एक उनाड उन्हाळी दिवस - - सीपीचा सेन्ट्रल पार्क आणि अमलतास

मे आणि जून ह्या दोन महिन्यात सूर्य क्रोधाने लाल होऊन आग ओकीत असतो. या आगीत जिथे धरणी माताच होरपळून जाते, तिथे पृथ्वीवरील प्राण्याची काय बिसात. दिल्लीत रस्त्यावर फिरणार्या आवारा गायी व कुत्रे दिवसभर सूर्याच्या क्रोधापासून स्वत:ला वाचविण्यासाठी सावली आणि पाण्याच्या शोधात भटकत राहतात. दुपारच्या वेळी तर झाडावर पक्षी ही झाडाच्या कोटरात दुबकून राहतात.

दुपारचे तीन वाजले होते, सीपीच्या मेट्रो स्टेशनहून बाहेर पडलो. सीपीच्या सेन्ट्रल पार्कमध्ये भरपूर हिरवळ आहे. झाडे- झुडपे ही पुष्कळ आहेत. पार्कच्या जवळून जाताना नेहमीच झाडावर असलेल्या पक्ष्यांची किलबिल ऐकू येथे. तर दुसरीकडे त्यांच्या खाली भारी संख्येने बसलेल्या प्रेमी जोड्यांची गुटरगूं ही ऐकू येते. पण आज पार्कमध्ये स्मशान शांतता पसरलेली होती. सिनेमातला खलनायक जास्तीसजास्त तीन एक तास नायक- नायिकेला एका दुसर्यापासून दूर ठेवतो. पण क्रोधाने भडकलेला सूर्यदेव तर तब्बल दोन महिन्यांसाठी प्रेमी-प्रेमिकांना विरहव्यथा भोगण्यास विवश करतो. मनात विचार आला, दोन महिन्याचा विरह आजच्या इनस्टेन्ट जमान्यातल्या प्रेमी-प्रेमिकांवर भारीच पडणार. या अवधीत कदाचित् कित्येकांना आपल्या प्रियकराचा विसरही ही पडत असेल. अचानक डोक्यावर एक पिवळे धम्म फुल पडले. वर बघितले, ऐन उन्हाळ्यात ही अमलतास बहरलेले होते. असे पिवळ्या धम्म फुलांनी नटलेले अमलतास पाहून 'फिर छिड़ी रात बात फूलों की रात है या बरात फूलों की' हे गाणे आठवले. पण इथे तर 'जेठ कि दुपहरिया में बात फूलों की, प्यार की बात, बात फूलों की'. मी सहजच अमलतासला विचारले, सूर्याच्या तेजाने समस्त धरती होरपळून गेली आहे. वेली आणि झाडे सुकून कांतिहीन झालेली आहे, आणि तू मात्र प्रफुल्लित आणि आनंदी दिसत आहे. या प्रचंड उन्हाळ्यात ही वसंताचा आनंद उधळीत आहे. क्या बात है. अमलतास खळखळून हसला. फुलांचा वर्षाव माझ्या अंगावर झाला, तो म्हणाला वासंतिक प्रेमाला अजूनही मी आपल्या हृदयात जपून ठेवले आहे. विरह माझ्या जवळ फटकत ही नाही. पहा कोकिळा आज ही माझ्या फांदीवर बसून प्रेमाचे गाणे म्हणते आहे.

खरंच, ज्याचे हृदय प्रेमानी भरलेले आहे. तो विरहात ही प्रफुल्लित आणि आनंदी राहतो. मनात विचार आला, या सेन्ट्रल पार्कमध्ये प्रेमाच्या हितगुज करण्यार्या प्रेमी जोडप्यांनी दोन महिने आपले प्रेम जपून ठेवले तर वर्षा ऋतूत त्यांच्या प्रेमाला पुन्हा नवे अंकुर फुटतील. अमलतास प्रमाणे त्यांचे प्रेम ही बहरेल. आपल्या मनात चाललेल्या या विचारांचे माझे मलाच हसू आले. सहज आकाशाकडे बघितले, क्रोधाने आग ओकणारा सूर्यदेव आता निस्तेज आणि तेजहीन दिसत होता. सूर्य तोच होता, तीच प्रचंड विरहाची आग, पण पाहण्याचा दृष्टीकोन बदलला किती फरक पडतो.

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

शेवटचे वाक्य आवडले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ROFL ROFL ROFL
विवेक काका, काल मौसम खुशनुमा झालेला. त्याचा परिणाम काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

हाहाहा पण वसंतऋतुमध्ये वृत्ती उमलतात अन एक उत्फुल्ल (चीअरफुल) उर्जा वातावरणात असल्याने चित्तवृत्ती खुलतात. अर्थात हे प्रत्येकाला माहीतच असेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चक्क ३ वाजेच्या सुमारास ४३ अंश तापमानात त्या भागात फिरलो होतो. (खुशनुमा सारखे तिथे काहीच दिसले नाही, म्हणून हे विचार मनात आले) असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बहाव्याचा पिवळा रंग उन्हाच्या रखरखाटात भर घालत नाही, उलट उन्हाला एक कोवळीक देतो. बहाव्याकडे वैशाखाच्या ऐन दुपारी पाहिले तरी डोळे थंडावतात. हा पिवळा फुलोरा अद्भुत वाटतो.
लेख आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>बहाव्याकडे वैशाखाच्या ऐन दुपारी पाहिले तरी डोळे थंडावतात<<
असे ऐंद्रीय अनुभव प्रत्यक्ष येतात की त्यांची शाब्दिक प्रतिमा तेव्हाही आणि आताही मनात तयार होते? डोळे थंडावतात म्हणजे काय होतं नेमकं? (खवचटपणे विचारत नाहीय राहीजी)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला

सुंदर दृश्य पाहून डोळे थंडावतातच. (हिंदीत- याला आंखे ठंडी करना म्हणतात - सीपी जा रहा हूँ, आँखे ठंडी करने).

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

डोळे निवणे असाही एक मस्त प्रयोग करतात मराठीत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन