सराईत

आताशा सुंदर लागलाय स्वर वगैरे..
सगळं कसं छान चालू आहे
हसतमुखानं यशाच्या छटा मोजत मस्त सरकतोय दिवस.
माझ्याकडे यांव आहे आणि मी त्याला त्यांव दिलं.
हिशोबाच्या कागदाचा मनात लागलाय ढीग.
थुंकी झेलणारे झेलतायत..
असुयेच्या आठ्या सुखावून जातायत .
मित्रांचाही आहेच की घोळका...
सगळं कसं छान चालू आहे .
मारायला शिकतोय की नकोसे विचार,
हव्याशा प्रलोभनांच्या बदल्यात.
खूप ताकद आहे अजून.. लांब धाव घ्यायची..
जवळच्या नात्याची मिठी फक्त सोडवायची
सुखाच्या व्याख्या बदलतायत,
नजर अजून रुंद होतेय.. घाव अजून खोल.
जल्लोष होतोय धुंद..
दरडावून विचारणारा आवाज क्षीण होत जातोय.
प्रशस्त होतायत रस्ते... तडजोडी अप्रशस्त..
बुद्धी तल्लख आणि जाणीवा सुस्त
नव्या लालसांचे अंकुर फुटताहेत.. वठलेल्या संवेदनांवर
एक क्षीण आवाज येतो कधीकधी.. पण..
सराईत हाताला आता कंपही नाही सुटत.. अचूक दाब देताना

- इतरत्र प्रकाशित

field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (2 votes)

प्रतिक्रिया

Smile वा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मारायला शिकतोय की नकोसे विचार,
हव्याशा प्रलोभनांच्या बदल्यात

शॉल्लेट.

----

खूप ताकद आहे अजून.. लांब धाव घ्यायची..
जवळच्या नात्याची मिठी फक्त सोडवायची

क्या बात है !!!

(बाकी ही डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्स ची स्टोरी असल्यासारखी वाटतेय.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कविता आवडली. एकाच वेळी व्यक्तिगत आणि राजकीय/सामाजिक पातळीवर लागू पडते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आवडली.
पण 'मारायला शिकतोय की नकोसे विचार' इथे थोडी अडखळले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0