प्र पीडी आणि "प्रपीडीत"

काय? जमलाय का? अहो "काय?" काय? आय-डी बघा आय-डी. अरे म्हणजे मी एव्हढा चतुराईने आय-डी घेतला तो कळलाच नाही अजून? परत एकदा बघा - 'प्रपीडीत' .....नाही कळलं? गेल्या आठवडाभरात आला नाही वाटतं ईकडे? आं? अहो नाही हो, ईकडे येउच नका नाही म्हणाले ते. येउन गर्दभपृच्छभागावर वगैरे नको एव्हढंच. असो. तर 'प्रपीडीत'. म्हणजे तुम्ही सगळे आता प्रपीडीत ! ........जाउद्या. नंदन समजावेल नंतर तुम्हाला. तरी नशीब, मी परत एकदा चेक केला आय-डी. आधी चुकून 'प्र पीडीत' टाईपलं होतं. वेळिच लक्षात आलं की प्र 'पीडी'त म्हणजे भलताच अर्थ आणि दुरूस्त केला लगेच.

तर मी 'प्रपीडीत' काय भानगड आहे सांगत होतो. हा एक 'न'वा नवा 'प्र'योग आहे. त्याचं काय झालं, आपली मराठी संस्थळं बहरायला, फुलायला लागली (हो, हो, कधी कधी मरायला सुद्धा लागली. झालं समाधान?) आणि लोकानी ईतक्या प्रकारचे प्रयोग केले की विचारू नका. एकाने कथा लिहून भलत्याच पाच-सहा जणानी पूरी करायची (ते सुद्धा गुप्तता राखून), "हमखास १०० प्रतिसाद मिळवायचे सुलभ मार्ग" सारखी लेखनं काय, अस्वलं/वडापाव्/जहाज वगैरे काहीच्या काही आय-ड्या, पुरोगामी/प्रतिगामी/तळपद्यांच्या विमानावरनं साठमारी, "म्य्त्री कर्न्र्का" सारखी - कोडच्या एका लायनीत अख्खं अ‍ॅप आहेसं वाटावं अशा प्रकारची - परीभाषा काय, विच्च्चारू नका!! ईतकी सगळी प्रयोगशीलकारीकता आजूबाजूला ओसंडून वहात असताना कितीहि नाही म्हंटलं तरी आपल्याला त्याची बाधा झाल्याशिवाय रहात नाहीच. आमच्या बाबतीत अगदी तस्संच झालं आणि आम्हीपण 'प्र'योगशील झालो. आणि अर्थातच नुसतेच 'प्रयोग'शील होउन मुळात प्रयोगशील होण्याच्या तत्वालाच अर्थ राहिला नसता म्हणून ''प्र'योग'शील झालो आणि हा लेख 'प्र'सवला प्रसवला.

म्हणजे बघा, मुळात आधी कुणा एका वीणाने (एकंदरीत लेखन बघता ही वीणा पीडीत नसून बाधित आहे असंच वाटतं आपल्याला) आपलं मन ईथे मोकळं केलं. त्या मोकळ्या झालेल्या मनातनं जी काही फुलं, मोरपीसं, गंध, तरंग, जलधारा वगैरे बरसल्या त्यावरनं समस्तास अचंबा जाहला! आयला काय दहा दिवस वाडीत गणपती असतो तसा काय बाईंकडे 'व्हॅलेंटाईन' बशिवलाय का काय?? सांद्र-मदिर सुरांच्या साथीत, मंद मंद प्रकाशात, समोर कोणी गौरांगना गुणगुणत असताना वगैरे सुद्धा यातलं आपल्याला काही म्हणजे काsssही सुचत नाही आणि ईथे वीणाबाई म्हणजे पु.लंचा नाथा कामत फकिराच्या हातच्या धुपासारखा उसासत असतो अगदी तश्श्शा उसासत होत्या! छ्या!! असो. असतं एकेकाच्या/एकेकीच्या नशीबी.

तिने दुसर्‍यांदा असं उसासल्यावर तिच्या त्या मनमोराला / राजाला / अमृतघडाधार्‍याला (येस्स, त्या 'ईश्श'वाल्या वाक्याचाच संदर्भ आहे ईथे. तुम्हीहि दोन-दोनदा वाचलंत ना ते वाक्य लब्बाडानो? ) / सोन्यालाही आपलं मन मोकळं करायची लहर आली. आणि काय सांगू तुम्हाला? अहो लहर कसली, उबळ आली उबळ. छ्या! अहो हा प्र म्हणजे भलतंच 'प्र'करण निघालं हो. " केवढा brave आहे आपण तुला कळाला अस्ता "?? थोडक्यात म्हणजे लग्नातल्या पंगतीत आकंठ जेउन जरा पडायला म्हणून जवळच्या मित्राकडे जाताना वाटेत पानपट्टी घ्यायला गादिवर थांबावं आणि तेव्हढ्यात शेजारून कोणीतरी स्टारबक्सच्या तोंडात मारेल अशा परिभाषेत "तीनसोबीस, कच्चा पक्का, जादा डाल" ऑर्डर देताना त्याच्या तोंडच्या देशी दारूच्या भपक्याने नुकत्याच रिचवलेल्या जिलब्या उन्मळून याव्यात तसं झालं. पण काय करता? वर वर तरी का होईना, वाचलं!

आता ईथे आमची एंट्री. मुळात वीणा कोण माहीत नाही, तिच्या प्राणसख्याबद्दल काहिहि माहिती नाही (ते काय म्हणतोस रे तू गवि नेहेमी? हां - 'शष्प' माहिती नाही), प्र काळा का गोरा, का प्र हे वीणाचंच दुभंगलेलं व्यक्तिमत्व आहे कल्पना नाही. पण 'प्रपीडीत' हा आय-डी घेउन जणू काही आपणच या खेळाचे सूत्रधार आहोत असं भासवायचा हा माझा 'प्र'यत्न! तर मंडळी, पुढच्या भागात आपण मेसमधे खिमा चापत बसलेल्या प्र ला वीणा काय उत्तर देते बघुया. 'प्र'ची उबळ वाचूनही तिला त्या गोsssड झिणझिण्या येत राहातील की उर्ध्व लागेल? मनमोराच्या अलवार आठवणीने व्याकूळ होताना 'गल्ली चुकल्याची' मंदशी शिरशिरी तिच्या हृदयात उमटेल का?? मुळात आता वीणाची वीणा झंकारायच्या परीस्थितीत आहे का???? पुढच्या काही तासात, दिवसात या सार्‍या प्रश्नांची उत्तरं तुमच्यासमोर सादर करतील.....'प्र पीडी आणि "प्रपीडीत"'
Wink Wink Wink

field_vote: 
4.5
Your rating: None Average: 4.5 (6 votes)

प्रतिक्रिया

ळोळ्स! ही सीरीज ज्या बुद्धीतून प्रसवते आहे तिला साष्टांग नमस्कार!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

हा भाग फक्कड जमलाय!!!
तीसरं भावूक पात्र आणा ब्वॉ त्या वीणेच्या तरलतेस समजून घेणारं. नाहीतर एकदम वीणेला लेस्बिअनच करुन टाका हाकानाका. Wink
कायतरी कल्ला कलाटणी येऊं द्या!!!
___
लेखकु अस्वल वाटतात मला तर Smile विनोदात त्यांचा हातखंडा हय. अन टाइम बी बराबर याच येळी ते हितं असत्यात Wink
पण गवि सुद्धा असू शकतात राव :O
नाही नाही गवि नसतील कारण दोघही शेम टायमाला लिस्ट मधी आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

जुणे सदस्य आहेत हो कोणीतरी.. तुमचीच आयडीया वापरलीये (नामकरणाची Wink
असो. आम्ही परपिडन करू शकतो. प्रपिडन वगैरे अपने बस की बात नही..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वॉव! मराठी संस्थळांसाठी हा मोठा नवा 'प्र'संग आहे! कल्पनेसाठी _/\_ स्वीकारा
या प्र-संगातून कशाचा जन्म होतो (की काय 'प्र'कट होते) ते पहायचे.

तोवर हे एकेक अफलातून प्र-पंच आम्हाला तुफान हसवताहेत. यामागचे सुत्रधार कोणी का असेना; आमचा मतलब या भन्नाट लेखनाशी! त्याची अधिक चिकित्सा करायला मला प्र-ताप थोडाच आलाय

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

ROFL
च्यामारी, ऐकत नाई यंदाचापण व्ह्यालंटाईण्डे ऐसीवरचा. गेल्या साली मालकीणबैंच्या 'लौ यू'चा हंगामा होता. यंदा वीणाबाई आणि त्यांचा अमृतघडाधारी शॉल्लेट आयटम. ऐसीचा अधिकृत सण म्हणून व्ह्यालंटाईण्डे घोषित करा तिच्यामारी. होऊन जाऊ द्या..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

आयला काय दहा दिवस वाडीत गणपती असतो तसा काय बाईंकडे 'व्हॅलेंटाईन' बशिवलाय का काय?

ROFL ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काळ तर मोठा दुर्धर आला. एकीकडे निबंधस्पर्धेची 'प्रं'प्रा सुरू करावी तर दुसरीकडे प्रेमाचा महापूर येतोय. असो.

प्रपीडीत हा तर जुनाच आयडी दिसतोय. त्यांनाही व्हँलेंटाईन डेच्या रोमँटिक शुभेच्छा देऊन मोकळं व्हावं कसं. म्हणजे आम्ही आमच्या घरी बसवलेल्या व्हँलेंटाईनची प्राणपतिष्ठा करायला मोकळे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

..मस्त जमलंय हो राघा..आवडलं..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आयला, गविंना आतल्या गोटातली बातमी दिसते! गवि, वीणाबाई कोण आहेत हो?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

अहो पण राघा अन हा आय डी यकाच वेळी लॉगड इन होते.

ते जमू शकतं म्हणा. म्हणजे लॉग इन करुन , लॉग आऊट न करता थ्रेड बंद केला तर घोस्ट सेशन लोंबकळत रहातो थोडा वेळ अन त्याच कालावधीत खर्‍या आय डी ने लॉग इन करता येते. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

..जरा प्रायमरी फोरेन्सिक जांच करायची हो.
..मिसळपावसाहेब..त्यांच्या लेखनातल्या सिग्नेचर्स...

..अल्टिमेटली मिसळपाव=राघा असा लॅब रिपोर्ट 'प्र'द्युम्न एसीपीसायबांच्या मागणीवरुन देत आहे.
-ग.वि. साळुंके.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ग वि साळुंके ?? हे साळुंके कोण ??

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सी आय डी नामक जेम्स बाँड, शेर्लॉक होम्स, इ. तमाम तुच्छ व म्लेच्छ डिटेक्टिव्हना अचंबित होण्यास भाग पाडेलसा प्रोग्र्याम आहे त्यातील हे डागदराचे पात्र आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ओके मिसळपाव होय! लेख वाचून मलापण राघाच वाटले.
मस्त जमलाय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

राघा नाहीत ते अस्वलजी आहेत. तुम्ही हे नोट केलं का बडबडे अस्वलजी काही कमेंट देत नाहीत. आजकाल इथे कमी वावरतात, त्यांच्या वेळेवर प्रपीडीत येतात Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

आता प्रेमालाप वाचावा लागणार तर.

बाकी गवि, अभ्यास फारच कमी पडतोय हां!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

..तुम्हाला इतकी खात्री ?

..बरं.. समीकरणात राघांऐवजी Nile..

Biggrin

..मिपासाहेबांनी मस्त मजा आणली..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दहा दिवस वाडीत गणपती असतो तसा काय बाईंकडे 'व्हॅलेंटाईन' बशिवलाय का काय??

ROFL ROFL ROFL ROFL

( कोण ब्रे हे )प्र पीडी आणि "प्रपीडीत" (?)
_/\__/\__/\__/\__/\__/\_
फार मजेदार प्रकरण आहे . एकंदरीत 'ऐसी' चा व्हलेंटाईन फुल फार्मात आहे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्या मोकळ्या झालेल्या मनातनं जी काही फुलं, मोरपीसं, गंध, तरंग, जलधारा वगैरे बरसल्या त्यावरनं समस्तास अचंबा जाहला

हे म्हंजे पाडगावकरांच्या कवितेचे थोडक्यात रसग्रहण केल्यासारखे वाटले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0