तिची कविता
तिची कविता
ती एक आई
जीवन घडवणारी!
ती एक पत्नी
साथ देणारी !!
ती एक ज्योती
उज्जवल भविष्याप्रत नेणारी!
ती एक दिप्ती
अखंड तेवत राहणारी !!
ती एक कळी
उमलण्यासाठी आसुसणारी!
ती एक चांदणी
चमचमण्यासाठी धडपडणारी !!
ती एक शक्ती
सामर्थ्य प्रदान करणारी !
ती एक व्यक्ती
जगण्याचा अधिकार मागणारी!!
प्रतिक्रिया
आठवण
यावरून गॉन गर्ल या सिनेमाची आठवण जाहली! (ह. घ्या. )
----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला
जगण्याचा अधिकार
अधिकार मागावेत का हिसकून घ्यावेत का मिळवावेत ...
जगण्याचा अधिकार मागणारी
आजकाल होणाऱ्या स्त्री भ्रूण हत्या मुळे..
जगण्याचा अधिकार [मागणारी ] असं लिहीलय.
निलम बुचडे
छान!
आवडली कविता.
डॉ. एस. पी. दोरुगडे
धन्यवाद !!!
डॉ. एस. पी. दोरुगडे सर.
निलम बुचडे