Skip to main content

मनातले छोटे मोठे प्रश्न - भाग २६

ही धागामालिका आपल्या मनात येणारे, नेहमी नेहमी डोकावणारे विचार मांडण्यासाठी आहे. कधी कधी आशय फार मोठा नसतो. फार खोल विचार केलेला नसतो. तो विचार/ कल्पना/ प्रश्न/ गंमत डोक्यात येते, जाते. कधी कधी आपण विसरतो, कधी कधी ती ती पुन्हा पुन्हा येत असल्याने आपण विसरू शकत नाही.
यापूर्वीच्या धाग्यावरचे प्रतिसाद १००च्या वर गेले आहेत म्हणून हा पुढचा धागा.

आधीचे सर्व धागे इथे वाचता येतील. - मनातले छोटेमोठे प्रश्न

==========

कुणाकडे बघून ती व्यक्ती एमसीपी अथवा एफसीएस आहे हे कसे कळते बॉ?

बॅटमॅन Tue, 21/10/2014 - 15:15

In reply to by सविता

हॅ हॅ हॅ.

"ती ना, 'तशी'च आहे. तिला बघितल्यावरच कळत! काय क्षयझ, काय अबक!" छाप कमेंटींची आठवण झाली. 'बघूनच कळणे' हा एकूणच जगातला सर्वांत विनोदी प्रकार आहे.

एखाद्या स्त्रीबद्दल पुरुषाने अशी मते व्यक्त केली तर सर्व स्त्रीवाद्यांचे कळफलक ओव्हरटाईम करू लागतात, मात्र तेच एखाद्या पुरुषाबद्दल स्त्रीने मताची पिंक टाकली तर मात्र कोणी बोलत नाही. बहुत रोचक.

लेस्बियन नव्हे.

मेघना भुस्कुटे Tue, 21/10/2014 - 15:20

In reply to by बॅटमॅन

अतिअवांतर:

अरे, स्त्रीवादी म्हणजे काय विश्वविधात्री आहेत काय, सार्‍या जगाच्या कल्याणा धावायला? तू आहेस ना पुरुषांसाठी बोंब ठोकायला सक्षम? नाही झेपलं तर सांग. येईलच कुणीतरी उद्धाराला.

बॅटमॅन Tue, 21/10/2014 - 15:22

In reply to by मेघना भुस्कुटे

वैयक्तिक रोखाच्या कमेंटी करून मुद्दा निकालात काढायचा असेल तर आपलं काय बी म्हण्णं नाय. चालूद्या. :)

मेघना भुस्कुटे Tue, 21/10/2014 - 15:46

In reply to by बॅटमॅन

सॉरी, गंभीर गोष्टीसाठी वापरलेला गंमतीचा सूर आणि वैयक्तिक रोख यांत गल्लत झाली.

अतिअवांतर म्हणून पांढर्‍या ठशातः

हिंदू मरतात तेव्हा नाही येत सेक्यूलर...
ब्राह्मण होरपळतात तेव्हा नाही येत पुरोगामी...
आमच्या मुलाची अ‍ॅडमिशन हुकते तेव्हा नाही येत आंबेडकर...

असले सगळे 'तेव्हा कुठे गेला होता राधासुता तुझा धर्म'छाप प्रश्न विचारणार्‍या लोकांना हा प्रश्न: "अरे, तेव्हा नाही आठवला धर्म. मी टॅम्प्लीज घेतली होती. किंवा माझा धर्म फक्त माझ्यापुरताच होता. तुझा धर्म नाही का इंद्रप्रस्थासाठी जंगलं जाळताना गुंडाळून ठेवलास? तशीच मी तेव्हा घेतली होती. मला आता आली माझ्या धर्माची आठवण. कारण माझ्या दाराशी आल्यात गोष्टी. म्हणून धर्मानं लढायचं मी ठरवलंय. आज-आत्ताचं, आपल्यातुपल्यातलं बोल, तुझ्या निवडीचं काय ते बोल. माझ्या बाकीच्या निर्णयांची चिवडाचिवड इथं आणायचं काम नाही."

बॅटमॅन Tue, 21/10/2014 - 15:53

In reply to by मेघना भुस्कुटे

मग हाच बचाव पुरुषांनी वापरला तर त्यांना पिडतात हे स्त्रीवादी त्याचं काय? हा एक मस्त सोयीस्कर बचाव आहे हां बाकी. मानलेच पाहिजे.

द टॅलंट फॉर ट्रिकरी इज इंडीड कमेंडेबल.

बॅटमॅन Tue, 21/10/2014 - 21:44

In reply to by मेघना भुस्कुटे

मी काय करावं हे तू सांगू नकोस, अन शिवाय- पर्सनली तुला उद्देशून बोलल्यागत प्रतिसाद देणं बंद करा आतातरी.

गवि Tue, 21/10/2014 - 15:22

In reply to by बॅटमॅन

बॅट्या.. अगदी अगदी.

बायकांना बरोब्बर "तसली" नजर कळते.

बाईला उपजतच "तो" एक सिक्स्थ सेन्स असतो.

असं आणि इतरही तत्सम नेहमीच ऐकतो. प्रत्यक्षात स्वतःच्या समोर अत्यंत सज्जन मित्रालाही त्याच्या केवळ रॉ दिसण्यावरुन "तुमच्या मित्राला जरा नीट बसायला / वागायला सांगा" वगैरे वाक्यं महिलांकडून ऐकली आहेत. मित्रही हबकला होता.

अन्यत्र ब्येष्ट बसमधे प्रचंड धक्काबुक्कीत एका भल्याथोरल्या मुलीने एका बारक्याश्या मुलाला त्याने धक्का "मारल्या"बद्दल फैलावर घेतलं. तो बिचारा गर्दीत स्वतःचा ब्यालन्स सांभाळायला धडपडत होता. शेवटी तिची चांय चांय आत्यंतिक झाल्यावर तो वैतागून चाचरत म्हणाला की "इतनीसी जगह है और आप भी एकदम प प पहिलवान हो.. (जाड अशा अर्थाने)" तेव्हा ती मुलगी एक्ट्रीम विनयभंग झाल्याप्रमाणे संपूर्ण भडकून "ए मिस्टर.. तोंड सांभाळून बोला" इ इ सुरुवात करुन जमावाला आपल्या बाजूला घेऊन त्याच्यावर हल्लाच केला.

अर्थातच प्रचंड मोठ्या संख्येने पुरुष गर्दीचा फायदा घेऊन किळस वाटेल असे प्रकार करतात हे मुळातच मान्य आहे. पण नुसते बघून कोण कसे आहे ते ठरवता येत नाही असं एक आपलं मत.

बॅटमॅन Tue, 21/10/2014 - 15:27

In reply to by गवि

नैतर काय च्यायला. उगा कायपण ऐकून घ्यायला पुरुष काय रस्त्यावर पडलेत काय.

असल्या सिक्स्थ सेन्सवर विसंबून कायदे केले तर हाहा:कार माजेल. त्यामुळे याचे भांडवल न करता तो स्वतःपुरताच ठेवावा हे उत्तम. एखादी सुपरन्याचरल सिद्धी असल्यागत नसते स्तोम माजवू नये कारण हे फूलप्रूफ नाही. इतर अंधश्रद्धांप्रमाणेच हीदेखील एक अतिशय पापिलवार अंधश्रद्धा आहे.

श्रेय-अव्हेरः शाळा. "गुप्तेसाहेब, पोरं रस्त्यावर पडलीत का आमची???" जोशाचे बाबा टु द बाबा ऑफ केवडा.

मेघना भुस्कुटे Tue, 21/10/2014 - 15:33

In reply to by गवि

या धाग्यावर हे अतिअवांतर आहे. ही उपचर्चा इथून हलवली तर बरं होईल.

बाकी स्त्रिया घेत असलेला स्त्रीदाक्षिण्याचा गैरफायदा वगैरे नेहमीचेच श्रेणीखेचक विषय आहेत. ते आपापल्या वैयक्तिक अनुभवानुसार चालू द्यात. पण नुसतं बघून कळण्याबद्दल आणि सिक्स्थ सेन्सबद्दल -

मला नाहीये हो सिक्स्थ सेन्स वगैरे. अतिशय असुरक्षित वातावरणात वाढलेल्या / राहावं लागणार्‍या स्त्रिया परिस्थितिवश इतका प्रचंड सावधपणा शिकतही असतील, नाही असं नाही. पण नाहीतर मोकळ्या, सुरक्षित, भेदभावरहित वातावरणात राहायला सरावलेल्या स्त्रियांना वा पुरुषांनाही सिक्स्थ सेन्स वगैरे नसतो.

फार प्रिव्हिलेज्ड - स्वच्छ - समृद्ध वातावरणात असणार्‍या काही झापडबंद स्त्री-पुरुषांना गरीबी-घाण-अव्यवस्था-चाकोरीबाहेरचं वागणं म्हणजेच अनैतिकता असं मानून घेण्याची सवय असल्याचं मात्र पाहिलं आहे. ते गंमतीशीर (हं!) असतं हे मान्य.

सविता Wed, 22/10/2014 - 18:37

In reply to by बॅटमॅन

पिक्चरात दाखवतात तसे लव्ह ऎट फर्स्ट साईट तसं हे हेट ऎट फर्स्ट साईट वाटले की काय तुला? तसे शब्दश: "बघून" नाही रे!

तर मला व्यक्तिश: कोणत्याही हिन वागणुकीचा न येता ती व्यक्ती इतर लोक विशेषत: स्त्रिया यांच्याशी कशी बोलते, वागते आणि इन जनरल विचारसरणीचा अंदाज येऊन डोक्यात जाणारे लोक!

बॅटमॅन Fri, 24/10/2014 - 14:22

In reply to by सविता

एकूणच पुरुष स्त्रियांशी इन जनरल कसे वागतात याचं इतकं भांडवल करणार्‍या स्त्रिया इन जनरल पुरुषांशी कशा वागतात इकडे मात्र काणाडोळा केला जातो. भलतंच रोचक आहे.

बॅटमॅन Thu, 30/10/2014 - 16:54

In reply to by सविता

गैरसोयीचे मुद्दे असले की तथ्य वाटणारच की. नवल ते काय?

(अवांतर किंवा खोडसाळ श्रेणी द्या बरे! तेवढी ती कमेंट वाचून स्त्रीवाद्यांना त्रास नको व्हायला.)

गवि Fri, 24/10/2014 - 11:01

सीग्राम इम्पिरियल ब्लू या उत्पादनाच्या "मेन विल बी मेन" जाहिरातमालिकेत नेहमी ऐकू येणारी गझल खालीलप्रमाणे:

"प्यार की राह में चलना सीख, इश्क की आह (की आग?!) में जलना सीख.."

ही गझल केवळ त्या जाहिरातींसाठीच बनवली गेली आहे की ती वेगळी इतर कोणत्या संग्रहात उपलब्ध आहे याविषयी आंजावर कोणतीही माहिती मिळत नाही. कोणाला ती असल्यास सांगावे ही विनंती. काही ठिकाणी पंकज उधास असा गायकाचा उल्लेख आढळला, पण प्रत्यक्ष गझल कुठेच नाही.

लॉरी टांगटूंगकर Fri, 24/10/2014 - 13:09

In reply to by गवि

ती गझल जाहिरातींसाठीच बनवली गेलेली. Ogilvy & Mather (उच्चार जमला नाय) या अ‍ॅड कंपनीचे क्रिएटीव्ह डीरेक्टर अजय गेहलोत यांनी फक्त प्यार की राह मे चलना सीख, इश्क की चाह मे जलना सीख इतक्या दोनच ओळी लिहीलेल्या होत्या. त्यांना पण म्हणे क्लायंटने पण गझल पूर्ण करायला सांगितलेली. :)

http://www.afaqs.com/news/story/41243_Imperial-Blue:-Man-thing-to-do

गवि Fri, 24/10/2014 - 13:16

In reply to by लॉरी टांगटूंगकर

अनेक धन्यवाद. शोध थांबवणे आले आता.. :(

आता यावरुनच एक आणखी अर्धवट राहिलेला शोध आठवला.

मॅकडोवेल नंबर १ ची जाहिरात "नंबर वन मेरा नंबर वन" अशा जिंगलसहित होती (फार पूर्वी).

त्याचं मात्र पूर्ण गाणं नक्की रिलीज झालं होतं, निदान व्हिडीओरुपात. दोन मित्र आणि मैत्री यांवर आधारित व्हिडीओ होता. जिंदगीके संग है की असे काहीतरी शब्द होते. धृवपद : नंबर वन, मेरा नंबर वन..

हे गाणं जरी कुठे सापडलं तरी प्लीज शेअर करावं.

मणिकर्णिका Tue, 28/10/2014 - 09:51

In reply to by लॉरी टांगटूंगकर

दोन दुरुस्त्या-

अजय गेह्लोत हे ओगिल्व्ही दिल्लीचे एक्झिक्युटीव्ह क्रिएटीव्ह डिरेक्टर आहेत. ओगिल्व्ही इंडियाचे क्रिएटीव्ह डिरेक्टर पियुष पांडे आहेत. (बेज बजाओ वाले)

अमुक यांनी दिलेला उच्चार एक गोष्ट वगळता बरोबर आहे. ते 'ओगिल्व्ही अँड मेदर' आहे. (मागे या कंपनीची प्रेस रिलीज पाठवताना 'मेथर' असे लिहून पाठवल्यावर त्यांच्याकडून 'मेदर' करावे अशी दुरूस्ती आली होती ते आठवते)

'न'वी बाजू Sun, 26/10/2014 - 16:57

व्यवस्थापकः या धाग्यावारील उपचर्चा इथे हलवली आहे

उदाहरणादाखल, शीकेपी समाजातील तरुणांची दलित तरुणींशी शुभविवाहांची टक्केवारी ऐकावयास आवडेल.

(शीकेपीच असे नाही, पाठारे प्रभू, शहाण्णव कुळी, सारस्वत, कुठल्याही तथाकथित उच्चवर्णीय समाजातील अशी टक्केवारी ठाऊक असल्यास जरूर सांगावी.)

आगाऊ धन्यवाद.
....................................................................................

सारस्वत हे वस्तुतः ब्राह्मण जरी असले, आणि अनेकदा अट्टाहासाने ही बाब अधोरेखित करताना दृष्टिपथास येत जरी असले, तरी चारचौघांत 'ब्राह्मणां'ना (पक्षी: भटांना) शिव्या घालण्याच्या / 'ब्राह्मणां'च्या (पुन्हा, पक्षी: भटांच्या) नावाने खडे फोडण्याच्या समये प्राप्ते सारस्वतांना ब्राह्मणांतून वगळावे, असा एक सर्वमान्य अलिखित संकेत आहे, आणि तो सर्व पक्षांकडून पाळला जातो, असे एक सामान्य निरीक्षण आहे, या कारणास्तव सारस्वतांचा येथे ब्राह्मणांहून वेगळा असा ज़िक्र केलेला आहे. अन्यथा, सारस्वतांच्या ब्राह्मणत्वाबद्दल प्रस्तुत लेखकाच्या मनात कोणताही संदेह नाही.

बोले तो, अनेक भटे ही साधारणतः सर्वच प्रसंगी सारस्वतांस ब्राह्मणांतून वगळतात; उलटपक्षी, अनेक सारस्वत हे साधारणतः केवळ ब्राह्मणांस शिव्या घालते वेळी सारस्वतांस ब्राह्मणांतून वगळतात (ए.के.ए. 'मी नाही त्यातली' शिण्ड्रोम), इतकाच काय तो क्षुल्लक (निरीक्षित) फरक आहे. बोले तो, 'कन्शिष्टन्सी इज़ द व्हर्च्यू ऑफ अ‍ॅन अ‍ॅस' या न्यायाने, भटे गाढव आहेत. (अशी पब्लिक आत्मनिर्भर्त्सनासुद्धा केवळ भटेच करू जाणोत, या कारणास्तवसुद्धा.)

मात्र, सरस्वतीचे पात्र आटून तेथील रहिवासी जेव्हा देशोधडीस लागून इतरत्र विखुरले, तेव्हा तत्रस्थ ब्राह्मणेतर जमातींचे नेमके काय झाले, अशी शंका आहेच. कारण सारस्वत ब्राह्मण जसे ऐकू येतात्/दिसतात, तसे सारस्वत ब्राह्मणेतरांबद्दल ऐकू येत नाही. त्यामुळे, सरस्वतीच्या प्रदेशातील ब्राह्मणेतरांची नेमकी काय विल्हेवाट लागली, ते कळत नाही.

चिंतातुर जंतू Sun, 26/10/2014 - 17:15

In reply to by 'न'वी बाजू

>> उदाहरणादाखल, शीकेपी समाजातील तरुणांची दलित तरुणींशी शुभविवाहांची टक्केवारी ऐकावयास आवडेल.

(शीकेपीच असे नाही, पाठारे प्रभू, शहाण्णव कुळी, सारस्वत१, कुठल्याही तथाकथित उच्चवर्णीय समाजातील अशी टक्केवारी ठाऊक असल्यास जरूर सांगावी.)

आगाऊ धन्यवाद.

अनेक वर्षं महाराष्ट्राशी संबंध न उरल्यामुळे कदाचित आपल्याला महाराष्ट्रातलं आजचं जातिवास्तव फारसं परिचित नसावं असं ह्या प्रतिसादावरून वाटतं. म्हणून पुन्हा एकदा कानिटकरांच्या 'अनुरूप'कडे लक्ष वेधू इच्छितो. Largest Matrimony Service for Marathi Brahmins अशी त्याची जाहिरात केली जाते. त्या दुव्यावर जाऊन वर किंवा वधू शोधायचा प्रयत्न केला, तर जातीच्या रकान्यात हे पर्याय दिसतात -

  • सर्व
  • ब्राह्मण
  • कोंकणस्थ (चित्पावन)
  • देशस्थ यजुर्वेदी
  • देशस्थ ऋग्वेदी
  • कऱ्हाडे
  • सीकेपी
  • गौड सारस्वत
  • देवरुखे
  • इतर

थोडक्यात, 'मराठी ब्राह्मणांसाठीच्या' विवाहसंस्थेमध्ये ह्या सगळ्या जातींसाठीचं वरवधूसंशोधन होतं. म्हणजे काय, तर ह्या जातींमध्ये आता पुरेशी सरमिसळ आणि वर्तनसाधर्म्य आहे. आणि म्हणून त्यांच्यात पुरेशी लग्नंही होत आहेत. त्यामुळे, ब्राह्मणांविषयीच्या मी वर व्यक्त केलेल्या मतांमध्ये ह्या सर्व जातींचा 'ब्राह्मण'मध्येच समावेश होता. म्हणजे, त्यांची वेगळी प्रतवारी करण्यात मला ह्या मुद्द्यापुरतं तरी काही हशील दिसत नाही. ('इतर'अंतर्गत कोण येतात, ते मला माहीत नाही; पण दलित किंवा शहाण्णव कुळी येत नसावेत.) बाकी चालू द्या.

जाता जाता : ह्या प्रतिसादामुळे आपल्या ज्ञानात भर पडली असेल, तर तसं कृपया सांगा. तसं झालं असेल, तरच तुमचे धन्यवाद स्वीकारण्यात येतील; अन्यथा ते आपल्यापाशीच राहू द्या.

बॅटमॅन Sun, 26/10/2014 - 17:44

In reply to by चिंतातुर जंतू

शीकेपी सोडून मराठा वा अन्य उच्चजातीय लोकांची दलित समाजाबरोबरच्या मुलामुलींशी विवाहाची % जास्त आहे असे म्हणावयाचे आहे काय?

चिंतातुर जंतू Sun, 26/10/2014 - 17:51

In reply to by बॅटमॅन

>>शीकेपी सोडून मराठा वा अन्य उच्चजातीय लोकांची दलित समाजाबरोबरच्या मुलामुलींशी विवाहाची % जास्त आहे असे म्हणावयाचे आहे काय?

असा आपला समज होण्याचं कारण कळलं नाही. विवाहाबाबत चर्चा करताना आणि 'ब्राह्मणांचे आंतरजातीय विवाह' असं म्हणताना आजच्या मराठी जातिवास्तवात नक्की कोणकोणत्या जातींचा समावेश 'आतले'मध्ये होतो आणि मग 'ब्राह्मणेतर' कोण असावेत हे स्पष्ट करण्यासाठी मी अनुरूपकडे बोट दाखवलं, कारण आजच्या जातिवास्तवाचा तो एक आरसा आहे.

सलील Mon, 27/10/2014 - 00:47

In reply to by बॅटमॅन

चर्चा फक्त मुद्दामहून ब्राह्मण जाती पर्यंतच सीमित ठेवण्याची बहुदा लीबरल लोकांची गरज असते. कारण खाप पंचायत असो, खैरलांजी असो, वा लक्षमण माने प्रकरण असो. अश्या ठिकाणी ब्राह्मण सापडले नाहीत तरी हे सगळे माप ब्राह्मण लोकांच्या पदरात टाकण्याची हि एक कला आहे. एकदा ब्राह्मणी साचा म्हटले कि पुन्हा ब्राह्मण समाजाला झोडपण्याची चौकट अपोआप होते. मागे एकदा ९६ कुळी मित्राने स्पष्ट केले आह्माला पाहिजेल तेच आह्मी करणार, बामनाची पोरगी मिळाली तर चालेल नाहीतर पाव्ह्ण्यातच लग्न होईल. असो किती लोहार आणि महार ह्यांचा विवाह झाला? किती दलितांनी क्शुद्रांना जवळ केले? हे असले विचारायचे नसते. जे काही करायचे ते फक्त बमानांनीच केले पाहिजेल असा प्रकार ध्वनित होतो. मध्यंतरी सोनवणी आणि नरके ह्यांची शेवटी मेटे वगैरे लोकांना आवरले पण बाकीचे सगळे गप्पा होते. कदाचित आपल्याला एकटा गाठून मारले तर काय घ्या. शिवाय बामणाला मारले तर बातमी होणारच नाही आणि फार कोणी लक्ष पण देणार नाही. बाकीच्यांना तसा हात लावणे थोडे कठीण आहे. शिवाय माने प्रकरणतर एकदम गायबच झाले. आपले लिबरल लोक मिठाची गुळणी धरून होते.

थोडक्यात जो तो फक्त आपआपल्या जाती सांभाळणार फक्त ब्राह्मण लोकांनी तसे केले कि काहीतरी अघटीत घडले असे काहीसे लिबरल, (खरेतर ह्यांना फंडामेंटलिस्टच म्हटले पाहिजेल जसे मार्क टुली सेक्क्युलर फंडामेंटलिस्ट म्हणतात तसेच) लोकांचे होते. धनुष म्हणतात तसा मध्यम मार्ग खरोखर किती लोक पुढे आणतात हा प्रश्नच आहे.

ह्या निमित्ताने नुकतेच ३ देशांच्या, अनुक्रमे इंग्लंड, हौलंड आणि जर्मन कलीग्ज बरोबर झालेली चर्चा आठवली. हिंदूंच्या जातीची फारच ढोबळ माहिती आणि त्यातून सगळीकडे फक्त दलित लोकांना कसे ब्राह्मण लोकांनी छळले एवढेच माहिती होते असे दिसले. मग चर्चा हळूहळू युरोप मध्ये चर्च आणि त्यांच्या फांदर लोकांनी केलेले अत्याचार ह्यावरून आता लग्न फार काल का टिकत नाहीत ह्यावर आली. त्यातला महत्वाचा मुद्दा हा निघाला कि बरेच वेळा क्लास डीफारंस असल्यामुळे आमचे तुटले असे चक्क बायकांनी सांगितले. मिडल क्लास आणि वार्किंग क्लास अशी घरांची ठेवण किंवा अगदी शुल्लक फरक म्हणजे कोणत्या चर्चला जातो ह्यावरून पण तुटले असे आईकले आणि धन्य झालो. म्हणजे इकडे लोक जाती वरून घमासान बोंबाबोंब करतायत आणि इकडे काहीतरी भलतेच. बर एक रेलेशनशिप तुटली असती तरी ह्यात काही विशेष नाही पण एकाच व्यक्तीची २-३ आणि बाकीच्या बाया आणि पुरुषांचे हेच किंवा थोडेफार अनुभव म्हणजे फारच झाले. मग एकाच जातीत किंवा साधारणपणे एकाच ठराविक विचारसरणीच्या लोकांच्यात लग्न व्हावे असे वाटले तर कुठे बिघडले. हा होलीयर द्यान दावू प्रकार कशाला?

बॅटमॅन Mon, 27/10/2014 - 12:29

In reply to by सलील

हा होलीयर द्यान दावू प्रकार कशाला?

असे म्हटल्याशिवाय त्यांना कोण विचारणार हो? त्यांचीही ती गरज असते सर्व्हायव्हलसाठीची. नायतर कुत्रं विचारणार नाही. मार्केटमध्ये टिकून राहण्यासाठीच्या गफ्फा आहेत ह्या, दुसरे काही नाही.

'न'वी बाजू Mon, 27/10/2014 - 17:48

In reply to by सलील

थोडक्यात जो तो फक्त आपआपल्या जाती सांभाळणार फक्त ब्राह्मण लोकांनी तसे केले कि काहीतरी अघटीत घडले असे काहीसे लिबरल, (खरेतर ह्यांना फंडामेंटलिस्टच म्हटले पाहिजेल जसे मार्क टुली सेक्क्युलर फंडामेंटलिस्ट म्हणतात तसेच) लोकांचे होते.

मग त्यांना फंडामेंटालिष्ट म्हणा!

लिबरलांना कशापायी बदनाम करता?

'न'वी बाजू Sun, 26/10/2014 - 17:45

In reply to by चिंतातुर जंतू

थोडक्यात, 'मराठी ब्राह्मणांसाठीच्या' विवाहसंस्थेमध्ये ह्या सगळ्या जातींसाठीचं वरवधूसंशोधन होतं. म्हणजे काय, तर ह्या जातींमध्ये आता पुरेशी सरमिसळ आणि वर्तनसाधर्म्य आहे. आणि म्हणून त्यांच्यात पुरेशी लग्नंही होत आहेत.

यात कोणतीही नवीन बातमी नाही. (आणि, 'वर्तनसाधर्म्य आहे', हाच तर मुद्दा आहे.)

मात्र,

त्यामुळे, ब्राह्मणांविषयीच्या मी वर व्यक्त केलेल्या मतांमध्ये ह्या सर्व जातींचा 'ब्राह्मण'मध्येच समावेश होता. म्हणजे, त्यांची वेगळी प्रतवारी करण्यात मला ह्या मुद्द्यापुरतं तरी काही हशील दिसत नाही.

अशा प्रकारे 'त्या' सर्व जातींचा समावेश 'ब्राह्मण' या लेबलाखाली केल्याने, सर्व काही ब्राह्मणांसारखेच (आणि आता 'ब्राह्मण' या आयत्या लेबलाच्या आडोशामागे उभे राहून) करूनच्या करून नामानिराळे राहण्याची आणि सार्वजनिक परिघात त्याचे खापर मात्र लौकिकार्थाने 'ब्राह्मण' या लेबलाने ओळखल्या जाणार्‍यांवर फुटण्याची 'त्या' सर्व जातींची आयती सोय होते, इतकेच.

आणि, अशा प्रकारची मांडणी करण्याचा आत्मघातकी मूर्खपणा (एक्स्क्लूज़िवली) 'मराठी ब्राह्मणांसाठी' (फॉर व्हॉटेवर इट इज़ वर्थ) म्हणविणार्‍या एखाद्या संस्थेने करावा, यासारखा दैवदुर्विलास कोणता?

बाकी चालू द्या.

चिंतातुर जंतू Sun, 26/10/2014 - 18:00

In reply to by 'न'वी बाजू

>> 'वर्तनसाधर्म्य आहे', हाच तर मुद्दा आहे.

वर्तनसाधर्म्य असलेल्या दलितांचा 'अनुरूप'मध्ये समावेश नाही, पण वर उल्लेख केलेल्या जातींचा आहे, हा फरक लक्षात आलेला नाही, की तो लक्षात घ्यायची इच्छा नाही? बाकी चालू द्या.

>> अशा प्रकारची मांडणी करण्याचा आत्मघातकी मूर्खपणा (एक्स्क्लूज़िवली) 'मराठी ब्राह्मणांसाठी' (फॉर व्हॉटेवर इट इज़ वर्थ) म्हणविणार्‍या एखाद्या संस्थेने करावा, यासारखा दैवदुर्विलास कोणता?

आत्मघातकीपणा कोणत्या अर्थानं? माझ्या माहितीनुसार 'अनुरूप' अत्यंत यशस्वी वधुवरसंशोधनसंस्था आहे. हां, अशासारख्या संस्था 'खरा ब्राह्मणधर्म' बुडवत आहेत आणि त्यामुळे ब्राह्मणांचा आत्मघात होत आहे असा काही सनातनी ब्राह्मणांचा समज असेल तर असू द्या बापडा.

'न'वी बाजू Mon, 27/10/2014 - 17:44

In reply to by चिंतातुर जंतू

वर्तनसाधर्म्य असलेल्या दलितांचा 'अनुरूप'मध्ये समावेश नाही, पण वर उल्लेख केलेल्या जातींचा आहे, हा फरक लक्षात आलेला नाही, की तो लक्षात घ्यायची इच्छा नाही? बाकी चालू द्या

वर्तनसाधर्म्य असलेले दलित हे 'आपल्यातले नाहीत', असे मानण्याचे/इतपत वर्तनसाधर्म्य या (नव्याने) 'आतल्या गोटातल्या' जमातींत आहे, असा मुद्दा होता; तो बहुधा समजला नसावा, असा संशयाचा फायदा देऊन मोकळा होतो. बाकी पळू द्या.

आत्मघातकीपणा कोणत्या अर्थानं?

आत्मघातकीपणा अशासाठी, की बेटीव्यवहारात दलितांना एक्स्क्लूड (अ‍ॅज़ अ जनरल रूल) ब्राह्मणही (पक्षी: भटे) करतात, शीकेपीही करतात नि सारस्वतही करतात. यात काही गैर किंवा पाप आहे, असा माझा दावा नाही. कारण कोणी कोणाशी लग्न करावे (किंवा करू नये), हा ज्याचातिचा वैयक्तिक मामला आहे. मात्र, यात काही खापर फोडणीय आहे, या गृहीतकाखालीच जायचे असल्यास, अशा मांडणीतून या भटेतर जमातींची भटांप्रमाणेच दलितांना एक्स्क्लूड करूनच्या करून वर 'ब्राह्मण' या लेबलाखाली डॉक्युमेंट होऊन नामानिराळे राहायची आयती सोय होते. बोले तो, पाप (म्हणजे, हे पाप आहे, असे गृहीत धरून) करावे सर्वांनी सारखेच, खापर मात्र फुटावे केवळ भटांवर. ब्रिगेडी रोषाचे वेळी पापाचे वाटेकरी व्हावयास कोणी तयार असावे?

याच कारणास्तव, या सर्व जमाती (वर्तनसाधर्म्यामुळे) 'ब्राह्मण' या एकाच लेबलाखाली सारणारी मांडणी पटत नाही. (आणि, अशी मांडणी एका 'ब्राह्मणांसाठी' म्हणवणार्‍या संस्थेने करणे हे आत्मघातकी वाटते.) त्यापेक्षा, ब्राह्मण वेगळे, शीकेपी वेगळे नि सारस्वत वेगळे (भले ही आता आपापसात लग्ने करीत असले तरी), मात्र दलितांना सामावून घेण्याच्या बाबतीत थोड्याफार फरकाने सारखेच वाईट, अशी मांडणी अधिक सयुक्तिक वाटते. ('शेपरेट, बट ईक्वल.' लेट द ब्लेम बी अपोर्शन्ड.)

माझ्या माहितीनुसार 'अनुरूप' अत्यंत यशस्वी वधुवरसंशोधनसंस्था आहे.

गूड फॉर देम.

हां, अशासारख्या संस्था 'खरा ब्राह्मणधर्म' बुडवत आहेत आणि त्यामुळे ब्राह्मणांचा आत्मघात होत आहे असा काही सनातनी ब्राह्मणांचा समज असेल तर असू द्या बापडा.

नाइस ट्राय. ('थ्रो इट अ‍ॅट द वॉल', इ.इ.)

प्रकाश घाटपांडे Sun, 26/10/2014 - 19:11

In reply to by चिंतातुर जंतू

इतर अंतर्गत ब्राह्मणांच्या अनेक पोटजाती दिसतात. त्याविषयी केतकरांच्या ज्ञानकोषात उल्लेख आढळले.

अतिशहाणा Tue, 28/10/2014 - 18:21

मनातले २ छोटे प्रश्न

१. विमानात मला कायम पंख्याच्या बाजूलाच जागा का मिळते? मी विविध वेळा विमानांचे बुकिंग करुन पाहिले आहे मात्र कायम पंख्यावरच जागा मिळाली आहे. अगदी लॅवेटरीला लागून असलेली कोपऱ्यातली कंजेस्टेड सीटही चालेल पण पंख्याच्या बाजूची जागा नको असे आता वाटते.

२. अरुणजोशी कुठे गेलेत?

बॅटमॅन Tue, 28/10/2014 - 18:24

In reply to by अतिशहाणा

क्र. १ चे उत्तर आणि 'व्हाय डिड अतिशहाणा क्रॉस दि रोड' चे उत्तर कदाचित एकच असावे.

क्र २. बद्दल बोलायचे तर भाईशेट्याच्या भाषेतः 'अजो कुठे गेले इचिभना'...बाकीचे गाणे पूर्ण करण्याचा जिम्मा अर्थातच तबियतदारांनी उचलावा.

आदूबाळ Tue, 28/10/2014 - 18:36

In reply to by अतिशहाणा

१. पंख्याचा एवढा त्रास होतो तर पंखा लावू नका विमानात.

(शिरेस उत्तरः पंख्याच्या बाजूच्या जागा बाहेर्-बघणेच्छुक लोक सहसा टाळतात. तुम्हाला नको असेल तर २४ तास आधी वेब चेकिन करून आपल्याला पायजे ती जागा मिळवता येते. लांबच्या प्रवासात मुतारीजवळची जागा वैर्‍यालाही न मिळो.)

२. हा प्रश्न मलाही पडला आहे. दिवाळीपूर्वी काहीतरी राडा-कुटिंग झाला होता त्यानंतर गायब आहेत.

अतिशहाणा Tue, 28/10/2014 - 18:46

In reply to by आदूबाळ

वेब चेकिनचा प्रयत्न सर्व वेळा केलाय पण उपलब्ध जागांमध्ये त्या पंखांच्या जवळच्याच तीनचार जागा दिसतात. (जास्त पैशे भरुन पुढच्या जागा देऊ करतात)

गवि Tue, 28/10/2014 - 18:40

In reply to by अतिशहाणा

पंख्याच्या बाजूला म्हणजे पंखांवरची (Above the wings) ही जागा विमानातली सर्वात स्टेबल आणि सुरक्षित जागा असते हे तुम्हाला माहीत आहे ना ?

त्या जागेवर बसलेली व्यक्ती इज द लीस्ट पॉसिबल व्हिक्टिम ऑफ अ क्रॅशलँडिंग.

तुमच्यासोबत मूल असल्यास विशिष्ट एअरक्राफ्टमधे विशिष्ट ठिकाणच्या एक्ट्रा ऑक्सिजन मास्कमुळे आणि इमर्जन्सी एक्झिट (पंखावर) याच्या सान्निध्यामुळे ती सीट आवर्जून तुम्हाला दिली जात असू शकते.

अतिशहाणा Tue, 28/10/2014 - 18:46

In reply to by गवि

ही जागा सुरक्षित आणि स्टेबल असेल तर चांगलंय. पण टेकऑफ-लँडिंगच्या वेळी त्या पंख्यावरील पंखांची उघडझाप पाहून भीती वाटते बॉ. कधी कधी लँडिंग गिअर आतबाहेर करताना कुई कुई असा आवाज या जागी जास्त येतो की काय असे वाटते.

गवि Tue, 28/10/2014 - 18:50

In reply to by अतिशहाणा

सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी तिथे असतो. अर्थात स्टेबल, आणि इक्विलिब्रियम बिघडला तरी बाजूचे पंख जमिनीवरच्या अडथळ्यांचा इंपॅक्ट शोषून एअरफ्रेमच्या त्या भागात सेफ झोन तयार करतात.

आवाज वगैरे जरासा जास्त येतो पण तसा तो सर्वत्रच येतो. व्ह्यू मात्र ब्लॉक होतो हे खरंय.

अतिशहाणा Tue, 28/10/2014 - 18:52

In reply to by गवि

ह्व्यू ब्लॉक होतो. अर्थात जास्त दिसलं तरी आणीबाणीच्या प्रसंगी विमान कंट्रोल करता येणार नाहीच. मात्र अशा वेळी पायलटला मौल्यवान सूचना देता येणार नाहीत याचंच वाईट वाटतं.

गवि Thu, 06/11/2014 - 17:02

In reply to by अतिशहाणा

काही अपघातांच्या फाईल्समधे सीटनुसार मृत / जखमी इत्यादि नोंद ठेवली जाते. त्यातल्या काही नोंदी नमुन्यादाखल घेता येतील. उदा १९९१ मधे यूएस एअर १४९३ बोईंग ७३७ विमानाला लँडिंग करतानाच रनवेवर असलेल्या एका दुसर्‍या विमानावर घासून क्रॅश झाले. त्यात खालीलप्रमाणे चित्र होते:

गवि Thu, 06/11/2014 - 17:09

In reply to by गवि

केगवर्थ क्रॅशमधे खालील क्रॅशसाईट पहा: (चित्रे जालावरुन साभार)

सोर्सः http://cdn.images.express.co.uk/img/dynamic/1/590x/secondary/115479.jpg

यात खालीलप्रमाणे मृत / जखमी :

सोर्सः http://news.bbcimg.co.uk/news/special/panels/14/jan/kegworth/img/img_pa…

एकूण बाकी कुठेही काहीही होवो.. पंखांवरची आणि शेपटाकडची बाजू त्यातल्यात्यात सेफ दिसते.

Nile Tue, 04/11/2014 - 22:27

In reply to by गवि

अन साला आम्ही मुद्दामहून पंख्यावर जागा मिळेल का ते पाहतो. विशेषतः रात्री अन पावसाळी/ढगाळ हवामान असेल तर. हाडाचे एअरोडायनॅमिस्ट ना, काय करणार!

मी Tue, 28/10/2014 - 19:05

In reply to by अतिशहाणा

१. विमानात मला कायम पंख्याच्या बाजूलाच जागा का मिळते? मी विविध वेळा विमानांचे बुकिंग करुन पाहिले आहे मात्र कायम पंख्यावरच जागा मिळाली आहे. अगदी लॅवेटरीला लागून असलेली कोपऱ्यातली कंजेस्टेड सीटही चालेल पण पंख्याच्या बाजूची जागा नको असे आता वाटते.

आता ते तुमचं डिफॉल्ट सेटिंग झालं आहे, सारखं-सारखं तिथे बसुन तुमच्या नावाचा बोर्डिंग पास ऑटोमॅटिक तयार होतो. ते नको असल्यास १ रुपयाच्या रेव्हेन्यू स्टँपवर अर्ज लिहून सगळ्या विमान कंपन्यांना पत्राने पाठवावा, त्यामधे ते सिट का नको आहे ह्याची सखोल कारणे द्यावीत, जमल्यास मागच्या १५ प्रवासांचे बोर्डिंग पासेस जोडावेत, त्यावर नक्कीच काहीतरी अ‍ॅक्शन घेतली जाईल.

पंख्यावरची जागा एकाप्रकारे तुम्ही एकाच जागी आहात हे तुम्हाला सांगत असते, म्हणजे इतरांना कसं हलणारं जग दिसतं, तुम्हाला मात्र कायम पंखाच दिसतो, त्यामुळे विमान पुढे जात आहे किंवा नाही ह्याबद्दल माहिती तुम्हाला इतरप्रकारे मिळवावी लागते, हे मानसिक ताणाला कारणीभूत ठरु शकते, तसा दावा तुम्ही विमान कंपन्यांवर दाखल करु शकता.

इथे गवि हे तुम्हाला ते सिट कसे सुरक्षीत आहे वगैरे सांगत आहेत पण विमान क्रॅश झाल्यावर पंखातरी वाचला आहे का? म्हणुन त्यावरचा माणुस वाचणार आहे? त्यामुळे ते विमान कंपन्यांचे एजंट असावेत अशी शंका मला येते.

२. अरुणजोशी कुठे गेलेत?

प्रश्न असा विचारायला हवा "अरुण जोशींचं काय झालं?". ('मारुती कांबळेचं काय झालं'च्या चालीवर).

Ignorance is bliss

तरी प्रश्न विचारोन का ब्लिस घालवता?

नितिन थत्ते Tue, 28/10/2014 - 22:46

In reply to by अतिशहाणा

तुम्हाला पंखाच्या बाजूची म्हणायचं आहे का? म्हणाजे अलिकडे पंखा असलेली विमानं सहसा दिसत नाहीत.

असल्या विमानात बसण्याची वेळ कुणावर न येवो.

मी Wed, 29/10/2014 - 13:12

खालच्या चित्रात दिसते ती एक काळ्या रंगाची नळी आहे, त्यामधे आतल्या निळ्या बाणाच्या दिशेने एक चेंडू सोडला आहे, तो नळीच्या दुसर्‍या भागातून बाहेर पडल्यास कोणत्या दिशेला जाईल? A? B? C? आणि त्याचे कारण काय असावे?

मी Wed, 29/10/2014 - 14:01

In reply to by मी

उत्तरामागच्या 'का'चे उत्तरही दिल्यास चांगले.

गवि Wed, 29/10/2014 - 14:12

In reply to by मी

कोणतेही बाह्य बल नसताना (हवेचा अवरोध इथे दुर्लक्षित करु) कोणतीही वस्तू आपली दिशा आणि वेग बदलत नाही.

इथे एक्झिट पॉईंटपर्यंत सर्पिल नळकांडीच्या आकाराने चेंडूला वाढत्या त्रिज्येच्या वर्तुळात ठेवून सेंट्रिपीटल आणि फ्युगल फोर्सेसच्या ब्यालन्सने तो पाथ मेंटेन केलेला आहे. पण सेंट्रिपीटल आणि फ्युगल फोर्सेस हे एकमेकांमुळे अस्तित्वात येतात. तस्मात सर्पिल नळकांडी संपताक्षणी या दोन्ही फोर्सेसचे कारण नष्ट होऊन चेंडू तिथपासून सरळ रेषेत गती घेईल. ही गती त्याला या सर्पिलाकारात मिळेल असे गृहीत धरले आहे कारण तुमच्या आकृतीत तो चेंडू आत जाऊन वेगाने बाहेर पडण्यासारखी रचना दिसत नाहीये (ग्रॅव्हिटी ऑर अदरवाईज बलाने) पण तो बाहेर "पडला तर" असे गृहीतक तुम्ही दिलेले असल्याने ते ग्राह्य धरले आहे.

नितिन थत्ते Wed, 29/10/2014 - 14:12

In reply to by मी

न्यूटनचा पहिला नियम ....
बाह्य बल कार्यरत नसेल तर वस्तू आहे त्या दिशेने जात राहील.
नळीतून प्रवास करताना नळीच्या भिंती बल लावून वस्तूची दिशा बदलत राहतात. नळीतून बाहेर पडताच हे बल नष्ट होते. त्यामुळे नळीतून बाहेर पडण्याच्या क्षणी जीदिशा असेल (बी) त्याच दिशेने वस्तू जात राहील.

मी Wed, 29/10/2014 - 14:38

In reply to by नितिन थत्ते

धन्यवाद, गवि आणि थत्ते. अर्थात उत्तर बरोबर आहेच, न्युटनचा नियम किंवा गविंनी दिलेले स्पष्टिकरण इथे योग्यच आहे. मला उत्तर असे असेल असे वाटत होते पण न्युटनचा नियम माहित नव्हता.

मी Thu, 30/10/2014 - 14:02

In reply to by अनुप ढेरे

पुणे मराठी ग्रंथालय बरं आहे, अनेक 'जुनी' लोकप्रिय पुस्तके मात्र कायम बुकिंग स्टेजमधे असतात, काहींची एकच प्रत असते ती घरी नेता येत नाही आणि इतर सदाशिव-कारणे वगळता ग्रंथालय बरे आहे तुलनेने स्वस्त आहे.

अनुप ढेरे Thu, 30/10/2014 - 14:04

In reply to by मी

पुस्तके मात्र कायम बुकिंग स्टेजमधे असतात, काहींची एकच प्रत असते ती घरी नेता येत नाही

या असल्या कारणांमुळेच नवं काहितरी शोधतो आहे.

मी Thu, 30/10/2014 - 15:08

In reply to by अनुप ढेरे

असली पुस्तके बहुदा प्रकाशनाकडेही नसतात(औट ऑफ प्रिंट), त्यामुळे इतर ग्रंथालयात ती मिळतील ह्याबद्दल साशंक आहे.

चिंतातुर जंतू Thu, 30/10/2014 - 17:03

In reply to by अनुप ढेरे

>> कादंबर्‍या, चरित्र, ललित, कविता. अनुवाद नसले तरी चालतील.

गावात - फीनिक्स लायब्ररी पाहा (सदाशिव पोस्ट ऑफिससमोर, कुमठेकर मार्ग).
एरंडवनात - अक्षरस्पर्श लायब्ररी (भोंडे कॉलनी)
ऑनलाइन / घरपोच सेवेसाठी - पै यांची फ्रेंड्स लायब्ररी.

लॉरी टांगटूंगकर Thu, 30/10/2014 - 17:53

In reply to by चिंतातुर जंतू

ऑनलाईन आणि घरपोच देणारी जस्ट बुक्स पण आहे.
यांच्याकडे वेगवेगळ्या भाषांमधली पुस्तके असतात, असा बाकीचा भरणा असल्याने मुख्य पुस्तके फार कमी असल्यासारखं वाटतं. पुण्यात कशी परिस्थीती आहे मला माहीती नाही. एक चक्कर टाकल्यास लक्षात येईलच.

चिंतातुर जंतू Thu, 30/10/2014 - 18:25

In reply to by लॉरी टांगटूंगकर

>> ऑनलाईन आणि घरपोच देणारी जस्ट बुक्स पण आहे.

मराठी पुस्तकांवर भर असेल, तर पै ह्यांच्या फ्रेंड्स लायब्ररीशी 'जस्ट बुक्स'ची तुलना करण्यात अर्थ नाही. बहुसंख्य मराठी वाचकांची भूक भागवण्यासाठी पै ह्यांचा साठा पुरेसा वाटतो (माझा प्रत्यक्ष अनुभव नाही.)

'न'वी बाजू Thu, 30/10/2014 - 14:47

In reply to by चिंतातुर जंतू

कोणत्या प्रकारची मराठी पुस्तकं?

१. नागड्या बायांची चित्रे असलेली
२. अंकलिपी
३. बायकांची मासिके
४. शेतकी आणि पाटबंधारे खात्याचे वार्षिक अहवाल

या चारही प्रकारची पुस्तके एकाच छताखाली मिळाल्यास सोन्याहूनही पिवळे.

गवि Thu, 30/10/2014 - 15:06

In reply to by 'न'वी बाजू

नागड्या बायांची चित्रे असलेली

"डेब"इतकी क्वालिटी मराठीत असेल का ? पिवळी (पडलेली) पुस्तके कितपत चांगली चित्रे दाखवतील याबद्दल साशंक आहे.

'न'वी बाजू Thu, 30/10/2014 - 15:13

In reply to by गवि

"डेब"इतकी क्वालिटी मराठीत असेल का ?

'महाराष्ट्र व्यापारात मागे का पडला' या गहन प्रश्नाचे इन्ष्टण्ट उत्तर आपल्या या प्रश्नातून मिळावे.

योजकस्तत्र दुर्लभः|

गवि Thu, 30/10/2014 - 15:17

In reply to by 'न'वी बाजू

योजकस्तत्र दुर्लभः|

नाय हो.. इतकी वाईट परिस्थिती नाहीये. हल्ली इकडे सर्व दुकानात योजकचे कोकम सरबत, योजक आंबावडी, फणसपोळी वगैरे सर्व मिळते.

'न'वी बाजू Thu, 30/10/2014 - 16:13

In reply to by गवि

"योजक" कोकम सरबतात, झालेच तर आंबावडीत, फणसपोळीत असेलही. नागड्या बायां(ची चित्रे छापण्याच्या धंद्या)त आहे काय?

"योजकस्तत्र दुर्लभः" बरोबरच आहे!

----------------------------------------------------------------------------------------------------

यावरून आठवले:

आमच्या - बोले तो, आमच्या नव्हे, पण आमच्या अमेरिकेतल्या - न्यूजर्शीतले एडिसन - खरे तर एडिसनशेजारचे आयझेलिन - हे मुळात गुजरात्यांनी ओसंडून वाहणारे गाव. इतके, की गावातल्या चौकात उभे राहून "पटेल!" असे जोरात ओरडावे - अर्ध्याहून अधिक गाव मागे वळून बघतो, कोणी आपल्याला हाक मारली म्हणून. मधला महासागर आड येतो म्हणून, नाहीतर खरे तर गुजरातेतच असायचे. एकदा तेथील जगप्रसिद्ध ओकट्री रोडशेजारील कोण्या अपार्टमेंट काँप्लेक्सात कोणी वाट चुकलेला गौरवर्णीय आपल्या दुसर्‍या एका गौरवर्णीय मित्राचा पत्ता विचारत आला, तर तेथल्या एका गुजराती आजोबांनी त्याला अत्यंत हेल्पफुली "इथे कोणी फॉरेनर नाही राहात" म्हणून सांगितले, तो किस्सा सर्वश्रुत आहे.

पण मग पुढे वायटूके घडले, नि हैदराबादेतून वायटूकेचे निमित्त सांगून येणार्‍या तेलुगू प्रोग्रामरांची एकंदरीत अमेरिकेतच रीघ लागली, त्यात आमच्या या एडिसनाचे डेमोग्राफिक्स पार बदलू लागले. इतके की, एके काळी जवळपास संपूर्ण गुजराती असलेल्या गावात तेलुगू लोक ही एक सिग्निफिकंट मायनॉरिटी बनली. आता, गुजराती ही बोलूनचालून व्यापारी जमात - ती या बदलाची दखल घेणार नाही, असे थोडेच होईल? म्हटल्यावर, स्थानिक रेडियोवर "श्री ज्युवेलर्स की रंडीऽऽऽऽऽऽ!" (तेलुगूत अर्थ: "श्री ज्युवेलर्सकडे याऽऽऽऽऽऽ!") म्हणून ओरडून सांगणार्‍या जाहिराती हळूहळू येऊ लागल्या.

यावर आमच्या एका सन्मित्रांची प्रतिक्रिया: "श्री ज्युवेलर्सनी बहुतेक आपला धंदा डायव्हर्सिफाय करायला सुरुवात केली वाटते!"

आदूबाळ Thu, 30/10/2014 - 15:26

In reply to by अनुप ढेरे

लायब्ररीतच बसून वाचायचं असेल तर शासकीय विभागीय ग्रंथालयाला (विश्रामबाग वाड्याच्या सर्वात वरच्या मजल्यावर) तोड नाही.

अवांतरः पुणे मराठी ग्रंथालय पत्र्या मारूतीच्या बोळात आहे ना? म्हणजे नारायण पेठेत. हा प्वाईंट नवी बाजूंनी न पकडल्याचं आश्चर्य वाटलं.

बॅटमॅन Thu, 30/10/2014 - 15:29

In reply to by आदूबाळ

तसं वाचायचं असेल तर मसाप सुद्धा बेष्ट आहे. टॉप फ्लोअरला ५/- देऊन बसता यायचं एकावेळी- अ‍ॅट द मॅक्स ३-४ तास. ही गोष्ट २००८ मधली आहे, आत्ताचं माहिती नाही.

स्वधर्म Thu, 30/10/2014 - 15:07

निसर्गातील (पृथ्वीवरील) पाणी हे तेवढेच राहते की त्यात कमी जास्त होते? इथे भूगर्भातले, समुद्रातले, जमिनीवरचे व बाष्प इ. मिळून एकूण पाणी अपेक्षित. पाणी 'निर्माण' करता येते का? कदाचित प्रयोगशाळेत हायड्रोजन व ऑक्सिजन यांचा संयोग घडवून आणून करता येत असेल, पण ते परवडणार नसेल असे वाटते. इलेक्ट्रॉलिसिसच्या विरूध्द क्रिया. वनस्पतीही मला वाटते पाणी 'वापरतात', ते निसर्गात कोणत्या प्रक्रियेतून निर्माण होते का?

ट्रिगरः मानवी उपदव्यापांमुळे त्याचे रसायने, संयुगे इ. रूपांतर होते व एकूणातल्या पाण्यातील पिण्यायोग्य पाण्याची उपलब्धता कमी कमी होत जाते. म्हणून पाणी वाचवा असा प्रचार केला जातो. पण मुळात एकूण पाणी हा एक स्थिर (नविन निर्माण न होणारा) घटक आहे असे अद्याहृत आहे, अशी समज जाणवत तरी नाही.

- स्वधर्म

गवि Thu, 30/10/2014 - 15:10

In reply to by स्वधर्म

पाणी स्पेसमधे एस्केप होते (गुरुत्वाकर्षणातून सुटून त्याची वातावरणाबाहेर गळती होते)इतके माहीत आहे.

गवि Thu, 30/10/2014 - 15:19

In reply to by स्वधर्म

फार हळूहळू एस्केप होत असावे. माहितगार (आयडी नव्हे) खुलासा करतील ..

माहितगार आयडीनेही खुलासा केला तरी उत्तमच आहे. पण ते खुलाश्याऐवजी प्रताधिकारमुक्त चर्चा टाकतील बहुधा.

लॉरी टांगटूंगकर Thu, 30/10/2014 - 15:49

In reply to by स्वधर्म

चेमिष्ट्रीच्या लोक्स ने कन्फर्म करावे.
बर्‍याचशा ज्वलन (combustion) प्रकारच्या प्रक्रियेत पाणी तयार होते.
CH4 + 2O2 → CO2 + 2 H2O

स्वधर्म Thu, 30/10/2014 - 19:06

In reply to by लॉरी टांगटूंगकर

धन्यचाद मंदार.
मिथेनच्या ज्वलनप्रक्रियेत पाणी तयार होतो असा संदर्भ विकीवर मिळाला. दुवा:http://en.wikipedia.org/wiki/Methane
Methane is created near the Earth's surface, primarily by microorganisms by the process of methanogenesis. It is carried into the stratosphere by rising air in the tropics. Uncontrolled build-up of methane in the atmosphere is naturally checked – although human influence can upset this natural regulation – by methane's reaction with hydroxyl radicals formed from singlet oxygen atoms and with water vapor. It has a net lifetime of about 10 years,[51] and is primarily removed by conversion to carbon dioxide and water.

परंतु, हे पाणी एकूण पाण्याच्या तुलनेत कितपत (की नगण्य?) आहे माहित नाही.
तसेच विकीवर पाण्याचे पान आहे: http://en.wikipedia.org/wiki/Water
तिथेही बरीच माहिती आहे. 'वाचवायचं' पाणी आणि त्यासंबंधीचा क्रायसिस हे फ्रेशवाटर असून एकूण पाणी उपलब्धता हा बहुधा चिंतेचा विषय नसावा. तार्यांच्या निर्मितीतही मोठ्या प्रमाणात पाणी तयार होत असल्याची माहीती या पानावर आहे.

- स्वधर्म

नितिन थत्ते Fri, 31/10/2014 - 13:41

राज्यपालांनी भाजपला महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित केले का? मला कुठे बातमी वाचल्याचं स्मरत नाही.

ऋषिकेश Fri, 31/10/2014 - 13:48

In reply to by नितिन थत्ते

श्री फडणवीस यांनी सत्तास्थापनेचा दावा केला. त्यावर राज्यपालांनी सरकार स्थापन करण्याची परवानगी दिली व १५ दिवसांत बहुमत सिद्ध करण्यास सांगितल्याचे वाचल्याचे आठवते. दुवा शोधायचा कंटाळा आलाय

वामन देशमुख Sat, 01/11/2014 - 12:35

एखादा खेळ खेळताना प्रतिस्पर्ध्याकडून एखादी चूक झाली तर ती चूक त्याने सुधारण्याआधी आपण "गाबडेव" किंवा "छाप" असे म्हटल्यास त्या प्रतिस्पर्ध्याला ती चूक सुधारण्याची संधी मिळत नाही आणि आपला फायदा होतो.
या "गाबडेव" किंवा "छाप" यासाठी हिंदी आणि इंग्लिश मध्ये कोणते शब्द आहेत का? असल्यास कोणते?

१. मराठवाड्यात प्रचलित
२. विदर्भात प्रचलित

yugantar Tue, 04/11/2014 - 22:13

मला प्रामाणिकपणे असे वाटते की LGBT चळवळ श्रीमन्ताची आपल्या सेक्शुअल कलाला समाजमान्यता मिळावी म्हणून चालविलेली आहे. सामान्य माणसाला(पक्षी:गरीब) जीवनाच्या रहाटगाडग्यात सेक्स करतानासुद्भा सेक्सविषयी विचार करायला वेळ नाही, दुसर्या शक्यता पडताळून कोण पाहणार.(माझाLGBT चळवळीला पाठिम्बा आहे.) तसेच RTP चळवळ(माझा या चळवळीलाही पाठिम्बा आहे.)मध्यमवर्गाच्या आपुलकीची चळवळ आहे.का र ण नवीन रोजगारात वाढलेला स्ञी टक्का.बलात्काराच्या केसमध्ये अधिक व्होकल असणार्या (मध्यम + उच्च) वर्गाने जबाव आणून बलात्काराच्या केसमध्ये आरोपीला जास्त शिक्षेचे विधेयक पारित करवून घेतले. इतके दिवस गावापाडातल्या बलात्काराकडे दुर्लक्ष केले.

{ प्रिय admin मला engish मध्ये लिहिण्याची मुभा मिळेल काय. मज पामराकडे computer ऐवजी mobile नामक smallscreen उपकरण आहे. केवळ दीड महिन्याचे site following व दोन प्रतिक्रियानतर लहान उपकरणी मोठी विञन्ती केल्याबद्दल क्षमस्व. एवढ्या पोष्टसाठी दोन तास गेले असल्याने त्यावर थोडा विचार व्हावा. आपल्या उत्तराच्या प्रतीक्षेत — एक 4 inch screen mobile धारक. धन्यवाद.}

ऋषिकेश Wed, 05/11/2014 - 13:59

In reply to by yugantar

मला प्रामाणिकपणे असे वाटते की LGBT चळवळ श्रीमन्ताची आपल्या सेक्शुअल कलाला समाजमान्यता मिळावी म्हणून चालविलेली आहे. सामान्य माणसाला(पक्षी:गरीब) जीवनाच्या रहाटगाडग्यात सेक्स करतानासुद्भा सेक्सविषयी विचार करायला वेळ नाही, दुसर्या शक्यता पडताळून कोण पाहणार

असा गैरसमज अनेकांचा असतो मात्र हे खरे नाही, इतकेच सांगतो.
तुर्तास यावेळच्या दिवाळी अंकातील आदित्यची मुलाखत वाचुन पहा. बघा काही मत बदलते का

yugantar Fri, 07/11/2014 - 15:29

In reply to by ऋषिकेश

1.जो जे वान्च्छील..... या साध्या न्यायानेच माझा LGBT ला पाठिम्बा आहे. मी मुलाखत वाचली आहे आणि मला त्याच्याबद्दल सहानुभूती वाटते.
२.मला लैंगिक अल्पसंख्यांक (LGBT खासकरुन LGB ) व आर्थिक अल्पसंख्यांक ( श्रीमंत आणि अत्यंत सुशिक्षित )या दिशेने आपले लक्ष केंद्रित करायचे आहे. दोन्ही गटातील लोक अधिकान्शी common आहेत. गरीब लोक sexual orientation बद्दल तेवढे vocal नसल्याने असेल कदाचित.
३. येथे दोन्ही परिस्थितीमध्ये लोकांच्या मनातली भीती समान आहे. LGBT लोक इतर लोकाना LGBT मध्ये रूपांतरित करण्याचा प्रयत्न करीत आहेत की काय अशी भीती वाटायला लागली असू शकते. तसेच साधारणपणे गरीब लोक हे श्रीमंत लोकाचा तिरस्कार करतात.
४.तशीच भीती आहे हिंदू लोकाना की ख्रिस्ती मिशनरी सामान्य लोकाना कल्याणाच्या नावाखाली ख्रिश्चन धर्मामध्ये convert करीत आहेत. (दुसरे उदाहरण
अनुसूची जातीच्या लोकाचे बौद्ध धर्मात रूपांतरबाबतीत.)
५. If LGBT movement gains support i also fear that if i like a male actor excessively (in non sexual way-having to explain it is also due to a fear that i might be misconstrued that i'm gay) and often say it loud in open people will say i'm gay. so though i like him then i must mention likes of katrina or karina in same sentence.
so naturally i would like that people who are straigt must be considered 'natural' and LGBT as 'not natural'

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 07/11/2014 - 21:07

In reply to by yugantar

साधारण सव्वाशे-दीडशे वर्षं मागे जाऊ या. स्त्रियांनी शिकायला पाहिजे, आर्थिक स्वातंत्र्य मिळवलं पाहिजे अशा प्रकारचे विचार सुस्थित असणारे, निदान खाण्यापिण्याची काळजी नसणारे पुरुष करत होते, (म. फुले, म. कर्वे). तेव्हा स्त्रिया असं काही म्हणत नव्हत्या, आणि गरीब स्त्रिया तर अजिबात नाही. (म्हणत असतील तरी त्यांना काय म्हणायचं होतं याची कोणाला पडली होती?) शिकल्या, आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र झाल्या म्हणून स्त्रिया पुरुष झाल्या का? (गंमत अशी की स्त्रीवादी आणि मेल शॉव्हनिस्ट एकाच अर्थाची तक्रार करतात पण त्यांचे तपशील फारच वेगळे असतात. पण ते असो.) समजा असं ठरवून कोणाला LGBT होता येत असेल तर, होऊ दे की. LGBT बनणं लादलं जात नाहीये तोपर्यंत कशाला काळजी करायची? (भारतात तर काही प्रकारचं queer - म्हणजे asexual - असण्याला, किंवा तसं दाखवण्याला फारच कूल पॉइंट्स मिळतात.)

आणि समजा कोणी तुम्हाला गे समजलं तर काय फरक पडतो? तुमचे ज्या व्यक्तिंशी शारीर/प्रेमसंबंध आहेत त्या व्यक्तींना तुमचा लैंगिक कल माहीत आहे, यापलिकडे कोणीही काहीही समजलं तरी काय फरक पडतो? कोणी पुरुष गे किंवा व्यक्ती LGBT आहे असं समजलं तर तुम्ही त्या लोकांना कमी लेखता का?

so naturally i would like that people who are straigt must be considered 'natural' and LGBT as 'not natural'

असं आपल्या वाटण्या-न-वाटण्यावर नैसर्गिक काय असतं हे कुठे ठरतं; आपोआप तुम्हाला तसं वाटलं असेल तरीही. पण तुम्हाला असं 'नैसर्गिकरित्या' वाटत असेल तर तुम्ही बायस्ड आहात असं मला वाटतं.

yugantar Fri, 07/11/2014 - 22:29

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

समजा असं ठरवून कोणाला LGBT होता येत असेल तर, होऊ दे की. LGBT बनणं लादलं जात नाहीये तोपर्यंत कशाला काळजी करायची?
> मला जन्मल्यापासून straight पणाच प्रशिक्षण मी straight झालो. जर मी unbiased विचार करायच ठरवल तर मला निदान काही काळ तरी सर्व शक्यता पडताळून पहाव्या लागतील. मग माझ्या गे बनण्याचे chances वाढतीलच नाही का?
कोiणी पुरुष गे किंवा व्यक्ती LGBT आहे असं समजलं तर तुम्ही त्या लोकांना कमी लेखता का?
> ज्याच त्याला स्वातन्ञ्य आहे.कमी समजण्याचा प्रश्नच नाही.पण अशा बाबतीत LGBT ना पाठिम्बा देणारे ही LGBT समजले जातात. ना घर का ना घाट का. मग मी क्रुतीरहित(छुपा) पाठिम्बा देतो (ज्याचा काही फायदा नाही.)

so naturally i would like that people who are straigt must be considered 'natural' and LGBT as 'not natural'
> I Want to say that I am forced to think that way because sitting on the fence is not an option here.(those sitting on fence will be hated more)

एक भयानक विचार -
जर सगळे आपणहुन गेपणादद्दल विचार करायला लागले तर होस्टेलवर एका खोलीत रहाणार्या पाच-पाच पोरान्च/पोरीन्च काय. त्याना live in relationshipच दिली गेली असे समजावे लागेल.

३_१४ विक्षिप्त अदिती Sun, 09/11/2014 - 21:54

In reply to by yugantar

मला जन्मल्यापासून straight पणाच प्रशिक्षण मी straight झालो.

अरे कर्मा! घोळ इथपासून आहे का? (वरच्या प्रतिसादाला विनोदी अशी श्रेणी देणाऱ्यांनो, :-) )
नाही हो, असं प्रशिक्षण देऊन कोणी समलैंगिक/विषमलैंगिक बनत नाहीत. लोक अशा धारणा, शरीररचना घेऊनच जन्माला येतात. LGBT लोकांचे आईवडील, आजूबाजूचे बहुतांश लोक विषमलैंगिक संबंध ठेवणारे असतात.

... LGBT ना पाठिम्बा देणारे ही LGBT समजले जातात. ना घर का ना घाट का. मग मी क्रुतीरहित(छुपा) पाठिम्बा देतो (ज्याचा काही फायदा नाही.)

या हिशोबात, या संस्थळावर लेखन करणारे बहुतांश लोक LGBT समजले जातात. ना घर के ना घाट के. काय फरक पडणारे त्यामुळे!

yugantar Mon, 10/11/2014 - 01:51

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

लोक अशा धारणा, शरीररचना घेऊनच जन्माला येतात. LGBT लोकांचे आईवडील, आजूबाजूचे बहुतांश लोक विषमलैंगिक संबंध ठेवणारे असतात.
>>>>>माझे पूर्वज बीफ खात नाहीत. मला खूप आवडते. मग मी त्यान्च्यापेक्षा वेगळा आहे. मग मी अशा धारणा, शरीररचना घेऊनच जन्माला घेऊन आलो का? त्याच्यापुढे जाउन मी धर्माच्या विरोधात असेन व सगळा समाज नसेल तर मग मी अशा धारणा घेऊनच जन्माला घेऊन आलो का?
मला अपेक्षा आहे की उत्तर नाही असे असावे.
तर मग उत्तर काय असावे?
किन्नर व अपन्ग याच्या शरीररचनेत बदल झालेला असतो. तर LGB यान्च्यात मानसिक बदल झालेला असू शकेल मग तो अगदी लहान वयात होवो की मोठ्या वयात. उदा. मी जर मी sexual preference बदलायला किवा कमीत कमी try करायला हरकत नाही या मताचा असेन तर जन्मताना असणार्या भावनाचा सम्ब्न्ध कुठे येतो. ज्यानी कोणी LGBT पणा स्वीकारलाय त्यानी विचार केला असेलच. त्याना पसन्त आहे तर उत्तमच आहे. पण समाजाला मान्य नाही म्हणून - आमचा जन्मतानाचा कल हा होता. आम्हाला accept करा असली थोतान्ड कशाला? LGB(transgender नव्हे) नी समाजाला असे म्हणावे: ही आमची choice आहे तुमची मान्यता असेल तर उत्तमच नसेल तरी एवढ बिघडत नाही(थोड तर बिघडणारच. कारण मी सूद्धा समाजात जाहीरपणे बीफ खाण्याबद्दल :काही सान्गू शकत नाही.)

मेघना भुस्कुटे Mon, 10/11/2014 - 09:03

In reply to by yugantar

बाकीचं चालू द्या.

कारण मी सूद्धा समाजात जाहीरपणे बीफ खाण्याबद्दल :काही सान्गू शकत नाही...

ये क्या माज्रा है?

'न'वी बाजू Mon, 10/11/2014 - 15:37

In reply to by मेघना भुस्कुटे

यक्झ्याक्टली!

"नेमक्या कोणत्या जमान्यात राहता आपण?" हा बोटांवर आलेला प्रश्न निव्वळ आळसापायी टाळला.

असो.

राजेश घासकडवी Tue, 11/11/2014 - 11:02

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

अरे कर्मा! घोळ इथपासून आहे का? नाही हो, असं प्रशिक्षण देऊन कोणी समलैंगिक/विषमलैंगिक बनत नाहीत. लोक अशा धारणा, शरीररचना घेऊनच जन्माला येतात.

हे तुमच्या सीमॉनला का सांगत नाही? ती तर म्हणते की “One is not born, but rather becomes, a woman”

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 05/11/2014 - 21:43

In reply to by yugantar

साधारणतः वयात येणारे लोक विचार करून प्रेमात पडत नाहीत. (विचार करून कोणीतरी नकार दिला तर काही दिवस त्याचा विचार करून पुन्हा प्रेमात पडायला मोकळे होतात.) पण कोणाच्या प्रेमात पडायचं याचा फार विचार होत नाही. हेटरोसेक्शुअल लोकांचा ... मग होमोसेक्शुल लोकांकडेही असंच बघता येईल. त्यातही फरक आहे; ते कधीकधी 'दुसऱ्या' शक्यता पडताळूनही पाहतात. (आदित्यची मुलाखत वाचा.) हेटरो-होमोसेक्शुअल असण्याचा आर्थिक स्थितीशी काय संबंध? (तुम्ही फोनवरून 'ऐसी'वर येता म्हणून बाकीच्यांनी मराठीतून विचार करायचं थांबवलं असं तर होणार नाही, बरोबर ना?)

त्यातही श्रीमंत लोक कलाप्रकारांखातर LGBT चळवळ चालवत असतील तरी काय बिघडलं?

---

इंग्लिशमध्ये थोडं लिहायला फार आक्षेप नाहीत. पण संस्थळ मराठी असल्यामुळे तावच्या तावभर लेखन इंग्लिशमधून करण्यासाठी सबळ कारण असावं अशी एक अपेक्षा आहे.

स्मार्टफोन असेल तर त्यावरून मराठीत लिहिणं फार कठीण नस‌ावं. (माझ्या दोन वर्षं जुन्या फोनवरून जमतं.)

yugantar Fri, 07/11/2014 - 16:22

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

त्यातही श्रीमंत लोक कलाप्रकारांखातर LGBT चळवळ चालवत असतील तरी काय बिघडलं?
मला कला-art म्हणायच नव्हत. लैन्गिक कल- sexual orientation बद्दल म्हणायच व्हत.
विनन्ती : खालील प्रत्युतर वाचावे. इथे copy paste होत नाहीये.

मिहिर Thu, 06/11/2014 - 10:38

गुजरातेत शाळेत शिकवायला लावलेली बात्रांची पुस्तके जालावर किंवा इतर कुठे मिळतील? नक्की काय काय लिहिले आहे ते बघायचे आहे.

अनुप ढेरे Fri, 07/11/2014 - 11:35

ब्याटरीवर चालाणार एखादा म्युझिक प्लेअर कमी आवाजावर वापरला तर कमी पॉवर खाईल का? आणि त्यामुळे जास्तं वेळ चालेल का?

ॲमी Fri, 07/11/2014 - 11:44

In reply to by अनुप ढेरे

मलादेखील साधारण असाच प्रश्न पडलेला.
फ्रिजचा नॉब १वर ठेवला तर तो ३वर ठेवल्यापेक्षा कमी इलेक्ट्रिसीटी कंझ्युम करतो का? त्यामुळे कमी बील येइल का?

अनुप ढेरे Fri, 07/11/2014 - 11:58

In reply to by ऋषिकेश

अधिक थंड करायला. आणि अजून खालच्या तापमानाला नियंत्रित करायला. (एक म्हंजे तीन पेक्षा कमी थंड (जास्तं तापमान) असं मी समजतोय. )

नितिन थत्ते Sat, 08/11/2014 - 06:43

In reply to by अनुप ढेरे

+१

शिवाय टेम्परेचर डिफरन्शिअल जितके जास्त तितका लॉस जास्त...

म्हणजे तुम्ही समजा तापमान ५ अंश सेल्सिअस सेट केले असेल आणि थर्मोस्टॅटचा टॉलरन्स अधिक/उणे १ डिग्री असेल तर ६ डिग्री तापमान झाल्यावर फ्रीज चालू होईल आणि ४ डिग्रीला पोचले की बंद होईल. पुन्हा तापमान सहा डिग्री व्हायला जो वेळ लागेल (बाहेरील उष्णता शोषल्यामुळे) तेवढा वेळ फ्रीज बंद राहील.

असेच तुम्ही तापमान १० डिग्री ठेवले किंवा शून्य डिग्री ठेवले तर होईल. मधला फ्रीज बंद राहण्याचा जो काळ असेल तो १० डिग्री तापमान ठेवले असता जास्त असेल आणि शून्य डिग्री तापमान ठेवले असता कमी असेल.

ॲमी Fri, 07/11/2014 - 11:54

In reply to by अनुप ढेरे

हो माझे निरीक्षणदेखील हेच सांगते. पण पंख्याचे मात्र तसे नाही. तो कितीही स्पीडवर ठेवला तरी तेवढीच वीज खातो.

घरघंटीचे काय? ती दिवसभर न वाजता चालू राहिली तर किती वीज खाते आणि सतत वाजत राहिली तर किती?

'न'वी बाजू Fri, 07/11/2014 - 16:56

In reply to by ॲमी

घरघंटीचे काय? ती दिवसभर न वाजता चालू राहिली तर किती वीज खाते आणि सतत वाजत राहिली तर किती?

प्रयोग करून पहा, मोजा नि निरीक्षणे इथेच मांडा; सर्वांनाच कळेल.

अतिशहाणा Fri, 07/11/2014 - 16:59

In reply to by 'न'वी बाजू

सहमत. शिवाय न वाजता किती वीज खाते हे मोजण्यासाठी घंटीवर लक्ष ठेवून बसणे आवश्यक आहे. दरवाजात बसून कोणालाही घंटी वाजवू देऊ नका. जर कोणी चुकून वाजवलीच तर दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा रीडिंग घ्या.

शुभेच्छा!

Nile Fri, 07/11/2014 - 22:27

In reply to by ॲमी

पंखा ऑन असेल तेव्हा सर्किट नेहमीच ऑन असते. (नविन इलेक्ट्रॉनिक बेल्स बद्दल माहिते नाही, पण जुन्या) घंटीमध्ये सर्किट ओपन-क्लोज्ड झाल्याने बेल वाजते. बेसिकली इलेक्ट्रीक मॅग्नेट मुळे घंटी बाहेर खेचली जाते आणी ती त्या लोखंडी प्लेट्सवर लागून आवाज होतो. नविन बेल्स मधील सर्किट वेगळे असले तरी प्रिन्सीपल तोच, त्यामुळे तेही उर्जा खाणार नाहीत.

नितिन थत्ते Sat, 08/11/2014 - 06:44

In reply to by ॲमी

>>पण पंख्याचे मात्र तसे नाही. तो कितीही स्पीडवर ठेवला तरी तेवढीच वीज खातो.

हे निरीक्षण आहे की ऐकले आहे? इलेक्ट्रॉनिक रेग्युलेटर असेल तर अगदीच शक्यच नाही.

अवांतर: घरघंटी म्हणजे डोअरबेल हे प्रतिसादांवरून कळले. अन्यथा आमच्याइकडे घरघंटी असे घरातील पीठ दळण्याच्या यंत्राला म्हटले जाते.

http://navshakti.co.in/mumbai/56822/

Nile Fri, 07/11/2014 - 22:24

In reply to by ॲमी

कमी होईल. इंफिशीयंसी ऑफ रेफ्रिजरेशन इज डिरेक्टली प्रपोर्शनल टू द टेंमपरेचर डिफरंस. जेव्हा तुम्ही नॉब कमी वर ठेवता तेव्हा फ्रिज मधले टेंपरेचर कमी थंड होते, त्यामुळे ते टेंम्परेचर मेंटेन करण्याकरता कमी उर्जा लागते.

"वॉट-ओ मीटर" म्हणून किरकोळ किमतीचा मॉनीटर मिळतो, तो तुम्ही तुमच्या उपकरणाला लावून विजेचा वापर बघू शकता. http://www.amazon.com/P3-P4400-Electricity-Usage-Monitor/dp/B00009MDBU

गवि Fri, 07/11/2014 - 11:57

In reply to by अनुप ढेरे

ब्याटरीवर चालाणार एखादा म्युझिक प्लेअर कमी आवाजावर वापरला तर कमी पॉवर खाईल का? आणि त्यामुळे जास्तं वेळ चालेल का?

उलट स्पीड / व्हॉल्यूम इत्यादि कमी करण्यासाठी सर्किटमधे कृत्रिमरित्या रेझिस्टन्स वाढवून करंट कमी केला जातो. त्यामुळे तितकेच कंझप्शन व्हावे.

थत्तेचाचा आणि अन्य अभियंते अधिक सांगू शकतील.

अधिक विचाराअंती.. आताशा रेझिस्टन्सवाले रेग्युलेटर्स असतात का ? बहुधा इलेक्ट्रॉनिक टाईपचे असतात.

अनुप ढेरे Fri, 07/11/2014 - 12:00

In reply to by गवि

पंख्याच्या रेग्य्लेटर बाबतीत तुम्ही म्हणता ते बरोबर असेल. कारण रेग्युलेटर न लावलेला पंखा सगळ्यात जोरात स्पीड वर फिरतो.

घाटावरचे भट Fri, 07/11/2014 - 12:08

In reply to by गवि

जनरली व्हॉल्यूम कंट्रोल पावर अँपच्या इनपुट सिग्नलची लेव्हल कंट्रोल करतात. त्या स्टेजला सिग्नल मिलिव्होल्ट लेव्हलला (जनरली) असतो. तिथे कृत्रिमरीत्या रेसिस्टन्स वाढवून/कमी करून पावर मधे फारसा फरक पडत नाही. पावर अँपला तुम्ही काय लेव्हलचा इनपुट सिग्नल देताय त्यावर पावर कंझम्शन ठरते.

यसवायजी Sun, 09/11/2014 - 00:25

In reply to by गवि

उलट स्पीड / व्हॉल्यूम इत्यादि कमी करण्यासाठी सर्किटमधे कृत्रिमरित्या रेझिस्टन्स वाढवून करंट कमी केला जातो. त्यामुळे तितकेच कंझप्शन व्हावे.

"त्यामुळे तितकेच कंझप्शन व्हावे" हे कसे?
आपण जर पॉवर कंझप्शनबद्द्ल बोलत असाल तर, करंट कमी झाल्याने कंझप्शनपण कमी होईल.पॉवर् आणी करंट डायटेक्टली प्रोपोर्शनल असतात ना?

घाटावरचे भट Fri, 07/11/2014 - 12:08

In reply to by अनुप ढेरे

मुळात म्युझिक प्लेयर बॅटरीमधील जी उर्जा वापरतो त्यातली बरीचशी स्पीकर चालवण्यासाठी वापरली जाते. आपण आवाज कमी करतो म्हणजे आपण स्पीकर मधे जाणारा करंट (किंवा पावर) कमी करतो. म्युझिक प्लेयर मधला पावर अँप्लिफायर स्पीकरला जोडलेला असतो आणि तो आवाजाची पातळी स्पीकरमधून ऐकू येईल एवढ्या प्रमाणात वाढवतो. यासाठी बॅटरीतील उर्जा वापरली जाते. आपण जेव्हा आवाज कमी-जास्त करतो म्हणजे त्या पावर अँपला मिळणार्‍या सिग्नलची (इनपुट) पातळी कमी-जास्त होते. ज्यामुळे आपोआपच अँप्लिफायरच्या आऊटपुटची पातळी कमी-जास्त होते आणि अँप्लिफायर बॅटरीतील उर्जा कमी-जास्त प्रमाणात वापरतो. अर्थात कमी आवाज आणि बॅटरी किती वेळ चालेल याचा नक्की संबंध सांगणे अवघड आहे. कारण आजकालच्या म्युझिक प्लेयर्स मधे एलसीडी स्क्रीन, वायफाय वगैरे सारखा बराच मालमसाला असतो जो आणखीनच बॅटरी खातो.