गुप्त 'वीणा'

गुप्त 'वीणा',
आज रात्री डोळे मिटायच्या आधी तुझा जुना लेख वर आलेला बघितला आणि तत्क्षणी तुझी आठवण मला घायाळ करायला लागली. वीणा, का गं गेलीस आम्हाला सोडून? नकळत मी मॉनिटरजवळ सरकलो, स्क्रीनवरच्या अक्षरानी माझ्या अंगाअंगावर अलगद शहारे उमटवले. जणू काही तू मॉनिटरमधेच आहेस 'वीणा'!! सारं मन... सारं तन आळसटून उठलं. एक हळूवार जांभई आली. काय करत असशील असा विचार करत कीबोर्ड जवळ घेतला. त्यावर विसावलेली माझी बोटं पाहिली. हीच का ती बोटं...ज्यानी तुझं लेखन सतरा वेळा मागे-पुढे स्क्रोल करत वाचलं? आणि धिटाईने माझं उत्तर लिहिलं? हो!! तीच ती बोटं. माझी...फक्त माझीच वीणा. वीणा, अगं तू खुलवलंस मला. माझ्यातल्या प्रँकस्टरला तुझ्या गोग्ग्ग्ग्ग्ग्ग्गोड शब्दानी बहकवलं. माझं भान हरपलं. या साईटवर मला फक्त तुला उत्तर देण्यासाठी लॉगिन करवलं ग!

आता तू ईथे नाहियेस वीणा. पण जाणवतंय की आपण एकाच साईटवर आहोत. जणू मी उपस्थित सदस्य ...आणि तू वाचक. माझं हे लेखन वाचणारी वाचक....तूच ती. वीणा, साथ घट्ट आहे गं आपल्या आयडींची. तू धारा आहेस या विचारांची, मी सज्ज आहे या चेष्टेसाठी. माझा मॉनिटर मी पूर्णपणे उजळवून टाकलाय. मन कसं फुलपाखरू होउन बागडतं आहे तुझ्या आठवणीत.

उठलो...फोन उचलला. व्हॉट्सअ‍ॅप चालू केलं आणि विचार तरंगला मनात. तू अशी फॉरवर्डस् सारखी बरसशील का माझ्या आयडीवर? या विचारानी मी पार बधीर होउन गेलो. व्हॉट्सअ‍ॅपवरचे कीती मेसेजेस त्या अर्धबधीरावस्थेत मी पुढे ढकलले ते उमजलं नाही मला वीणा!!!

शुद्धिवर आल्यावर फोन बंद करताना उमगलं की माझ्या उत्सुकतेवर पण तू अधीरघाईसारखी पसरल्येस. आजतरी तू लिहीणार का? एक वर्ष तुझी लेखननक्षी नाही. काय करू गं? तू परत नाहीच लिहिलंस तर? खुळं मन सैरावैरा भरकटलं. निराशेने मन पार हेलावून गेलं. पोखरलेल्या उदास, उद्विग्न मनाला दिलासा म्हणून तेव्हढ्यात वर आलेला तुझा दुसरा लेख वाचला.

परत एकदा मन खुळावलं. वाटलं, जणू तू परत एकदा लिहिणारेस आमच्यासाठी. ब्राउझरचं पान रीफ्रेश केलं. परत उत्साह वाटो माझ्या वीणाला. पुढच्या विडंबनाच्या ओळीच सुचल्या जणू!!

पुन्हा मन बहरलं!!! अंगांग थरथरलं. ऐसीवरचा आयकॉन अपडेट झाला जणू. कारणंच तसं होतं. उपस्थित सदस्यांमधे नाव आलं...."पी. डी. वीणा"!!!

तुझाच,
वीणावाचक
२ फेब्रुवारी २०१६

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

विचित्र वीणा!
(रुद्र वीणा, सहस्र वीणा वगैरे वगैरे..)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हाय!!! आवडलं बर्का. Smile
___

या विचारानी मी पार बधीर होउन गेलो. व्हॉट्सअ‍ॅपवरचे कीती मेसेजेस त्या अर्धबधीरावस्थेत मी पुढे ढकलले ते उमजलं नाही मला वीणा!!!

ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सुप्त ज्वालामुखी जागृत झाला ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

राकुंना खुन्नस म्हणून धागे प्रसवले जातायत का?

-(रिकामा) णावी भिंतीला तुंबड्या लावी. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

मोहनदास दवणे अशी सही केल्यास हा हेतू असल्याचे सहज स्पष्ट होईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अर्धअपेक्षापुर्ती Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0