ब्युटी अँड द बीस्ट - प्लूटो ग्रह, वृश्चिक रास

*१ अन्यत्र (मिसळपाव) पूर्वप्रकाशित
*२ ज्यांना ज्योतिष हे थोतांड वगैरे वाटत असेल त्यांनी हा लेख वाचू नये.

बर्‍याच वर्षांपूर्वी मी "ब्युटी अँड द बीस्ट" या कथेची प्लूटो या ग्रहाशी तसेच वृश्चिक या राशीशी घातलेली एक सुरेख सांगड वाचली होती. तो लेख विशेषतः ज्यांना ज्योतिषविषयक ज्ञान आहे त्यांना आवडेल असा होता. आता जेवढी सांगड आठवते तेवढी माझ्या तोडक्या मोडक्या शब्दात सांगायचा प्रयत्न करते.
सूर्य, चंद्रादि वैयक्तिक ग्रहांपेक्षा, प्लूटो हा ग्रह "व्यापक मानसिकतेवर" अधिराज्य करणारा ग्रह समजला जातो. म्हणजे त्याचे परीणाम बघताना व्यक्तीपेक्षा , त्या पीढीतील जनमानसावर काय समग्र परीणाम झाला ते साधारण पहातात. पण याचा अर्थ असा नाही की वैयक्तीक काहीच परीणाम होत नाही. हा ग्रह क्रूर आणि अशुभ समजला जातो कारण ज्या घरात हा पडतो त्या घराच्या कारकत्वाखाली येणार्‍या गोष्टींची हा उलथापालथ करतो. कोणत्याही गोष्टीची संपूर्ण काया पालटून टाकणे हे याचे मूळ काम मग ते भल्याकरता असो वा बुर्‍याकरता. या कायापलटामध्ये अनावश्यक गोष्टींचा संपूर्ण र्‍हास होतो जी की खूप पीडा-क्लेशदायक घटना असू शकते. पण जी आपल्या चांगल्याकरता आवश्यक असते. हा ग्रह फिनीक्स या पक्षाने देखील दर्शविला जातो. फिनीक्स हा स्वतःच्या राखरांगोळीतून भरारी घेणारा ग्रीक "मायथॉलॉजीकल" पक्षी. विध्वंस-पुनर्निर्मीती हे चक्र प्लूटो दर्शवितो.
वैदिक ज्योतिषशास्त्रामध्ये वृश्चिक आणि मेष या दोन्ही राशी मंगळ ग्रहाच्या अधिपत्याखाली येतात तर पाश्चात्य ज्योतिषशास्त्रात वृश्चिक ही रास प्लूटोच्या अधिपत्याखाली येते. सूर्यापासून अतिदूर असा हा प्लूटो हा शीतग्रह शक्तीशाली वृश्चिक राशीचे अधिपत्य गाजवतो.
"ब्युटी अँड द बीस्ट" या कथेमध्ये राजपुत्राचा एकंदर २ वेळा कायापालट वाचकासमोर येतो. पहील्यांदा राजपुत्राचे भयावह जनावरात रूपांतर होताना. या रूपांतरामध्ये राजपुत्र किल्ल्याच्या नीरव शांततेत, मौनाच्या भयाण आणि एकाकी खाईमध्ये लोटला गेलेला आहे. त्याला केवळ एकच आशातंतू आहे की या हीडीस रूपातदेखील जर कोणी त्याच्यावर प्रेम केलं तर त्याला पुनः पूर्वरूप प्राप्त होऊ शकेल जे की त्याला जवळजवळ अशक्यप्राय वाटत आहे. एकाकी, विषण्ण आणि अंधःकारात हा राजपुत्र फक्त किल्ल्यात येईल त्या व्यक्तीला स्वतःच्या शक्तीने बंदी बनवून , अधिकार गाजवून , प्रेम हिसकावून घेऊ इच्छितो. वृश्चिक रास ही खूप सामर्थ्यवान मानली जाते (पॉवर) पण तितकच या लोकांना हेदेखील शिकावं लागतं की दुसर्‍यावर सत्ता गाजवून सर्व गोष्टी मिळतात असं नाही तर स्वतःवर काबू ठेवून, स्वतःला जिंकून , स्वसंयमाने (सेल्फ्-कंट्रोल) देखील आमूलाग्र बदल घडू शकतात, हवे त्याची प्राप्ती होऊ शकते. पहिल्यांदा बीस्ट हा ब्युटीला कैदेत ठेवतो पण हळूहळू त्यांच्या मैत्रीत १ वेळ अशी येते की तो तिच्या विनंतीला मान देऊन स्वतःच्या मनाविरुद्ध तिला, तिच्या वडीलांकडे जाण्यास परवानगी देतो. खरं पहाता हा फार अवघड त्याग आहे कारण त्याचा एकमेव आशातंतू तो सोडायला तयार होतो आहे. पण या त्याच्या विश्वासातच त्याच्या दुसर्‍या कायापालटाचे बीज लपलेले आहे. आणि दुसर्‍या रुपांतरात केवळ तो जनावरातून मनुष्यात परिवर्तित झालेला नसून त्याची आत्मिक उत्क्रांतीदेखील झाली आहे. त्याच्यातील दुसर्‍यावर सत्ता गाजविण्याच्या दोषाचा (कंट्रोलींग नेचर) र्‍हास झाला आहे. हा प्लूटोच्या कारकत्वाखाली येणारा पुनर्जन्मच!!!

हा लेख कितीजणांना सुसंबद्ध वाटेल ते माहीत नाही. कारण प्लूटो आणि व्रुश्चिक राशीचे गुणधर्म माहीत हवेत जे की मी द्यायचा थोडा प्रयत्न केला आहेच. आशा करते काहीजणांना तरी याची सांगड लागेल.

field_vote: 
2
Your rating: None Average: 2 (1 vote)

प्रतिक्रिया

फलज्योतिषावर विश्वास नसल्याने लेखन पुर्ण वाचलेले नाहि.. वरवर चाळले
अर्थात तरीहि वेगवेगळ्या विषयावरील लेखन प्रकाशित झाले पाहिजे याच्याशी सहमती असल्याने याही विषयावर लेखन झालेले बघुन बरे वाटले.

बाकी राशींच्या-ग्रहांच्या गुणधर्मावरही लिहिलेत तरी छानच!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मिडवेस्टात स्नो पडायला लागला की शुचिकाकू बिघडतात असे दिसते. तुमच्या कुंडलीत स्नो कुठ्ल्या घरात आहे हे जरा बघुन सांगा पाहू. Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-Nile

*२ ज्यांना ज्योतिष हे थोतांड वगैरे वाटत असेल त्यांनी हा लेख वाचू नये.
हे फार फार आवडलं त्यामुळे लेख वाचला नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0


मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही