खूशखबर! खूशखबर!! खूशखबर!!! - अमेरीकेतल्या लोकानो, ऐका हो ऐका

खूशखबर! खूशखबर!! खूशखबर!!! - अमेरीकेतल्या लोकानो, ऐका हो ऐका;
तुम्ही पन्नास वर्षांचे असाल (जवळपास चालेल) आणि ४०१(क)+सेव्हिंग अकाउंटमधे $४५०,००० असले तर you are done! काम सोडा आणि उरलेलं आयुष्य सुखासमाधानाने भारतात घालवा. कसं? सोपं आहे. या धाग्याच्या भाराभर प्रतिसादातनं जमलेलं 'लोणी' - "महिन्याला एका माणसाला २५,००० रूपये बक्कळ झाले आणि महिन्याला २५,००० रूपयात चांगल्यापैकी भाड्याची जागा मिळते."

त्यामुळे, तुम्ही स्पाउझसकट तीस वर्ष अजून जगलात तर;
(((२*२५०००)*१२)*३०)/६० = $३००,००० - मासिक जगायचा खर्च आणि
(((१*२५०००)*१२)*३०)/६० = $१५०,००० - भाडं३ब
$१ = Rs६० धरलेत. दॅट्स ईट.


एव्हढे पैसे बँकेत ठेवलेत तर, CD जाउद्या, अहो सेव्हिंगलाच ८%+ व्याज मिळतंय. त्यामुळे "अहो इन्फ्लेशन ईंडीयात पण असतं म्हंटलं" वगैरे पॉईंटस काढूच नका. आणि रत्नागिरी, चिपळूण, सांगली अशा एखाद्या "अगदीच खेडेगाव नाही, मोठं बकाल शहर नाही पण बर्‍यापैकी वैद्यकीय सेवा आहे" अशा ठीकाणी राहिलात तर काय, एव्हढ्या पैशात संस्थानिकासारखे रहाल.

पंचवीस वर्षांच्या नोकरीत दर वर्षी $१६,०००, मॅक्झिमम काँट्रीब्यूशन केलेलं असलंत तर $४००,००० ईथेच जमले. शिवाय अमेरि़कन सिटिझनशिप सोडू नका ईथे परत येताना. म्हणजे साठीनंतर सोशल सिक्युरीटी आहेच वर महिन्याची................. तो मै बात पक्की समझूं? Smile



मी हा धागा 'मौजमजा' मधे टाकतोय खरा. पण खरंच असं करता येईल, नाही का?...........

----------------------------------------------------------------------------------
या माझ्या पहिल्या तळटीपा, 'न'वी बाजू तुम्हाला अर्पण करतोय. त्या तुम्हिच वाचा!५ब
१. ते खोडलेला रूपया असं दिसतं ते रूपयाचं नवं चिन्हं ALT+nnnn वापरून लिहिता येतं का?
२. कोणी दादा कोंडकेंचा 'भाड्या'चा विनोद परत नका हां सांगू
३. आधी डॉलर मग आकडा, पण आधी आकडा मग रूपया असं का असतं?
३ब. स्पाउझ बरोबरच, एकाच घरात रहाल उरलेलं आयुष्य असं गॄहित धरलेलं आहे.
४. सोईसाठी धरलाय. आत्ता ५९.२ आहे.
५. म्हणजे पहिल्यांदा लिहिलेल्या. पहिली एकच आहे त्यातली.
५ब. कोणावरनं घेतलंय हे वाक्य सांगा? ओळखा ना ओळखा, तीन ट्राय. ५क
५क. आणि हे कोणावरनं घेतलंय? त्या लेखकाची अशी वाक्या-वाक्याला आठवण होते हो......
६. संपादक, हा प्रश्न "काही छोटे-मोठे प्रश्न" सदरात हलवलात तरी चालेल.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

Smile
लहान ठिकाणी जाउन रहायचं अशी वेगळीच योजना माझ्याही डोक्यात होती.
मग सगळ्यांच्याच डोक्यात ती तशी असते हे जाणवलं आणि त्यातलं वेगळेपणही संपलं.
आमच्या एका मित्राचे सुवचन :-
जेवह तुम्हाला एखादी नवीन आयडिया सुचलेली असते, तेव्हा ती अजून किमान वीस लोकांना तुमच्याआधी सुचून गेलेली असते.
जेव्हा तुम्हाला एखादी मुलगी खूप आवडलेली असते तेव्हा तुमच्या आधी ती किमाना वीस लोकांना आवडलेली असते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

जेव्हा तुम्हाला एखादी मुलगी खूप आवडलेली असते तेव्हा तुमच्या आधी ती किमाना वीस लोकांना आवडलेली असते.

आवडणं वेगळं आणि प्रपोजून होकार मिळवणं वेगळं.

बाकी चालू द्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

$४५०,०००??????

या जन्मी आम्हाला अशक्य आहे Sad Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कित्ती-कित्ती ते मार्दव, कित्ती ती विनयशीलता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पंचवीस वर्षात ४५०के सहजशक्य आहे असे वाटते. अगदी चक्रवाढव्याजाकडे दुर्लक्ष केले तरी एम्प्लॉयर कॉन्ट्रिब्युशन पकडून महिन्याला $१५०० सेव करण्याइतके घरटी एक नोकरी करणारे भारतीय लोक नक्कीच कमावतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पंचवीस वर्षे अमेरिकेत घालवल्यानंतर भारतात यावेसे वाटण्याबाबत साशंक आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गेल्या दहापंधरा वर्षांत अमेरिकेची आर्थिक अधोगती ज्या झपाट्याने होताना दिसते आहे, त्या रेटने, तो पाहून, अमेरिकेत पंचवीस वर्षे घालवलेल्या कोणाच्या मनास असा विचार कदापि किमानपक्षी शिवून गेला असल्यास निदान मला तरी आश्चर्य वाटणार नाही. (विशेषतः, त्याअगोदरची काही समृद्धीची, भरभराटीचीही वर्षे पाहिलेली असतील तर.)

अर्थात, दुरून डोंगर साजरे म्हणा, इथेही आणि तिथेही. शिवाय, पैसा हा एकमेव निकष नाही, हेही आहेच.

पण असो.

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

पर्सेप्शनचा भाग. दुकाने भसाभस बंद पडत जाऊन त्याजागी वाढणार्‍या रिकाम्या जागा, जिथे एके काळी गजबजणारे मॉल असत तिथे भसाभस कुत्र्याच्या छत्रीप्रमाणे उगवणारी डॉलर स्टोअरे (कारण आम जनतेला हळूहळू त्याहून अधिक काहीच - अगदी वॉलमार्टसुद्धा - परवडेनासे होऊ लागणे), तर्‍हेतर्‍हेची रेष्टारण्टे / छोटे उद्योग बंद पडत जाणे, वगैरे वगैरे. ऑन द होल भिकेला लागू लागला आहे हा देश, असे वाटते कधीकधी. असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खरंय, पूर्वीची अमेरिका राहिली नाही.

मूळ चर्चाप्रस्तावकासाठीः (भारतात येऊन निवृत्तीनंतरचे आयुष्य भारतातच घालवायचे असल्यास सिटीझनशिप कशासाठी बाळगून बसायचे? ट्याक्सेशनची निष्कारण कटकट वाढते.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खरंय, पूर्वीची अमेरिका राहिली नाही.

वर्क्स - रादर, डझण्ट वर्क - बोथ वेज़.

भारतही पूर्वीचा राहिलेला नाही. आजच्या भारताशी - तो (तुलनेने) चांगला आहे, की वाईट, याबद्दल काहीच म्हणणे नाही, पण - अजिबात रिलेट करता येत नाही. परक्यांच्या देशात गेल्यासारखे वाटते - आणि तेही केवळ भिन्न पासपोर्टमुळे नव्हे.

(बादवे, खुद्द पुणे ओळखू येत नाही.)

पण असो. हे व्हायचेच.

---------------------------------------------------------------------

म्हणजे, वर्क्स बोथ वेज़, बट डझण्ट वर्क फॉर मी ईदर वेज़, अशा अर्थी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अजिबात रिलेट करता येत नाही. परक्या देशात गेल्यासारखे वाटते

रादर त्यामुळेच पंचवीस वर्षे अमेरिकेत काढल्यानंतर भारतात येण्याबाबत (कधीकधी विचार येत असले तरी गांभीर्याने हालचाली करण्याइतपत हातपाय हालवण्यासंदर्भात) शंका आली होती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खरे आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सुखासुखी नाही कोणी तसा विचार करणार. पण तू वर म्हंटल्याप्रमाणे अमेरीकेची आर्थिक अधोगती अशी होत राहिली तर हा एक सिरिअस पर्याय होईल का? सत्तरीच्या दशकात जे आले त्याना काय वाटतं विचारलं पाहिजे...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....

पंचवीसेक वर्षापूर्वी जे अमेरिकावा तत्सम देशात भारतातून गेले; त्यांच्या डोक्यात तुलना होताना "सध्याची अमेरिका/विद्यमान देश" विरुद्ध "पंचवीस वर्षापूर्वीचा भारत/मायदेश" अशी होत असावी. चुकून एखद्यानं ती तुलना शिरेसली घेउन "(१९७०-८० मधला )भारतच बरा" असा विचार करुन सध्याच्या भारतात यायचा प्रयत्न केल्यास त्याला काय प्रसंगास सामोरे जावे लागत असेल हे रोचक ठरावे. तुलना होताना सध्याचा भारत आणि सध्याच्या वास्तव्याचा अमेरिकादी देश ह्यांची झाल्यास ठीक; नैतर अजूनच गेम व्हायचा.

अर्थात टीव्ही इंटरनेट फोनमुळे जग जोडले गेल्याने काही वेग़ळे आयामही असतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

(बादवे, खुद्द पुणे ओळखू येत नाही.)

घ्या आम्हाला वाटलं पुण्यातले लोकं अगदी अटलांटाला गेले तरी बदलत नाहीत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुम्हाला भारतात गेल्यावर नक्की कशाची कमतरता सगळ्यात जास्त वाटेल? हा प्रश्न फक्त अमेरिकेतल्या भारतीयांनाच नाही, तर 'कोणत्याही परदेशात' काही काळ घालवलेल्या लोकांसाठी आहे. कोणती गोष्ट भारतात हवी असं प्रकर्षाने वाटेल?

मला अमेरिकेत आल्यावर सार्वजनिक दळणवळणाची सोय नाही याचा अजूनही त्रास होतो. अमेरिकेतून परत गेल्यावर सरकारी ग्रंथालयं श्रीमंत नसण्याबद्दल सगळ्यात जास्त दुःख होईल. चांगले परदेशी सिनेमे, चांगल्या प्रिंट्स मिळवण्यातला त्रास जाणवेल बहुदा. नेटफ्लिक्सचीही उणीव भासेल.
पण पुन्हा थोडा विचार करता, बाकीचं सोडून सार्वजनिक शौचालयांची अनुपलब्धता फार टोचेल असंही वाटतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अहो, राष्ट्रपिता गांधीजींनी सांगितलं "भारत छोडो" म्हणून इथे आलो. आता परत कसे जाणार?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कधी येताय मग इकडे Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

२१२००९, २१२०१०,२१२०११, २१२०१२..... मोजतोय/जमवतोय - जरा वेळ लागेलसं दिसतंय Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....

या आमच्या एनाराय आजी आजोबांनी सुखाने भारतात रिटायर व्हावे ही सदिच्छा! आम्ही अधूनमधून सुटीला आलो की येऊच भेटायला (तेव्हढेच हाटेलाचे पैसे वाचतील!).

-दारिद्र्यरेषेखालचा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

५% चलनफुगवटा धरला तर
(((२*२५०००)*१२)*३०)/६० = $३००,००० $६९७,६०८ - मासिक जगायचा खर्च आणि
(((१*२५०००)*१२)*३०)/६० = $१५०,००० $३४८,८०४ - भाडं

ते असो.
बँकेतल्या खात्याचा दर हा जवळपास चलनफुगवट्याच्या दरापेक्षा थोडाच अधिक असतो. तर जर फिक्स डिपॉझिटला ८% मिळत असतील, तर चलनफुगवट्याचा दर ~८% (कदाचित थोडा कमी) इतकाच असणार. कदाचित विकसनशील देशात हा फरक थोडा अधिक असेल.

मुद्दल सुरक्षित ठेवायचे तर ठेवीवरील (व्याज - चलनफुगवटा दर) इतपत वार्षिक मिळकतीवर जगायला पाहिजे. समजा ठेवीवर ८% व्याज मिळत असले, आणि चलनफुगवट्याचा दर ५% असेल, म्हणा. तर मुदलाच्या ३% मिळकतीवर वार्षिक खर्च करता येईल. या वर्षी हा खर्च $१५००० इतका आहे (वरील आकड्यांच्या आधाराने). त्याकरिता आज मुद्दल हवे $५००,०००.

अर्थात ३० वर्ष पूर्ण होता-होता मुद्दल संपले तर चालेल, असेही कोणी ठरवू शकते. आणि व्याज ८%, चलनफुगवटा ५%, म्हणू. तर आज $२९४,००७ गुंतवावे लागतील.

यू.एस.मध्येच जर आज कोणी ६५ वर्षांचे असेल, या वर्षी निवृत्त होऊन मग २०-२५ वर्षे खऊन-पिऊन-सुखी राहायचे असेल (ठेव कमी झाली तर चालेल, असे ठरवून), तर आजची बचत ~$१,०००,००० इतकी लागेल, असे कुठेतरी वाचल्यासारखे वाटते. त्यामुळे भारतात निवृत्त होण्याची शक्यता अगदीच काही टाकाऊ नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

((२*२५०००)*१२) = ६ लाख रुपये वार्षिक जगायचा खर्च
((१*२५०००)*१२) = ३ लाख रुपये वार्षिक भाडं

एकूण ९ लाख वार्षिक लागणार
९,००,०००/०.०८ = ११,२५०,००० रुपये = १ कोटी १२.५ लाख (इतके बँकेत ठेवले आणि ८% व्याज असेल तर ९ लाख वर्षाला मिळतील, शिवाय मुद्दल पण तसेच राहील.)

११,२५०,००० रुपये / ६० = $१८७,५००

१. नेहमी ९ लाखच लागतील, असे मानले आहे.
२. यात इन्फ्लेषन धरलेले नाही.
३. टॅक्स धरलेला नाही.
४. डॉलर ते रुपये रुपांतरीत करायचा खर्च धरलेला नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

करेक्ट! www.aisiakshare.com/node/2962#comment-63179 इथे मी हेच सांगायचा प्रयत्न केलाय. त्या मित्राकडे आताच साधारण १कोटी इन सम फॉर्म ऑर आदर आहेत. रिअल इस्टेट ८% ने वाढेल की नाही अशी शंका असल्यास घर विकायचा पर्याय आहे. सो ही क्यान रिटायर राइट नाउ.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इन्फ्लेशन धरले नाही ही सगळ्यात मोठी उणीव आहे वरील हिशोबाची. १०% इन्फ्लशन पकडा ते ६ लाखाला लावा ४० वर्ष. आणि ४० वर्षानी बघा किती होतं ते. रिटायर व्हायला इन्फ्लेशन बीट करणारी गुंतवणूक असायला लागते. आपल्याकडे सध्द्या एफ्डी ८-९% व्याज देते. इन्फ्लेशन ९-१०% असतं. वार्षिक १४-१५% देणारी गुंतवणूक असेल तर काही चिंता करण्याचं कारण नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

यात तू प्रिंसीपल इंट्याक्ट ठेवायचा प्रयत्न करतोयस आणि इंफ्लेशन व FD चे रेट जवळपास असतात हे विचारत घेत नाहीयस. इंफ्लेशन वाढले तर इंटरेस्ट रेटही वाढेल आणि मिळणारा इंटरेस्टही वाढेल आणि त्यातूनच वर्षभराचा खर्च निघत राहील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रिंसिपल इन्ट्याक्ट ठेवण हे अडिअडचणीला उपयोगी ठरतं तुमचे इंशुरन्स वगैरे सगळ असेल तरी. म्हणून म्हणतोय. घराच्या अगेन्स्ट अन्युईटी वगैरे प्रकार बघितले पाहिजेत एकदा. मला मरेपर्यंत दरमहा अमुक इतके पैसे द्या आणि मेल्यानंतर घर तुम्चं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

मला मरेपर्यंत दरमहा अमुक इतके पैसे द्या आणि मेल्यानंतर घर तुम्चं.

यात अडचण मला एवढीच दिसते, की देव न करो, पण तुम्ही लवकर मरण्यात ब्यांकेला इंटरेष्ट राहातो. तुम्ही जितके जास्त जगाल, तेवढा ब्यांकेला तोटा (किंवा कमी फायदा). शिवाय, स्वतःची जागा असताना तीत ब्यांकेच्या मेहेरबानीने राहायचे.

नाही म्हणजे, मेल्यानंतर पुढच्या पिढीसाठी मागे काही काय म्हणून ठेवायचे, असा काही विचार यामागे असेल, तर तो मी एक वेळ समजूही शकतो, पण मरेपर्यंतची शाश्वती काय? निदान मी तरी हा ऑप्शन स्वीकारण्याअगोदर इतर सर्व ऑप्शन एक्झॉस्ट झालेत, याची खात्री करून घेऊन मगच स्वीकारेन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ते आहेच. ज्यांना अगदीच खाज आहे ४०व्या वर्षी निवृत्त व्हायची त्यांना उपयोगी असावं हे. अजुन एक मुद्दा म्हणजे बचतीवरचं प्रिंसिपल प्रोटेक्ट नाही करायचं असं म्हटलं तर तुम्ही नक्की किती वर्ष जगणार हे काय माहित. सो किती वर्षात ते प्रिंसिपल संपलेलं चालेल हे नाही ठरवता येणार.

आणि

मेल्यानंतर पुढच्या पिढीसाठी मागे काही काय म्हणून ठेवायचे, असा काही विचार यामागे असेल

हॅ हॅ हॅ. ज्यांच्यासाठी काहीतरी ठेवावं अस वाटतं असे लोक असतील तर एवढी चिंधीगिरी करायची गरज पडणार नाही असं वाटतय. आणि ते अपेक्षांची सायकल ब्रे़क करणं वगैरे आहेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

एक कोटीच प्रिंसीपल इंट्याक्ट ठेऊन काय करणार आहे एकटा माणूस?
९% इंफ्लेशन आणि ८% FD व्याज. फरकातला १-२% प्रिंसीमधून जात राहीले तरी १कोटी संपायला बराच वेळ लागेल.
घर रिव्हर्स मॉर्टगेजबद्दलची चर्चा www.aisiakshare.com/node/2163

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

९ टक्के इन्फ्लेशन चक्रवाढव्याजाने वाढत जाणार. याउलट मिळणाऱ्या व्याजाचा वापर घरखर्चासाठी करत राहिल्यास तिथे चक्रवाढव्याजाचा फायदा होत नाही असे दिसते.

एक्सेलमध्ये थोडीशी प्राथमिक आकडेमोड केली तर २०१४ मध्ये निवृत्त झाल्यास ८ टक्के व्याजदर व ९ टक्के महागाईदराने, ९ लाख वार्षिक खर्चवाल्याचे १.१२ कोटी रुपये मुद्दल २०२५ मध्ये - ११ वर्षात - संपेल.

वर्ष मुद्दल खर्च
2014 11200000 900000
2015 11115000 981000
2016 10934910 1069290
2017 10644176.7 1165526.1
2018 10225287.387 1270423.449
2019 9658548.81855 1384761.55941
2020 8921842.6242771 1509390.0997569
2021 7990354.82548425 1645235.20873502
2022 6836276.83400182 1793306.37752117
2023 5428475.02922388 1954703.95149808
2024 3732125.72442889 2130627.30713291
2025 1708312.01760833 2322383.76477487
2026 -686421.324587607 2531398.3036046

कंफर्टेबल रिटायरमेंटसाठी महागाई दरापेक्षा जास्त व्याजदर व वार्षिक खर्चाच्या ३० पट मुद्दल हाताशी हवी. ९ लाख वार्षिक खर्च करणाऱ्याला किमान २.७ कोटी तरी हवेत (व व्याजदर महागाईदरापेक्षा जास्त हवा). अन्यथा निवृत्तीची घाई करु नये.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाटाआ

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उडून गेलं नाही. खर्चासाठी वापरलं आहे.

पहिली ओळः मुद्दल 12000000 खर्च 900000
दुसरी ओळः मुद्दलावरील व्याज 960000, इन्फ्लेशनमुळे खर्चातील वाढ 81000,
व्याजासह मुद्दल 12960000. एकूण खर्च 981000.
मुद्दलातून खर्च वाया गेल्यानंतर पुढील वर्षासाठी शिल्लक राहिलेली मुद्दल 11979000

हे गणित उरलेल्या ओळींसाठी लावले आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मुद्दल तशीच ठेवली नाही तरीही एकदा घर विकल्यावर दुसरे घर घेण्यासाठी किंवा दरमहा घराचे भाडे देण्यासाठी खर्चात वाढ होणारच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मुद्दल तशीच ठेवली नाही तरीही एकदा घर विकल्यावर दुसरे घर घेण्यासाठी किंवा दरमहा घराचे भाडे देण्यासाठी खर्चात वाढ होणारच. >> १ कोटी हातात आहेत. त्यावर ८% ने व्याज ८लाख. ट्याक्स कापून ७लाख. त्या दुसर्या धाग्यानुसार तीन चार जणांच्या फ्यामिलीचा खर्च ३०हजार, २बीएचकेचे भाडे २५हजार येतेय. मग एक माणूस ७लाखात आरामात राहू शकत नाही का? आता परत इंफ्लेशन चक्रवाढ दराने वाढते सांगू नका. कारण मग व्याजपण साधारण तेवढेच वाढणार आहे.

बराच वेळ लागणार नाही. >> किती वेळ लागेल तुमच्या मते? १ कोटी संपायला? ११वर्षे? ९लाख खर्च कुठुन काढला एका माणसाचा?

कोणातरी फायनान्सवाल्याला बोलवा बॉ. आपण नॉनफायनान्सवाले उगाच तेचते बोलत बसलोय. प्रश्न असा आहे की एक ३०ते४० वयाचा माणूस, ज्याच्याकडे १कोटी आहेत, तर तो साधारण ८०चा होइपर्यंत, शून्य ब्यालन्स न होता, भारतात राहू शकेल की नाही? माझ्यामते राहू शकतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

९लाख खर्च कुठुन काढला एका माणसाचा?

६ लाख रुपये घरखर्च व ३ लाख रुपये भाडे असे वरील प्रतिसादातील उदाहरण होते त्यावरुन काढला होता.

प्रश्न फायनान्सचा नाही. प्राथमिक चक्रवाढव्याजाचे गणित आहे.

प्रश्न असा आहे की एक ३०ते४० वयाचा माणूस, ज्याच्याकडे १कोटी आहेत, तर तो साधारण ८०चा होइपर्यंत, शून्य ब्यालन्स न होता, भारतात राहू शकेल की नाही?

सध्याचा महागाईदर ९ टक्के व फिक्स्ड व्याजदर ८ टक्के पकडला. उत्पन्नावर कोणताही कर भरत नाही असे गृहित धरले तर ३० वर्षे वयाचा माणूस घरभाड्यासकट १२९०० रुपयाच्या मासिक खर्चावर जगू शकतो.

५० वर्षाची आकडेमोड पाहा.

वर्ष मुद्दल खर्च
2014 10000000 155000
2015 10631050 168950
2016 11297378.5 184155.5
2017 12000439.285 200729.495
2018 12741679.27825 218795.14955
2019 13522526.9075005 238486.7130095
2020 14344378.5429202 259950.517180355
2021 15208582.7626272 283346.063726587
2022 16116422.1741754 308847.20946198
2023 17069092.4897959 336643.458313558
2024 18067678.5194178 366941.369561778
2025 19113126.7081489 399966.092822338
2026 20206213.8036244 435963.041176348
2027 21347511.1930321 475199.71488222
2028 22537344.3992531 517967.68922162
2029 23775747.1699418 564584.781251565
2030 25062409.5319729 615397.411564206
2031 26396619.1159258 670783.178604985
2032 27777194.9805204 731153.664679434
2033 29202413.0844614 796957.494500583
2034 30669922.4622127 868683.669005635
2035 32176651.0599736 946865.199216142
2036 33718700.0776259 1032083.06714559
2037 35291225.5406473 1124970.5431887
2038 36888305.6918234 1226217.89207568
2039 38502792.6448068 1336577.50236249
2040 40126146.5788162 1456869.47757512
2041 41748250.5745646 1587987.73055688
2042 43357203.9942228 1730906.626307
2043 44939092.091086 1886688.22267463
2044 46477729.2956575 2056490.16271534
2045 47954373.3619504 2241574.27735972
2046 49347407.2685843 2443315.9623221
2047 50631985.4511399 2663214.39893109
2048 51779640.5923962 2902903.69483488
2049 52757846.8124179 3164165.02737002
2050 53529534.677578 3448939.87983333
2051 54052552.982766 3759344.46901833
2052 54279071.7501572 4097685.47122998
2053 54154920.3265292 4466477.16364067
2054 53618853.8442832 4868460.10836833
2055 52601740.6337043 5306621.51812148
2056 51025662.4296482 5784217.45475242
2057 48802918.39834 6304797.02568014
2058 45834923.1122158 6872228.75799135
2059 42010987.6149825 7490729.34621057
2060 37206971.6368116 8164894.98736952
2061 31283793.8315238 8899735.53623278
2062 24085785.6035519 9700711.73449373
2063 15438872.6612379 10573775.7905982
2064 5148566.86238498 11525415.611752
2065 -7002250.8054339 12562703.0168097
  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हम्म. त्याच गावात तशाच लाइफस्टाईलने रहायचे असेल तर सध्याच्या खर्चाच्या ३०पट मुद्दल आणि इंफ्लेशनला बीट करणारे व्याजदर...ओके थँक्यू Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"खर्चावरील व्याज तुम्ही वापरत असता; खर्च करत असता.
त्यामुळे त्यावरती तुम्हाला effect of compounding, चक्रवाढ व्याजाचा मिळणार नाही"
हा मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

येस गॉट इट. पण तिकडे अजोंचा ३व्यक्तींचा वर्षाचा खर्च (EMI/भाडे पकडून)१२ लाख आहे. बाकीच्यांचा ३ ४ जणांच्या कुटुंबाचा वर्षाचा खर्च (EMI/भाडे, शिक्षण, वर्षातून एकदा देशपरदेशी पर्यटन वगैरे सोडून) ३.५ लाख आहे. आणि इथे मिसळपाव, धनंजय, उदय. २ व्यक्ती तर मी १व्यक्तीच्या खर्चाबद्दल बोलतोय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

((१*२५०००)*१२) =३ लाख रुपये वार्षिक जगायचा खर्च (कदाचित जास्त आहे, २५ हजारात २ जण मुंबईत राहणारे माहीत आहेत.)
((१*२५०००)*१२) = ३ लाख रुपये वार्षिक भाडं
एकूण ६ लाख
या ब्लॉगमध्ये म्हटल्याप्रमाणे रिटायर व्हायला त्याच्या २५ पट रक्कम पण पुरेशी होईल, पण अगदी मन मारून जगण्यापेक्षा वर म्हटल्याप्रमाणे ३० पट पकडू. (यात इन्फ्लेशनचा होणारा परिणाम पण धरला गेला).
६ लाख * ३० पट / ६० = १.८ कोटी = $३००,००० पुरेसे होऊ शकतील. (इंफ्लेशन न धरता दोघांचे $१८७,५०० आले होते). अर्थात २५,००० रुपये महिना खर्च ही रक्कम व्यक्ती-व्यक्तीनुसार बदलू शकते. इतके पैसे कुणाला कमी वाटू शकतात, तर कुणाला जास्त.

माझे व्यक्तिगत मत आहे की "currency of life is time, not money". पैसे कमावता येतात, पण वेळ मात्र ठराविक असतो. आणि एका ठराविक मर्यादेनंतर अजून पैसे मिळाल्याने आनंद काही विशेष वाढत नाही. मग पैसे का कमवायचे? कारण खिशात पैसा असला की एक आत्मविश्वास येतो. आयुष्यात जास्त रिस्क घेण्याची ताकद येते आणि त्यातून आयुष्यात अजून आनंद मिळवण्याच्या शक्यता वाढतात. बस, अजून काही नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हम्म. आभार Smile
कारण खिशात पैसा असला की एक आत्मविश्वास येतो. > अगदी अगदी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

+१
पर्फेक्ट

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

इंफ्लेशनला बीट करणारे व्याजदर

हे फक्त शेअर बाजारातून मिळू शकतात. म्हणजे डायरेक शेअर्स किंवा मुचुअल फंड. बाकी काही कमी जोखमीचे मार्ग असतील तर सांगा...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

@अनुप ढेरे:

इन्फ्लेशन धरले नाही ही सगळ्यात मोठी उणीव आहे वरील हिशोबाची.

तुम्ही बहुदा बघताय तो प्रॉडक्ट म्हणजे इन्फ्लेशन अ‍ॅडजस्टेड अ‍ॅन्युइटी. An inflation-indexed annuity will provide a lower initial amount of monthly income than a non—inflation-indexed immediate annuity, but over time, as inflation continues, the monthly income will gradually increase, surpassing the amount you would be receiving from an equivalent non-indexed annuity.
अ‍ॅन्युइटी हा विषय खूप किचकट आहे आणि खूप variables आहेत, म्हणून जास्त लिहित नाही. पण अ‍ॅन्युइटीचे बरेच कॅल्क्युलेटर वेबवर उपलब्ध आहेत, ते वापरून किती मूळ रक्कम गुंतवावी लागेल, ते काढता येते.

गुंतवणुकीच्या साधारण ४% रक्कम विथड्रॉ करावी, असा अमेरिकेत thumb-rule आहे. (इथले इन्फ्लेशन ३% पकडून) भारतात हा आकडा किती असेल, याची मला कल्पना नाही. पण ८% हा एकदम सेफ गुंतवणुकीचा दर धरला होता. पण आपण फारच कमी रक्कम सेफ गुंतवणुकीत ठेवतो. साधारणतः इमर्जन्सी फंड फक्त अल्ट्रा सेफ गुंतवणुकीत असतात. बाकी गुंतवणूक अशा ठिकाणी असते जिथे इन्फ्लशनपेक्षा जास्त रिटर्न्स मिळतील. त्यामुळे मी रिटायर झालो तर १ कोटी ट्रेजरी बाँडमध्ये ठेवणार नाही, थोडे इक्विटी मार्केटमध्ये, थोडे बाँडमध्ये, थोडे रियल इस्टेटमध्ये वगैरे असेच ठेवणार.

जर माझ्यावर असा विचार करायची वेळ आली, तर सर्वप्रथम मी माँटे-कार्लो अ‍ॅनॅलिसिस करीन. रिटायरमेंटसाठी हे एक प्लॅनिंग टूल आहे, ज्यात तुम्ही वेगवेगळे पॅरॅमिटर अंदाज करून, विशिष्ट निव्रुत्तीवेतन मिळेल का? याची प्रोबॅबिलिटी काढू शकता. नोबेल विजेता डॉ.विलियम शार्प यांची Financial Engines ही कंपनी अशी सोय देते. (Disclosure: या कंपनीशी माझा व्यक्तिगत काहीही संबंध नाही. पण मी एच.आर. आणि बेनेफिट्स संबंधात काम करतो आणि मी आमच्या ४०१(क) मध्ये या कंपनीची सोय देण्यासाठी कारणीभूत होतो.)

बरेच इंग्रजी शब्द वापरले आहेत, म्हणून क्षमस्व. (मला फायनान्सचे योग्य मराठी शब्द माहीत नाहीत किंवा मराठीत अचूक भाषांतर करता येत नाही).

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

९० च्या दशकात गोल्डन हॅण्डशेक म्हणून २० लाख वगैरे घेतलेल्यांचे पैसे ४-५ वर्षात संपल्याची उदाहरणे आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

+१
उदाहरणे पाहण्यात आहेत.
त्या काळात आजच्यापेक्षा २० लाख लैच मोठी रक्कम वाटे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

त्याच गावात तशाच लाइफस्टाईलने रहायचे असेल तर सध्याच्या खर्चाच्या ३०पट मुद्दल आणि इंफ्लेशनला बीट करणारे व्याजदर...

हा थोडा फसवा युक्तिवाद आहे. सर्वसाधारणपणे रिटायरमेंट प्लानिंग हा ज्यांचा धंदा आहे, ते हा सल्ला लोकांना देत असतात. लोकांनी जास्त पैसे गुंतवणं हे त्यांच्यासाठी अर्थातच फायद्याचं असतं. 'सध्याच्या खर्चाच्या ३० पट' मध्ये सध्याचा खर्चच कायम राहील हे गृहितक आहे. तो तसा राहत नाही.

- तुमच्या घराचं कर्ज कधी ना कधी फिटतं. साधारण ४५ वर्ष वयाचा माणूस रिटायरमेंट प्लानिंगचा विचार करतो तेव्हा त्याने पंधराएक वर्षं घराचे पैसे भरलेले असतात. हा तीसेक टक्क्यांचा खर्च आहे.
- नोकरी करण्यासाठी तुमचा दररोजचा प्रवासखर्च - त्यात पेट्रोल आणि गाडीवर पडणारं मायलेज कमी होतो. हा सुमारे पाच टक्के खर्च आहे.
- नोकरीसाठी आवश्यक असणारे चांगले कपडे, वेळ कमी पडत असल्यामुळे होणारा बाहेर खाण्याचा खर्च हे कमी होतं. हाही सुमारे पाच टक्के खर्च आहे.
- मुलांच्या सुटीच्या काळातच करता येणारा प्रवास महागाचा पडतो, कारण त्यावेळी सर्वच जण प्रवास करत असतात.
- मुलांचं शिक्षण कधीतरी पूर्ण होऊन ती नोकरीला वगैरे लागतात. तो खर्च साधारण पन्नासाव्या वर्षी थांबतो.

त्यामुळे तुमच्या भविष्यातला खर्च हा 'सध्याच्या खर्चाच्या' साधारण ३० ते ४० टक्क्यांनी कमी होऊ शकतो.

दुसरी गोष्ट चक्रवाढव्याजाची. ८% व्याजाने पैसे मिळणार आणि ९% इन्फ्लेशन रेट हे गृहितक फारच चुकीचं आहे. दोन वर्षांसाठी लागणारी कॅश हातात केव्हाही काढता येईल अशा स्वरूपात ठेवली, तर उरलेल्या गुंतवणुकींवर इन्फ्लेशन रेटपेक्षा जास्त परतावा सहज मिळू शकतो. ८% व्याजदर हा जवळपास शून्य रिस्कसाठी असतो. तुमचे पैसे बऱ्यापैकी सुरक्षित स्टॉक्स आणि बॉंड्स यांच्या कॉंबिनेशनमध्ये ठेवलेत तर तुम्हाला जास्त परतावा मिळतो. त्यातही हे लॉंग टर्म प्लॅनिंग असल्यामुळे जर तुम्ही स्टॉक्स स्वस्त असताना बॉंड्स विकून स्टॉक्स विकत घेतले आणि स्टॉक्स वर गेल्यावर पुन्हा बॉंड्समध्ये घातलेत तर अधिक फायदाही होऊ शकतो.

त्यामुळे माझा अंदाज असा आहे की रिटायर झाल्यावर तुमचे कुठचे खर्च कसे कमी होतील याचा हिशोब करून जर किंचित काटकसरीने राहिलं तर 'सध्याच्या खर्चाच्या' सुमारे १२ ते १५ पटीत सहज जगता येईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सध्याच्या खर्चाच्या ३०पट मुद्दल

माझा युक्तिवाद सध्याच्या खर्चाच्या ३० पट असा नसून रिटायरमेंटनंतर लागणाऱ्या खर्चाच्या ३० पट असा आहे. बाकी निदान भारतातील बचतीचे स्वरुप पाहता स्टॉक इन्वेस्टमेंट फारच कमी लोक करतात हे सहज लक्षात येईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हम्म. पटतय :-).

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

I= Investment in today's terms
E = Annual expenditure in today's terms
r = rate of return in percent per annum
f = rate of inflation in percent per annum
n= number of years

All accruals and expenses upfront
1. Today's balance = I(1+r)^0-E(1+f)^0
2. Balance after one year = I(1+r)^1-E((1+f)^0*(1+r)+(1+f)^1)
3. Balance after second year = I(1+r)^2-E((1+f)^0*(1+r)^2+(1+f)(1+r)^1+(1+f)^2)
4. Balance after nth year = I(1+r)^n-E((1+r)^n + (1+r)^(n-1)(1+f) + (1+r)^(n-2)(1+f)^2 + ..... + (1+f)^n)=0

Hence I/E = ((1+r)^n + (1+r)^(n-1)(1+f) + (1+r)^(n-2)(1+f)^2 + ..... + (1+f)^n)/(1+r)^n
= 1+ (1+f)/(1+r)+ ((1+f)/(1+r))^2+((1+f)/(1+r))^3 + ...+ ((1+f)/(1+r))^n
= (1- ((1+f)/(1+r))^n)/(1-((1+f)/(1+r)))
if (1+f)/(1+r) is called C
I/E = (1-C^n)/(1-C)

For values of rate of return = 8%, inflation rate of 6% and balance life of 30 years,
I/E = 23.18.

आजच्या खर्चाच्या कितीपट गुंतवणूक करावी लागेल हे परतावा दर व महागाई दर यांच्यात किती फरक आहे यावर अवलंबून आहे. शिवाय तोच फरक असेल तरी ते दोन्हीचे प्रत्यक्ष मूल्य काय आहे हे देखिल महत्त्वाचे आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

२ कोटी ७० लाखात मी रिटायर व्हायला तयार आहे. नो प्रॉब्लेम.

पण इतर चर्चेच्या अनुषंगाने.

१. रिटायर झाल्यावर कमाई पूर्ण बंदच करायची सक्ती आहे का?
२. आज जी 'ऐश' करतो आहोत, ती रिटायरमेंटनंतर करायची इच्छा व शारिरिक क्षमता रहात नाही हे हिशोबात धरले आहे का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-