डायल

सेकंदामिनिटांचे थेंब डायलवर येतात
तासांच्या नद्या नि वर्षांचे महापूर डायलवर येतात
अंतरांचे संदर्भ डायलवर येतात
कललेली उन्हे
उतरते जिने
केले- न केलेले गुन्हे डायलवर येतात
धुळीतली पावलं डायलवर येतात
उमटलेले ठसे डायलवर येतात
हरवलं आकाश
निसटलं अवकाश
डायलवर येतात
चढते उतरते सूर
बदलते नूर
डायलवर येतात
काचांचे आरसे
भिंगं नि चश्मे
कप नि ग्लासं
तुकडे नि चुराही कधी -
डयलवर येतात
उत्तर रात्रींची टळटळीत उन्हं डायलवर येतात
अचूक जमलेला कोन
न शमलेलं मौन
हरलेल्या डावांचे चढलेले लोण डायलवर येतात
आताशा मात्र
पुनरपि कधी
क्वचित् कदापि
यश्चित् कश्चित
डायल टोन येतात
डायलटोनच येतात.
डायलटोनच येतात.

field_vote: 
1
Your rating: None Average: 1 (2 votes)

प्रतिक्रिया

डायल म्हणजे मन आहे का?

आताशा मात्र
पुनरपि कधी
क्वचित् कदापि
यश्चित् कश्चित
डायल टोन येतात
डायलटोनच येतात.
डायलटोनच येतात.

आता वार्धक्यात मात्र वांझोट्या आशा, कामना ...
असे काही आहे का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे डायलटोनच
डायन होऊन येतात|

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कविता आवडली. धृपद गरजेपेक्षा जास्त वेळा आलं आहे असं वाटलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तेच ते तेच ते तेच ते

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0