कापूसकोंड्याला गोष्ट

कापूसकोंड्याला मी म्हटलं, मी
तुला गोष्ट सांगू का?
तो थकून बसला होता शतकानुशतकं नुसत्या उचक्या लागून
नाव तर सगळे घेत होते त्याचं आणि कुणालाही
ठाऊक नव्हती कधीही त्याची गोष्ट
माहीत नव्हतं की, कोण कुठला माणूस आहे तो,
कोणत्या मातीतला?

शुभ्र कापसातल्या सरकीला कोंड्यागत फेकून देतात लोक,
हे माहीत असणारेही म्हणत होते हसत-हसत...
तुला कापूसकोंड्याची गोष्ट सांगू का!
सांग काय म्हण्तेस तुला कापूसकोंड्याची गोष्ट सांगू का?
नको काय म्हण्तेस तुला कापूसकोंड्याची गोष्ट सांगू का?
हसतेस काय तुला कापूसकोंड्याची गोष्ट सांगू का?
झोपू नकोस तुला कापूसकोंड्याची गोष्ट सांगू का?
उठून का जातेस तुला कापूसकोंड्याची गोष्ट सांगू का?

माहीत नसलेली गोष्ट मुलांना सांगण्यासाठी
उत्सुक माणसं शतकानुशतकं
आणि कापूसकोंड्या गोष्टीबाहेर बसून राहिलेला रिकामा उन्हात
त्याच्या ना जगण्याला अर्थये
ना मरण्याला

कापूसकोंड्याला म्हटलं, टेकव माझ्या मांडीवर डोकं
आणि झोप शांत शतकांचं जागेपण मिटवून
मी सांगेन तुला गोष्ट!

field_vote: 
4.2
Your rating: None Average: 4.2 (5 votes)

प्रतिक्रिया

नाव तर सगळे घेत होते त्याचं आणि कुणालाही
ठाऊक नव्हती कधीही त्याची गोष्ट
माहीत नव्हतं की, कोण कुठला माणूस आहे तो,
कोणत्या मातीतला?
.
.
.
झोप शांत शतकांचं जागेपण मिटवून
मी सांगेन तुला गोष्ट!

छान आहे. आवडली कविता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कापूसकोंड्याला म्हटलं, टेकव माझ्या मांडीवर डोकं
आणि झोप शांत शतकांचं जागेपण मिटवून
मी सांगेन तुला गोष्ट!

मग शेवटी कोणती गोष्ट सांगितलीत त्याला?

कापूसकोंड्याची?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चिऊ-काऊ ची Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कापूसकोंड्याला मी म्हटलं, मी
तुला गोष्ट सांगू का?

'तुला' ऐवजी 'तुझी' गोष्ट सांगू का? असं विचारणं जास्त न्याय्य वाटलं असतं. तो बिचारा, उन्हातान्हात, कापसांतून सरकी काढत फिरतो आहे. हंसाने दुधातलं अतिरेकी पाणी काढून टाकावं तसं. लोक खुशाल त्याने केलेल्या मऊ गादीवर झोपतात. त्यांच्या राठ झालेल्या स्वप्नांचे बिछाने तो पुन्हा मुलायम करतो. आणि त्याच्या आयुष्याची गोष्ट मात्र कोणी ऐकत नाही. सांगत नाही. नुसतीच हुल देतात. खरंच त्याची गोष्ट कोणा कवि-लेखक मंडळींनी सांगितली पाहिजे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'तुला' ऐवजी 'तुझी' गोष्ट सांगू का? असं विचारणं जास्त न्याय्य वाटलं असतं.

असे विचारले असते, तर तो बहुधा 'नकोऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽ!!!!!!!!' म्हणून किंचाळत, दोन्हीं कानांवर हात ठेवून पळून गेला असता.

अगदी 'नको काय म्हणतोस, कानावर हात काय ठेवतोस, पळून काय जातोस, तुला कापूसकोंड्याची गोष्ट सांगू?' असे त्याला विचारण्याची संधी तुम्हाला मिळण्याअगोदर!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खरंच त्याची गोष्ट कोणा कवि-लेखक मंडळींनी सांगितली पाहिजे.- आत्ताच कल्पना सुचली. सध्या रिकामटेकडा आहेच. आजच लिहून काढतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उ त्त म!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

वाचायला छान वाटलं.
अश्या लेखन प्रकाराला नेमकं काय म्हणाव?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेखन

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मुक्तछंदातील कविता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छान लिहिलय. पुलंच 'बोलट' हे व्यक्तिचित्र आठवलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !