्याने माझ्या संबंधित वेब्‌साइट्‌चा फक्त ‌दुवा मी इथे देत आहे ह्याबद्दल क्षमायाचना!

http://mybolikawita.blogspot.com/

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

ब्लॉगची लिंक देण्याऐवजी एखादी कविता कॉपी पेस्ट केली तर अधिक लोकांना त्यावर चर्चा करणं सोपं जाईल. मी इथेच त्यातल्या कविता कॉपी पेस्ट करून बघितल्या - शेजारी शेजारी येण्याऐवजी एकाखाली एक आल्या - यापेक्षा इतर काही फॉर्मॅटिंगची अडचण आली नाही.

ती २०१ क्रमांकाची कविता वाचली. अत्र्यांनी जे वृत्त साधलेलं आहे ते तुमच्या 'उत्तरा'त नीट जमलेलं नाही. विडंबन फक्कड जमण्यासाठी त्याहीपलिकडे बरंच लागतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

http://mybolikawita.blogspot.com/ ह्या माझ्या वेब्‌साइट्‌मधल्या प्रत्येक "कवितायुगलां"मधे डाव्या बाजूला मी कोणत्यातरी मान्यवर कवींची किंवा कवयित्रींची कविता उद्धृत केली आहे आणि उजव्या बाजूला माझी "गंमतिका" लिहिली आहे. प्रत्येक "कवितायुगला"च्या शिरोभागी मी खालची तीन वाक्ये हेतुपूर्वक लिहिली आहेत.

---------------------------------------------------------------

खालची डावीकडची कविता एका मान्यवर कवींची आहे. उजवीकडे त्या कवितेचे एक वेषांतरित रूप आहे. शब्दांच्या खेळातून निर्माण होणार्‍या मनोरंजनापलिकडे त्या वेषांतरित रूपाचा कोणताही हेतू नाही!

---------------------------------------------------------------

"विडंबन" ह्या शब्दात उपहास गर्भित असतो. वरच्या तीन वाक्यांमधे मी सुचवल्याप्रमाणे माझ्या "गंमतिकां"मधे उपहास/"विडंबन" गर्भित नाही; म्हणूनच मी माझ्या "रचनां"ना "गंमतिका" हे नाव दिले होते. दुसर्‍या शब्दात, माझ्या रचना "विडंबनकविता’’ नाहीत.

माझ्या आधल्या "पोस्ट"मधे मी लिहिलेली माझी मुख्य अडचण होती ती (http://mybolikawita.blogspot.com/ ह्या माझ्या वेब्‌साइट्‌मधे आहे त्याप्रमाणे) "गंमतिका" मूळ कवितेच्या उजव्या बाजूला "पेस्ट" न करू शकण्याबाबत. माझ्या "गंमतिका" मूळ कवितेच्या (खाली असण्याऐवजी) उजव्या बाजूला असणे मला महत्त्वाचे वाटते. (ते का ते उघड आहे.)

"अत्र्यांनी जे वृत्त साधलेलं आहे ते तुमच्या 'उत्तरा'त नीट जमलेलं नाही. विडंबन फक्कड जमण्यासाठी त्याहीपलिकडे बरंच लागतं" ह्या तुमच्या समालोचनातल्या पहिल्या वाक्याबद्दल माझा आक्षेप अजिबात नाही; कारण वेगवेगळे समालोचक वेगवेगळी समालोचने नेहमीच करत असतात. पण माझ्या "गंमतिका" "फक्कड" जमलेल्या असोत वा रद्दीत टाकायच्या लायकीच्या असोत, "गंमतिका" "फक्कड" जमण्याकरता त्यांमधे कोणकोणते गुण असावे लागतात ह्याची मला निदान जाण आहे की नाही ह्याची (तुम्ही मला आजपर्यंत कधीही भेटलेले नसल्यामुळे) तुम्हाला काडीइतकीही कल्पना नसतानाही ती जाण मला नसल्याचे तुमच्या दुसर्‍या वाक्यातल्या "त्याहीपलिकडे बरंच लागतं" ह्या शब्दसमुच्चयाद्वारे तुम्ही ध्वनित केलेले वाचून मला जरा गंमत वाटली!

असो. (पूर्वीच्या पत्रव्यवहारांच्या शेवटी लिहिण्याची प्रथा असे त्याप्रमाणे) क. लो. अ. हे वि. (कळावे; लोभ असावा हे विनंती.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एक मराठी असामी

माझ्या "गंमतिका" मूळ कवितेच्या (खाली असण्याऐवजी) उजव्या बाजूला असणे मला महत्त्वाचे वाटते.

शेजारी शेजारी चिकटवण्यासाठी या प्रतिसादाच्या तळात दिलेलं एचटीएमेल कोड तुमच्या लेखात कॉपी पेस्ट करा. प्रत्येक < नंतरचे व > च्या आधीचा स्पेस काढून टाका. त्यानंतर योग्य ठिकाणी योग्य ते टेक्स्ट चिकटवा. तुमच्या कविता शेजारी शेजारी दिसतील.

तुम्हाला विडंबन किंवा गंमतिका फक्कड होण्याकरता काय लागतं याची जाण कितपत आहे याबद्दल मला अवाक्षरही काढायचं नाही. तुम्ही जे सादर केलेलं आहे ते फक्कड जमलेलं नाही इतकंच म्हणायचं आहे. व्यक्तिगत टिप्पणी नाही, गैरसमज नसावा.

पुढच्या ओळीपासून एचटीएमेल कोड सुरू होतं.

< table style="width:600px" >
< tr >
< td >< b >कोकिलान्योक्ती (मूळ)< /b >< /td >
< td >< b >राजकारण्यन्योक्ती ("उत्तर")< /b >< /td >
< /tr >
< tr >
< td >येथे समस्त बहिरे वसताती लोक,
का भाषणे मधुर तू करिशी अनेक.
हे मूर्ख त्यांस किमपीहि नसे विवेक,
वर्णावरून तुजला गणतील काक.
...< /td >
< td >येथे समस्त हुशार वसताती लोक,
जरी भाषणे मधुर तू करिशी अनेक.
ते सूज्ञ त्यांस असे नीरक्षीरविवेक,
विलंबाविना तुजला जाणतील काक;
तरी सल्ला राजकारणत्याग तू करून टाक!< /td >
< /tr >
< /table >

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काही समांतरे वाचली.
उदाहराणार्थ कृष्णशास्त्री चिपळूणकरांच्या अन्योक्ती :

------------------------------

कोकिलान्योक्ती (मूळ) राजकारण्यन्योक्ती ("उत्तर")
येथे समस्त बहिरे वसताती लोक,
का भाषणे मधुर तू करिशी अनेक.
हे मूर्ख त्यांस किमपीहि नसे विवेक,
वर्णावरून तुजला गणतील काक.
...
येथे समस्त हुशार वसताती लोक,
जरी भाषणे मधुर तू करिशी अनेक.
ते सूज्ञ त्यांस असे नीरक्षीरविवेक,
विलंबाविना तुजला जाणतील काक;
तरी सल्ला राजकारणत्याग तू करून टाक!

------------------------------
अशा बाबतीत मूळचे वृत्त पाळले तर परिणाम अधिक साधता येईल असे वाटते. पुढील लेखनाकरिता शुभेच्छा.

राजेश घासकडवी यांच्या प्रतिसादाला +१

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

राजेश, एचटीएमेल कोड पुरवल्याबद्दल धन्यवाद!

गंमत म्हणजे माझ्या http://mybolikawita.blogspot.com/ वेब्‌साइट्‌मधे मी माझ्या गंमतिका "पोस्ट" केल्या होत्या तेव्हा तुम्ही पुरवले आहेत त्याचसदृश "एचटीएमेल कोड" मी वापरले होते, पण तेच "कोड" माझी कोणतीही गंमतिका इथे "पोस्ट" करतानाही वापरले असता ती मूळ कवितेच्या (खाली असण्याऐवजी) उजव्या बाजूला सादर करण्यासंबांधितचे माझे कोडे सुटेल हे माझ्या ध्यानात आले नव्ह्ते! (ते असो, http://mybolikawita.blogspot.com/ वेब्‌साइट्‌ची आता "ऐसी अक्षरे"च्या वाचकांना जाण मिळाल्याने माझ्या गंमतिका इथे पुन्हा "पोस्ट" करण्यात अर्थात्‌ काहीएक औचित्य नाही.)

पण तुम्ही पुरवलेले कोड केवळ चाचणीकरता वापरून पाहूया ह्या विचाराने मी जेव्हा ते "कॉपी/पेस्ट" केले तेव्हा निदान ""पूर्वदृश्या"त तरी संबंधित गंमतिका मूळ कवितेच्या उजव्या बाजूला न दिसता ते कोडच मला जसेच्या तसे दिसले. समजा मी त्यानंतर "प्रकाशित" करा असे "म्हटले" असते तर गंमतिका मूळ कवितेच्या उजव्या बाजूला दिसली असती का? समजा असती तरी त्या पद्धतीत एक उणीव अशी राहिली असती की ती सगळी पोस्ट मला अगदी पाहिजे तशी अचूकपणे दिसणार की नाही ह्याबद्दल मला अगदी महत्त्वाचा संदेह राहिला असता. तर त्यासंबंधी तुम्ही तांत्रिक खुलासा केला असता तो उपयुक्त ठरेल.

आता दुसर्‍या एका काहीश्या किरकोळ विषयासंबंधी नम्रपणे लिहू का? तुम्ही लिहिले आहे - "तुम्हाला विडंबन किंवा गंमतिका फक्कड होण्याकरता काय लागतं याची जाण कितपत आहे याबद्दल मला अवाक्षरही काढायचं नाही. तुम्ही जे सादर केलेलं आहे ते फक्कड जमलेलं नाही इतकंच म्हणायचं आहे. व्यक्तिगत टिप्पणी नाही, गैरसमज नसावा." पण मी पूर्वी लिहिल्याप्रमाणे "गंमतिका" "फक्कड" जमण्याकरता त्यांमधे कोणकोणते गुण असावे लागतात ह्याची मला जाण नसल्याचे तुमच्या "त्याहीपलिकडे बरंच लागतं" ह्या शब्दसमुच्चयाद्वारे ध्वनित झाले होते आणि ते वाचून मी लिहिल्याप्रमाणे मला जरा गंमत वाटली होती इतकेच.

असो. तो किरकोळ मुद्दा बाजूला ठेवून, गंमतिकारचनासंबंधित माझ्या वैयक्तिक "कौशल्या"च्या परिमितीत http://mybolikawita.blogspot.com/ ह्या माझ्या वेब्‌साइट्‌मधल्या गंमतिका फक्कड दर्जाच्या नाहीत हे तुमचे वैयक्तिक समीक्षण तुम्ही लिहिल्याबद्दल आणि त्यानंतर एचटीएमेल कोड पुरवल्याबद्दलही, राजेश, खूप धन्यवाद!

क. लो. अ. हे वि.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एक मराठी असामी

तुम्ही पुरवलेले कोड केवळ चाचणीकरता वापरून पाहूया ह्या विचाराने मी जेव्हा ते "कॉपी/पेस्ट" केले तेव्हा निदान ""पूर्वदृश्या"त तरी संबंधित गंमतिका मूळ कवितेच्या उजव्या बाजूला न दिसता ते कोडच मला जसेच्या तसे दिसले.

तुम्ही '<' नंतरच्या आणि '>' आधीच्या स्पेसेज डिलीट केल्या नसाव्यात.

तुमचा 'लेख' आणि तुमचे दोन प्रतिसाद यामध्ये मिळून तुमच्या ब्लॉगची लिंक तुम्ही सहावेळा दिलेली आहे ही मला एक फक्कड गंमतिका वाटली. असो.

एक नम्रपणे तुम्हालाही विचारू का? तुम्हाला तुमच्या गंमतिका खरोखरच सुधरायच्या आहेत का? कारण या साइटवर अनेक जण असे आहेत जे तुम्हाला तुमचं तंत्र सुधारण्यासाठी मदत करू शकतील. ते न करता तुम्हाला केवळ समीक्षणाबद्दल धन्यवाद देऊन, काहीतरी ध्वनित झाल्याबद्दल गंमत वाटून घ्यायची असेल आणि आपल्या ब्लॉगची लिंक अनेक वेळा देऊन लोक वाचतील अशी आशा करायची असेल तर ते फक्कड जमलेलं आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रतिसादात ट्याग कसे वापरायचे हे शिकवण्यासाठी एचटीएमएल एनकोडर वापरल्यास अधिकच्या स्पेसेस वगैरे कटकटी कराव्या लागणार नाहीत.

http://www.opinionatedgeek.com/DotNet/Tools/HTMLEncode/encode.aspx

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0