भूमीशी - परिसराशी नातं सांगणार्‍या मराठी कविता

आपला गाव, आपला परिसर ह्यांविषयीची आत्मीयता आणि त्यांच्याशी असलेलं नातं पुष्कळ लोकांना जगण्याचं बळ देतं आणि स्मरणकातरही बनवतं. मराठीत अशा भावना ज्यात प्रकट झालेल्या आहेत अशा वेगवेगळ्या काळातल्या आणि वेगवेगळ्या जाणीवा व्यक्त करणार्‍या कवितांच्या मी शोधात आहे. राष्ट्राभिमान किंवा देशाभिमान अशा भावनांपेक्षा आपल्या भूमीशी किंवा परिसराशी असलेल्या व्यक्तिगत जिव्हाळ्याच्या नात्याची भावना ज्यात व्यक्त होते आहे अशा कविता हव्या आहेत. त्याचप्रमाणे वस्तू किंवा व्यक्तीशी नातं नको आहे, तर गाव, नदी, भूमी अशा गोष्टींशी नातं सांगणार्‍या कविता हव्या आहेत.

कविता गाजलेली असावीच असा आग्रह नाही. कवितेला काही साहित्यिक मूल्य मात्र असावं. (हे अर्थात व्यक्तिसापेक्ष आहे हे मान्यच आहे.) नावाजलेल्या कवीच्या कवितांचाच विचार करायचा आहे. पटकन सुचणारी काही उदाहरणं -

कविता ऑनलाईन मिळाली तर ह्या धाग्यावर दुवा द्या. अन्यथा कवितेचं शीर्षक, कवीचं नाव आणि कोणता संग्रह, प्रकाशन वगैरे माहिती सांगा. प्रतिसादात पूर्ण कविता टंकून दिलीत, तर उत्तमच!

field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (1 vote)

प्रतिक्रिया

संग्राह्य धागा झायाय छान !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

संग्राह्य धागा झायाय छान !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रतिसाद देणाऱ्या सगळ्यांचे अनेक आभार! तुम्हा सगळ्यांच्या सहभागामुळे संकलन खूप रंगतदार झालं आहे. आता काही पुढच्या विनंत्या Smile -

  • घर झाड अशासारख्या गोष्टींपेक्षा, म्हणजे वास्तू-वस्तूंपेक्षा अधिक व्यापक परिसर हवा, पण त्या व्यापकतेसोबत येणारे अभिमान/गर्व नकोत. 'भूमीशी - परिसराशी नातं' आत्मीयता/स्मरणकातरता ह्यापलीकडे नेता येईल का, ते पाहायला हवं. त्यांपेक्षा वेगळ्या भावनाही ज्यांत आहेत अशा काही कविता सुचवाव्यात. उदा. एखाद्या शहरा/देशाविषयीचा वाईट अनुभव, असूया, पूर्वग्रह किंवा द्वेषसुद्धा कवितेचा जनक ठरू शकतो.
  • अपेक्षेप्रमाणे इथे मध्यमवर्गीय संवेदना खूप अधिक प्रमाणात आल्या आहेत. (सुर्वे, ढसाळ किंवा कोलटकरांसारखे काही अपवाद वगळता.) त्यात गैर काही नाही, पण काही अपवादात्मक जागा मिळालेल्या किंवा अजिबात जागा न मिळालेल्या संवेदनांविषयीच्या कविता देण्याची विनंती.
  • नव्या पिढीतले पण एव्हाना परिचित झालेले काही कवी आलेले आवडतील. उदाहरणार्थ, पृथ्वीराज तौर ह्या एका नव्या कवीच्या कवितासंग्रहाचं नावच 'गाव आणि शहराच्या मधोमध' असं आहे. हे किंवा असं काही कुणी वाचलं आहे का? त्यात काही तरी वेगळं मिळालं असेल तर त्याचाही समावेश करावा ही विनंती.
  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

शंका: पहिला मुद्दा कळला. पण त्यात गावाचं / परिसराचं नाव असणं अभिप्रेत आहे की नाही? कुसुमाग्रजांची 'कलोजस' (चूभूदेघे) नामक कविता आठवते आहे. ती मुंबई-लोकल-गर्दी यांतल्या आणि कुटुंबातल्या पुरुषाच्या दोन चेहर्‍यांबद्दल बोलते बहुतेक. पण त्यात मुंबईचा उल्लेख नाही. ते माझ्या डोक्यानं केलेलं गा०जा०भ० आहे. अशा कवितांचं काय? (हे सौमित्रच्या काही कवितांबद्दलही खरं आहे.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

नाव असायलाच हवं असा आग्रह नाही. सौमित्रचं नाव निघालं म्हणून आठवलं - त्याच्या एका कवितेचा साधारण विषय परदेशात गेल्यानंतर तिथलं विचित्र वाटणं आणि परत आल्यावर इथे विचित्र वाटणं असा काहीसा आहे. माझ्या आठवणीनुसार त्यात परदेश म्हणजे कुठे आणि परत आल्यावर म्हणजे नक्की कुठे असे तपशील नाहीत, पण तरीही ती कविता क्वालिफाय होईल, कारण ती आपल्या भूमीशी असलेल्या नात्याविषयी आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

वेगळ्या जाणीवा -
१. http://www.aisiakshare.com/node/2002
ही नव्वदोत्तरी कविता तर तुम्हाला माहीतच आहे. उल्लेखलेल्या वस्तू, परिसर ह्या गोष्टी शहर-देशाइतका व्यापक नाहीत पण जाणीव व्यापक आहे नि ती परिसराशी असलेल्या नात्यातूनच व्यक्त होते.

२. जाणीव वेगळी म्हणून ही चालते का पाहा -
http://aisiakshare.com/node/4096#comment-103607

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एखाद्या शहरा/देशाविषयीचा वाईट अनुभव

२०१४ साली आलेल्या 'म्हादू' चित्रपटातली दोन गीते (गीतकार - अजय कांडर):
१. माझ्याच माणसांना शोधीत मी निघालो
आणि अपेक्षाभंग वा वाईट अनुभव नशिबी आल्याने खिन्न होऊन परतताना -
२. माझ्याच माणसांना सोडून चाललो मी

गाण्यातल्या शब्दांत परिसर-गाव-देशाचे वर्णन नाही पण दृश्यांतून तो परिसर आदिवासी पाड्याचा आहे हे कळते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सलाम
सबको सलाम
ज्याच्या हातात दंडा
त्याला सलाम,
लाथेच्या भयाने
डावा हात गांडीवर ठेवून
उजव्या हाताने सलाम!
बघणाऱ्याला सलाम,
न बघणाऱ्याला सलाम,
विकत घेणाऱ्याला सलाम,
विकत घेण्याचा इशारा करणाऱ्याला सलाम,
सलाम, भाई, सबको सलाम.

वटारलेल्या प्रत्येक डोळ्याला सलाम,
शेंदूर थापलेल्या दगडाला सलाम,
लाखो खर्चून बांधलेल्या देवळांना सलाम,
देवळांतल्या देवांच्या धाकाला सलाम,
देवांचे आणि धर्मांचे कंत्राट घेणाऱ्यांना सलाम,
रिकाम्या हातातून उद काढणाऱ्या बडेबुवाला सलाम.
शनीला सलाम,
मंगळाला सलाम,
भीतीच्या प्रत्येक ठेकेदाराला सलाम,
आईवर आयुष्यभर गुरगुरणाऱ्या बापाला सलाम,
बापावर गुरगुरणाऱ्या साहेबाला सलाम,
साहेबाची टरकावणाऱ्या
त्याच्या साहेबाला सलाम,
सलाम, प्यारे भाईयों और बेहेनों,
सबको सलाम.

ज्याच्या हातात वृत्तपत्र
त्याला सलाम,
भाषणांचे, सभांचे
फोटोसकट रिपोर्ट छापतो त्याला सलाम,
वृत्तपत्रांच्या मालकांना सलाम,
त्यांची वेसण धरणाऱ्या
राज्यकर्त्यांना सलाम,
ज्याच्या समोर माइक्रोफोन
त्याला सलाम,
त्यातून न थांबता बोलतो
त्याला सलाम,
लाखोंच्या गर्दीला सलाम,
गर्दी झुलवणाऱ्या
जादूगारांना सलाम,
भाईयों और बेहेनों सबको सलाम.

नाक्यावरच्या दादाला सलाम,
हातभट़्टीवाल्याला सलाम,
स्मगलरला सलाम,
मटकेवाल्याला सलाम,
त्यांनी पेरलेल्या हफ्त्यांना सलाम,
लोकशाहीलाबी सलाम,
ठोकशाहीलाही सलाम,
सत्तेचा ट्रक चालविणाऱ्यांना सलाम,
ट्रकखाली चिरडलेल्या
गांडुळांना, कुत्र्यांना सलाम,
ज्याच्या हातात चाकू त्याला सलाम,
विमानातून बॉंम्ब फेकणाऱ्यांना सलाम,
शस्त्रास्त्रांच्या प्रचंड व्यापाऱ्यांना सलाम,
काळाबाजारवाल्यांना सलाम,
त्यांना फाशी देण्याची घोषणा करणाऱ्यांना सलाम;
गटारातल्या पाण्याने इंजेक्शने भरणाऱ्यांना सलाम,
तिरडीचे समान विकणाऱ्यांना सलाम,
तिरडी उचलणाऱ्या खांद्यांना सलाम,
मौत सस्ती करणाऱ्या सर्वांना सलाम,
सलाम, प्यारे दोस्तों, सबको सलाम.

बिळांना सलाम,
बिळांतल्या उंदरांना सलाम,
घरातल्या झुरळांना सलाम,
खाटेतल्या ढेकणांना सलाम,
गजकर्णी भिंतींना सलाम,
पिचलेल्या बायकोला सलाम,
दीड खोलीतल्या पोरवड्याला सलाम,
गाडीत चेंगरणाऱ्या गर्दीला सलाम,
किडक्या धान्याला सलाम,
भोके पडलेल्या पिवळ्या गन्जिफ्रॉकला सलाम,
धंद्याच्या मालकाला सलाम,
युनियनच्या लिडरला सलाम,
संपाला सलाम,
उपासमारीला सलाम,
सर्व रंगाच्या सर्व झेंड्यांना सलाम,
चाळीचाळीतून तुंबलेल्या
संडासातल्या लेंड्यांना सलाम,
मानगूट पकडणाऱ्या
प्रत्येक हाताला सलाम,
सलाम, भाईयों और बेहेनों, सबको सलाम.

या माझ्या परमपवित्र इत्यादी देशाला सलाम,
या देशाच्या सुउदात्त सुमंगल सुपरंपरेला सलाम,
सर्व बिलंदर घोषणांना सलाम,
जातिभेदांच्या उकिरड्यांना सलाम,
या उकिउरडयांतून सत्तेचे पीक काढणाऱ्यांना सलाम,
उपनिषदे आणि वेदांना सलाम,
साखरकारखान्यांच्या दादांना सलाम,
त्यांच्या शेकडो लॉऱ्यांना सलाम,
निवडणुकींना सलाम,
निवडणुकफंडाला सलाम,
अदृश्य बुक्क्यांना सलाम,
मतांच्या आंधळ्या शिक्क्यांना सलाम,
ससा हाती असलेल्या पारध्यांना सलाम,
त्यांच्या तैनातीतल्या गारद्यांना सलाम,
दलितांवर अत्याचार करणाऱ्यांना सलाम,
या बातम्या वाचणाऱ्या सर्व षंढांना सलाम,
सलाम, भाईयों और भैनों, सबको सलाम.

सत्ता संपत्तीच्या भडव्यांचा देश म्हटले
तर डोके फोडतील ,
हलकट लाचारांचा देश म्हटले
तर रस्त्यावर झोडतील,
खरीदले जाणाऱ्यांचा देश म्हटले
तर वाटा रोखतील,
देवाधर्माविषयी, नेत्यांविषयी वाईट बोललो
तर नाक्यावर गाठून ठोकतील,
शोषण करणाऱ्यांचा देश म्हटले
तर नोकरीवरून काढतील;
म्हणून आधी माझ्या नपुंसकत्वाला सलाम,
आणि त्यानंतर अर्थातच
या माझ्या
परमपवित्र सुउदात्त सुमंगल देशाला सलाम,
या महान देशाच्या महान परंपरेला सलाम.
सलाम
प्यारे भाईयों और बेहेनों, सबको सलाम,

अनेक हात असते
तर अनेक हातांनी केला असता सलाम,
लेकिन माफ़ करना भाईयों,
हात तर दोनच
आणि त्यातला डावा
लाथेच्या भयाने
ठेवलेला गांडीवर
म्हणून फक्त
उजव्या हाताने सलाम,
सलाम, सबको सलाम
भाईयों और बेहेनों, सबको सलाम.

कवी - मंगेश पाडगावकर.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सत्ता संपत्तीच्या भडव्यांचा देश म्हटले
तर डोके फोडतील ,
हलकट लाचारांचा देश म्हटले
तर रस्त्यावर झोडतील,
खरीदले जाणाऱ्यांचा देश म्हटले
तर वाटा रोखतील,
देवाधर्माविषयी, नेत्यांविषयी वाईट बोललो
तर नाक्यावर गाठून ठोकतील,
शोषण करणाऱ्यांचा देश म्हटले
तर नोकरीवरून काढतील;
म्हणून आधी माझ्या नपुंसकत्वाला सलाम,

हे खासच

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'विचित्र वीणा' आणि 'कशासाठी पोटासाठी' या दोन्ही कविता यात चालतील का?
अपेक्षा समजावी म्हणून विचारतो आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

'कशासाठी पोटासाठी' आणि 'विचित्र वीणा' - दोन्हींमध्ये मुख्यतः परिसराचं वर्णन आहे. परिसराशी (भावनिक) नातं त्यात फारसं स्पष्ट नाही. अशा कवितांचा समावेश करायचा झाला, तर निसर्गवर्णनात्मक कोणतीही कविता घेता येईल - अगदी श्रावणमासी वगैरेही. तितका व्यापक स्कोप नको; तो अधिक संकुचित केला तर काही अधिक रोचक हाती लागण्याची शक्यता आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

ओके. आभार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

गोविंद नारायण माडगांवकरांच्या (१८६३) मुंबईचे वर्णन पुस्तकात मुंबईवरची बरीच वेगवेगळी, लांबलचक कवने आहेत. ती सगळी टायपत बसले तर 'रात्रिरेव व्यरंसीत्' होईल. म्हणून दोन दोन ओळी देते. यातल्या कुठल्याच कवनात मुंबईबद्दलचे प्रेम, ओढ किंवा स्मरणरंजन दिसत नाही. बहुतेक ठिकाणी मुंबईचा थाट, श्रीमंती, नवलाई, दरारा यांचंच वर्णन आहे.
* 'या शहराचे वैभव पाहूनच मराठे लोक आनंदात असतात' तेव्हा म्हणतात ती लावणी:
'...मुंबई शहर गुलजार मुंबादेवी है ठिकाणा //
इंग्रज की साहेबी चलता उप्पर किल्ला नमुना //
अजब तर्‍होंका टापु मुंबई जरा है दखनमें //
शिव शंकर पैगंबर देव रहेते है ते बसतीमें //...'
* मुंबईवर पोवाडा:
'सागरामाजी बेट थेट पहाति चे कोशाचा छाटा //
भरति आल्या संधीस धक्याशीं उसळति लाटांवर लाटा // ...'
* कवन:
कायहो मुंबई बंदर उमदा कोट्यावधि फिरतात जहाजे //
अजब कंपनी शहर त्याला लंकेची उपमा साजे //....'
* 'पुरातन स्थायिक सुतारा'कडचे एक 'चमत्कारिक कवन':
'.....निमे मुंबई सागरामाजि होती// बहू लोकवस्ती असीतैं न होती//
महाघोर रानें तशा शेतवाड्या// लघू झोंपड्या झांवळ्यांच्या कवाड्या //'
* मुंबापुराख्यान (मुंबादेवीचे संस्कृत महात्म्य):
'अथ मुंबापुराख्यानं शृणुध्वं मुनयः शुभं//
यस्य श्रवणमात्रेण चिंतितान्याप्नुयान्नरः//...'
* १८०२ साली मुंबईत लागलेल्या आगीवर कुण्या 'देवभोळ्या' कवीने केलेले कवन:
'.....दीवसाच्या अकरा घड्यांवरि महा प्रलयाग्नि जो ऊठला//
वायूसंग मिळोनि भाग अरधा मुंबैइचा जाळिला//...'
* १८५४ साली मुंबईत भयंकर वादळ झाले, त्याचे वर्णनः
'....ऐका आतां समुद्रांतली// नासाडी जी बहुतचि झाली//
तरी गलबतें फुटोनि गेलीं// एकमेकावरि आपटलीं//...'
* लहान मुलांना 'देवी आल्या म्हणजे झोंपाळ्यावर निजवून गाणी म्हणतात' त्याचा एक मासला:
'मुंबईशहराची हवा बाया निघाल्या पाहावया.
मुंबई शहराला ग बयानो रसते फार.
बाजुला ग दिसती मोठीं मोठीं घरें.
घराला काम नकशीदार.
घराला रंग तरेतरेचे.
रंगांमध्यें रंग ग बयानो निळा जंगाल.
मुंबई शहर ग आहे फार........'
* याचबरोबर १८५७ चे बंड मोडावे म्हणून मुंबईतल्या शेटसावकार लोकांनी केलेल्या प्रार्थना, 'लोखंडी रस्ता' सुरू झाल्यावर कोण्या कवीने केलेली कविता, मुंबईतल्या बाणकोटी बाल्यांवरची कविता, संतांचा वेष 'धरून' मुंबईत भीक मागणार्‍या लोकांवर कुणीशी केलेली कविता अशी अनेक कवने या पुस्तकात माडगांवकरांनी 'उतरून घेतली आहेत'.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अजय कांडर यांच्या मोहल्ला सेरिज मधल्या कविता सुचवाव्याश्या वाटतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भव्य हिमालय तुमचा अमुचा
केवळ माझा सह्या कडा

ही वसंत बापट यांची कविता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'मामाच्च्या गावाला जाऊया' चालेल का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मुंबई, मुंबई, माझ्या प्रिय रांडे
ये व माझा स्वीकार कर
सात घटकेचा मुहूर्त
आधीव्याधीनंतर
सर्वांगसुन्दर प्रतिमासृष्टी
अश्विनीरूप ऋतुस्नात कामातुर लक्ष्मी
सर्पस्वरूप विष्णू उर्ध्वरेत स्खलित
सूर्याचे अनुष्ठान
हे शेष सूर्याच्या चेहऱ्याG
हे कामेच्छेच्या माते
हे अदिती
माझ्या प्रियेचा दगड
मला अधिकच प्रिय आहे

- नामदेव ढसाळ

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

'न्हालेल्या जणु गर्भवतीच्या' ही मर्ढेकरांची कविता वर कुणी लिहिली आहे काय? अजूनपर्यंत कुणाला आठवली नसेल तर आश्चर्य.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कविता मला सुचली होती पण ते वर्णन हिवाळ्याचे - मुंबईतल्या - अधिक आहे असे वाटले.

न्हालेल्या जणू गर्भवतीच्या
सोज्वळ मोहकतेने बंदर
मुंबापुरीचे उजळीत येई
माघामधली प्रभात सुंदर

सचेतनांचा हुरूप शीतल
अचेतनांचा वास कोवळा
हवेत जाती मिसळुनी दोन्ही
पितात सारे गोड हिवाळा !

डोकी अलगद घरे उचलती
काळोखाच्या उशीवरुनी
पिवळे हांडे भरून गवळी
कवाड नेती, मान मोडूनी

नितळ न्याहारीस हिरवी झाडे
काळा वायू हळूच घेती
संथ-बिलंदर लाटांमधुनी
सागर-पक्षी सुर्य वेचती

गंजदार, पांढर्‍या नि काळ्या
मिरविती रांगा अन नारिंगी
धक्क्यावरच्या अजुन बोटी
साखारझोपेमधी फिरंगी

कुठे धुराचा जळका परिमल
गरम चहाचा पट्टी गंध
कुठे डांबरी रस्त्यावरच्या
भुर्‍या शांततेचा निशिगंध

ह्या सृष्टीच्या निवांत पोटी
परंतु लपली सैरवैरा
अजस्त्र धांदल, क्षणात देईल
जिवंततेचे अर्घ्य भास्करा

थांब! जरासा वेळ तोवरी -
अचेतनांचा वास कोवळा;
सचेतनांचा हुरूप शीतल;
उरे घोटभर गोड हिवाळा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एका दिवसाचं शूटिंग...

सौमित्र
(... आणि तरीही मी, पॉप्युलर प्रकाशन)

स्थः - चर्चगेट किंवा व्ही. टी. स्टेशन
वेळ - सकाळच्या समुद्र भरतीची
लेन्स - धावपळीची...
टॉप अँगल...
धडधडत स्टेशनमधे ट्रेन शिरते...
डब्याडब्यांमधून विखुरलेला दिवस...
स्वतःला ढकलत ढकलतच प्लॅटफॉर्मवर उतरतो...
तुकडे तुकडे एकमेकांत बेमालूमपणे मिसळत जातात...
एक प्रचंड समुद्र लाटालाटांनी हलू लागतो...
दिवस सैरभैर...
वेड्यांच्या हॉस्पिटलमधून...
पिंजर्‍यात कोंडून आणलेले असंख्य चिमणी-कावळे...
एकसाथ स्टेशनमधे सोडले जातात...
कलकलाट... कलकलाट... कलकलाट...
दिवस ओलाचिंब, स्वतःला सावरत
कॅमेर्‍याखालून आऊटफ्रेम निघून जातो...
संपूर्ण फ्रेमभर वारूळफुटले मुंगळे व मुंग्या...
कट इट...

स्थळ - शहरातल्या भूलभुलैयेचं प्रवेशद्वार
अर्थातच स्टेशनबाहेर जाण्याचं गेट...
कॅमेरा - समोरच्या फूटपाथवर...
लेन्स - हरवून जाण्याची...
'दिवस' स्टेशनच्या पायर्‍या उतरतोय...
स्टेशनबाहेर काही वेळ थांबतो....
संभ्रमित...
इकडे-तिकडे बघतो...
चुकीच्या रस्त्यावरून चालू लागतो...
कॅमेरा त्याला फॉलो करू लागतो...
दूरवर पसरलेले रस्ते...
अनेक वाहनं... यांच्यावरून...
दिवसाच्या पावलांच्या ठशांचे आवाज...
हळूहळू दिवस रस्त्यावरून दिसेनासा होतो...
फ्रेमभर फक्त रस्ते...
आणि मुंग्यांच्या हालचाली...
कट इट...

स्थळ - वरळी टी. व्ही. टॉवर...
कॅमेरा - टॉवरच्या टोकावर...
लेन्स - उन्हाची... टॉप अँगल...
वाईऽऽऽड फ्रेम...
संपूर्ण शहरावरून कॅमेरा पॅन होऊ लागतो...
पत्त्यांचे बंगले.
पुठ्ठ्यांची घरं.
रक्तवाहिन्यांचे रूळ.
रेल्वेची गांडुळं.
अजगरांचे रस्ते.
कीटकांची वाहनं.
डबक्याचा समुद्र.
शोकेसमधली वाळू.
मिलच्या चिमण्या.
चिमण्यांचे धूर...
कॅमेरा धुराबरोबर वर जाऊ लागतो.
संपूर्ण फ्रेमभर धुराचं आकाश.
कॅमेरा आकाश घेत घेत...
चारी दिशांना फिरू लागतो...
अचानक फ्रेममध्ये
एक घार प्रवेश करते...
झूम इन...
फ्रेममधे फक्त एक घार.
जिच्या नखाळ पंजात 'दिवस' लोंबकळताना दिसतो... पुल्ल बॅक...
पंजा दिवसात घट्ट रोवलेली घार.
शहरावरून घिरट्या घालते आहे...
फ्रेममधे खोऽऽऽलवर पसरलेलं पुसट शहर...
आणि वर...
दिवसाला अधून-मधून टोचा मारत,
वार्‍याच्या लाटांवर तरंगणारी घार दिसते.
दिवसाच्या रक्ताचे तुषार...
वातावरणात तरंगताहेत.
हळूहळू कॅमेर्‍याची लेन्स लाल होत जाते.
आणि अचानक
घार दिवसावरची पकड ढिली करते.
'दिवस' स्लो मोशनमध्ये...
शहरावर कोसळतोय...
डिझॉल्व!

स्थळ - समुद्र किनारा...
वेळ - सूर्यास्ताची...
लेन्स - या चिमण्यांनो परत फिरा
घराकडे अपुल्या...
सांजावत चाल्लेलं तांबडं पाणी...
आभाळ तांबडं की पाणी तांबडं
या संभ्रमात कॅमेरा...
पाण्यात बुडी मारायला,
सूर्यानं उडी घेतलेली.
सूर्य आणि समुद्र यांच्यात फक्त वीतभर अंतर उरलेलं.
सूर्यानं पाणी शिवलेलं...
झूमइन...
फ्रेममधे...
स्लोमोशनमधे...
चक्क बुडत चाललेला तांबडा सूर्यगोल.
इतक्यात. फ्रेममध्ये एक होडी प्रवेश करते.
पुन्हा झूमइन...
टाईऽऽट फ्रेम...
तांबड्या बॅकग्राऊंडवर.
जखमी अवस्थेतही.
किनार्‍याच्या दिशेनं...
दिवस होडी वल्हवताना दिसतो...
दिवसाच्या हातातल्या वल्ह्यावरून
कॅमेरा पॅन होतो...
फ्रेममधे फक्त पाणी कापत हलणारं वल्हं...
आणि पाण्याचा सप्प... सप्प... आवाज...
कट इट...

स्थळ - दारूचा गुत्ता.
वेळ - मध्यरात्रीच्या अलीकडची
किंवा घरी जाण्याच्या पलीकडची.
लेन्स - सोनेरी.
कॅमेरा एका दारूभरल्या बाटलीत.
सोनेरी द्रव्यानंतरची काच.
काचेपलीकडे 'दिवसा'चा झिंगलेला चेहरा.
आजूबाजूला लांबट, पसरट, गोल चेहरे.
'दिवस' एका घोटात ग्लास संपवतो.
समोरची बाटली उचलतो.
बुचांवर सराईत थाप मारतो...
बाटलीतला कॅमेरा हादरतो...
फ्रेममधे फक्त मोठमोठे बुडबुडे दिसू लागतात...
दिवस टेबलावर बाटली आदळतो.
बाटली खालून फुटते.
फ्रेममधे सोनेरी द्रव हळूहळू खाली जाताना दिसतो.
जसजसा द्रव खाली जातो,
तसतशी फ्रेम ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट होत जाते.
झूम इन...
दिवसाच्या पसरट चेहर्‍यावर ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट हास्य...
कट इट...

स्थळ - एका स्त्रीचं घर...
वेळ - नको ती...
लेन्स - एका स्त्रीच्या डोळ्यांची
टाईऽऽऽट फ्रेम
फ्रेममधे फक्त आतून बंद दार...
बाहेरून कडी वाजते...
फ्रेममधे एक हात येतो...
कडी काढतो
दार उघडतो...
समोर 'दिवस'
पुल्ल बॅक
फ्रेममधे...
एक अंथरलेला बिछाना...
दिवसाकडे पाहत राहिलेली पाठमोरी स्त्री...
आणि समोर...
तिच्याकडे निर्विकार नजरेनं पाहणारा...
झिंगलेला.
जखमी दिवस...
फ्रेम फ्रीज होते...
धी एन्ड...
(आणि अचानक त्या स्त्रीची रात्र होते.)


(आज शहरातले सारे रस्ते चाल्लो..., आज अचानक शहरात थोडा गारवा पसरलाय..., एकदा... एक शहर चुकून..., माझं स्वत:चं असं वेगळंच शहर आहे..., प्रत्येक वेळी हे शहर सोडताना...., दूर इथून फार-फार दूर माझं एक गाव आहे..., ... चर्चगेटच्या गर्दीतून शब्द पेरीत फिरताना
(मधली ओळ), परक्या देशात... या संग्रहातल्या अशा अनेक कवितांमधून समुद्र, रस्ते, पाऊस आणि शिवाय शहर - अपरिहार्यपणे मुंबई - आहे.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

सदानंद रेगे यांची प्लॅटफॉर्म ही कविता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

कविता छान आहे. पहिल्या ओळीतला शब्द टायपायला चुकलाय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

पाने