फेसबुक तू आणि व्हाॅट्सँप मी

नमस्कार रसिकहो, पाट्यांच्या पुण्यात आपण आजुबाजुला पाहिल तर लक्षात येत की सगळेच एकमेकांशी 
डिजिटली जास्त कनेक्ट आहोत ,कवितेतला नायक त्याच्या नायिकेला या संभाषणाच्या व्यथा आणि फायदे सांगायचा प्रयत्न करतोय ....

फेसबूक तू अन व्हाॅटसॅप मी,नातं आपलं
ब्राॅडबँडचं
2G 3G दागिने घालून दोघांनी अाॅनलाईन
भेटायचं

लाइक सुपरलाइक स्पर्धेमध्ये,निखळ बोलण दुर्मिळ
झालं
तुझी माझी प्रेमपत्रं पोचवणारं कबुतर,डिजिटल दुनियेत बेकार झालं

प्लास्टिकचं प्रेम अन् प्लास्टिकचं भांडण 
अहो चाकापेक्षा कोरडं वंगण 
त्याच जुन्या भिंतींमध्ये रोज नवं सीमोल्लंघन

कुठली नाती अन् कसलं फिलिंग
आधी चॅटिंग नंतर डेटिंग
भावनेचं ...भावनेशी यांत्रिक सेटिंग

तरीसुद्धा आपल्या मैत्रीत एक मात्र बरं आहे
रात्री अपरात्री बापा देखत बोलायची सोय आहे

कोणी पाहिलं तर टेन्शन नसतं
स्कार्फ बांधायच कंपल्शन नसतं

इथे जात,गोत्र कुणी विचारत नाही ,आणि
प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय खरं वय कळत नाही

म्हणून म्हणतो,

फेसबूक तू अन व्हाॅटसॅप मी,नातं आपलं ब्राॅडबँडचं
2G 3G दागिने घालून दोघांनी अाॅनलाईन
भेटायचं

!निनाद!

.........................

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (3 votes)

प्रतिक्रिया

हाहाहा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एक नंबर!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

कुठली नाती अन् कसलं फिलिंग
आधी चॅटिंग नंतर डेटिंग
भावनेचं ...भावनेशी यांत्रिक सेटिंग

हे विशेष आवडलं. हल्लीची सिनेमातली गाणीही पहा. त्या आवाजांत तरल भावना नसतातच. ठेक्यावरच्या गाण्यांत केवळ 'मी एक स्टड आहे' एवढाच मेसेज कानावर आदळत रहातो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'मी एक स्टड आहे' एवढाच मेसेज कानावर आदळत रहातो.

किंवा मी एक आयटम आहे Sad
मग आयटम नसलेल्यांनी काय करावं? ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तरीसुद्धा आपल्या मैत्रीत एक मात्र बरं आहे
रात्री अपरात्री बापा देखत बोलायची सोय आहे
खरं कारण हेच आहे ...
बाकी सगळं सोशेल आहे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पोथी पढी पढी जग मुआ...पंडित भया ना कोय...
ढाई आखर प्रेम का पढे सो पंडित होय..

आज काल मुलामुलींना आॅप्शन्स् अॅव्हेलेबल आहेत ,उगाच एकदुजे के लिये वैगेर भानगडीत पडत नाहीत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

!नाद!