मूचो मांस, ग्रासियास!

फोटोंसकट वाचण्यासाठी ब्लॉगला भेट द्या.

शनि-रवी दिवसभर बाहेर भटकायचं, पतंग उडवायची, समुद्रात डुंबायचं, वाळूचे किल्ले करायचे, हेच पोर्तोरीकन जनसामान्याचे दिनमान आम्हालाही आता अंगवळणी पडले होते. तसे हे पोर्तोरीकन लोक तब्ब्येतीत जगतात म्हणायला हरकत नाही. नात्यागोत्यातली सगळी मंडळी एकत्र येऊन, सकाळी उन्हं तापू लागायच्या आत, मोठमोठ्या गाड्या भरून, बार्बेक्यूचे सामान घेऊन, समुद्राकाठी मस्तशी जागा पकडणार. तिथे हॅमॉक, छत्र्या लावून दुपारची पण सोय करून टाकणार. बर्फाच्या थंडगार केगमधून बियर-दारू तर इतकी वाहणार, की साक्षात समुद्रदेवतेला तहान लागावी! चिप्स आणि सोडा-कोकचा शोध पोर्तोरीकनांनी लावलाय का काय, इतके सॉफ्टड्रिंकचे कॅन आणि पिवळी पुडकी जागोजागी दिसत असतात.

हळूहळू उन्हे उतरू लागली, की वायूलहरींबरोबर बार्बेक्यूतले भाजके/जळके वास येऊ लागत, की मग समजावे, "भट्टी जमलिये" जनतेची. भट्टीत बहुतांशी पोर्क, चिकन आणि स्टेकच शिजत असायचे, त्यामुळे मला तिथे जवळजवळ मळमळायला लागायच्या आत आम्ही पळ काढायचो. हे जमीनीवरचंच नव्हे, तर समुद्रातलंही जेवण नेहमीच मुबलक मिळतं, तिथे धान्य, फळभाज्या उगवण्याची तसदी कोण घेतो? ९९% पोर्तोरीकन मांसाहारी आहेत म्हणण्यात काही अतिशयोक्ती तर नाहीच, शिवाय, पोर्तोरीकन लोक ९९% मांसाहारी आहेत, असं म्हणण्यातही नाही! (म्हणजे मांसा व्यतिरिक्त कुठल्याही अन्नप्रकाराचा त्यांच्या आहारात फारसा वाटा नाही.) झालंच तर उकडलेल्या बीन्स (राजमा/लाल चवळी किंवा तत्सम), कच्ची केळी नि आवोकाडो, इतपतच भाजीच्या सदरात मोडणाऱ्या गोष्टींशी त्यांचा संबंध येत असावा.

पुण्यात फिरायला आलेल्यांना जसे आपण आवर्जून सिंहगडावर झुणका-भाकरी खा बरंका? किंवा, महाराष्ट्रात येऊन पुरणपोळी खाल्ली नाही, तर काय केलं? असं आपण म्हणू, तसं आमच्या ओळखीपाळखीच्या PRकरांनी आम्हाला, "गुवाबाते" ला नक्की जा, म्हणून बजावलं. भटकंतीविषयक पुस्तकांतही, स्वत आणि मस्त म्हणून गुवाबातेचा पहिला नंबर लागतोच लागतो. मग एका रविवारी पावसाळी सह्याद्रीत शोभतील अशा हिरव्याकंच घाटांतून गुवाबाते नावाची जागा शोधत निघालो. रस्त्याच्या कडेकडेने आंब्याच्या झाडांचा वास साथ करीत होता, आणि तिथेच धूळ खात पडलेल्या आंब्यांचा अचंबाही वाटत होता. त्यातले दोन-चार आंबे आम्ही घरी आणलेही (फुकटची वस्तू सोडेल तो कोक्या कसला?) पण कापल्यावर केवढ्या त्या शीरा निघाल्या, आणि चवही खास नाही, म्हणूनच त्यांना भाव नसावा हे कळले.

"थोडं तरी लेचॉन खाऊन बघणारेस का तू?" अशी नवऱ्याने माझी परीक्षा घेतली, त्यात मी शंभर मार्कांनी नापास होऊन दाखवलं, की "मला व्हेज काहीही चालतं, पिवळाधमक भात आणि लाल बीन्सची उसळही मला पुरेल. तुम्हाला एन्जॉय करता आलं ना, मग झालं." तरीही, काही घरांमधून बरक्या फणसाची झाडं दिसली, म्हणून असेल, किंवा पावसाळी घाटातल्या ओल्या हवेची तल्लफ असेल, माझ्याही मनात "चहा, भजी, डोंगरची मैना" असल्या विचारांची पालवी फुटू लागली होती.

तिथे पोचल्यावर मात्र निखाऱ्यांवर "दम" देऊन शिजवलेला अख्खा डुक्कर बघितला, आणि ते "मूचो मांस" पाहून शिव-शिव करायची पाळी आली. "mucho mas" म्हणजे स्पॅनिश मधे, "अजून खूप", पण आम्हाला त्याचा वेगळाच अर्थ अनुभवायला मिळत होता. जिथे तिथे वेगवेगळ्या स्वरूपात मांसच पुढे येत होतं. आठवड्यातून चार वेळा चिकन हादडणारं माझं लेकरूही ते डुक्कर पाहून बावरलं Smile तोवर बहुतेक त्याला पिवळ्या कोंबडीच्या पिल्लांची चित्रं, आणि आपण खातो, ते "चिकन", किंवा गोंडस गुलाबी पिग, आणि खातो ते पोर्क, ह्यातला संबंध लक्षात आला नव्हता. मूचो मास? नो ग्रासियास! असंच म्हणावंसं वाटू लागलं, किंबहुना मूचो मास, इज ग्रास! (इति. "न"वी बाजू) आणि इतकं असूनही कुठलंही मांस हे "सुग्रास" लागत नव्हतं, निदान मला तरी! Smile Smile

मी खूपशा मनोनिग्रहाने चिकन खाऊन पाहिलं, ते भट्टीवर शिजवल्यामुळे खरंच बरंच बरं लागत होतं. पण खाण्यापेक्षा, तिथल्या लोकसंगीताने एकदम उत्साह आला. स्टेजवर चारपाच बाप्ये आणि एक सुदृढ महिला मिळून जे काही गात होती, त्याचा ठेका नाचायलाच लावेलसा होता. शनि-रवि हा गुवाबातेचा रस्ता माणसांनी फुलून जातो. घरोघरी लेचॉनची मेजवानी असते. आणि मुख्य म्हणजे, इथले नावाजलेले "lechon joints" ही इतके घरगुती असतात, की आज घरी डुक्कर भाजलाच आहे, तर दोन-दोन डॉलरला येणाऱ्या-जाणाऱ्यालाही देऊ, तेवढीच रात्रीची दारू सुटेल! Smile तिथल्या "वेटर" किंवा स्वयंपाक्यांचं वागणंही अगदी लाघवी असतं. ती साधी माणसं" बघूनच खरं माझं पोट आणि मन भरलं.

तीच मजा Pinones मधे पण आली. तिथे चौपाटी सारख्या टपऱ्या टपऱ्यातून अगदी चार टिकल्यांना मस्त मस्त स्नॅक्स मिळतात. Bacalaito, Alcapuria, असो, किंवा Empanada कुठल्याही प्रकारचं मांस, साधारणपणे मक्याच्या पीठात, किंवा मैद्यात घोळून तळायचं, ही एकच पाककृती! मी चक्क फिशची पुरी असावी, तसे बाकालाइतो खाल्ले, आणि वर गारगार नारळपाणी! चिकनपेक्षा फिश खायला सोपं, असा शोधही मला तेव्हाच लागला. आणि शिवाय, शेळी जाते जीवानिशी, असं असतांना, जर शेळीच (चिकनच) खायचं, तर निदान तुपात तळून साखरेत घोळून तरी खावं, म्हणजे थोडा तरी तिच्या (गेलेल्या) जीवावर न्याय केल्यासारखं होईल! असं मी मनाशी ठरवलं.

अशी हळूहळू "मूचो मांस" ची सवय झाली, न्यू जर्सीची धावपळ, येणारे-जाणारे, पार्ट्या नि मुलांच्या ॲक्टिव्हिटीजचं चक्रीवादळ मागे टाकून आम्ही पण दुपारी "निवांSSSत" झोपा काढायला लागलो, बीचवर तासंतास घालवू लागलो. ह्या भटकंतीत, जिथे जे मिळेल, त्याने पोटपूजा करायची, हे ही आलंच. तर एक दिवस असेच दमून-भागून आम्ही एका चांगल्याशा रेस्टोरंटात गेलो, कि तिथे निदान (मला) पास्ता/नूडल्स तरी मिळतील. मेन्यूत एका ठिकाणी "pollo"(चिकन) वाचलं, तरीही, पास्ता मी खाईन, पोराला चिकन होईल, म्हणून वेटरला विचारलं की हा काय प्रकार आहे, तर तो म्हणाला, "तळलेल्या चिकनच्या आत पोर्क आणि स्टेक भरून कायतरी कायतरी कायतरी.........."
पुढचं मी ऐकलं नाही..............................................................................

field_vote: 
3.5
Your rating: None Average: 3.5 (2 votes)

प्रतिक्रिया

व्वा!
आपली मर्यादा लक्षात घेऊन (व पदार्थाला/वासाला नाके मुरडूनही) लेख चविष्ट झालाय. Smile
शैलीही मस्त!

अजून येऊद्या

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

छान लिहीलय. खुप छान शैली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Every time, every time it rains, it's gonna rain pennies from heaven
Don't you know every cloud contains lots of pennies from heaven
You'll find your fortune's fallin', baby, all over the town
Be sure, be sure that your umbrella is upside down

पोर्तो रिकोची अशी ओळखही आवडली. मला माहीत होतं ते अरेसिबोमुळे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

आरेसीबो प्र चं ड आवडलं, ते ही वैज्ञानिक नव्हे, तर नैसर्गिक कारणांसाठी. रस्ताभर मला नारळीकरांच्या प्रेषित मधे जगतोय असं वाटत होतं. त्यावरही अजून लिहायचे आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आवडला.
आण्खी लिहा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख आवडला पण फार छोटा वाटला. कोणातरी मांसदर्द्याने तिथे जाऊन तपशीलवार लिहीले पाहिजे असे वाटून गेले.
मांस सोडून इतर बाबींवर लिहा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ननि: छोटा? मला वाटले लोक दोन परिच्छेद वाचूनच पेंगतील. मला आपले सारखे वाटत असते की लिहून आपण वाचणार्‍यांवर अत्याचार करतोय, तर निदान लवकर तरी संपवावे.
पण तुमच्या मुद्द्याशी अगदी सहमत आहे. मांसदर्दींनी (विशेषत: भारतीय दर्दींनी) खरोखर अशी परीक्षणे जास्त लिहायला हवीत. माझा नवरा आवडीने मांसाहारी असूनही, त्यालाही तिथल्या मांसाहाराचा वीट आला, कारण वर सांगितल्याप्रमाणे अतिशय एकसुरी पाककृती असतात. शिवाय, टूरिस्ट लोक एकदाच, तेही मजा करायलाच येतात, त्यामुळे पुनःपुन्हा चांगले पदार्थ देऊन ग्राहकांशी नातं बनवण्याची बर्‍याच रेस्टोरंटांना गरजच नसते. काहीही केलं तरी ती चालतातच.
पोर्तोरीकोच्या एकूण खाद्यसंस्कृतीवर मी अजून सविस्तर लिहीन म्हणते, पण हा एक चांगला लेख त्यावर आला होता:
http://nyti.ms/17ms6gg

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गैरसमज बाळगणे टाळा, नी अधिक मुचो लिहा!
हे अज्जिबात जास्त नाहिये. थोडी अधिक लांबी चालेलच!

आता बाकी स्तुती पुढिल लेखावर हा! Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

'मूचो मांस' म्हणजे 'भरपूर मांस' हा अ(न)र्थबोध रोचक (आणि आपल्या जागी ठीकच) आहे. त्या तेजोमहालयावर आपलीही विटकर घालावी म्हणतो.

त्या 'मूचो मांस'पुढील 'ग्रासियास'पासून 'इज़ ग्रास' असा अ(न)र्थबोध घेतल्यास अनेक रोचक शक्यता उद्भवतात.

- 'ऑल फ्लेश इज़ ग्रास' या उक्तीकरिता '(नॉट ऑल, बट) मच फ्लेश इज़ ग्रास' असे ते उत्तम प्रत्युत्तर होऊ शकते.
- '(टू) मच फ्लेश इज़ ग्रास', यातून 'अति तेथे माती' आणि 'घर की मुर्गी दाल (घास?) बराबर' असे दोन अ(न)र्थबोध यातून एकसमयावच्छेदेकरून होऊ शकतात.

बाकी चालू द्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

न(वी) बाजू, तुमची सूचना सूप्परलाईक आवडलिये. लेखात तुमच्या नावासकट उद्धृत करते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0