वात्रटिका - झिंगाट प्रेम

हिरव्या शालूत
कळी लाजली
फुलपाखराचे जी
झिंगाट झाले जी.
फिरफिर नाचला
शिट्टी वाजवली
झिंगत म्हणाला
आय लव यू.
झिंग झिन झिंगाट
झिंग झिन झिंगाट.
प्रिन्स चिमण्याने
डाव साधला
बेसुध फुलपाखरू
चोचीत धरला.
फुलपाखरू खाऊन
चिवताई खुश
चिवचिव प्रिन्स
आय लव यू.
झिंग झिन झिंगाट
झिंग झिन झिंगाट.

दूर झाडावर काळा कावळा त्यांचे प्रेमाचे चाळे बघत होता,....

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

हाण्ण!!! काय हो त्या गरीबड्या फुलपाखराला मारलत Sad
कळी करुन सावरुन नामानिराळी Sad असच असतय या पॅसिव्ह अ‍ॅग्रेसिव्ह लोकांचं ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गरीब फुलपाखराला मारून सिनेमावाल्यांनी चक्क ८० कोटींचा गल्ला जमविला आहे. बाकी कळीचा काय दोष, तिने थोडीना म्हंटले होते, ये माझ्या अवती-भोवती चकरा मार. वास्तविक जगात गाफील प्रेमी प्रेमिकांचे असेच हाल होतात. मग फुलपाखरू असो कि चिमणा-चिमणी. ते गाण आठवत का ' प्यार करे कौआ काटे'...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वास्तविक जगात गाफील प्रेमी प्रेमिकांचे असेच हाल होतात.

डोकं ताळ्यावर ठेऊन प्रेम केलं तर त्याला प्रेम कसलं म्हणायच?
.
साभार - http://kavitabhavlelya.blogspot.com/search/label/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A...
.
हृदय अर्पण करतात ती माणसं...
.
हृदय अर्पण करतात
ती माणसं निराळीच असतात

पूर असतो त्यांच्या स्वभावात
किनारा सोडतात तेंव्हा नदीहून बेफाम होतात
कोसळतात खोल तेव्हा किती उंच जातात

जशी हसतात फुलं, पूर्ण उमलतात,
उधळतात गंध, गळून पडतात
नियतीचा सहज स्विकार हृदय देणारेच करतात

अश्रुंच्या प्रत्येक थेंबातून त्यांची गाणी फुलतात
प्रीतीचे दिव्य किरण त्यांच्यातून नित्य पाझरतात
ज्यांची दारे बंद होतात त्यांनाही आपले हृदय देतात

हृदय अर्पण करतात
ती माणसं निराळीच असतात

कवी - शिरीष पै

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बरे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!