खातेस घरी तू जेव्हा -

(चाल- नसतेस घरी तू जेव्हा-)

खातेस घरी तू जेव्हा
जीव घाबराघुबरा होतो
उरण्याचे होती वांधे
पोटात गोळा का येतो ..

डिश फुटून खाली पडावी
का तोल मना बिघडवतो
तोबरा मनी हीन वाटे
अन खंत वाटता रडतो ..

येतात पाहुणे घराशी
धुसफुसून सरती मागे
चिडकीशी गाठच आता
तव फंडा आठवत जातो ..

तव हालचाली बोकण्याच्या
मज डसती हजार वेळा
जीव जाई तरी हादडावे
मी बघ्याच नुसता उरतो ..

तू लांब राहशिल काय
सोडूनच या घरदारा
सगळ्यांचा जीव भकास
माझ्यासह उपास घडतो ..

ना अजून झालो तगडा
का दुष्काळातुनी आलो
तुज पाहुन समजत जाते
खाण्यास जन्म हा घडतो !
.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

ROFL ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कबीरा खडा बाजार में, मांगे सबकी खैर|
ना काँहू से दोस्ती, ना काँहू से बैर||

प्रसन्ना१६११ -

प्रतिसादाबद्दल धन्यवाद !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ROFL आवडली.

येतात पाहुणे घराशी
धुसफुसून सरती मागे

या सरती शब्दाऐवजी सरशी असे लिहायचे होते का म्हणजे नायिका मागे सरते बरोबर? पाहुणे नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अमृतराय नामक पेशवाईतील एक कवींनी असेच आपल्या बायकोबद्दल लिहिले आहे. पूर्ण श्लोक पाहिले पाहिजेत, सध्या तुटक ओळी आठवताहेत तेवढे देतो-

"मागे ती लुगडी, सकाम बुगडी, आठां दिसां बांगडी"
"खाते ती जशि माकडी वसवसी"
"यालागी अमृतेश्वरासि रुचली, गंगातिरी झोपडी" इ.इ.

अधिक माहितीकरिता महाराष्ट्र सारस्वतातील अमृतराय कवीबद्दलचे प्रकरण पहा.

https://archive.org/details/MaharashtraSaraswatBhaveWithSupplementFull

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

वा! रोचक आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काव्या , बॅटमॅन

प्रतिसादाबद्दल आभार !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0