फुसके बार – २७ जानेवारी २०१६

फुसके बार – २७ जानेवारी २०१६
.
१) काल एका पणजोबांच्या बरोबरीच्या मित्रांच्या मानाने त्यांना मिळालेल्या दीर्घायुषाबद्दल त्यांच्या नातवाने विचारल्याबद्दलची एक आठवण सांगितली. तशीच आठवण महर्षी कर्वे यांच्याबाबतही सांगितली जाते. ते नव्वदीत असताना त्यांचे पुत्र रघुनाथ कर्वे यांचे वयाच्या एक्काहत्तराच्या वर्षी निधन झाले. त्यावर स्वत: महर्षी कर्वेंची प्रतिक्रिया काय होती, तर, अहो त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काय आहे, त्याचे वय झाले होते, तो गेला यात वाईट वाटून का घेता?

२) तलवार सिनेमातले एक वाक्य: सबूत और सजा याने जच्चा और बच्चा

संवादलेखकाची कमाल.

३) अरूणाचल प्रदेशात राष्ट्रपती राजवट आणण्याच्या केन्द्र सरकारच्या निर्णयाबद्दल कॉंग्रेस सरकारने वादळ उठवले होते. मात्र राष्ट्रपतींनी याबाबतच्या मंत्रीमंडळाच्या शिफारशीवर शिक्कामोर्तब केले.

अर्थात राष्ट्रपतींनी त्यापूर्वी गृहमंत्री राजनाथसिंग यांना बोलावून याबाबत चर्चा केली होती.

आता कॉंग्रेसने हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात नेले आहे. विधानसभेच्या सभापतींच्या परवानगीशिवाय विधानसभेचे अधिवेशन भरवता येते काहा प्रश्न तेथे चर्चिला जाईल. त्याचप्रमाणे सत्ताधारी पक्षामध्ये मोठ्या प्रमाणावर बंडखोरी झाल्यावर बंडखोरांनी व विरोधी पक्षाने विशेष अधिवेशनाची मागणी करूनही तसा निर्णय न घेण्याच्या सभापतींच्या निर्णयाचीही चौकशी तेथे होईल.

भाजपने तिथला कॉंग्रेस पक्ष फोडण्याचा उद्योग केला असेल तर त्याचे समर्थन करण्याचे कारण नाही, परंतु १९८०मध्ये इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्यावर हरयानातील जनता पक्षाचे मुख्यमंत्री भजनलाल यांनी आपल्या बहुतेक सगळ्या आमदारांसह कॉंग्रेसमध्ये प्रवेश करत आपले मुख्यमंत्रीपद टिकवले होते. त्या प्रकाराची या निमित्ताने आठवण झाली.

मी मागे म्हटल्याप्रमाणे आज राष्ट्रपती राजवटीसाठी सर्वात योग्य असलेले राज्य म्हणजे ममता बॅनर्जींचे.

४) शनी शिंगणापूरला महिलांनाही चौथ-यावर जाऊन दर्शन घेऊ देण्यावरून महिलांच्या एका गटाकडून आंदोलन चालू आहे. तेथे पुरूषांना प्रवेश आहे, मात्र महिलांना नाही, याचे परंपरा व स्त्रियांची पुनरूत्पादनाची शक्ती या भलत्याच आधारांवर समर्थन करणा-या एका पोस्टबद्दल मी नुकतेच लिहिले होते. त्यामुळे यात पुरूष-स्त्री भेदभाव नको हे खरेच.

पण या आंदोलक महिलांनी उघडपणे बसमधून तेथे पोहोचण्याचा प्रवेश केला, तो पोलिसांनी आधीच उधळवून लावला. हे असे होणार हे अपेक्षित होतेच. तेव्हा या आंदोलकांची चमकोगिरीच या निमित्ताने पहायला मिळाली.

बाकी या आंदोलक महिला या महिलांच्या एखाद्य मूलभूत प्रश्नावरून लढत असत्या तर ठीक होते. मात्र जसा केला जात असलेला भेदभावही मान्य करायला नको, तसेच या महिलांचे अंधश्रद्धेकडे जाणारे पाऊलही तेवढेच समर्थनीय आहे, हेदेखील या निमित्ताने सांगावे वाटते. आम्हाला ही अंधश्रद्धाच मान्य नाही, तुमचे दर्शन तुम्हाला लखलाभ अशी जर या महिलांची भूमिका असती, तर त्यांचे कौतुक करता आले असते. तेव्हा येथे दोन्ही बाजू मागासलेल्या विचारांच्याच आहेत.

५) जगभरात मंदी असतानाही जागतिक स्टील उत्पादनामध्ये भारतामध्ये स्टीच्या उत्पादनात वाढच झाल्याची बातमी महाराष्ट्र टाइम्समध्ये प्रसिद्ध झाली आहे. त्याप्रमाणे २०१४मध्ये ८.७३कोटी टन एवढे असलेले उत्पादन २०१५मध्ये ८.९६कोटी टनांपर्यंत वाढल्याचे या बातमीत म्हटले आहे.

या निमित्ताने जागतिक स्टील उत्पादनावर नजर टाकली तर असे दिसते की चीनचे स्टील उत्पादन भारताच्या जवळजवळ दहापट आहे. भारताच्या स्टील उत्पादनक्षमतेचा जीव आजही इतका कमी आहे. तरीही त्यांच्या उत्पादनात थोडी घट झाली व आपल्याकडे मात्र थोडी वाढ झाली, यावरून भारतातील स्टील उद्योगाने जगातील कलाच्या विरूद्ध कामगिरी केली असे म्हणत आपली पाठ थोपटून घेणे कसे खोडसाळपणाचे आहे हे लक्षात यावे. धन्य हे अशा अर्धवट बातम्या पेरणारे लोक.

६) हा फोटो कशाचा असू शकेल? फोटो फार स्पष्ट आलेला नाही, पण काय आहे ते साधारणपणे कळावे.

थंडीच्या दिवसात एक कुत्रा आसपास दोनशेपेक्षा अधिक लोक उपस्थित आहेत त्यांची पर्वा न करता त्या खड्ड्यात शांतपणे पहुडलेला आहे. त्याला तेथे उब मिळत आहे ती दोन दिवसांपूर्वी पेटवलेल्या चितेतून उबदार बनलेल्या या खड्ड्याची.

अर्थात हा फोटो आहे स्मशानभुमीतला.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

वारंवार सांगूनही योग्य ठिकाणी लेखन न केल्यामुळे धागा वाचनमात्र करण्यात येत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0