आजीआजोबा आणि नातवंडे (भाग ३ अंतिम)

भाग १ http://www.aisiakshare.com/node/2956
भाग २ http://www.aisiakshare.com/node/2959
मुलांकडे परदेशात कायमचे रहायला गेलेल्या आजीआजोबांची संख्या किंवा टक्केवारी सध्या तरी नगण्य म्हणण्याइतकी अगदी कमी आहे. अमेरिकेतल्या समाजातल्या लोकांचे सरासरी आयुर्मान वाढले असले तरी तिथले वृध्द क्वचितच त्यांच्या मुलाबाळांसोबत राहतात. ते स्वतंत्रपणे किंवा ओल्डएजहोम्समध्ये रहात असतात. त्यामुळे तिकडे स्थायिक झालेल्या सगळ्या भारतीयांनाही आपल्या आईवडिलांना आपल्याबरोबर राहण्यासाठी तिकडे आणावे असे वाटेलच असे नाही. काही लोक तसा प्रयत्नच करत नसतील. त्याचप्रमाणे भारतात संपूर्ण आयुष्य घालवल्यानंतर अखेरीस वेगळ्या देशातल्या वेगळ्या वातावरणात जायलाही बहुतेक लोक तयार होत नाहीत. काही जणांचा एकादा मुलगा किंवा मुलगी भारतातच असतात. त्यांना त्यांचा आधार असतो. आजकाल वैद्यकीय क्षेत्रात झालेल्या प्रगतीमुळे काही लोक उतारवयातसुद्धा स्वतंत्रपणे मजेत राहू शकण्याइतके धट्टेकट्टे असतात, काही लोकांनी इतर काही व्यवस्था केलेली असते. काही लोक "ठेविले अनंते तैसेचि रहावे, चित्ती असो द्यावे समाधान" किंवा "तुका म्हणे स्वस्थ रहावे, जे जे होईल ते ते पहावे" असे म्हणत काळ कंठत असतात.

चौथ्या आणि अखेरच्या उदाहरणातले आजीआजोबा भारतातच राहतात, पण त्यांची दोन्ही मुले परदेशात गेली आहेत. त्या दोघांचाही प्रेमविवाह झाला आहे. मुलीने बंगाली बाबू मोशाय निवडला आहे, तर मुलाची पत्नी मल्याळीभाषी केरळकन्या आहे. मुलगी आणि जावई दोघेही शास्त्रीय संशोधन करतात. आपापल्या क्षेत्रात जगात इतरत्र कोणकोणते संशोधन चालले आहे याचा अभ्यास करणे, स्वतःच्या संशोधनावर शोधनिबंध लिहिणे, त्यांना शास्त्रविषयक नियतकालिकांमध्ये (सायंटिफिक जर्नल्स) प्रसिद्ध करणे, त्यांचे पेटंट्स मिळवणे, अधिकाधिक सेमिनार्स, कॉन्फरन्सेस वगैरेंमध्ये जाऊन त्यात सहभाग घेणे हेच त्यांचे जीवन आहे. भरपूर नावलौकिक आणि पैसे कमवावेत आणि आपले राहणीमान शक्य तितक्या उच्च दर्जाचे ठेवावे असे त्यांना वाटते. मुलांना जन्म देणे, त्यांचे संगोपन करणे यामुळे त्यात व्यत्यय येऊ नये म्हणून त्यांनी 'डिंक (डबल इनकम नो किड्स) कपल' राहण्याचा निर्णय घेतला आहे.

आजीआजोबांच्या मुलाच्या वंशवेलीवर दोन फुले उमलली आहेत. अमेरिकेत जन्माला आलेल्या प्रत्येक बाळाला आपोआप तिथले नागरिकत्व मिळते असा तिकडचा नियम आहे. कदाचित अन्य देशात आणि भारतातसुद्धा असे नियम असले तरी मला त्याची माहिती नाही. दोन तीन वर्षांच्या काळासाठी अमेरिकेत गेलेले काही लोक सुद्धा आपल्या मुलांना अमेरिकेचे नागरिकत्व मिळावे म्हणून त्यांनी तिथेच जन्माला यावे असा आग्रह धरतात. आपल्या या गोष्टीतल्या आजीआजोबांच्या पहिल्या नातवंडाच्या जन्माच्या वेळी त्यांना स्वतः तिकडे जाण्याची खूप इच्छा होती. त्यात पहिल्या नातवंडाला जन्मल्याबरोबर पाहणे तर होतेच, अशा नाजुक वेळी आपण आपल्या मुलासोबत असलेच पाहिजे, ते आपले कर्तव्य आहे असे त्यांना वाटत होते. अमेरिकेच्या व्हिसासाठी दिलेल्या इंटरव्ह्यूमध्ये त्यांच्या मते अत्यंत सबळ असलेले हे कारण त्यांनी मोठ्या अभिमानाने सांगितले. पण तो घेणार्‍या अमेरिकन अधिका-याला मात्र ते कारण पटले नाही. "आमच्या देशातली वैद्यकीय व्यवस्था सर्वोत्कृष्ट आहे, बाळबाळंतिणींची सर्वतोपरी काळजी घेण्यासाठी ती समर्थ असल्यामुळे असल्या सबबीवर बाहेरून कोणाला तिकडे येण्याची गरज नाही." असा शेरा मारून त्यांचा अर्ज फेटाळला गेला.

त्यांना व्हिसासाठी पुन्हा अर्ज करण्याची संधी एक वर्षानंतर मिळाली या वेळी मात्र "तुमच्या सुंदर देशातली अद्भूत स्थळे आणि तिथली अद्ययावत शहरे वगैरेंची शोभा पाहण्यासाठी आणि मौजमजा करण्यासाठी आम्हाला तिकडे जायचे आहे." असे सांगितल्यावर त्यांना दहा वर्षांसाठी व्हिसा मिळाला, पण एका भेटीमध्ये फक्त सहा महिनेच राहण्याची परवानगी होती. त्यानुसार त्यांनीही तिकडे सहा महिने राहण्याचा बेत आखला. मुलाकडे जाऊन पोचल्यानंतर नातीचे कौतुक, मुलाशी बोलणे आणि तिकडची घरे, घरातल्या विविध सोयी, उद्याने, रस्ते, इमारती, बाजार वगैरे पाहून थक्क होण्यात पहिले दोन आठवडे अगदी स्वर्गसुखात गेले. त्यानंतर नव्याची नवलाई ओसरू लागली आणि महिना दीड महिना संपेपर्यंत थोडा कंटाळा यायला सुरुवात झाली. हवेतला गारवा वाढू लागला आणि घराबाहेर पडणे कठीण होऊ लागले. चोवीस तास घरात बसून राहण्याची स्थानबद्धता जाचक वाटू लागली. आणखी महिनाभर मुलाकडे राहून झाल्यावर मुलीला भेटायला आणि थोडे दिवस तिच्याकडे रहायला गेले. पण ते दोघे आपापल्या विश्वात मग्न झालेले असायचे. यामुळे आजीआजोबांना जास्तच एकाकीपणा यायला लागला. वाढत जाणारी कडाक्याची थंडी सहन होत नसल्यामुळे दमाखोकला वगैरेंनी उचल खाल्ली, वारंवार अंग मोडून येऊन ठणकायला लागले. या शारीरिक यातना सहन करणे कठीण होत गेल्यामुळे आजीआजोबांनी आपला दौरा आवरता घेतला आणि तीन महिन्यांनंतरच ते मायदेशी परतले. यानंतर पुन्हा कधी अमेरिकेला जायचे असल्यास उन्हाळ्यातच असे त्यांनी ठरवले.

एकदा अमेरिकेची वारी करून परत आल्यानंतर त्या आजीआजोबांना पुन्हा अमेरिकेला जायचा योग त्यानंतर जुळून आलाच नाही. त्यांच्या नातवाच्या जन्माच्या वेळेस नेमका कडक हिवाळा होता आणि त्यानंतर आलेल्या उन्हाळ्यात भारतातल्या जवळच्या आप्ताच्या मुलीचे लग्न असल्यामुळे त्यांना त्यातली महत्वाची आणि जबाबदारीची कामगिरी सोपवली गेली होती. त्यानंतरच्या वर्षी त्यांना प्रकृतिअस्वास्थ्यामुळे परदेशी जाता आले नाही. त्याच्या पुढल्या वर्षी त्यांच्या मुलालाच भारतात यायचे होते, म्हणून ते गेले नाहीत. पण मुलालाही इकडे येणे जमले नाही. त्याला कधी नोकरी, कधी शहर तर कधी तिथले घर बदलायचे होते, कधी मुलांच्या शाळेच्या अॅड्मिशन घ्यायच्या होत्या, कधी ड्रायव्हिंग लायसेन्सची मुदत वाढवून घेण्याचे काम करून घ्यायचे होते, तर कधी ऑफिसमधून सुटी मिळू शकत नव्हती. अशा निरनिराळ्या कारणाने त्यांना दोन वर्षे येता आले नाही. अखेर सगळे प्रॉब्लेम सुटून त्यांचे येण्याचे नक्की ठरले आणि तिकीटे काढली गेली.

आजीआजोबांनी आपल्या मुलाच्या आणि नातवंडांच्या आगमनाच्या तारखेवर कॅलेंडरमध्ये ठळक अक्षरात खूण करून ठेवली आणि उरलेले दिवस मोजायला सुरुवात केली. आता ते त्यांच्या आगमनाच्या तयारीला लागले. घराची डागडुजी करून भिंतींना नवे रंग लावून घेतले. ते काम करून घेतांना बरीचशी जुनी अडगळ काढून टाकून मुलांच्या सामानासाठी जागा केली. त्यांच्यासाठी एक बेडरूम रिकामी करून ठेवली. तिथल्या कपाटांमधले सामान दुसरीकडे हलवले. त्या बेडरूमला एअर कंडीशनर बसवून घेतला. पहिल्या रेफ्रिजरेटरच्या दुप्पट आकाराचा मोठा रेफ्रिजरेटर घरात आणला, घरातल्या टीव्हीवर जगातले सगळे चॅनेल्स पाहण्याची व्यवस्था केली. काजू, बदाम, पिस्ते, बेदाणे वगैरे सुक्या मेव्याची पाकिटे आणून ठेवली. बेसनाचे लाडू, नारळाच्या वड्या, खमंग चकल्या, आळूवड्या वगैरे मुलाच्या आवडीचे पदार्थ तयार करून डब्यात भरून ठेवले. नातवंडांसाठी बाजारात मिळतील तेवढ्या प्रकारची चॉकलेट्स, बिस्किटे, कुकीज वगैरे आणून ठेवली. त्यांच्यासाठी छान छान खेळणी आणि कपडे आणले. त्या काळात आजीआजोबांच्या मनाला दुसरा कुठला विचारच शिवत नव्हता.

नातवंडांच्या आगमनाचा दिवस उजाडण्याच्या आधीपासूनच आजीआजोबांनी त्यांच्या विमानाचे स्टेटस इंटरनेटवर पहायला सुरुवात केली. तिकडून निघतांना मुलाने फोन केला होताच, त्यांचे विमान मुंबईच्या विमानतळावर पोचल्याचे इंटरनेटवर पाहताच आजीआजोबांना खूप आनंद झाला. पाठोपाठ त्यांच्या मुलाचा इकडे येऊन पोचल्याचा फोनही आलाच. आता बाल्कनीत उभे राहून दोघेही टॅक्सीच्या येण्याची वाट पहायला लागले. गेटपाशी एक टॅक्सी आलेली दिसताच त्यातून कोण कोण उतरत आहे हे पाहिले. आजींनी आत जाऊन आरतीचे तबक तयार करून आणले. तोपर्यंत सगळेजण दारापर्यंत येऊन पोचलेच होते. आधी तर नातवंडांनी दुडूदुडू धावत पुढे येऊन दरवाजा ठोठावला, पण तो उघडल्यावर मात्र लाजून मागे सरली आणि त्यांच्या आईवडिलांच्या मागे दडून उभी राहिली. त्यांच्यावरून भाकरीचा तुकडा ओवाळून टाकल्यानंतर आणि औक्षण करून झाल्यावर सर्वांनी घरात प्रवेश केला.

नातवंडे आधी थोडी बिचकत होती, पण थोड्याच वेळात नव्या जागेत रुळली. घरभर हिंडून इकडच्या वस्तू तिकडे करू लागली, त्यांची उलथापालथ करू लागली. शोकेसमधल्या शोभेच्या वस्तू बाहेर काढून त्यांच्याशी खेळू लागली. ते करत असतांना त्यांच्या चेहेर्‍यावर ओसंडून वाहणारा आनंद निव्वळ अपूर्व होता. हर्षोल्लासातून आणि एका प्रकारच्या विजयोन्मादातून त्यांनी काढलेले चित्कार खूप गोड वाटत होते. हेच पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी आजीआजोबांनी किती वर्षे अधीरतेने वाट पाहिली होती. त्याचे सार्थक झाले होते. आधी तर आजीआजोबांना त्यांच्या उत्साहाचे आणि अॅक्टिव्हपणाचे अमाप कौतुक वाटले, पण ते पाहून त्या मुलांना अधिकच चेव चढला. त्यांचा धागडधिंगा जरा अतीच होऊ लागल्यावर त्याला आळा घालणे आवश्यक होते. मोठी मुलगी जरासे दटावल्यावर थांबली, पण लहानगा तर काहीही समजून घेण्याच्या वयाचा नव्हताच. त्यामुळे कोणतीही नाजुक किंवा धोकादायक वस्तू त्याच्या हाताला लागू न देणे एवढाच उपाय होता. अशा सगळ्या वस्तू भराभर उचलून उंचावर किंवा कडीकुलुपात बंद करून ठेवाव्या लागल्या. तरीही काही वस्तूंची मोडतोड झालीच. शिवाय उचलून ठेवलेल्या वस्तूच हव्या म्हणून थोडी रडारडही झाली.

मुलांचे लक्ष दुसरीकडे वेधण्यासाठी त्यांना टेलिव्हिजन लावून दिला. अर्थातच त्यांच्या आवडीची कार्टून्स दाखवणारी चॅनेल्स पाहण्याचा हट्ट त्यांनी धरला. रिमोट कंट्रोलने ते चॅनेल्स लावणे समजायला त्यांना काहीच वेळ लागला नाही. त्यानंतर दिवसाचा बहुतेक वेळ घरातल्या एकमेव टीव्हीवर पोगो, निक, सीबीबी, डिस्ने ज्युनियर वगैरे किड्स चॅनेल्सच लागलेले असत. कोणीच ते लक्ष देऊन पहात नसले तरी बॅकग्राऊंडवर ते चालत असणे आवश्यक बनले. माई, नाना, आईआजी, भाबो वगैरे आजीआजोबांच्या रोजच्या पाहण्यातली मंडळी आता त्यांना भेटेनाशी झाली. टीव्हीवर ताबा मिळवल्यानंतर मुलांनी घरातल्या टॅब्लेट आणि सेलफोन्सकडे मोर्चा वळवला आणि त्यावर असलेले गेम्स खेळायला लागले. आजकाल सगळ्या गोष्टी इतक्या यूजर फ्रेंडली झाल्या आहेत की अक्षरओळख नसलेली मुलेसुद्धा आयकॉन्सवर आपली चिमुकली बोटे दाबून सटासट खेळ सुरू करून खेळत बसतात किंवा मेमरीत साठवून ठेवलेली चित्रे आणि चलचित्रे पहात बसतात. त्यांचा सगळा वेळ यातच जात असल्यामुळे त्यांचे आजीआजोबांच्या शेजारी बसणे फारसे झाले नाही.

खास मुलांसाठी तयार केलेल्या पाचक आणि पौष्टिक द्रव्यांच्या पिठांचे खूपसे डबे त्यांच्या आईने अमेरिकेतून येतांना आणले होते. दिवसातल्या ठराविक वेळी त्यातल्या ठराविक पॉवडरचे १-२ चमचे उकळलेल्या पाण्यात किंवा दुधात मिसळून ती त्यांना खायला किंवा प्यायला देत होती. डाळ, तांदूळ वगैरे शिजवून आणि गाजर, टोमॅटो, दुधी वगैरेंना वाफवून ते पदार्थही घड्याळाच्या ठोक्याप्रमाणे त्यांना खायला घालत होती. भारतातले अरबट चरबट काही खाऊन त्यांची पोटे बिघडू नयेत किंवा त्यांना कसल्याही संसर्गाची बाधा होऊ नये यासाठी ही दक्षता घेतली जात होती. आपल्या नातवंडांसाठी मुगाच्या डाळीची ऊनऊन खिचडी किंवा शेवयाची खीर अशासारखे नवनवे पदार्थ तयार करून त्यांना आपल्या हाताने भरवावेत असे आजीच्या मनात रोज आले तरी ते प्रत्यक्षात आणायला फारसा वाव मिळत नसल्याने तिने आपला हात आवरता घेतला.

अमेरिकेत असतांना दोन्ही मुलांच्या कानावर कधी एकाददुसरा मराठी शब्द पडला असला तर असेल, त्याचा अर्थ थोडासा समजलाही असेल, पण त्यांच्या बोलण्यात तो येत नव्हता. मोठी मुलगी इंग्रजीत काही सोपी वाक्ये बोलायची. पण तिच्या अमेरिकन अॅक्सेंटमुळे तिचे बोलणे समजून घेणे आणि तिच्या बोलीत तिला समजेल असे काही सांगणे आजीआजोबांना जरासे अवघड जात होते. लहान मुलाचे इंग्रजीतले बोबडे बोल कळणे जवळ जवळ अशक्यप्राय होते. त्यामुळे आजीआजोबांना त्यांच्या नातवंडांशी त्यांना हवा होता तेवढा संवाद साधता येत नव्हता. त्यांना मांडीवर बसवून काऊचिऊच्या गोष्टी सांगणे दूरच, सिंड्रेला किंवा स्नोव्हाइटची गोष्ट सांगणेसुद्धा कठीण होत होते.

अमेरिकेतून आलेल्या मंडळींचा भारतातला कार्यक्रम चांगलाच धावपळीचा होता. अमेरिकन वकीलातीत जाऊन व्हिसाचे स्टँपिंग करून घेणे अत्यावश्यक होते. त्याची पूर्वतयारी करण्यात आणि वकीलातीच्या चकरा मारण्यात दोन चार दिवस गेले. भारतातले इतर नातेवाईक, मित्रमैत्रिणी वगैरेंना भेटण्यात काही दिवस गेले, त्यासाठी दोन तीन वेळा परगावी जाऊन येणेही झाले. सुनेला तिच्या माहेरी काही दिवस रहाण्यासाठी आणि तिच्या नातेवाइकांना भेटण्यासाठी केरळ कर्नाटकाची वारी करून झाली. त्या गडबडीतच भारतातली एक दोन निसर्गरम्य पर्यटनस्थळे, तीर्थक्षेत्रे वगैरेंना भेटी देऊन झाल्या. हे करता करता त्यांना अमेरिकेला परतायचा दिवसही उजाडला. यात आजीआजोबांना त्यांच्या नातवंडांसमवेत अगदी मोजके दिवसच घालवायला मिळाले. त्यातला क्षण न् क्षण सार्थकी लावण्याचा यथाशक्ती प्रयत्न त्यांनी केला.

"आता पुढल्या वर्षी तुम्ही दोघे अमेरिकेला या." आणि "आम्ही आमची पुढची ट्रिप नक्की लवकरात लवकर करू." वगैरे मुलाने आणि सुनेने घरातून निघतांना आईवडिलांना सांगितले. नातवंडांना निरोप देतांना आजीआजोबांचे डोळे भरून आले. त्या दोघांना आता पुन्हा याच रूपात त्यांना पहायला मिळणार नव्हते. पुढच्या भेटीपर्यंत ते दोघेही मोठे होऊन किती तरी बदललेले असणार, याची जाणीव झाल्याने ते त्यांना डोळे भरून पाहून घेत होते, पण वयोमानानुसार अधू होत चाललेली त्यांची दृष्टी अश्रूंमुळे जास्तच अंधुक झाली होती. मुले मात्र आता आपल्या विश्वात परत जाणार म्हणून खूष दिसत होती. आजीआजोबांच्या लहानपणी त्यांच्या आजीआजोबांना सोडून जातांना ते त्यांच्या गळ्य़ात पडून रडायचे याची त्यांना आठवण झाली, पण त्यांच्या नातवंडांनी मात्र त्यांना आनंदाने हात हलवून बाय बाय केले. त्यांची ही हंसरी छबीच लक्षात ठेवली गेली हे ही एका परीने चांगलेच झाले. नातवंडांच्या चार दिवसांच्या अत्यल्प सहवासानेसुद्धा आजीआजोबांना एक अपूर्व असा आनंद मिळवून दिलाच, पण त्यांचे येणे आणि जाणे त्यांना एकाद्या लहानशा वावटळीसारखे भासले. त्याने सुखद गारवा आणला, पण घरट्याच्या काही काड्या किंचित विस्कटल्या. त्यांना पुन्हा जुळवून घ्यायच्या की तशाच राहू द्यायच्या हे त्यांना सुचत नव्हते.

गेल्या शतकात मध्यमवर्गीयांच्या जीवनात आमूलाग्र बदल झाले. पूर्वीच्या काळातले लोक खेड्यापाड्यांमध्ये एकत्र कुटुंबामध्ये रहात असत. त्यांच्या पिढ्या न् पिढ्या एकाच चाकोरीत रहात असल्यामुळे दोन पिढयांमधल्या माणसांच्या आचारविचारात फरक नसायचा. कुटुंबातल्या ज्येष्ठ व्यक्ती म्हणजे आजीआजोबांचे स्थान कुटुंबप्रमुखाचे असायचे. नातवंडांशी त्यांचा अत्यंत निकटचा संबंध येत असल्याने त्यांच्यात अतिशय जिव्हाळ्याचे घट्ट नाते निर्माण होत असे. मधल्या पिढीतले बरेचसे लोक उदरनिर्वाहासाठी मुंबईपुण्यासारख्या शहरात येऊन स्थायिक झाले, पण नेहमी आपल्या गावी जाऊन येत असत. त्यांच्या मुलांना अधून मधून त्यांच्या आजीआजोबांचा सहवास मिळत असे. त्या मुलांच्या मनात आजीआजोबांचे एक विशेष स्थान निर्माण होत असे, त्यांचेविषयी ओढ वाटत असे. ती मुले मोठी झाल्यानंतर त्यांच्यातली काही आपल्या शहरातच राहिली, पण त्यांच्यात आणि त्यांच्या आईवडिलांच्यात जनरेशन गॅपमुळे थोडा दुरावा निर्माण झाला, त्यातली काही वेगळी रहायला लागली. त्यांच्या मुलांचे आजीआजोबांबरोबरचे संबंधही त्यामुळे कमकुवत होत गेले. अनेक मुले दिल्ली, बंगलोर किंवा लंडन, न्यूयॉर्क, सिडनी या सारख्या दूर दूरच्या ठिकाणी गेली. त्यांच्या मुलांची आजीआजोबांशी फारशी घनिष्ठ अशी ओळख होऊ शकली नाही. ती आणखीनच दुरावत गेली. विज्ञान तंत्रज्ञानातल्या प्रगतीमुळे आता जगाच्या पाठीवर कुठेही असलेल्या लोकांशी घरबसल्या संपर्क साधणे शक्य झाले आहे खरे, पण व्यक्तिशः गाठभेट झाली नसेल तर पडद्यावर दिसणारे काल्पनिक गोष्टीतले आजीआजोबा आणि पडद्यावरच दिसणारे आपले खरेखुरे आजीआजोबा यात अजाण बालकांना कितीसा फरक वाटणार आहे?

समाजाच्या ज्या स्तरामधले लोक मला भेटतात, माझ्याशी मन मोकळे करून बोलतात, त्यांच्याकडून कळलेली आणि माझ्या पाहण्यात आलेली काही नमूनेदार उदाहरणे देऊन मी हा लेख लिहिला आहे. ही सगळी उदाहरणे प्रातिनिधिक असतीलच असे नाही, पण काल्पनिक असली तरी वास्तवापासून फार दूर नाहीत. यात कोण बरोबर की चूक असला निवाडा करायचा माझा हेतू नाही. सगळेच आपापल्या जागी बरोबर आहेत. मला जे जाणवले तसे मी मांडले आहे एवढेच. हा लेख एकांगी झाला आहे असा त्यावरील मुख्य आक्षेप आहे. एक वेगळा लेख लिहूनच तो कदाचित दूर करता येईल.

. . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . (समाप्त)

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (4 votes)

प्रतिक्रिया

लेखमालिकेत मांडलेल्या समस्या आता पुढे येऊन किमान ४-५ दशके झाली आहेत. त्यावर विपुल लेखनही झाले आहेत, पुस्तकेही आहेत. त्यामुळे विषयात, प्रसंगात वा मांडणीत नाविन्य वाटले नाही. अर्थात आधी 'मी' यांनी पॉईंट आउट केले तसे अभिनिवेषाचा वा अतृप्त / काहितरी हरवल्याचा भाव ला लेखमालेत दिसत नाही हे स्तुत्य आहे.

एक वेगळा लेख लिहूनच तो कदाचित दूर करता येईल.

उत्तम वाट पाहतो आहे.

--------
समांतरः

हा लेख वाचून जुना मनात असलेला एक प्रश्न समोर आला.

१९७०-८० च्या दशकात कित्येक भारतीय आम्रिकेत /परदेशी गेले असतील. आपल्या मुलांच्या वेळी भारतीय संस्कार द्यावे की अमेरिकन पद्धतीने वाढवावे, भारतात जावे की इथेच रहावे वगैरे नेहमीच्या द्वंद्वाला ही पिढीही समोर गेली असेल. व या द्वंद्वातून सुलाखून आता ते अमेरिकतच स्थाईक झाले असतील.

गेल्या ४५+ वर्षांत त्यांची आता तिसरी पिढी आता जन्माला आली असेल. त्या आजीअजोबांच्या नात्याविषयी उत्सुकता आहे. अमेरिकन पालक मुलांसोबत अनेकदा रहात नाही. मात्र ही ७०च्या दशकात गेलेली पिढी मुलांसोबत रहाते का? का त्या आजीआजोबांचा आयुष्याचा पुर्वार्ध भारतात गेल्याने भारतीय मुल्यव्यवस्थेचे संस्कार असल्याने एका नव्या द्वंद्वाला सामोरे जायला लागते.

असे काही अल्पसंख्य आजी आजोबा असतील ज्यांची मुले आता अमेरिका सोडून अन्य देशांत स्थायिक झाली असतील व नातवंडे भारतही नाही व अमेरिकाही नाही तिसर्‍याच भागात असतील(जसे युरोप) अशा आजी आजोबांना किती एकटे वाटत असेल, वाटत असेल का? अश्या आजी आजोबांच्या भावना काय असतील? आपल्या आजीआजोबांच्या भावनेची जाणीव त्यांना होत असेल का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

विषयात, प्रसंगात वा मांडणीत नाविन्य वाटले
नाही. अर्थात आधी 'मी' यांनी पॉईंट आउट केले तसे अभिनिवेषाचा वा अतृप्त /
काहितरी हरवल्याचा भाव ला लेखमालेत दिसत नाही हे स्तुत्य आहे. >> +१

अवांतराबद्दल ७० ८०च्या दशकात फारसे मायग्रंट नसणार भारतातून असे वाटतेय. असलेच तर मेट्रोमधून किंवा नेहमीचे गुज्जू सरदार केरळी तमिळ वगैरे जास्त असतील. ९०नंतर आयटी, ओपन इकॉनॉमी वगैरेमुळे मायग्रेशन वाढले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

१९७०-८० च्या दशकात कित्येक भारतीय आम्रिकेत /परदेशी गेले असतील.
- ऋषिकेश माझ्या जवळुन पाहण्यात अशी ३-४ कुटुंबे आली आहेत म्हणुन प्रतिसाद द्यावासा वाटला. गंमतीची गोष्ट म्हणजे प्रत्येकाची गोष्ट निरनिराळी आहे, त्यांच्याकडे बघताना मला व्यक्ती तितक्या प्रकृती हया वाक्याची जाणीव होते.
एक कुटुंब असे आहे की आजी-आजोबा अजुन भारतीय गोष्टी/सण/आहार/विचार धरुन आहेत पण तिस-या पिढीला सोडा त्यांच्या मुला-सुनांना,मुली-जावयालाही काहीच इंटरेस्ट नाही.
एक कुटुंब असे आहे की आजी-आजोबा अजुन भारतीय गोष्टी/सण/आहार/विचार धरुन आहेत पण तिस-या पिढीला आणि त्यांच्या मुला-सुनांना,मुली-जावयालाही खूपच इंटरेस्ट आहे.
कधीकधी वरच्या दोन्हीचे कॉम्बिनेशनही दिसते म्हणजे दुस-या पिढीतल्या बायकोला या गोष्टीत रस आहे पण नव-याला नाही किंवा उलटेही आणि यावरुन तिस-या पिढीतल्या मुलांचा कल ठरत असावा.

मात्र ही ७०च्या दशकात गेलेली पिढी मुलांसोबत रहाते का? - नाही अजुनतरी पाहण्यात आले नाही. एक पतिपत्नी ६०-७० च्या दशकात आलेले डॉक्टर होते, त्यातले आजोबा आधी वारले, त्यांची तिन्ही मुले+मुली वेगवेगळ्या आणि लांबलांबच्या राज्यात होती एका मुलाने काही महिने आजींना घरी ठेवले होते पण त्या दोघांच्या नोक-यांमुळे त्यांना घरी २४ तास लक्ष देता येईना म्हणुन तिघांनी मिळुन निर्णय घेतला की दुस-या मुलाच्या जवळच्या सिनिअर सेंटरमध्ये (वृद्धाश्रमासारखेच) आजींना ठेवायचे म्हणजे तिथे २४ तास लक्ष ठेवायला त्यांचा स्टाफ/नर्स असेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रोचक आहे. आभार.

त्यांची तिन्ही मुले+मुली वेगवेगळ्या आणि लांबलांबच्या राज्यात होती एका मुलाने काही महिने आजींना घरी ठेवले होते पण त्या दोघांच्या नोक-यांमुळे त्यांना घरी २४ तास लक्ष देता येईना म्हणुन तिघांनी मिळुन निर्णय घेतला की दुस-या मुलाच्या जवळच्या सिनिअर सेंटरमध्ये (वृद्धाश्रमासारखेच) आजींना ठेवायचे म्हणजे तिथे २४ तास लक्ष ठेवायला त्यांचा स्टाफ/नर्स असेल.

एकुणच अमेरिकेला मेल्टिंग पॉट का म्हणतात ते अश्या प्रसंगातून नव्याने जाणवू लागते.
नागरीकांची ढोबळ जीवनशैली २-३ पिढ्यांनंतर "अमेरिकन" होते. चायनिज/भारतीय/हिस्पॅनिक/स्पॅनिश/आफ्रिकन मुळे असतील, काही प्रमाणात विविधता असेलही - असतेच पण ढोबळ स्केलवर जीवनशैली बर्‍यापैकी स्ट्रीमलाईन होते.

आपल्याकडे उलट घटकद्रव्य तितक्या वेगात 'मेल्ट' न होता खिचडी किंवा अधिक योग्य म्हणजे भेळ म्हणता यावी असे मला वाटते. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

आपल्या खेड्यातून शहरात ५०-६० च्या दशकात** झालेले स्थलांतर आणि ९० दशकानंतर अमेरिकेत झालेले स्थलांतर यात गुणात्मक* फरक काय आहे?

*शहरात आलेले खेड्यातील संस्कृती टाकून शहराशी एकरूप झाले. खेड्यातून आपल्या मुलांकडे शहरात (कायमचे) रहायला यायला तेव्हाचे आईवडील नाखूषच होते. (प्रत्येक) अडीअडचणीला गावी धावून जाणे तेव्हाही अवघड होते (आर्थिक दृष्ट्या तसेच वाहतुकसाधनांची उपलब्धता). आज निदान कम्युनिकेशन खूप सहज सोपे झालेले आहे. तेही त्या काळी अवघड होते.

** हे स्थलांतर करणारे म्हणजे आज अमेरिकेत गेलेल्या आपल्या मुलांबद्दल तक्रार करणारे आजी आजोबाच असण्याची बरीच शक्यता आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

आज निदान कम्युनिकेशन खूप सहज सोपे झालेले आहे. तेही त्या काळी अवघड होते.

कम्युनिकेशन सोपं झालेले आहे पण सहज/समृद्ध झालेले नाही, ५०-६०च्या दशकात ते अवघड असुनही पत्रांद्वारे (पर्सनल टच) जपण्यामुळे आतापेक्षा अधिक समृद्ध होते(मुंबईबद्दल माहिती नाही) असे माझे वैयक्तिक मत आहे. साधनांच्या उपलब्धीमुळे आज गुणात्मक फरक पडला आहे काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पॉइंट इज कम्युनिकेशन अवघड / सोपे असण्याबद्दलच आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

पण स्थलांतरातला गुणात्मक फरक त्याने पडतो/पडु शकतो हे मला सांगायचे होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गुणात्मक का वापरातल्या अनभिज्ञतेमुळे फरक आहे? म्हणजे इमेल वगैरे गेल्या १५-१६ वर्षात आले त्याआधी पत्रच मुख्य माध्यम होते. ज्या वयस्कर लोकांनी हे माध्यम शिकून आत्मसात केले त्यांना इतका तुटलेपना जाणवला नाही. पण ज्यांना ते अवघड गेले त्यांच्यात मनात असते की ह्यात पर्सनल टच नाहीये.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गुणात्मक का वापरातल्या अनभिज्ञतेमुळे फरक आहे?

फरक का आहे हे तपासत आहात म्हणजे फरक आहे हे मान्य असावे, पत्रामधे प्रत्यक्षपणाचा अनुभव हा अधिक असतो असे माझे मत आहे, इमेलपेक्षाही फोन/स्काईप अधिक सोयिस्कर आहे पण त्यामुळे संवादाचा पक्षी नात्यांचा दर्जा वाढला आहे असे म्हणता यावे काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी कुठेही दर्जा वाढला आहे असे म्हणालो नाहीये. वापरातील फरकामुळे तेवढा दर्जा वाटत नाही. पण जेंव्हा दुरून लोक इमेल करतात आणि पत्र लिहितात ह्यात फार वाटत नाही. भाषा आणि वापर वेगळा आहे. तिसरा म्हणजे सवय. मुळातच इमेल हे इतके नावे माध्यम आहे की त्यामुळे हजारो वर्ष चालेला पत्र व्यवहार ह्याची तशी तुलना होऊ शकत नाही. तुम्ही कसे वापरता आणि मनात वाटून घेता त्यावर आहे असे माझे म्हणणे आहे इतकेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आपल्या खेड्यातून शहरात ५०-६० च्या दशकात** झालेले स्थलांतर आणि ९० दशकानंतर अमेरिकेत झालेले स्थलांतर यात गुणात्मक* फरक काय आहे?
ढोबळ मानाने पाहता ही स्थलांतरे सारखीच वाटतात. मला त्यात खालील फरक दिसतात.
५०-६० च्या दशकात झालेले पहिले स्थलांतर जवळ जवळ कंपल्शन होते. ९० च्या दशकानंतरचे दुसरे स्थलांतर जवळ जवळ व्हॉलंटरी असावे. असलेच तर पीअर प्रेशर.
५०-६० च्या दशकात शहरात आलेले लोक खेड्यातील संस्कृती (जवळ जवळ) टाकून शहरातील संस्कृतीशी एकरूप झाले. कदाचित त्या दोन्हींमध्ये जमीन अस्मानाचा फरक नसेल.
९० च्या दशकानंतर अमेरिकेत गेलेले लोक तिथल्या संस्कृतीशी पूर्णपणे एकरूप झालेले नाहीत, असे मला तरी वाटते. भारतातील शहरांमधली संस्कृती त्यांनी अजून पूर्णपणे सोडलेली नाही. आजच्या घडीला खास 'अमेरिकेतली संस्कृती' अशी शिल्लक आहे की नाही याबद्दल मला थोडी शंका वाटते.
** हे स्थलांतर करणारे म्हणजे आज अमेरिकेत गेलेल्या आपल्या मुलांबद्दल तक्रार करणारे आजी आजोबाच असण्याची बरीच शक्यता आहे.
बर्‍याच अंशी तसे आहे. पण ते तक्रार करतात असेच म्हणता येणार नाही. त्यांच्यातले बहुतेक लोकांना त्यांच्या मुलांचा अभिमान वाटतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भ फॉर भन्नाट.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

+१

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

अमेरिकेतून आलेल्या मंडळींचा भारतातला कार्यक्रम चांगलाच धावपळीचा होता.

हा प्रकार तर सॉलिडच असतो.

परवाचा एक प्रसंग -
"आपण भेटू यात?"
"हो रे, नक्कीच."
"तू १ ला आला नि १५ ला जाणार. तेव्हा तुझ्या सोयीप्रमाणे ठरव."
"१ ला नाही, २९ ला आणि १५ ला नाही, १४ ला."
"अरे, ठिक आहे, त्याच्याने एवढा फरक पडत नाही."

दोन दिवसानी...
"अरे, तुझा फोन आला नाही."
"करणारच होतो."
"कधी भेटायचं?"
"१० ला भेटुया. संध्याकाळी."
"संध्याकाळी? मी सुट्टी मारायचा विचार करत होतो."
"आपण सुभाष (बोस) प्लेस मधे भेटू."
"घरी का नाही?"
"अरे, घरी कशाला?"
"यार, घरी आराम असतो."
"अरे, पण आता 'आमचं' घर नाहीच्चे."
"मित्रा, माझं तरी आहे ना? मी अजूनही व्यवस्थित दिल्लीत राहतो."
"असू दे रे. घरी नको. त्रास होईल."
"कसला?"
"असू दे रे. आपण सुभाष प्लेसला भेटू."
"घरी कसला त्रास होईल?"
"...."
"आपल्या सात जणांना जास्तच दंगा करायला जस्त वेळ हवा असेल तर जेवण इ बाहेरून मागवू. मग?"
"अरे पण तिथून मला अर्ध्या तासाने मामीकडे जायचं आहे."
"म्हणजे आपण (फक्त) अर्धा तास सुभाष प्लेस मधे भेटणार?"
"हं..."
"अबे साल्या, तुला इथे असताना माझ्या घरातून हकलावा लागायचा. तुला आता वेळ नाही?"
"अहो, प्रत्येकाची आपले आपले जीवन असते. तुम्ही उगा फोर्स करू नका. प्रत्येकाने असे फोर्स केल्याने या लोकांचा स्वदेशवास एकदम जड होतो. आपण जाऊ सुभाष प्लेसला."
"असंच असेल तर अर्धा तास तरी जायची काय गरज? माझ्याकडून भेटीमधे सूट. मला कोणाचं शेड्यूल लोड करायला आवडत नाही. आयुष्यात जेव्हा केव्हा सवडीने येशील तेव्हा भेटूच."
"अर्धा तास तरी भेटूच शकतो."
"हा काय प्रोजेक्ट आहे का? कंपल्सरी असाईनमेंट आहे का?"
"तसं नै रे..."
"मी माझ्याकडून फायनल सांगतो. मला अर्धा तास सुभाष प्लेस मधे भेटण्यात काहीच रस नाही. तू मला न समजून घेणारा भारतीय नाठाळ आरामात समजू शकतोस."
"मी पाहतो."
"नको असू दे. पक्षी मीच दुबईला येईन कधीतरी. तिथेही अस्ले आयघाले प्रकार करू नको म्हणजे झालं"
"बरं ठिक आहे. १०ला आपण सातही जण एकत्र पूर्ण दिवस तुझ्याकडे एकत्र काढू. पिकनिक करू. चेस खेळू. दारू पिऊ. जुन्या बॉसेसना शिव्या देऊ. .... ... ... आता खुष?"
"आणि भोसडीच्या, मला दिवसभरात एकदाही १५ तारखेपर्यंतचं शेड्यूल नाही सांगायचं. नाहीतर गांडीवर लाथा घालीन."
"डन."
"डन."

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

तिन्ही लेख आवडले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तिन्ही लेख वाचले. त्यांत वर्णन केलेले बरेचसे अनुभव नातेवाईकांकडून आणि ओळखीच्या लोकांकडून ऐकले आहेत.
या सगळ्या उदाहरणांत, मुख्य प्रॉब्लेम वाटतो तो अति भावनाशीलतेचा. आजी-आजोबा हे जर थोडे अलिप्तपणे विचार करायला शिकले आणि त्यानुसार वागले तर त्यातून अतिअपेक्षा आणि त्यातून येणारे अपेक्षाभंगाचे प्रकार कमी होतील असे वाटते. स्वतःच्या मुलांविषयी व नातवंडांविषयी प्रेम वाटणे स्वाभाविक आहे. पण नातवंडे म्हणजे 'अगदी दुधावरची साय', अशा प्रकारचे उमाळे आणू नयेत. बदलत्या जगांत, त्यांची जीवनसरणी समजावून घ्यावी. आपले संस्कारच त्यांच्यावर व्हावे ही वृथा अपेक्षा सोडून द्यावी.
मुले परदेशांत असली आणि भारतात फक्त आजी-आजोबा असतील तर त्यांनी, अतिम्हातारपणी चांगल्या वृद्धाश्रमात जाऊन उरलेले आयुष्य व्यतीत करण्याची मानसिक तयारी करावी. तर ते सर्वांच्याच दृष्टीने सोईचे आणि आनंदाचे होईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आपण दुसर्‍याकडून काय अपेक्षा ठेवतो ते फार महत्वाच वाटतं. आणि कोणी आपल्याकडूनही काही अपेक्षा ठेवल्यात का हेही. अवाजवी अपेक्षांची सायकल कधीतरी तोडायची. ती कोणी हा महत्वाचा प्रश्न आहे. निस्वार्थी विचार करायचा तर मी माझ्या आई-वडीलांच्या अपेक्षा पूर्ण करीन पण तशाच अपेक्षा माझ्या मुलांकडून करणार नाही हा होइल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

तशाच अपेक्षा माझ्या मुलांकडून करणार नाही

हे ठीकच आहे, पण...

मी माझ्या आई-वडीलांच्या अपेक्षा पूर्ण करीन

हे काय म्हणून? तुम्हाला तुमचे आयुष्य नाही काय?

("कोणी आयुष्य देईल का, आयुष्य?")

----------------------------------------------------

अतिअवांतर (हे म्हणजे उगाच आमच्या अतिलिबरल गोटाला चाळवायला, काडी टाकायला):

दशरथाने श्रावणबाळाची अनइण्टेन्शनली का होईना, पण खरे तर सुटका केली. पण त्याच्या बदल्यात तो मात्र (व्हेष्टेड इण्टरेष्ट्सकडून) शापाचा धनी झाला. यासारखे नि:स्वार्थी कृत्य जगात दुसरे काही असू शकेल काय?

('उठाये जा उन के सितम, और जिये जा...')

---------------------------------------------------

अतिलिबरलान्योक्ति.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुम्हाला तुमचे आयुष्य नाही काय?

माझे आयुष्य आहे म्हणूनच माझा निर्णय. हा की ही अपेक्षांची सायकल मी तोडावी. मला नाही आवडणार दुसर्‍या कोणावर ही सायकल तोडण लादणं. ना माझ्या पालकांवर ना माझ्या पोरांवर.

("कोणी आयुष्य देईल का, आयुष्य?")

आणि पालकांच्या थोड्याफार वाजवी अपेक्षा पूर्ण करण म्हणजे पूर्ण आयुष्य देऊन टाकणं असं मला नाही वाटत.

=======================================

१. वाजवी/अवाजवीची व्याख्या माझी. उदा: मला ५ नातवंड हवी आहेत ही अवाजवी. सत्यनारायणाच्या पुजेला बसावं ही वाजवी अपेक्षा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

सत्यनारायणाच्या पुजेला बसावं ही वाजवी अपेक्षा.

ही अपेक्षा मी 'माफक' क्याटेगरीत टाकू शकेनही कदाचित, पण 'वाजवी'बद्दल प्रचंड साशंक आहे.

पूर्ण आयुष्य देऊन टाकणं

"कोणी आयुष्य देईल का, आयुष्य?" हे वाक्य "यू ऑट टू गेट अ लाइफ" अशा अर्थी टाकले होते, "पूर्ण आयुष्य देऊन टाकणे", "आत्मसमर्पण" अशा अर्थी नव्हे. पण ते असो.

(अतिअवांतर शंका: स्वतःचे पूर्ण आयुष्य देऊन टाकता येण्याकरिता मुळात स्वतःचे आयुष्य असणे आवश्यक असावे काय? वन क्यानॉट गिव व्हॉट वन डझण्ट ह्याव इन द फर्ष्ट प्लेस, अशी आपली आमची धारणा होती, झाले. बाकी, आपल्याजवळ असलेल्या गोष्टीचे काय करावे, हा ज्याचातिचा प्रश्न आहे, हे ओघानेच आले, पण तो फार पुढचा भाग झाला.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वईच बोलरेला है... की २-४ चीजे उनकेलिये करने के बाद आपुन के लिये भी बहौत लाइफ बचता है , ऐसा मेरेको लगता है.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

एखादी गोष्ट तुम्ही त्यांच्यासाठी करावी की नाही, हा पूर्णपणे तुमचा वैयक्तिक निर्णय आहे. यू माइट डू इट अ‍ॅज़ अ फेवर - परह्याप्स, अ‍ॅज़ अ रिटर्न फेवर अगेन्स्ट द मेनी फेवर्स द्याट दे मे ह्याव डन अण्टू यू फ्रॉम टैम टू टैम, व्हॉटेवर. हा फेवरच आहे, बोले तो, पूर्णतः ऐच्छिक आहे, तोपर्यंत काहीच म्हणणे नाही, तो तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्या 'फेवर'ची 'ड्यूटी' होऊ लागली, की तेथे अडचणीला सुरुवात होते. आणि लीगली एन्फोर्सिबल ड्यूटी झाली, तर गडबड होते. असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बरोबर आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

अतिम्हातारपणी चांगल्या वृद्धाश्रमात जाऊन उरलेले आयुष्य व्यतीत करण्याची मानसिक तयारी करावी.

मला आजोबा बनून वृद्धाश्रमात जायचे आहे असा प्रसंग येणार असेल तर I will make every attempt that my sons/daughters don't go abroad in first place. Some of my such efforts could be even illegal, unethical and untruthful.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

ओह. म्हणजे परदेशी नाही पाठवलंत तुम्ही मुलाना तर ती तुम्हाला ईथे राहून सांभाळतील, तुमच्यावर वॄद्धाश्रमात जायची वेळ गॅरेंटीड येणार नाही असा भ्रम आहे का तुमचा?


आणि हा असा

मला आजोबा बनून वृद्धाश्रमात जायचे आहे असा प्रसंग येणार असेल तर I will make every attempt that my sons/daughters don't go abroad in first place. Some of my such efforts could be even illegal, unethical and untruthful.

विचार करणं बरोबर आहे का ते जाउंदे. तूर्तास तरी मला अजोंचं अपत्य न केल्याबद्दल देवाचे आभार मानतो Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....

(किंबहुना, त्यांना आत्ताच वृद्धाश्रमात का पाठवू नये, हा प्रश्न विचारण्याचा अधिकार मला केवळ त्यांचे उत्तरदायित्व माझ्यावर नसल्याकारणाने नाही, हे मी जाणून असल्याकारणाने विचारण्याचे आवरते घेत आहे. असो.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

घारेकाकांनी एका मुद्द्याबद्दल काही लिहीले नाही. चूभूद्याघ्या.
शेती मुख्य उत्पन्न असताना एकत्र राहण्यात फायदा होता आणि वारसामधे जमीन मिळायची. औद्योगिकरणाने शहरात गेलेल्यांनादेखील गावाकडून धान्य वगैरे यायचे आणि वारसा जमीन आहेच. ९१नंतर आयटी, ओपन इकॉनॉमीमुळे कित्येक गरीब, निम्नमध्यमवर्गीयांची मुले मध्यम/उच्च मध्यमवर्गात गेली. अशा पालकांनी मुलांवर जेवढा खर्च केला किंवा शिक्षण, करीअरमधे त्यांचा फारसा गायडन्स नव्हता, परत वारसात देण्यासारखे काहीही नाही. उलट ही मुलंच त्यांना चांगले राहणीमान, आरोग्यासुविधा वगैरे देतायत. तर या पालकांनी कोणत्या बेसिसवर नातवंड सांभाळणार नाही, मुक्ताफळे ऐकावी लागतात वगैरे बोलावे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उलट ही मुलंच त्यांना चांगले राहणीमान, आरोग्यासुविधा वगैरे देतायत. तर या पालकांनी कोणत्या बेसिसवर नातवंड सांभाळणार नाही, मुक्ताफळे ऐकावी लागतात वगैरे बोलावे?

लेट अस पुट इट धिस वे. हे (किंवा फॉर द्याट म्याटर कोणतेही) पालक आपल्या मुलांना नातवंडे सांभाळणे देणे लागत नाहीत, आणि ही मुलेही त्या पालकांना चांगले राहणीमान, आरोग्यसुविधा वगैरे देणे लागत नाहीत. (स्वेच्छेने, आपुलकीने केले, भाग वेगळा आणि ठीकच आहे, पण त्याने पौण्डॉफ्फ्लेशदायित्व प्रस्थापित होत नाही, आणि होऊ नये.)

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

(मध्यंतरी शिवसेनेचा असला कायसासा घाट होता, असे ऐकून आहे. (चूभूद्याघ्या.))

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे पर्फेक्टच आहे.
पण कायदा काय म्हंतो ठौक आहे का तुम्हाला? आईवडील मुलगामुलगीकडून पोटगी मागू शकतात.
आणि आधीच्या पिढीच माहीत नाही, पण सध्या जे आजीआजोबा आहेत, ते छडी लागे छमछमवाले पालक होते. दणादण लगावणारे. मग आता का 'दुधावरची साय' वगैरे पाझर फुटायला लागला?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पण कायदा काय म्हंतो ठौक आहे का तुम्हाला? आईवडील मुलगामुलगीकडून पोटगी मागू शकतात.

होय कल्पना आहे.

सध्या जे आजीआजोबा आहेत, ते छडी लागे छमछमवाले पालक होते. दणादण लगावणारे. मग आता का 'दुधावरची साय' वगैरे पाझर फुटायला लागला?

त्यामागची कारणमीमांसा मरू द्या. (थोडक्यात, त्यांना काय वाट्टेल ती आर्ग्युमेंटे करू द्या.) मुळात तो त्यांचा मूलभूत अधिकार नाही, हे एकदा मानल्यावर त्या अरण्यरुदिताला किमानपक्षी माझ्या लेखी तरी काही किंमत नाही.

(आणि असा कायदा तरी का होऊ शकतो? आपली तरुण पिढी अशा वेळी नेमकी कोठे झोपा काढते? दुर्दैवाने, राजकीय क्षेत्रात 'तरुण रक्ता'चा अर्थ आपल्याकडे हुल्लडबाजी, मवालीगिरी आणि सार्वजनिक मालमत्तेची तोडफोड इतकाच होतो - इर्रेस्पेक्टिव ऑफ पार्टी अफीलिएशन - त्याचा उपयोग राजकीय पक्ष असले कायदे - अर्थात मतांच्या सोयीकरिता - पास करवून घेण्याकरिता करतात. 'आपल्या संस्कृती'चा नारा दिला, की काम फत्ते.

याकरिता समाजशिक्षण पाहिजे. युवा पिढीला जागरूकता नसली अधिक उद्योग नसले, की त्यांचे 'कार्यकर्ते' बनतात, नि मग कोणीतरी भडकावून दिले, की पुढचामागचा विचार न करता कशालाही उचलून धरतात. बाय अँड लार्ज तरुण पिढीला स्वतंत्र विचार - किमानपक्षी स्वतःच्या हितसंबंधांचा विचार - करायला शिकवले पाहिजे. आणि हे कोणी शिकवणार नाही - अगोदरची पिढी तर नाहीच नाही, कदाचित अंशतः कारण ते त्यांच्या हितसंबंधांच्या विरोधात जाते म्हणून; तरुण पिढीने हे स्वतः शिकले पाहिजे. ती जबाबदारी तरुण पिढीची आहे, कारण त्यांचे हितसंबंध त्यात अडकलेले आहेत.

आणि बायदवे, आम्ही जे काही शाळेत शिकल्याचे आठवते, त्यानुसार, वृद्ध पालकांची जबाबदारी मुलांनी घेणे हा पालकांचा नैतिक अधिकार असू शकतो, परंतु वैध अधिकार नाही. माझ्या मर्यादित आकलनशक्तीस अनुसरून याचा अर्थ, या अधिकारास कायद्याची एन्फोर्सेबिलिटी नाही, असणे अपेक्षित नाही. याचाच अर्थ, मुळात असा कायदा नव्हता. अशा परिस्थितीत असा कायदा जर पुढे कोणी आणला असेल, तर त्याला कोणीतरी घटनात्मक च्यालेंज देणे आवश्यक आहे. पण त्याकरिता आपल्या अधिकारांबद्दल जागरूकता, त्यांबद्दल आस्था आणि त्यांकरिता लढण्याची तयारी आवश्यक आहे. अर्थात, कोणताही राजकीय पक्ष याचा पुरस्कार तर करणार नाहीच - कारण ते राजकीय हितसंबंधांस पोषक नाही - पण ही जागरूकताही येऊ देणार नाही. तेव्हा, एव्हरीबडी ह्याज़ टू बी ऑन हिज़ ऑर हर ओन.)

आणि आधीच्या पिढीच माहीत नाही, पण...

आम्ही स्वतःच्या पार्श्वभागास 'प्रोग्रेसिव' हे लेबल डकवून घेत असल्याकारणाने, प्रत्येक पुढची पिढी ही त्याअगोदरच्या पिढीपेक्षा सुधारित असते (किमानपक्षी, असायला हवी), ही आमची आंतरिक श्रद्धा आहे. (हे बरोबर की चूक हे तो एक जगन्नियंता जाणे.) सबब, त्याअगोदरच्या पिढीबद्दलच्या या बाबतीतील आमच्या अटकळी त्या पिढीस फारशा फेवरेबल नाहीत, एवढेच नमूद करू इच्छितो.

किंबहुना, आपल्या ज्या पिढ्या ब्रिटिश राजवटीखाली वाढल्या, त्या बाय अँड लार्ज ब्रिटिश राजवटीखालीच वाढण्याच्या लायकीच्या होत्या - 'सब्जेक्ट्स' म्हणून; 'नागरिक' म्हणून नव्हे - असे एक बरेचसे सरसकट (आणि तितकेच विना-आग्यापिछ्याचे) वैयक्तिक मत या निमित्ताने उगाचच प्रतिपादू इच्छितो. (सो हेल्प मी गॉड.)

------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

कोणत्याही पुराव्याविना ठोकून दिलेल्या विधानास 'अटकळ' म्हणून संबोधण्याची एक पुरातन प्रस्थापित जालरूढी आहे, तीस अनुसरून. (चूभूद्याघ्या.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Smile पर्फेक्ट _/\_

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शिवाय अशा कायद्यांमुळे बायकोला नीट सांभाळले नाही तर '४९८ अ'चा बडगा व आईवडिलांना नीट सांभाळले नाही तर या नव्या कायद्यानुसार शिक्षा अशी 'इकडे आड तिकडे विहीर' परिस्थिती नवरोबांवर उद्भवते ते वेगळेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हिंदू पुरूषाने लग्न न झालेली बहीण, मुलगी, मुलग्याच्या मरणोपरांत सून यांनादेखील सांभाळण्याचा कायदा आहे बहुतेक.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

किंबहुना, आपल्या ज्या पिढ्या ब्रिटिश राजवटीखाली वाढल्या, त्या बाय अँड लार्ज ब्रिटिश राजवटीखालीच वाढण्याच्या लायकीच्या होत्या - 'सब्जेक्ट्स' म्हणून; 'नागरिक' म्हणून नव्हे - असे एक बरेचसे सरसकट (आणि तितकेच विना-आग्यापिछ्याचे) वैयक्तिक मत या निमित्ताने उगाचच प्रतिपादू इच्छितो. (सो हेल्प मी गॉड.)

ब्रिटिश जगावर हुकुमत करायच्या लायकीचे होते. आताचे काळे भारतीय राजकारणी निव्वळा षंढ आहेत. हे पाहू जाता कोणत्या पिढीची काय लायकी होती हे कळून यावे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

सब्जेक्ट्सनी हुकूमत करू दिली म्हणून ब्रिटिशांचे दुनियेत फावले. प्रजा नालायक होती; ब्रिटिश ग्रेट होतेच, असे नव्हे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

One hundred thousand Britishers cannot rule 350 million Indians if the latter refused to co-operate - M K Gandhi

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

त्याकाळी युरोप, अमेरिका, जपान वजा जाता अख्खं जग यांचं कोलोनी होतं. इतक्या मोठ्या जगाच्या मानसिकेतेचं वर्णन एका शब्दात करणं ठिक नसावं. विदेशी सत्ता हा राजकीय, सामाजिक, वैज्ञानिक परिस्थितींचा परिपाक होता. ती कोणती गुलामगिरीची मानसिकता दर्शवत नाही. पण असंच म्हणायचं असेल तर तो एक रेसिस्ट कमेंट होईल. युरोपीय ओरिजीनच्या लोकांना श्रेष्ठ ठरवणारी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

ब्रिटिश जगावर हुकुमत करायच्या लायकीचे होते. आताचे काळे भारतीय राजकारणी निव्वळा षंढ आहेत. हे पाहू जाता कोणत्या पिढीची काय लायकी होती हे कळून यावे.

ओव्हरसिम्प्लिफाईड प्रतिसाद! अपेक्षाभंग नेहमीप्रमाणेच झाला नाही. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अशा परिस्थितीत असा कायदा जर पुढे कोणी आणला असेल, तर त्याला कोणीतरी घटनात्मक च्यालेंज देणे आवश्यक आहे. पण त्याकरिता आपल्या अधिकारांबद्दल जागरूकता, त्यांबद्दल आस्था आणि त्यांकरिता लढण्याची तयारी आवश्यक आहे. अर्थात, कोणताही राजकीय पक्ष याचा पुरस्कार तर करणार नाहीच - कारण ते राजकीय हितसंबंधांस पोषक नाही - पण ही जागरूकताही येऊ देणार नाही

या रचनेत अर्थात, "कोणताही राजकीय पक्ष याचा पुरस्कार तर करणार नाहीच - कारण ते राजकीय हितसंबंधांस पोषक नाही" हे शब्द पेरता तेव्हाच असे म्हणण्यात काही लॉजिक नाही जे लक्षात येते. म्हातार्‍यांचे प्रमाण किती असते मतदारांत?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

मतदारांत म्हातार्‍यांचे प्रमाण फारसे असण्याची गरज नसते. म्हातार्‍यांच्या नावाने केलेल्या इमोशनल ब्ल्याकमेलला बळी पडू शकणार्‍यांची संख्या पुरेशी असली, तरी पुरते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रतिसाद हटवला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

आपल्या ज्या पिढ्या ब्रिटिश राजवटीखाली वाढल्या, त्या बाय अँड लार्ज ब्रिटिश राजवटीखालीच वाढण्याच्या लायकीच्या होत्या - 'सब्जेक्ट्स' म्हणून; 'नागरिक' म्हणून नव्हे
आपल्या मुलांवर, नातवंडांवर माया करणे म्हणजे 'सब्जेक्ट्स' ची मानसिकता; आपले आईवडील, पत्नी, मुले वगैरे सर्वांशी फक्त हक्काची भाषा करणे म्हणजे 'नागरिक'. व्वा भाई व्वा! क्या बात है?
आमच्या पिढीचे आईवडील, आजी आजोबा यांनी बाळगलेली नीती मूल्ये त्यांना ब्रिटिशांकडून मिळाली होती ही अजब माहिती आजच समजली. ती मूळ भारतीय होती अशी माझ्यासकट अनेक लोकांची समजूत होती. या दुष्ट किंवा धूर्त ब्रिटिशांनी छापखाने आणले आणि श्रवणबाळासारख्या (अक्कलशून्य) लोकांच्या कथा छापून प्रसिद्ध केल्या. त्या वाचून हिंदुस्थानातल्या लोकांना दुसर्‍याचा विचार करण्याची वाईट सवय लागली, स्वतःच्या हक्कासाठी भांडणे त्यांना सुचलेच नाही असेच बहुधा झाले असावे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मागच्या पिढितल्या लोकांवर राज्य करण्यासाठी युरोपातले शास्ते इथे आले. त्यांनी इथल्या शासकांना पराभूत केले. (केले नसते तर भारतीय लोक आमच्यावर राज्य करा म्हणून ब्रिटिशांच्या मागे लागले नसते.).

आता ब्रिटिश गेले मात्र काही लोकांना त्यांची गुलामगिरी फार प्रिय. मग ते तिकडे जाऊन त्यांच्या नियमांखाली (चाहे ते यांना कितीही काळे, मागास, इ समजोत) राहणे पसंद करत आहेत. जेव्हापावेतो अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, युरोप, (जपान, कोरीया, तैवान, हाँगकाँग, सिंगापूर सुद्धा?) चा प्रश्न आहे, लोक तिथे पैशासाठी नक्कीच जात नाहीत. तो एक बहाणा आहे. पसंद आहे ती एक प्रकारची गुलामगिरी. एक प्रकारचा अप्पर क्लासच्या लोकांत राहत असल्याचा आनंद. स्वच्छ, शिस्तबद्ध, वैज्ञानिक दृष्टिकोन, उच्च मूल्ये असणार्‍या, इ श्रेष्ठ जातीत मिसळायची धडपड. त्यांचा भाग बनायची धडपड. तिथले नागरीकत्व (स्वतःला नाहीतर बाळाला) मिळवून द्यायची मानसिकता. युद्धात हारून ब्रिटिशांखाली राहिलेले मागच्या पिढीतील लोक या स्वतःहून गुलाम बनायला गेलेल्या लोकांपेक्षा कधीही श्रेष्ठ.

आता तिकडे जाणारे सगळेच असे असतात असे नाही. वरील उतारा जे स्वतःसाठी वा भारतासाठी जे थेट वा अप्रत्यक्ष "शुद्ध पैसे कमवण्यासाठी" जात आहेत, स्वतःला वा स्वतःच्या समाजाला नको त्या अर्थाने हिन समजत नाहीत त्यांच्यासाठी नाही. ज्यांना पश्चिम पाहून आपल्या देशाचा प्रचंड गंड येतो त्यांच्यासाठी आहे. शिवाय जे तिकडे जायला मिळत नाही म्हणून इकडे तडफडत असतात, तडफडले आहेत आणि अजूनही ग्रज बाळगून आहेत हे ही येतात. यांच्या मुखी नेहमी "च्यायला, भारत अमेरिकेत समाविष्ट व्हायला पाहिजे राव!" असली वाक्ये येत असतात. ब्रिटिशांखाली असणार्‍या भारतीयांना भारतीयत्वाचा अभिमान होता, आता स्वतंत्र भारतातील चिकार मानसिक गुलामांना (अमेरिकेचे वैभव पाहून) भारतीयत्वाचा प्रचंड न्यूनगंड आहे. "हे कधी भारतात व्हायला?", " यात अजून ५० वर्षे भारत क्वालिफाय होणार नाही.", इ इ गंडदर्शक वाक्ये ही पिढी करत असते. बर्‍याच प्रसंगी थेट नाही बोलली तरी मनात असाच विचार करत असते.

दोन देशांची होलिस्टिक तुलना म्हणजे त्यांच्या जीडीपींची तुलना नसते. हे ही न उमगणारे मानसिक गुलाम आजच्या पिढीत इतके वाढले आहेत कि त्यांची मागच्या पिढीची लायकी होती हा विषय डोक्यात आणायची लायकी नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

स्वच्छ, शिस्तबद्ध, वैज्ञानिक दृष्टिकोन, उच्च मूल्ये असणार्‍या, इ श्रेष्ठ जातीत मिसळायची धडपड.

यात काय चुके?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

धडपड हा शब्द लाचारी असा वाचावा.

टिका त्या मूल्यांवर नाही, ही मूल्ये आपल्याकडे नाहीतच अशा लावलेल्या शोधावर आहेत. भारतातही मागासवर्गीयांतून आलेले बरेच लोक उच्चवर्णीयांत मिसळण्याचा नि आपल्या मूळ लोकांशी असलेली नाळ तोडण्याचा लाचारवाणा, लाजिरवाणा प्रयत्न करताना दिसतात. याचा अर्थ उच्चवर्णीयांची सन्मूल्ये टिकार्ह आहेत असा होत नाही, पण ते "त्यांचं कौतुक नि आपल्यांचा तिटकारा" करण्याची घाई केविलवाणी दिसते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

ब्लंट बट करेक्ट इसेन्शिअली. 'उच्चवर्णीयांची सन्मूल्ये' या प्रयोगामुळे श्रेणीदाते भडकले असावेत, पण तो शब्दसमुच्चय 'उच्चवर्णीयांची(म्हणून)सन्मूल्ये' असा वाचल्यास अडचण पडू नये.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ही मुलंच त्यांना चांगले राहणीमान, आरोग्यासुविधा वगैरे देतायत. तर या पालकांनी कोणत्या बेसिसवर नातवंड सांभाळणार नाही, मुक्ताफळे ऐकावी लागतात वगैरे बोलावे?
जे पालक आपल्या मुलांवर सर्वस्वी अवलंबून आहेत ते तोंडातून अवाक्षर काढत नाहीत. "मुक्ताफळे ऐकावी लागतात" हे माझे म्हणजे लेखकाचे वाक्य आहे. मी स्वतः या गोष्टीतला बिचारा आजोबा नाही, एक त्रयस्थ व्यक्ती आहे आणि ही गोष्ट परिणामकारकरीत्या सांगण्यासाठी मला ते वाक्य योग्यच वाटते.
"नातवंड सांभाळणार नाही" असे माझ्या गोष्टीतल्या आजीआजोबांनी कुठेच म्हंटलेले नाही, अंगात बळ नसतांनासुद्धा आणि अपमान सहन करून्ही ते नातवंडांवरील प्रेमामुळे हे काम करतच आहेत. अशा प्रकारचा विपर्यास बहुधा आपल्या मनातल्या कडवटपणामुळे झाला असावा.

मुलांनी आपल्या कमाईतून आपल्या आईवडिलांवर थोडा खर्च केला आणि त्याच्या बदल्यात त्यांनी त्यांच्या मुलांना त्यांनी सांगितल्याप्रमाणे नीट सांभाळावे अशी अपेक्षा ठेवली तर हा एक रुक्ष व्यवहार झाला. त्यात नातेसंबंध कुठे शिल्लक राहिले? माझा लेख नातेसंबंधांविषयी आहे. आणि ते किती कमकुवत झालेले आहेत हे आपल्या विचारसरणीमधूनच स्पष्ट होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या 'ललित' लेखमालेविषयीचे माझे मत ऋला दिलेल्या उपप्रतिसादातच संपले आहे.
लेखन एकांगी असण्याबद्दल आधीच्या भागांवरील प्रतिसादांतदेखील काहींनी टिप्पणी नोंदवल्या आहेत; तसाच माझादेखील प्रतिसाद होता.
बाकीच्या मुद्द्यांवर कधी चर्चाप्रस्ताव आल्यास बोलेनच. तोपर्यंत 'गप्प बसा' सौंस्कृतीचे पालन करत आहे Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0