युद्ध

हाय सोसायटीतल्या लोकांची जिमला जायची, इतर पुरुषांसाठी तयार व्हायची, मुलांसाठी प्रचंड मेहेनतीने उठायची पण बहुसंख्य स्त्री वर्गासाठी मात्र डबे भरायची अशी ही वेळ.
थोडक्यात, सकाळचे ६.३० वगैरे वाजलेत. इतर दिवशी घरात ह्या वेळी युद्धपातळीवर आवराआवर चालू असते, पण आज नाही.
कारण वार- शनिवार!
मी शांतपणे लोळत पडलेला असतो. झोप मस्तपैकी आजूबाजूला असते, स्वप्नं चालू असतात आणि अचानक कोणीतरी बोंबा मारायला लागतं-
ढँण.ढँण.ढँण.ढँणssss
कुलदैवतेला स्मरून सांगा- शनिवारी सकाळी ६.३० ला अलार्म लावून उठून बसण्याचं काय कारण असतं? काहीही नाही. पण हे तिला पटेल तर ना? मग त्या अलार्मच्या रणशिंगानेच युद्धाला सुरवात होते.
"शनिवारी ६.३० चा अलार्म कशाला लावलास?" मह्त्प्रयासाने डोळे उघडून मी तिला विचारतो. ती शांतपणे झोपलेली.
ढँण.ढँण.ढँण.ढँणssss
"उठून तो अलार्म बंद तरी कर!" - मी पेंगुळलेल्या डोळ्यांनी आजूबाजूला अलार्म शोधतो. डोळ्यावर चश्मा नसल्याने धड काहीच दिसत नाही. उजवीकडून बहुतेक आवाज येतोय. चश्मा लावला नसेल, तर ऐकूही जरा कमीच येतं असा माझा अनुभव आहे.
"उम्म्म, किती वाजले?" बाजूने आवाज येतो.
ढँण.ढँण.ढँण.ढँणssss
"हा भयानक अलार्म तूच लावलायेस, आणि वरून मलाच विचारतेस किती वाजले? बंद कर प्लीज."
"अरे तो काय, त्या साईड टेबलच्या कप्प्यात आहे फोन. जरा बंद कर ना प्लीssज"
फोन साईड टेबलच्या कप्प्यात असणे, हा दंडनीय गुन्हा असल्याचा पॉइंट मला अलार्मच्या गदारोळात फिलहाल सोडून द्यावा लागणार आहे, हा विचार मनात येउन क्षणमात्र दु:ख होतं. शिवाय प्लीssज मधला मोहक स्वर दुर्लक्षणं अशक्य असतं.
ढँण.ढँण- टेबलाशी झटापट करून मी तो अलार्म बंद करतो.
"हम्म्म. झोप आता." असं म्हणून शत्रू कूस बदलून शांतपणे झोपूनही जातो.
देवाच्या कृपेने मला तिचा फोन बघायची बुद्धी होते. त्यात ६.४५, ७.०० आणि ७.१५ असे तीन अलार्म्स माझ्याकडे बघून दात विचकून हसत असतात.
ते बघून माझ्या डोक्यात काहीतरी वाजतं आणि शत्रूला ह्याबद्दल जाब विचारण्याचा निर्णय मी तातडीने घेतो. आणि ते ३ अलार्म बंद करून मग पुन्हा झोपेकडे वळतो.

-*-

"उठ रे, ८.३० झालेयेत." अंगावरचं पांघरूण खेचत तिचा स्वर माझ्या कानावर पडतो. अलार्म्स!
"तू सकाळी एवढे भारंभार अलार्म्स का लावतेस ग?"
"अरे मला पटकन जाग येत नाही. ४ अलार्म्स असले की मग कसं सेफ वाटतं. जाग आली का तुला आज?" पडदे उघडताना ती विचारते. आत आलेला सूर्यप्रकाश मग उरलीसुरली झोप आणि शनिवार सकाळचा माहोल- दोन्ही पळवून लावतो. छ्छ्या!
"मग? आणि आज शनिवार आहे, तू फक्त सोमवार ते शुक्रवार का नाही लावत हे अलार्म्स? त्या स्मार्टफोनचा काहीतरी वापर कर-"
"अरे मला नाही जमत, असू दे ना, मला अजीबात त्रास होत नाही त्याचा. चल उठ आता..."
"जमत नाही काय? फक्त हे असं-" पण ही वाक्य शत्रूच्या कानावर पडतच नाहीत. तो हातात झाडू घेऊन समोरच्या खोलीत साफसफाई करायला तयार असतो.

मला सांगा, शनिवार सकाळ ही काय साफसफाई करण्याची वेळ आहे का? काहीही काय अरे? असं मस्त झोपून रहावं, मग थोडावेळ क्लासिकल लोळणं वगैरे. त्यानंतर झोप थोडी दूर होते न होते तोच बाजूला फोनवरून जगभरच्या मित्रांची विचारपूस. मग जरा उगाच फेसबुकवर एक चक्कर, लोकांना काहीही पोस्ट केल्याबद्दल शिव्या-ओव्या. मग झालंच तर पेपर हातात-
"जरा हे उचलायला मदत कर रे. माझा हात पोचत नाहिये तिथे." शत्रू तेवढ्यात मला परत जमिनीवर आणतो.
निव्वळ नाविलाजाने मी पाय ओढत बाहेर पाउल टाकतो आणि समोरचं दृश्य माझी उरलीसुरली झोप उडवून टाकतं. बाबा आदमच्या काळातला एक मिक्सरचा खोका वरती फिदीफिदी हसत बसलेला असतो आणि ती त्याच्याखाली उत्सुक चेहेर्याने माझ्याकडे बघत असते.
"खाली काढ ना ह्याला जरा"
"आत्ता? जरा थांब ना-" अटॅक होणार हे माहिती असूनही मी गाफिलपणे एक वाक्य बोलून जातो.
"थांब काय अरे? आत्ता हवंय म्हणूनच सांगतेय ना? नाहीतर..." पुढल्या फैरी मला ऐकू येत नाहीत. गोळीबार सुरू झाला आहे एवढं समजतं आणि मी चिलखत चढवतो.
"आलोssss. जरा तोंड धूवुन येतो. नाहीतर तूच म्हणशील सकाळी ब्रशसुद्धा केला नाहीस म्हणून".
कसला गुगली टाकलाय! मी विजयी मुद्रेने आत जाऊन तोंडात ब्रश धरून पुन्हा बाहेर येतो.
"तू येतोयेस की मीच काढू हा खोका?" शत्रू आता थोडा त्रासलेला दिसतो.
"ई एओ आ. आंम अआ". तिला ब्रश करताना बोललेलं अजीबात आवडत नाही. अजून एक पॉईंट मिळाला! बरं झालं. ६.३० ही काय अलार्म लावायची वेळ आहे का?
"ओके. मीच करते." आवाजातल्या निर्धारामुळे मला रब्बरबँड पूर्ण ताणला गेल्याचं समजतं. आता अजून ताणला तर शनिवारी सिरिअल्स खायची वेळ आल्याशिवाय रहाणार नाही. तेव्हा बाझीगर बनलेलं बरं.
मी तोंडातली टूथपेस्ट गिळून टाकत चपळाईने पुढे होऊन तो मिक्सरचा खोका खाली आणतो. बोनस पॉईंट मिळवण्यासाठी एका ओल्या फडक्याने तो पुसूनही घेतो आणि आवाजात कमालीचा इंट्रेस्ट आणून एक निरागस सवाल टाकतो -" आत्याने दिलेला होता ना हा मागे दिवाळीला?"
"काहीही काय अरे, आपण पलीकडे जाऊन घेतला होता हा. तुला काहीच लक्षात नसतं! दे इकडे-" म्हणून एक विजयी स्मित फेकून शत्रू त्या मि़क्सरची पाहणी करण्यात गुंग होतो. आता तो मिक्सर आत्याने दिलेला नाही- हे मला पक्कं माहिती असतं, आणि कुणी दिलाय हे पक्कं ठावूक नसतं! तेव्हा अज्ञान उघडं करायला एवढी माहीती पुरेशी असते. असो!
"काय हवंय तुला आता त्या मिक्सरमध्ये?"
"अरे नीलूला जरा सांगायचं होतं, तिच्या मावसबहिणीच्या लग्नात गिफ्ट द्यायला तिला काहीतरी हवं आहे. तिने मला व्हॉट्सप केलं मगाशी." खोक्यातून आवाज येतो. "तिला ना-" खोक्यातला आवाज उत्साहाने काहीतरी सांगायला लागतो.
नीलू आणि तिच्या मावसबहिणीला शनिवार सकाळच मिळाली होती का हे उद्योग करायला? लोक असं का करतात? त्यांना काहीच कसं समजत नाही? शनिवारची सकाळ ही असल्या क्रूर थट्टेची वेळ आहे का? असले चित्र-विचित्र प्रश्न माझ्या डोक्यात थैमान घालू लागतात.
तेवढ्यात खोक्यातून आवाज येतो- "तुला काय वाटतं? काय दिलेलं बरं?"
"हो, चालेल.." असलं काहीतरी निरर्थक उत्तर देऊन मी स्वयंपाकखोलीत डबे शोधू लागतो. मरणाची भूक लागलेली असते.
"चालेल काय? बेडशीट्स घेऊ की तो लँप?"
"बेडशीट्स. अगं बाकरवड्या कुठे ठेवल्यास तू? मी काल ह्या इथे ठेवलेल्या-" एका ड्ब्यापाशी जाऊन मी तिला विचारतो. तो डबा नक्कीच ओळखीचा आहे. काल परवा त्याच्यावरच बाकरवड्या ठेवल्याचं मला पक्कं लक्षात असतं. माझी शॉर्ट टर्म मेमरी तशी उत्तम आहे.
"फेकून दिल्या मी त्या. तारीख उलटली होती त्यांची दोन दिवसांपूर्वी." खोक्यातून निरिच्छ सुरांत उत्तर येतं.
फेकून दिल्या? बाकरवड्या? अरे काय हे? मी खाऊ काय आता? सकाळी सकाळी एकतर मला त्या अलार्मने ऊठवलंस, नंतर हे मिक्सरपुराण काढून बसलीस.
काय चाललंय काय? शनिवार सकाळचा बट्ट्याबोळ! फेकून दिल्या? असं कोणी करू शकतं का? श्या!
"इकडे ये आधी." माझ्या आवाजात बहुतेक थोडा वैताग+ संताप डोकावतो. फेकून दिल्या?
"थांब, जरा हे जागेवर ठेवते. इकडे येतोस का?" शत्रू अजूनही मिक्सरपुराणातच गुंतलेला असतो. कहर आहे.
मी तो खोका पुन्हा त्याच्या मूळ जागी ठेवतो, आणि काही न बोलता जाऊन लोकसत्तेत तोंड खुपसतो. मला काय करायचंय? जाऊ दे! तिला जर एवढं कळत नाही तर. भूक तर लागलीये, पण आता शरण जाऊन चालणार नाही. थोडी कळ काढून मग बघू. दर वेळी मीच-
पुढली १५ मिनिटं शांततेत जातात. माझ्या मनात तोपर्यंत हजारो विचार येऊन जातात! शत्रूवर कशी कुरघोडी करावी, त्याला नामोहरम करायला काय डावपेच वापरावे वगैरे कूटविचारांत मी हरवून जातो, समोरच्या अग्रलेखात गिरिश कुबेर आज कोणाला दम देतायेत हेसुद्धा मला समजत नाही.
डोक्यात सत्राशेसाठ विचार चालू असतात. मला खरंच माझ्या शत्रूचा आता राग यायला लागलाय-हेपण मला कळतं. सहाजिक आहे- राग येणार नाही?
आणि बाकरवड्या कुणी फेकून देतं का-

"कुठलं फरसाण घेणार आहेस?" स्वयंपाकघरातून आवाज येतो.
काय बोलतेय काय माहिती. अचानक फरसाण कुठून आलं? पण असंच आहे, तिचे विचार कुठून कुठे जातील काय माहिती? मागे एकदा मांजर पा़ळायचं ठरलं होतं तेव्हा त्याबद्दल बोलता बोलता तिने अचानक "हा बुश बरा आहे की क्लिंटन रे?" असा राजकीय सवाल टाकला होता. तिच्या डोक्यातल्या वायरी थोड्या गंजल्या आहेत.
"काय? कशाबद्दल बोलतेयेस?" माझ्या आवाजातला राग लपत नाही.
तोवर मिसळीचा गरमा-गरम मसालेदार सुगंध तिच्या हातांतल्या बश्यांतून माझ्यापर्यंत पोचलेला असतो.
"नेहेमीचं फरसाण घेणार आहेस की नवं आणलंय ते?, आणि पाव बशीतच आहेत, खायला घे, मी आलेच, कांदा घेऊन येते थांब" केसांना मस्तपैकी एक झटका देत ती आत जाते.
मुसळधार पावसानंतर आपला उन्हाळी त्रागा नाहीसा व्हावा तसे तिच्या त्या प्रश्नाने माझे युध्दविषयक विचार नाहीसे होतात. क्षणार्धात!
आणि खरं सांगू, तिची मिसळ अशी जमून जाते, बस्स! कधीतरी या खायला, मग सविस्तर सांगतो.
"हं, घे कांदा. कशी झालीये रे?" तिचा स्वर उत्सुक.
मी एक घास घेतो. निव्वळ अप्रतिम. "फस्स्क्लास झालीये ग. तू बेश्ट आहेस!" मी मनमोकळेपणाने तारीफ करतो. मगासच्या शत्रू वगैरे विचारांबद्दल मलाच आता मनात जरा गिल्टी वाटायला लागतं. उगाच आपण असलं काहितरी मनात ठेवतो. सकाळी एवढं उठून तिने-

"सांडवशील बशीबाहेर! नीट खा रे" शत्रू पुन्हा डोकावतोच!!

-*-

~ परवाच आमच्या गुहेत घडलेल्या एका हृदयद्रावक प्रसंगावर आधारित. बाकरवड्या मात्र खरंच फेकून देण्यात आल्या होत्या.

field_vote: 
4.5
Your rating: None Average: 4.5 (8 votes)

प्रतिक्रिया

अह्हाहा!!! खरच खुसखुशीत.

हा दंडनीय गुन्हा असल्याचा पॉइंट मला अलार्मच्या गदारोळात फिलहाल सोडून द्यावा लागणार आहे, हा विचार मनात येउन क्षणमात्र दु:ख होतं.

हे मस्त!!

ओके. मीच करते." आवाजातल्या निर्धारामुळे मला रब्बरबँड पूर्ण ताणला गेल्याचं समजतं. आता अजून ताणला तर शनिवारी सिरिअल्स खायची वेळ आल्याशिवाय रहाणार नाही. तेव्हा बाझीगर बनलेलं बरं.

Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छान लेख.
फक्त २ दिवसांपूर्वी एक्स्पायरी डेट उलटलेला माल खाल्याने काही त्रास होत नाही. एकदा बाकरवड्या विकत आणतानाच तारीख उलटलेल्या मिळाल्या होत्या. शिवाय 'बाकरवड्या' म्हणून दोन पाकिटे आणली. बऱ्याचदा असाच माल मिळतो.

असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चितळे बाकरवड्या होत्या का ??

अगदी अलिकडेच मुंबई पुणे दॄतगती महामार्गावरील एका फूडमालात चितळे बाकरवड्यांचं एक पाकीट घेतल्या गेलं... हापिसात येवून पाकीट उघडल्यावर बाकरवड्या मउ झाल्याचं दिसलं ... सहज म्हणून पाकिटावरील ग्राहक तक्रारीसाठी दिलेल्या पत्त्यावर ईमेल धाडला आणि चितळ्यांनी चक्क चक्क दोन दिवसात पाकीट बदलून दिलं हो ...
बहुदा चितळ्यांच्या दुकानातील लोकच थोडे (की बरेचसे???) उर्मट असतात आणि कंपनीतील बाकी लोक बरे असावेत ...
पाकिटावर "एक्स्पायरी डेट बघून माल घ्यावा नंतर तक्रार चालणार नाही" टाईप काही सूचना नाही ना बघून तुम्ही पण कधीतरी प्रयत्न करून पहा ... कदाचित खरचं अच्छे दिन आले असतील ...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बाबा बर्वे
" समर्थाचिया सेवका वक्र पाहे
असा सर्व भूमंडळी कोण आहे ? "

दरवेशाला शत्रू म्हणू नये हो अस्वलराव. तुही यत्ता कंची? (=किती वर्ष झाली दरवेशाला शरण जाऊन?) अननुभवी दिसता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

ह्याचं उत्तर "पास" असंच द्यावं असं मला सांगण्यात आलं आहे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कहर छान आहे. मग - सविस्तर लिहीन. आत्ता अलार्म बंद करून झोपतेय!

****

कायच्या काय फ्रेश आहे अस्वलराव. लई म्हणजे लईच मजा आली. माझ्या डोळ्यासमोर शनिवार सकाळ, सकाळी सकाळी मागे लागलेल्या कामांचा झक्कू, वैताग, मिसळ, गरम तर्री... असं सगळं साग्रसंगीत उभं राहिलं. असे लेख सोन्यासारख्या शनिवाराबद्दलच सुचू शकतात. वा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

अरे हे काय युद्ध आहे?
प्राण्यांना खाऊचं अमिष दाखवून ट्रेन करण्याच्या प्रयत्नाला युद्ध म्हणतंय हे अस्वल. ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बेक्कार आवडलेला आहे प्रतिसाद!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भारीच.
लेखही आणि ननिंचा प्रतिसादही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

मस्तं लिहिलय.. आवडल!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

मस्त, बाकरवड्यांसारखाच खुसखुशीत लेख.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अस्वल हा आयडी पाहिला किच हसू येते. लेख किंवा प्रतिसाद संपेपर्यंत मजा येते. शेजारचे "हा मंद मंद स्मित मोड कशाने ऑन झाला" असे विचारतात.
-----------------
तो चष्मा नसल्यावर ऐकू देखिल कमी येण्याचा अनुभव आमच्याकडून वाचवून घेऊन उद्यापासून तुम्ही आमच्या इंद्रियांचं काँफिगरेशन नक्की बिघडावणार.
---------------
बाकी शत्रू हा प्रकारच वाईट्ट गोड्ड आहे.
जिससे हारने में लिज्जत वो पायी,
जिससे हारने में लिज्जत वो पायी,
लिज्जत वो पायी,
कि फिर हार जाने को जी चाहता है,
कि जी चाहता है।

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

तो चष्मा नसल्यावर ऐकू देखिल कमी येण्याचा अनुभव आमच्याकडून वाचवून घेऊन उद्यापासून तुम्ही आमच्या इंद्रियांचं काँफिगरेशन नक्की बिघडावणार.

हाहाहा हा छान प्रतिसाद!!! अगदी खरा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अहो खरंच, चश्मा नसल्यावर थोडं कमी ऐकू येतं. आता मला हसा, पण उद्या कुठल्यातरी बर्कले बिर्कलेच्या संशोधकांनी सिद्ध केलं की तुम्ही ऐकाल निमूट.
आणि वाईट्ट गोड्ड शत्रू : Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

युद्ध रोज पेटले, जवान चालले पुढे,
मिळुनी सर्व शत्रुला, मिसळ चारुया खडे!!!!

प्रसंग खरेच हृदयद्रावक होता म्हणायचा. जांबुवंताख्यान जबर्‍या आवडल्या गेले आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

फक्कड लेख!

शनिवार हा अकरानंतरच उजाडतो, त्यापूर्वीचा काळ हा शुक्रवारातच मोडतो (रविवार पेठेचा काही भागही शुक्रवारातच मोडतो, असं ऐकून आहे तसंच काहीसं. 'न'वी पेठही फार दूर नाही म्हणा तिथून ;)); असं आमचंही ठाम मत असल्याने साडेसहाचा गजर हा अस्वलास किती अनबेअरेबल वाटला असेल, याची कल्पना आली Smile

१. साटल्यशून्य'पना'बद्दल मंडळ दिलगीर आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'पना' बद्दल ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नंदनला त्यामुळे आलम'पना'ह हा खिताब देण्यात येत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

वा वा ये भी खूब!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शोक्रन!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

आलम'पना'ह हा खिताब
..............किंवा नंदन'पन्'त.. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा हा हा, सहीच!

अतिअवांतरः नंदनशेठ जर तो नसून ती असते तर 'पन'वती असाही खिताब दिला असता Wink

आता नंदनशेठ मारायला येण्याअगोदर आम्ही पळतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

नंदन हा
'पन्'टर
'पन्ना'लाल

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

काय'पन'हं Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

काय अस्वलराव या युद्धात नवे दिसताय, इतके सोप्पे डावपेच समजत नाहीत काय?
बाकी अलार्म-अस्त्राचे उपद्रवमूल्य खूप जास्त आहे हे खरे आहे. आमच्या गुहेत शत्रूला तर फार विचित्र कारणांसाठी (म्हणजे खेळांचे प्रत्यक्ष प्रक्षेपण पहाण्यासाठी, स्वस्तातली तिकिटे बुक करण्यासाठी (ती अशी भलत्या वेळी उपलब्ध होतात) वगैरे कारणांसाठी शनिवारी आणि रविवारी अलार्म लावायचा असतो. छळ आहे झालं!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दु:ख अलार्म्सचं नाहीये हो.
दु:ख आहे ते त्या भयानक आवाजातसुद्धा लाकडाच्या ओंडक्याप्रमाणे सुस्त झोपू शकण्याच्या शत्रूच्या कलेचं. हे गजर लावले जातात त्याचं मुख्य कारण म्हणजे- "अरे मला तर कळतच नाही ना गजर लावलाय ते. मग शनिवार काय आणि रविवार काय? असू देत ते अलार्म्स." असं दिलं जातं.
फोनला इअरफोन्स लावून मग अलार्म्स लावत जा ह्या मौलिक सूचनेवर शत्रू फिदिफिदी हसतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुम्ही शत्रूसाठी गनिमी कावा करता का? म्हणजे हळूच शत्रूच्या गजराची वेळ बदलायची वगैरे. त्यापेक्षा शुक्रवारी रात्री सरळ आठ वाजताच झोपत का नाही तुम्ही? म्हणजे शत्रू जागा होण्याआत तुम्हीच जागे असाल.

आमच्याकडचा गनिम स्वतःचा गजर लवकर लावतो, मला जाग येते, मी वळवळ करून त्याला त्रास देण्यापेक्षा उठून बाहेर येते. शनिवारी मात्र मज्जा येते. उठल्यावर पंधरा-वीस मिनीटांत, "उठ, उठ. मला भूक लागल्ये. चल पोहे करू या." असं म्हणत मी शत्रूला पांघरुणाबाहेर काढते. माझं हे असं असतं.
उन्हाळ्यात ही युक्ती चालली नाही तर "लवकर उठ, ऊन वाढायच्या आत फार्मर्स मार्केटात जाऊन ताजी भाजी घेऊन येऊ" ही युक्ती आणखी चांगली चालते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

हाहाहा मस्त ग अदिती! मला नेहमी ४:३० ला जाग येतेच मग मस्त कोणीही उठलेले नसताना गाणी ऐकता येतात. लेमन ग्रास्+आल्याचा चहा होतो अन वॉकही होतो. तोवर सगळे उठलेले असतात अन मग कामं सुरु होतात .... जाम बोअर होतात वीकेंडची कामं Sad

क्वचित जास्त झोप येते तेव्हा मधेच जाग येते अन किलकिले डोळे केले तर शत्रू नीरीक्षण करतोय असं दिसतं. पण उठवत नाही तो :).... माझा दरारा आहे Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नेहमी ४:३० ला जाग येतेच

कोणत्या ग्रहावर रहाता हो तुम्ही अपर्णाताई?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रुची मी ८ ला झोपते Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तिने कोणत्या टाईमझोनमध्ये आठला झोपून साडेचारला उठते ते लिहीलेलं नाहीये. भाळली लगेच रुची. तसा अस्वलपण सूर्योदयालाच उठत असणार ... तुमच्या शत्रूला हे सांगून पहा अस्वलराव. आणि प्रतिक्रिया काय ते पण कळवा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

बाकरवड्यांबद्दल वाचून वाईट वाटलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

कोणाला कशाचं, आदूबाळला बाकरवड्यांचं!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

एक ऐसीकर म्हणून शरम इ.इ. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

पुढच्या वेळी अलार्म ऐकल्यावर उलट्या बाजूला डोके करून कानावर उशी आणि पांघरूण घेऊन दुर्लक्ष करून बघा. काही वेळा उपयोग होतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आत्ता धागा पुन्हा वाचला, मजा आली.
विनोद हडप यांच्या 'अप्पू अस्वल्या करी गुदगुल्या' या फार लहानपणी पाहिलेल्या बालनाट्याच्या नांवाची आठवण झाली. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शत्रूने लेख वाचल्यावर 'तिचा शत्रू म्हणून उल्लेख केल्या बाबत जाब विचारला तर खरोखरच युद्ध होईल. शेवटी अस्वलाच्या नाकात वेसण हे आहेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ज्योतिषात आपले उघड शत्रू अन आपल्या जोडीदाराचे घर एकच असते - ७ वे घर Smile
कुछ तो तथ्य हयिच!! Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ROFL मस्त!
चष्मा लावला नसेल तर ऐकू कमी येत हे मात्र अगदी खरं आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अस्वलरावांचा विजय असो!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!