रामाची राज्यसभा आणि कुटुंब

एका सश्रद्ध मित्राने खालील चित्र मला पाठवून त्यात दाखविलेल्या व्यक्ति कोणकोण आहेत असा प्रश्न गंभीरपणे विचारलेला आहे. चित्र पुढे दाखवीत आहे.

काही तितकेच सश्रद्ध मित्र चित्राची गंभीर चर्चा करतील. काही अश्रद्ध शंकेखोर चिकित्सक त्याची भरपूर टिंगलटवाळी करू शकतील. दोघांनाहि येथे अमर्याद मालमसाला आहे.

ऐसीच्या सदस्यांनीहि असे प्रयत्न करून पहावेत. होऊन जाऊ द्या फ्री फॉर ऑल...

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

आहाहा वामाड्कारुढ सीता विथ लव-कुश! क्या बात क्या बात!
हट्टाकट्टा अन दाढी मिशी वाला हनुमान पाहून धन्य जाहले.
____
हा आमचा रामदरबार -


_______
अन हा-
मिशीवाला राम

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Every time, every time it rains, it's gonna rain pennies from heaven
Don't you know every cloud contains lots of pennies from heaven
You'll find your fortune's fallin', baby, all over the town
Be sure, be sure that your umbrella is upside down

मी जर पहिल्या चित्रातला राम असतो तर हातातल्या बाणाने सभोवतालच्या लोकांना टोचलं असतं!
अरे किती खेटून असताय, काही जरा पर्सनल स्पेस द्याल की नाही?

आणि दुसर्‍या चित्रातल्या सीतेने घातलीय तशी मांडी घालून बसून दाखवल्यास शुचि यांना माझ्याकडून एक डिनर फ्री!!!!
Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दुसर्‍या चित्रातल्या सीतेने घातलीय तशी मांडी घालून बसून दाखवल्यास शुचि यांना माझ्याकडून एक डिनर फ्री!!!!

डिनरला व्हील चेअरवरुन यावं लागेल Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Every time, every time it rains, it's gonna rain pennies from heaven
Don't you know every cloud contains lots of pennies from heaven
You'll find your fortune's fallin', baby, all over the town
Be sure, be sure that your umbrella is upside down

टे गोमुखासन हाय. तुमी तशी मांडी नकिच घालु शकाल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!

चित्र दिसत नाहीये. घरी जाऊन पाहतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

राम, त्याची सख्खी भावंडं, चुलत भावंडं, त्याचे शिक्षक, मित्र, दास, दासी, पुरोहित वर्ग,बायका, मुलं, भालदार, चोपदार, चवर्‍या ढाळणारे. वगैरे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"नॉट टू द स्केल" लिहायचं राहीलं असावं काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चित्राकसे काल आणि मानवी शरीरांच्या आकारांचे परस्परसंबंध अशा बाबींकडे दुर्लक्ष करून पाहिले तर चित्राबद्दलचे माझे तर्क असे आहेत:

केंद्रस्थानी अर्थातच राम-सीता-लव-कुश असे ’हम दो हमारे दो’ कुटुंब आहे. हे चौघे ग्रुप फोटोसाठी कधीहि एकत्र आले नव्हते हे विसरून जावे. सीतेचा आकार पाहता ती लव-कुशांची आई नसून बहीण वाटावी. निळे-सावळे आहेत ते राम-लक्ष्मण. येथे तुलसीदासांच्या वीणा सहस्रबुद्धे ह्यांनी गायलेल्या ’कहां के पथिक कहां किनु है गवनवा’ ह्या गीताची आठवण येते. त्यात राम-सीता-लक्ष्मण वनवासाकडे जात असता वाटेत गावांतील लोक तुम्ही कोण. कुठे चाललात अशा चौकशा करतात. एक ग्रामवधू सीतेला विचारते, ’कौन सो प्रीतम, कौन देवरवा’. त्यावर ’सिया मुसकाई, बोलत मधुबानी, सावरे प्रीतम, गोरे देवरवा’ असे उत्तर देते. म्हणजे लक्ष्मण गोरा होता असे दिसते. येथे मात्र तोहि सावळा आहे.

लक्ष्मणापुढे उर्मिला दिसते. तिच्या शेजारी शत्रुघ्न आणि रामाच्या उजव्या हाताला धनुष्य घेतलेला भरत असावा. त्यांच्या बायका मांडवी आणि श्रुतकीर्ति ह्यांना मात्र नवर्‍यांशेजारी जागा दिसत नाही, लक्ष्मण-उर्मिला-शत्रुघ्नामागे तीन स्त्रिया आहेत त्यातील दोघी ह्या असाव्यात.

भरतापुढे आसनावर बसलेला आणि दाढी असलेला कोण असावा? त्याच्या हातात काहीतरी कागद आहे. त्यावरून तो रामायणाचा लेखक वाल्मीकि मानावा तर तो ऋषीसारखा अजिबात दिसत नाही. रामाचा प्रधानमन्त्री सुमंत तर तो नसेल? त्याच्या उजव्या हाताला बिभीषण आणि त्याची पत्नी असावेत. त्यांच्या शेजारी तांबडया शरीराचा आहे तो कोण असावा? कोणी ऋषि दिसतो पण रंगावरून शंबूक असावा का? त्याच्या शेजारी केस बांधलेला म्हणजे रामाला गंगापार नेणारा निषाद असेल काय?

अगदी पुढे मारुतिराय आहेत हे उघड आहे. मारुतीमागे सुग्रीव आणि पत्नी तारा असावेत.

अन्य ऋषिमुनि, स्त्रिया वगैरेंपैकी मला कोणीच ओळखता येत नाहीत. गर्दी भरण्यासाठीचे एक्स्ट्रा असतील काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>सिया मुसकाई, बोलत मधुबानी, सावरे प्रीतम, गोरे देवरवा’ असे उत्तर देते. म्हणजे लक्ष्मण गोरा होता असे दिसते. येथे मात्र तोहि सावळा आहे.

लक्ष्मण सावळाच असेल पण दुसर्‍याबाजूचे गवत नेहमी अधिक हिरवे भासते तद्वत सीतेला लक्ष्मण गोरा वाटू लागला असेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.


हे चित्र आठवलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आणि या चित्रावरून आम्हांस...

...हे चित्र आठवले. (चित्र जालावरून साभार.)

नीडलेस टू से, हे दुसरे चित्र एकाच वेळी अधिक रियालिष्टिक आणि त्याचबरोबर अधिक "रसाळ"ही वाटते. (निदान आम्हांस तरी.)

इत्यलम्|

---------------------------------------------------------------------

अन्यथा, आमचे ड्रॉइंग कोठून इतके चांगले असायला?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0