इस Q के...

हे माझं अजून एक पुर्वप्रकाशित. (जरा काहिही हं T टायपाच आहे)

ईस Q के....
ह्याही रविवारची सुरुवात नेहमी सारखी बारगळली. प्रत्येक सुट्टीला काहीतरी Happening, crazy, तुफानी, Larger than Life करावसं वाटत आणि एखादा अपवाद सोडला तर नेहमी या योजनांचा बोजवाराच ऊडालेला असतो. आज पण alarm ला 3 वेळेस snooze करुनही नेहमीपेक्षा लवकरच जाग आली, ऊशीरा निवांत ऊठण्याची पहिली योजना बारगळली.
Well beginning is half done जर खरंचअसेल तर आज No beginning no done झालं.
झोपेतून ऊठल्या ऊठल्या आणि डोळे ऊघडायच्या आत ह्या Q ने घेरल.
ह्या Q न सुट्टीच खोबर करुन टाकलय. खुप आणि खुपच छळलंय...
Question मधला Q वाचला
Queue मधला Q वाचला
Queen मधला Q वाचला
Quest मधला Q वाचला
Quad मधला Q वाचला
पण Q ची Query काही सुटली नाही,
आणि Q च्या प्रश्नांना Quench करता आलं नाही
Oxford मधले सगळे Q एकदमच वाचून काढले
सग्गळ्या Q नंतर U च येतोय यार...
काय विचार करुन बनवलं असेल देवच जाणो, पण
Q नंतर U च का यावं???
क्यूं???? नंतर ultimately यू च...का?
का??? नंतर फक्त तू च...का?
Q 'U'?

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet