लोकमतामधे ऐसी अक्षरे

http://onlinenews1.lokmat.com/php/detailednews.php?id=OxygenEdition-57-1...

आजच पेपर वाचतांना मेघना ढोके यांच्या प्रतिक्रियेत 'ऐसी अक्षरेचाही' उल्लेख वाचला.

ऑनलाईन लेखनमाध्यमांची अधिकाधिक दखल घेतली जावी अस आपल्या सर्वांना वाटत. त्या दिशेने झालेली ही वाटचाल खूपच महत्त्वाची वाटते. त्याकरता मेघना यांचे आभार.
ऐसी अक्षरेची पतका अशीच झळकत राहील अशी खात्री आहे...
सोनाली

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

ही माहिती पोहोचवल्याबद्दल आभार. 'लोकमत'चेही आभार. आंतरजालाची दखल छापील माध्यमं घेत आहेत हे तसंही आता नवीन नाही, पण तुलनेने नवीन संस्थळाची 'लोकमत'ने दखल घेतली आहे याचा आनंद झाला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

ज्या विषयावर लेख लिहिला गेला आहे त्यावर इथे विस्त्रुत चर्चा घडल्यास हरकत नाही. विषय लेखनाच्या व्यक्तीस्वातंत्र्यावर आहे. तिथे मांडल्या न गेलेल्या बर्‍याच गोष्टी इथे मांडता येतील.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

“I am alone in the midst of these happy, reasonable voices. All these creatures spend their time explaining, realizing happily that they agree with each other. In Heaven's name, why is it so important to think the same things all together. ”
― Sartre

>>ज्या विषयावर लेख लिहिला गेला आहे त्यावर इथे विस्त्रुत चर्चा घडल्यास हरकत नाही.

सहमत. मराठी संस्थळावर नेमानं वावरणार्‍यांना या लेखातल्या मुद्द्यांविषयी काय म्हणायचं आहे ते ऐकायला आवडेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

अभिनंदन

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

.

लोकसत्ताच्या आजच्य अग्रलेखात ऐसी अक्षरे,मिसळ पाव,उपक्रम या स्ंकेतस्थळांचा उल्लेख आहे -

http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=208...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हे ही वाचायचं निसटलं असतं. धन्यवाद उत्पल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

इतर संस्थळांच्या सोबतीने तुलनेने तान्ह्या ऐसिअक्षरेची दखल वृत्तपत्रात घेतलेली बघुन आनंद झालाच. तशी मराठी जालावर अनेक संस्थळे आली आणि गेली मात्र ज्यांनी या ना त्या प्रकारच्या लेखनात ठसा उमटवला त्यांची नावे आपसूक आलीच आहेत. ऐसीअक्षरे व इतर संस्थळाचेही अभिनंदन!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

त्या लेखाच्या विषयावर विस्तृत चर्चा व्हावी असे मला वाटते..विशेषत: मराठी संस्थळावर नियमित लेखन वाचन करनार्यानी जरुर आपले मत सांगावे..धन्यवाद..!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

चालक-मालकांचे अभिनंदन!

लेखातल्या मतांशी सहमत आहे. पण "वाटलं लिहुन टाकलं" हे या संस्थळांचं एकाचवेळी बलस्थान आणि आव्हान आहे असं मला वाटतं. आज ही संस्थळे मुख्य प्रवाहापासून दूर असली आणि तान्ही किंवा बालवयात असली तरी भविष्यात इंटरनेटच्या प्रसारामुळे या संस्थळांवरची वाचक-लेखकवर्दळ छापील माध्यमांएवढीच किंवा जास्तही होऊ शकते. त्याचबरोबर नविन बहुतांश इंग्रजी बोलणार्‍या पिढीमुळे या संस्थळांच्या भविष्यावर प्रश्नचिन्हही आहे.
वाढलेल्या वर्दळीत प्रकाशित होणार्‍या मजकुराचा दर्जा टिकवणे आणि तरीही अभिव्यक्तिस्वातंत्र्यावर गदा न येऊ देणे ही एक मोठी कसरत होणार आहे. त्यादृष्टीने आत्ताच सुरचित आणि सुस्पष्ट धोरण असणे नितांत आवश्यक आहे.
जर इंटरनेटचा प्रसार होऊन वर्दळ वाढली तर या संस्थळांवर इतर घटकांच्या बरोबरीने एक भाषिक जबाबदारी येऊन पडणार आहे, इच्छा असो वा नसो.
वाढत्या वर्दळीबरोबर स्पर्धेत वाढ होऊन स्वतःचे वेगळेपण टिकवण्याचाही दबाव वाढेल असे वाटते.
यातले काहीच झाले नाही तर प्रश्नच मिटला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

"वाटलं लिहुन टाकलं" हे या संस्थळांचं एकाचवेळी बलस्थान आणि आव्हान आहे असं मला वाटतं.

शतशः सहमत. संस्थळांवर आपल्या मनातले विचारांचे तुकडे हवे तेव्हा अत्यंत कमी कष्टांत लोकांपुढे मांडता येतात. संपूर्ण लेखनाची प्रक्रिया पार पाडून, संपादकांच्या चाळणीतून पुढे नेत, लेखनात सुधारणा करत जात ते कथा किंवा लेख स्वरूपात एखाद्या मासिकात प्रसिद्ध करण्याची क्षमता सगळ्यांकडेच नसते. त्यापोटी उत्तम लिखाण करण्याची कला असलेलेही मागे पडतात. संस्थळांवर ताबडतोब मिळणाऱ्या प्रतिसादांमुळे आपलं लिखाण सुधारणं, आपल्यासारख्याच लेखनात गती असलेल्यांशी चर्चा करणं हे सहजसाध्य झालेलं आहे. हे बलस्थान.

त्याचबरोबर, लिखाणाचा दर्जा चांगला होण्यासाठी 'वाटलं, लिहून टाकलं' हा सहजसोपा दृष्टिकोन पुरेसं नाही असं मला वाटतं. काही प्रमाणात आपल्या प्राथमिक लेखनाचा पुनर्विचार करून, ते घासूनपुसून पुन्हा अधिक चांगल्या स्वरूपात आणण्याची गरज असते. हे कष्ट या माध्यमातही घेणं शक्य आहे, पण लेखकांनी ते वरचेवर केलं पाहिजे. ते होत नसेल तर चांगले लेखन करू शकणारेही या कष्टांच्या अभावामुळे पुढे येणं कठीण आहे. लेखक घडावा लागतो. ती जडणघडण होण्यासाठी विशेष प्रयत्न झाले नाहीत तर ते या माध्यमाचं अपयश ठरेल. कष्टांचा अभाव जर गृहित असेल तर ते आव्हान.

कठीण चाचणीतून उतरणारे मूठभर थोडे असं छापील वाङमयात चित्र दिसतं. सोप्या चाचणीतून पुढे येऊन काहीही लिहिणारे खूप हे दुसऱ्या टोकाचं चित्र संस्थळांवर दिसतं. या दोन्हीचा सुवर्णमध्य साधायला हवा. तो संस्थळांवर अधिक चांगला साधला जाईल असं वाटतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लिखाणाचा दर्जा चांगला होण्यासाठी 'वाटलं, लिहून टाकलं' हा सहजसोपा दृष्टिकोन पुरेसं नाही असं मला वाटतं. काही प्रमाणात आपल्या प्राथमिक लेखनाचा पुनर्विचार करून, ते घासूनपुसून पुन्हा अधिक चांगल्या स्वरूपात आणण्याची गरज असते. हे कष्ट या माध्यमातही घेणं शक्य आहे, पण लेखकांनी ते वरचेवर केलं पाहिजे. ते होत नसेल तर चांगले लेखन करू शकणारेही या कष्टांच्या अभावामुळे पुढे येणं कठीण आहे. लेखक घडावा लागतो. ती जडणघडण होण्यासाठी विशेष प्रयत्न झाले नाहीत तर ते या माध्यमाचं अपयश ठरेल. कष्टांचा अभाव जर गृहित असेल तर ते आव्हान.
कठीण चाचणीतून उतरणारे मूठभर थोडे असं छापील वाङमयात चित्र दिसतं. सोप्या चाचणीतून पुढे येऊन काहीही लिहिणारे खूप हे दुसऱ्या टोकाचं चित्र संस्थळांवर दिसतं. या दोन्हीचा सुवर्णमध्य साधायला हवा. तो संस्थळांवर अधिक चांगला साधला जाईल असं वाटतं.

चर्चा येथेच संपते. या प्रतिसादाचे गुणांकन अजिबात वाढलेले नाही हे 'वाटलं, लिहून टाकलं' याचं समर्थनच ठरतं आहे.
'वाटलं, लिहून टाकलं' याचे एक स्थान ठरले पाहिजे. त्याला किती महत्त्व द्यायचे?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मेघना, कप्तान, आणि बाकी सर्वच ... सकाळच्या सप्तरंगमधला संध्या गोखले यांचा हा लेख वाचनीय आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

संध्या गोखले यांच्या लेखाचा दुवा : http://www.esakal.com/eSakal/20120205/5466512471123852982.htm

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

तळमळीने लिहिलंय अगदी संध्या गो़खलेंनी

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

“I am alone in the midst of these happy, reasonable voices. All these creatures spend their time explaining, realizing happily that they agree with each other. In Heaven's name, why is it so important to think the same things all together. ”
― Sartre

राम जगताप यांच्या ब्लॉगवरचा हा लेख वाचा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

“I am alone in the midst of these happy, reasonable voices. All these creatures spend their time explaining, realizing happily that they agree with each other. In Heaven's name, why is it so important to think the same things all together. ”
― Sartre

लोकमतमधल्या लेखात 'मराठी लिहित्या-वाचत्या तरुण मुलांच्या जगात काय घडतं?' असा प्रश्न विचारून तरुण लोकांविषयी काही विधानं केलेली आहेत. मराठी ब्लॉगविश्व खरंच कितपत तरुण आहे असा एक प्रश्न या निमित्तानं मला पडला आहे. माझ्यापाशी संख्याशास्त्रीय विदा (डेटा) नाही, पण जालावरचं मराठी लिखाण वाचताना बर्‍याचदा असं वाटत राहतं की या विश्वातले लिहिते-वाचते टेक सॅव्ही किंवा फेसबुक-ट्विटरसारख्या सोशल मीडिआवर वावरणारे असतीलही (नव्हे अनेकजण आहेतच), पण त्यांचं वय साधारण तिशी किंवा त्याहून अधिक असतं. कॉलेजात जाणारे मराठी तरुण-तरुणी फेसबुक-ट्विटरवर असतात, पण मुख्यतः इंग्रजीतून. ते मराठी ब्लॉग विश्वात किंवा मराठी संवादस्थळांवर (मायबोली, मिसळपाव, उपक्रम, ऐसी अक्षरे वगैरे) कितपत वावरतात?

अर्थात, तिशीतल्या व्यक्तींनी स्वतःला तरुण म्हणवून घ्यावं हवं तर, पण सहसा 'तरुणाई' वगैरे शब्दांत किंवा वृत्तपत्रांच्या युवा पुरवण्यांत वगैरे 'कॉलेज कट्टा' वयाचे तरुण अभिप्रेत असतात असं वाटतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

लोकमतमधल्या लेखात 'मराठी लिहित्या-वाचत्या तरुण मुलांच्या जगात काय घडतं?' असा प्रश्न विचारून तरुण लोकांविषयी काही विधानं केलेली आहेत. मराठी ब्लॉगविश्व खरंच कितपत तरुण आहे असा एक प्रश्न या निमित्तानं मला पडला आहे.

कारण शेवटी ते वृत्तपत्रीय लेखन आहे. Smile त्यात विदा वगैरे, तोही मराठी वृत्तपत्रातील लेखनात, शक्य नाही. त्या मर्यादा आहेत त्या विशिष्ट पर्यावरणाच्या. पण तुमच्या मतांशी सहमत. Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मराठी ब्लॉगविश्वाच्या वयाबद्दल मलाही शंका आहे. पण या ब्लॉगविश्वाचे वाचक जर पुण्या-मुंबईच्या बाहेरचेही असले* तर त्यांचं सरासरी वय मुंबई-पुण्याच्या लेखक वाचकांपेक्षा कमी असेल असं वाटतं.

*अकोला, बीड, नांदेड इत्यादी जिल्ह्यांची ठिकाणीही असणार्‍या इंटरनेटच्या उपलब्धतेबद्दल मला अजिबात काहीही कल्पना नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.