जंगल

जंगलातल्या एका हिरवळीवर एका संध्याकाळी दोन झाडांना टेकून
सूर्यास्ताची वाट पहात आपण दोघे बसू
स्पर्शही न करता खूप बोलू दवाचे सप्तरंगी थेंब दिसेनासे होईपर्यंत
जंगल ओलांडून तू एकटी घरी जाणार याची मला काळजी असेल
आणि रस्ताभर मी सिग्रेटीवर सिग्रेटी संपवत जाईन याची तुला फिकीर
मला तर कालही भेटायचं होतं आणि उदयाही भेटायचयं
काहीही आणि खूप काही असंबद्ध बोलायचयं
बोलायला काहीच नसेल तर मावळणा-या सूर्याचे आणि तुझ्या बंडखोर केसांचे
बदलणारे रंग पहायचेत

एका संध्याकाळी तू तिथे येशील तेव्हा मी तिथे नसेन
मी दगा नै दिला
नीट पहा एक अर्धवट जळालेली सिगारेट पडलेली दिसेल
काल तू गेल्यावर अंधारात माचिस ने सिगारेट पेटवली
पारध्याला अंधारात ते कुठल्या जीवाचे डोळे वाटले असावेत
एक बाण उरात शिरला सिग्रेट हातातून गळून पडली
पारधी जवळ आला घाबरून पळून गेला
साल्याने पाणी नै पाजलं सिग्रेट तरी कमीत कमी तोंडात ठेवायची
श्वापदाने शरीर ओढून खोल जंगलात नेलं
तरी प्रश्न शिल्लक ऊरतो पाकिटात अजून तीन सिग्रेट शिल्लक होत्या
आणि पारध्याच्या भात्यात तीन बाण
छातीत बराचसा टार
आणि उरात ब-याच कविता भ्रूणहत्या झालेल्या
-फुल्या

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

भयंकर कविता. कालच रात्री मला तीन लांडगे सिगारेट ओढताना दिसले आणि सकाळी हि कविता. रात्रीचा खेळ चाले, पाहणे बंद करावे लागेल. >) >) >)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आवडली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कविता आवडली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0