प्रेमाचे हाय कू (?)
कत्तल झाली
प्रेमाच्या दिनी.
बंदिवान भृंग*
नाहक प्राण गेला.
(
त्याचा बटवा
आता उधार मागणार.
तो श्लोक
रात्रिर्गमिष्यति भविष्यति सुप्रभातम्
भास्वानुदेष्यति हसिष्यति पङ्कजश्री:|
इत्थं विचिन्तयति कोशगते द्विरेफे
हा हन्त हन्त नलिनीं१ गज उज्जहार ||
१वेलांटी र्हस्व की दीर्घ याबद्दल जऽरा घोळ आहे डोक्यात.
बाकी याचा अर्थ असा की एक भुंगा कमळात गेला अन राच्च्याला न्हेमीपरमाने कमळ बंद झाले. मग उद्या दिवस होईल अन कमळ हसेल अन आपण मुक्त होऊ अशा विचारात असतानाच एका हत्तीने ते कमळ उपटून काढले.
मुळीच गरजेचं नाही.
मुळीच गरजेचं नाही.
शिक्षितांच्याही वेगळ्या अंधश्रद्धा असतात.आता लिंका शोधत नाही पण मेटल फर्निचर वापरल्याने त्यामधून सौम्य प्रमाणात विद्युत प्रवाह वैगेरे जात असतो आणि शरिरावर त्याचा परिणाम होतो वैगेरे असा काही तरी लेख वाचनात आला होता. अलीकडे वास्तुशास्त्र सांगतं म्हणून सेफ्टी डोअरही धातूचं न करता लाकडी करतात.
असा काही तरी लेख वाचनात आला
असा काही तरी लेख वाचनात आला होता
१. शरीरात अनेक सौम्य विद्युतप्रवाह वाहत असतात. शरीराला त्याचे वावडे नसते.
२. धातूंतून निष्कारण विद्यूत प्रवाह वाहत नाहीत.
आपण ज्या संशोधनाबद्दल बोलत आहात त्याचा सारांश, लिंक अवश्य द्या. कारण या हिशेबाने सगळा धातू संपूर्ण लाकडांनी रिप्लेस करणे म्हणजे प्रूथ्वीचा सर्वनाश आहे.
बारा एक वर्षाचा होतो, १९७२-७३
बारा एक वर्षाचा होतो, १९७२-७३ मधली घटना, कुणीतरी श्रावणाचा महिन्यात शंकराच्या पिंडीवर दूध घालायला वडिलांना सांगितले होते. अचानक त्यांना ऑफिसच्या कामानिमित एका आठवड्यासाठी बाहेर जावे लागले. खंड पडू नये म्हणून आईने ते काम मला सांगितले. रोज सकाळी हलवायाच्या दुकानातून १० पैश्याचे दूध (जवळ जवळ १०० ग्रम) एका गिलासात घेऊन जवळच्या एका मंदिरात शंकराच्या पिंडीवर दुधाची धार सोडायची, हेच काम. पहिल्याच दिवशी मंदिराच्या बाहेर एक भिकारी दिसला, का कुणास ठाऊक मी ते दूध त्या भिकार्यास दिले. आणि नुसते पाणी शंकराच्या पिंडीवर सोडले. आठवडाभर असेच केले. काही दिवसांनी वडिलांना खरे काय ते कळले (बहुतेक मंदिराच्या पुजारी कडून), पण त्यांनी या बाबतीत मला कधीच जाब विचारला नाही.
"अनावश्यक"
ही श्रेणी समजावी. निरर्थक प्रतिसाद न्हवे. चर्चा हवी असे तर मुद्दे धरुन करावी ही विनंती. काका तेंव्हा लहान होते व काही चुकीची कृती त्यांच्या कडून घडने हा एक समजुन घेण्याजोगा मुद्दा होता (त्यांच्या पिताश्रींनी तेच केले असावे असे मानायला जागा आहे) पण त्याला आपण हात जोडले बघुन प्रचंड गोंधळ झालाय.
कमलिनीच्या प्रेमातबंदिवान
वा! सुंदर!!
नैनोंसे जो नैना टकराये तो कौन जीता और कौन हारा?
नैनोंसे जो नैना टकराये तो दिल हारा वोह सब जीता|
.
भुंगा जि़ंकला हो :)
____
तो श्लोक आहे ना की भुंगा बंदीवान झाला तरी कमळ पोखरत नाही. मस्त आहे .