Skip to main content

खरडफळा फुलबाज्या - ज्योतिष


डिस्क्लेमर-
ज्योतिष शास्त्र आहे की नाही? .......................... माहीत नाही.
कुंडली मांडता येते, गणिती द्न्यान आहे? ......................नाही अर्धवट माहीती आहे. व मुख्य थोडाफार पडताळा आहे.
ज्योतिषविषयी प्रश्न विचारला तर उत्तर देता येइल? ...................... डिपेन्डस!
मला ज्योतिषविषयक माझे काही अनुभव सांगायचे आहेत - जरुर! स्वागत आहे. त्याकरताच हा धागा आहे.
ज्योतिषविरोधी एकाही प्रश्नावर मी गिल्ट ट्रिप वर जाणार नाही आणि प्रश्नाकडे सोईस्कररीत्या दुर्लक्ष करणार आहे. तरी चालू द्या.
हंसाची चाल डौलदार असते पण म्हणून अन्य पक्ष्यांनी चालूच नये काय? तद्वत नाही आमचे इन्टरेस्टस - विद्न्यान, विदा, नास्तिकपणा, पुस्तकवाचन आदि बौद्धिक! पण म्हणून आम्ही अडखळत व्यक्त होउच नये काय?
त्यातही कोणाला अंधश्रद्धानिर्मूलनाचा पुळका आला, तर हा धागा स्थगित करावा/उडवावा.

_________________________________________________________________
शुचि -

वृश्चिक राशीबद्दल अनुभव सांगायचा तर - वृश्चिकेचा एक अक्षरक्ष: एक जातक मला असा पहायचा आहे जो आपल्या राशीचा एक उत्तम अँबॅसेडर नसतो. They belong to their tribe & make it proud.
तूळ चंद्र - अतिशय संतुलित रास आहे. डोक्यावर थंड बर्फाचं पाणी ओतलं तरी संतुलन ढळणार नाही हाहाहा.
वृषभ चंद्र - शांत, समाधानी असतात. यांच्या संगतीत मनास एक शांतता अनुभवास येते.
कर्क चंद्र - हत्तीची स्मृतीक्षमता असते. २० वर्षापूर्विचे डिटेल्स अगदी बारकाव्यांसकट आठवतात. Be careful with them. They will NEVER forget how you made them FEEL.
सिंह शुक्र - मला २ लोक माहीत आहेत. तुम्ही त्यांना उचित सन्मान द्या आणि मग पहा हा सिंह करा मांजर बनतो. (वाईट अर्थाने नव्हे तर चांगल्या अर्थाने)
भरपूर खिडक्यावाले घर हवे. प्रत्येक खिडकीमध्ये सुपरहेल्दी हिरवीगार रोपटी हवीत. नाही फुलं नकोत फक्त फॉलियाज (पाने). ओह माय गॉड!!! आणि आपल्यापाशी खूप वेळच वेळ हवा.उदाहरणार्थ लॉटरी लागलेली असावी आणि माझ्या मुलीनी परत एकदा पिल्लू बनुन जावं (= वेळ मागे जावा)
मग मी १००% परफेक्ट आई बनून दाखवेन Smile
- कर्क चंद्र मैत्रिण
_____________
आपण आपल्याकरता समर्थपणे आणि ठाम उभे राहीले नाही तर अन्य कोणी कसे राहील? - मेष सूर्य मैत्रीण
____________
घरात एक जरी कन्या राशीची व्यक्ती असेल तर त्या आख्ख्या घरादाराला, काही पहावं लागत नाही एक ऑर्डर असते घराला, वळण असतं, व्यवस्थितपणा, टापटिप असते.
____________________
माझा एक (कुंभ चंद्र) सहकारी - मी सध्या घरात सोलर पॅनल्स वर काम करतो आहे. त्याकरता बेल्स लॅबमध्ये वीकेंडला जाउन आलो. तिथे एकाला भेटलो. ......... मी आज 'हॉलोग्राफिक इमेजेस' बनवण्याच्या कार्यशाळेत नाव नोंदवलं, ..... मी परवा मॉडर्न आर्ट म्युझिअम ला भेट दिली. ..................... मी पेनीज बनवणाऱ्या कारखान्याला गेल्या आठवड्यात भेट दिली.
मी - ए बाबा जरा माणसासारखा वाग. कोणत्या भाषेत बोलतोयस तू?
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++

अचरट -

पिरिओडिक टेबल जसे प्रत्येक मूलद्रव्याचे गुणधर्म सांगते तसेच ग्रह काम करतात या गृहितकावर ज्योतिष उभे आहे.
डोकेबाजपणा - बुध,
चिकाटीने काम,मालक - शनि,
पोकळ बडेजाव,स्थैर्य - गुरु,
काम तडीस नेणे,पदाधिकारी -रवि,
मानसिक संतुलन,लोकमान्यता -चंद्र,
तडकाफडकी झटपट उरक - मंगळ,
परदेश, घुसखोरी - राहू,
सुखभोग,लोभसपणा - शुक्र,
कल्पकपणा - नेपच्युन
++++++++++++++++++++++++++

शुचि-
च्रट्जी ते आता एक्सेसिव्ह बेसिक झालय. राशी आणि ग्रहांचे, बेसिक बिल्डिंग ब्लॉक्स पाठ आहेत.
थोडी उदाहरणं द्या ना. नुसती थिअरी काय कामाची?
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

अचरट -
मागच्या निवडणुकींपुर्वी सर्व मोठ्या नेत्यांच्या कुंडल्या चर्चेत आलेल्या. कोणकोण पंप्र होणार नाही. बरोबर वर्तवलेलं.
++++++++++++++++++++++++++++++++++
अदिती-
पिरिआॅडिक टेबल आणि ग्रहांमधून ज्योतिष ही तुलना समजण्यासाठी मला सगळं भौतिकशास्त्र विसरावं लागेल. नकोच ती पीडा!
++++++++++++++++++++++++++++++

शुचि-
च्रट्जी लेख नको मग फक्त टिका आणि टिका त्यावर येइल. टिकेला हरकत नाही फाट्यावर मारता येते पण कोणाला इन्टरेस्ट असणारे धड काही भरीव उदाहरणं देणार नाहीत.
.
एक फेमस ज्योतिषी बाई आहे. तिच्या मते ज्योतिष हे प्रेडिक्ट्टिव्ह टूल नाहीच तर ते अवेअरनेस टूल आहे.
.
माझा ८ वी पासूनचा एक मित्र आहे आणि मी त्याला जपून आहे कारण तो एकच मित्र आहे आणि अनेक टीनएजर आठवणी त्याच्याबरोबर जोडलेल्या आहेत् . I cannot afford losing his friendship. कर्क-शुक्र, कर्क-सूर्य,वृश्चिक-चंद्र तोही १२ व्या घरात, मीन=मंगळ असे त्याच्याही कुंडलीत जलराशींचे आधिक्य आहे.
आमच्यात किंचीत telepathy आहे म्हणायला हरकत नाही. असं उदाहरण द्यायला संकोच वाटतो कारण ते कोणीही एका फटक्यासरशी नाक मुरडून उडवुन टाकेल की ह्या! ही काय टेलिपथी झाली. असो.
________________
एक अत्यंत आवडती धडाडीची व सुपर ड्युपर बुद्धीमान मैत्रिण आहे. कन्या-सूर्य तूळ-लग्न, वृश्चिक-चंद्र, सातव्या घरात मंगळ. वगैरे. आय आय टी, आय आय एम व त्या उपरांत करीअरचा चढता व वेगवान आलेख. सॉलिड आहे ती. There was a strange, striking moment , between us which is utterly inexplicable. अशा अनुभवांमुळे फक्त भौतिक जगापलिकडे काहीतरी असल्याचा विश्वास बसतो.

Both of them belong to Scorpio triebe Ref their moons. आणि म्हणुन मग कोणी वृश्चिक चंद्र आहेत असा संशय आला की माझे कान टवकारतात. अर्थात असे अन्य काहीजण आहेत, we are different as chalk & cheese. तेव्हा १००% ग्रहच रुल करतात असे म्हणता येत नाही. पण एक पोटेन्शिअलकडे बोट दाखवतात.
____________________________
धनु, कुंभ आणि सिंह लोक माझ्याकरता कोडे (enigma) आहेत. परग्रहवासी असल्या सारखे वाटतात.

Node read time
4 minutes

ललित लेखनाचा प्रकार

4 minutes

सामो Tue, 12/03/2019 - 10:46

हां अजुन एक उदाहरण आठवलं. एक जनरल फोरम आहे. तिथे ज्योतिषविरोधी वातावरण असतं, तिथे माझी एक कर्क-चंद्र मैत्रीण ज्योतिषविषयक पोस्टस टाकत बसते. आता या बाईला कळायला हवं नको तिथे नको तो विषय मांडू नये पण नाही. खेकडा कसा नांगी तुटली तरी पकड सोडत नाही तशी ही आपलं म्हणणं काही बदलत नाही की सुधरत नाही. :D :D :D
कर्क जातकांचा स्वभाव आहे तो एखादी गोष्ट पकडली की सोडायची नाही.

शशिकांत ओक Mon, 25/03/2019 - 10:41

In reply to by सामो

ज्योतिष विषयावर धागा सुरु आहे हे पाहून नाडीग्रंथ भविष्याचा विचार सादर करायला सुरसुरी आली.
सायन-निरयन, पौर्वात्य आणि पाश्चिमात्य कुंडलीत ग्रह मांडायची पद्धत वगैरे चर्चा होत राहतील. ताडपट्टीवर कोरलेले ज्योतिष, त्यात मांडून आलेली जन्माच्या वेळची ग्रह परिस्थिती आणि अन्य कथन ज्योतिष शास्त्राला वेगळ्या स्तरावर पोहोचवते.

प्रकाश घाटपांडे Tue, 12/03/2019 - 11:48

अयनांशामुळे आता बरेच निरयन कुंडलीतील ग्रह सायन कुंडलीत पुढच्या राशीत जातात तरी त्यांची फळे तीच कशी काय राहतात बुवा! हातचा बदलला तरी गणित मात्र कस काय बरोबर येत ? कारण जातक ज्योतिषी संबंध हे गणितच वेगळे असते. ते ॲब्स्टरॅक्ट आहे

सामो Tue, 12/03/2019 - 11:57

In reply to by प्रकाश घाटपांडे

सायन - निरयन कूटप्रश्नच आहे. मला वाटतं तुम्ही इस्टर्न/वैदिक पद्धत आणि वेस्टर्न पद्धतीबद्दल बोलताय. बहुतेक.
जेव्हा सॅम जेप्पी सांगत असतो ही पोर्णिमा बवृषभ चंद्राची आहे तेव्हा बिग स्काय ॲस्ट्रॉकलॉजी आणि इतर म्हणत असतात मिथुन चंद्राची आहे. तो घोळच आहे.
_____
माझी रास वैदिकेत कर्क आहे तर पाश्चात्य कुंडलीत सिंह दाखवतात. सिंहेचा एकही गुण नाहीये माझ्यात. ना मी flamboyant, vivacious, extrovert आहे, ना कोणी मला अति अटेन्शन (लक्ष) दिलं तर मी नर्व्हसच होइन उलट. की नको ती प्रसिद्धी.
पण कर्क राशीचे गुण मात्र खूप आहेत.
_________-
तेव्हा मलाही तो फरक का ते माहीत नाही.

सामो Tue, 12/03/2019 - 12:24

In reply to by प्रकाश घाटपांडे

पण घाटपांडे तुम्ही जी चिकीत्सक दृष्टी व ओपन माईंडेडनेस दाखवता तो मला नेहमीच आश्वासक व कौतुकास्पद वाटतो. चिकीत्सा हा कन्येचा गुण आहे. आता मला माहीत नाही तुम्ही कन्या राशीचे आहात अथवा नाही. पण कौतुकास्पद गुण आहे.
________________________
आस्तिक नास्तिकतेबद्दल माझ्या एका कन्या सहकाऱ्याचे मत - अरे यार! तुम्ही छातीठोकपणे आस्तिकच आहोत आणि देव आहेच किंवा नास्तिकच आहोत आणि देव नाहीच कसे सांगू शकता. इतका ओव्हरकॉन्फिडन्स येतो कसा लोकांना, माझ्या सारखे गोंधळलेले लोक नसतातच का?
.
अगदी बरोबर कन्या चंद्र आहे तो. तो फट्टकन खोटा आत्मविश्वास दाखवणार नाही. तो विश्लेषक आहे , चिकीत्सक आहे. अनंत काळ तो चिकित्सा करेल पण जेव्हा त्याला उत्तर सापडेल ना तेव्हा ते परफेक्ट असेल मग त्यात कोणी खोट काढू शकणार नाही.

चिमणराव Tue, 12/03/2019 - 12:21

>>धनु, कुंभ आणि सिंह लोक माझ्याकरता कोडे (enigma) आहेत. >>
हे खरंच.
चंद्र मनाचा कारक हे दोन्हीकडे मान्य आहेच. धनुचा कल अध्यात्माकडे, कुंभेचा कल जमवून ठेवायचे सर्व पण नक्की त्याचे काय केव्हा वापरायचे हेच निश्चित नसते॥ सिंह म्हणजे फारच सुस्तपणा करतात मग अचानक मोठा पंजाच मारतात माशीवरही. अरे तू जरा वेळीच मान हलवलीस तर माशी उडेल की.

सामो Tue, 12/03/2019 - 12:38

In reply to by चिमणराव

कुंभ ही इन्टेलेक्च्युअल (बौद्धिक) वायू राशिंपैकी शेवटची रास. पहील्या २ वायु राशी - मिथुन व तूळ. कुंभ म्हणजे वायू राशींची, बौद्धिक गुणाची परिपूर्णता. अनेक संशोधक या राशीत आढळतात.
.
ठीक आहे ही झाली थिअरी. मग मी मला विचारते तू काय पडताळलस.? का तू हो ला हो केलस?
त्यातून शोध सुरु होतो मानवी स्वभावाच्या अभ्यासाचा पण ज्योतिष शास्त्राच्या दृष्टीकोनातून. आणि असा छंद असणं यात चूकीचं काहीच नाही.
.
मग मला माझ्या ओळखीतिल एक कुंभ चंद्र बाई आठवतात ज्यांच्या स्वत:च्या थिअरीज असत. 'शुचि इंग्रज बुद्धीमान जमात. इंग्रजी राज्यावर एके काळी सूर्य मावळत नसे. पण ते इतके बुद्धीमान का तर सर्वबाजूनी समुद्राने वेढलेले. मासे मुबलक तेच स्टेपल अन्न म्हणून मग मेंदू तल्लख.'
आणि काही थिअरीज होत्या मी विसरले.
सांगायचा मुद्दा हा की बौद्धिक नजरिया (आउटलुक). .
हा माझा कुंभ चंद्र सहकारीही - शुचि तू ऑटोमेशन शीक. हा दुवा घे, तो दुवा घे म्हणून मला दुवे पाठवत असतो. मलाही काही माहीत नव्हते पण मी शिकलो. सोप्पे आहे.
या प्रसंगात मला त्याच्या सदिच्छा जाणवतात पण त्याच बरोबर बौद्धिक कामातील उत्साह जाणवतो.

सामो Tue, 12/03/2019 - 15:33

In reply to by बॅटमॅन

मेष सूर्य सांगीतलय की वर
आणि मेष चंद्र माझं जमत नाही :D त्यामुळे असा avid इन्टरेस्ट घेउन कधी नीरीक्षण नाही झालं.
हां हा एक पुरावा की मी सिंह-चंद्र नाही त्याचा. कारण मेष व सिंह दोघात गट्टी असते दोन्ही एकाच म्हणजे अग्नी तत्वाच्या म्हणुन. माझी मेषेबरोबर (मेष चंद्र) अजिबात गट्टी कधी झालेली नाही.
पण मला तरी लिमिटेड नीरिक्षणावरुन असे वाटते की एडका/मेंढा जसा डोक्याने धडका देत सुटतो. (अनेक विनोदी व्हिडिओज आहेत फेसबुकवर) तद्वत हे लोक उगाचच भांडतात. मान्य आहे तत्वाकरता भांडतात पण उगाचच आणि खूप.
हा बघ -

.
.
हाहाहा सॉलिडे तो व्हीडीओ. मी असे ऐकले आहे की मेंढ्याने हल्ला केला की अंगाचं गोल मुटकुळं करुन . पडुन राहून आपला बचाव करायचा.

चिमणराव Tue, 12/03/2019 - 16:11

छोट्याशा उंचवट्यावर उभे राहून इकडे तिकडे पाहात "मी उंचावर"
"बरं बरं तूच उंचावर."

बाकी मेषपात्र हा वाक्प्रचार मराठीत आहेच.
मेष राशीतले शनि ,गुरु,रवि,मंगळ हे फार प्रभावी तीक्ष्ण फले देतात. मेषेचा रवि जिथे असेल ते स्थान आयुष्यात एकदातरी जाळतो. दोन आगी एकाच ठिकाणी. समोच्या स्थानासही झळ लागते.

सामो Tue, 12/03/2019 - 18:20

In reply to by चिमणराव

मेषेच्या एका विशिष्ठ नक्षत्रात शनि नीचीचा असतो एवढेच माहीत आहे मला. बाकी माझ्या द्न्यानाची फार भेसळ आहे हे मी मान्य करते. कारण पहाते कुंडली http://astrosage.com वरती जी की वैदिक साईट आहे पण निकष लावते पाश्चात्य पद्धतीचे & still i get convinced & have convictions ;)
- अर्थात प्रत्येक ग्रह कोणत्या ना कोणत्या राशीत उच्चीचा असतो, एका राशीत नीचीचा असतो. एका राशीत स्वस्थानी असतो व अन्य एका राशीत weak स्थानी असतो.
सांगायचा मुद्दा की यात मेषेचा काही दोष वगैरे नाही.
.
उदा सूर्य मेषेच्या एका नक्षत्रात (बहुतेक अश्विन) एका बिंदूला उच्चीचा असतो.

चिमणराव Tue, 12/03/2019 - 16:16

कुंभेची विशेष आवड - पेप्रातला फक्त सोन्याचा भाव पाहणे, आपले राशिभविष्य पाहणे.
साठलेल्या पैशाच्या आढाव्याने आपोआप गुदगुल्या होतात.

सामो Tue, 12/03/2019 - 19:03

ज्योतिष विषयात विशेष कोणाला रुचि नाही हे वारंवार लक्षात आल्याने, यापुढे या विषयावरील एकांगी चर्वितचर्वण बंद करण्याचा निर्णय मंडळ घेत आहे :D :D :D त्यामुळे या विषयावरती, नवीन धागे माझ्याकडुन तरी निघणार नाहीत. :)
देर आये , दुरुस्त आये!

चिमणराव Tue, 12/03/2019 - 19:12

मोठे आणि हळू फिरणारे ग्रह राशिंपेक्षा इतरांच्या किती जवळ अथवा दूर आहेत यावर फलांत बदल होईल. शिवाय हे पाहताना सायन निरयन मोजपट्टी निरर्थक ठरेल. म्हणजे शनि-रवि समोरासमोर असतील तर कोणत्याही परिमाणाने समोरासमोरच राहतील. ( no change in aspect ) राशि वेगळ्या येतील. म्हणून कदाचित >>पाश्चात्य पद्धतीचे & still i get convinced & have convictions >>returns true.?

सामो Tue, 12/03/2019 - 20:21

कोई मिल गया, मेरा दिल गया ....... क्या बताउं यारो मै तो ...... लालालाला लल्लाल्ला!!!

एक स्टार मिल गया. ज्या कोणी एक स्टार का होइना या धाग्याला बहाल केला त्याचं देव भलं करेल :D

राही Tue, 12/03/2019 - 22:39

इथे घाटपांडेकाका असताना फार ज्ञानदीप पाजळणे योग्य नव्हे. पण फल सांगताना ग्रह, भाव, राशी, नक्षत्र, अंश, अवस्था, योग, दृष्टी, दशा (जन्मकाळची आणि सध्याची) अश्या अनेक अंगांनी जन्मपत्रिका निरखावी लागते. शिवाय 'स्थलकालानुसारेण' तर आहेच. खूपच पर्म्युटेशन्स कॉम्बिनेशन्स होतात. अर्थात कम्प्यूटर या प्रत्येक कॉम्बिनेशन्साठी फलित सांगू शकतो. पण साकल्य नसते. तिथे प्रत्येक पैलू/अंगाच्या दबावाचे (वेटेज) प्रमाण जोखताना सध्यातरी मानवी प्रज्ञा/बुद्धी वापरावी लागते.

भांबड Wed, 13/03/2019 - 12:24

मीनेच बघा की काही. सगळ्यात शेवटली रास आहे, १०० व्या प्रतिसादात नको म्हणून...

सामो Wed, 13/03/2019 - 13:50

In reply to by भांबड

मीन माहीत नाही नीट. व्यक्ती आठवतायत पण त्यांच्यात विशेष मीनेचे गुण आढळल्याचे स्मरत नाहीये.
उदा - मीनेचा चंद्र असलेली एक नात्यातील मुलगी आहे. पण तिचा सूर्य आहे मकरेचा पहील्या घरात. सूर्याच्या पहील्या घरातील स्थानामुळे, तिच्यात नेतृत्वगुण आहे. मीनेच docile स्वभाव झाकोळला आहे.
मीनचं नाही माहीत नीट.

अतिशहाणा Wed, 13/03/2019 - 15:08

वृश्चिक राशीबद्दल अनुभव सांगायचा तर - वृश्चिकेचा एक अक्षरक्ष: एक जातक मला असा पहायचा आहे जो आपल्या राशीचा एक उत्तम अँबॅसेडर नसतो. They belong to their tribe & make it proud.

+1

सामो Wed, 13/03/2019 - 20:56

In reply to by चिमणराव

माझ्या माहीतीप्रमाणे सहावे घर(कन्या राशीचे स्वस्थान्) उघड शत्रुंचे स्थान आहे
१२ वे घर (मीन राशीचे स्वस्थान) हे छुप्या शत्रुंचे स्थान आहे.

सामो Thu, 14/03/2019 - 04:12

शुक्र या ग्रहाच्या कारकत्वाबद्दल इतकं वाचलय. -
(१) कोणी म्हणतं शुक्र हा प्रेमाचा कारक असल्याने ज्या राशीत शुक्र असतो त्या राशीसारखे तुम्ही प्रेमात असताना वागता. .......................... मला याबद्दल खात्री नाही.
(२) कोणी म्हणतं शुक्र हा आवडीनिवडीचा कारक असल्याने,ज्या राशीमध्ये असतो त्या राशीची अभिव्यक्ती जे जे करते ते ते तुम्हाला आवडते ...........................

(३) कोणी म्हणतात शुक्र हा तुम्ही सोशली कसे रिलेट करता त्याचा कारक आहे................................... हे १००% खरे आहे.
.
स्वानुभावाने, राशी हा स्फटीकदीप आहे, आकाशकंदील आहे. तर प्रत्येक ग्रह, त्या मधील ज्योत आहे. शुक्राच्या राशीमुळे तुमच्या प्रेमाच्या अभिव्यक्तीला त्या राशीचा रंग येतो.

उदाहरणार्थ तुमचा शुक्र वृषभेचा असेल तर एक संथ, No hurry/no worry असा शांतपणा तुम्ही प्रेमात व्यक्त कराल घिसाडघाई सोडाच अजिबात घाई सुद्धा करणार नाही. You will take your sweet time.

याउलट जर मेषेचा शुक्र असेल तर You love chase. साहस, धडाडी हे गुण तुम्हाला आवडतील, ते तुम्ही तुमच्या प्रेमिकावरही प्रोजेक्ट कराल.
.
माझ्या अनुभवात वृश्चिक ही रास राशीचक्रातील सर्वाधिक इन्टेन्स रास आहे आणि इथला शुक्र अन्य लोकांशी रिलेट करण्याची तीव्र उर्मी देतो. खूप गरज असते रिलेट करण्याची in width as well as in depth.

वृश्चिकेचा चंद्र पहीलं पहातो ते सेल्फ प्रिझर्व्हेशन, स्वसंरक्षण. हे लोक तुमच्याकडे उघड होणारच नाहीत. कारण knowledge is power. Knowledge can lead to manipulation. They will be ALWAYS be guarded. कारण चंद्र मनाचा कारक आहे.

तसं वृश्चिकेच्या शुक्राचं नाही. वृश्चिकेचा शुक्र असलेली व्यक्ती तिची माहीती चटकन देइलही. But in love she will act very dark. They may even stalk. (You got to be very lucky to get that kind of love & attention हाहाहा)

हा फरक आहे खरा चंद्र राशीत आणि शुक्र राशीत.

सामो Thu, 14/03/2019 - 05:19

In reply to by चिमणराव

तुम्ही? येस्स्स्स्स!!! अत्ता आठवलं तुम्ही सुद्धा वृश्चिक-शुक्र आहात.
सेम पिंच!
माझा अनुराधा नक्षत्रात आहे. अनु+राधा. म्हणजे राधेला अनुसरणारी. प्रचंड डिव्होशनल (समर्पण) सुंदर नक्षत्र आहे ते.

चिमणराव Thu, 14/03/2019 - 10:57

वृश्चिक ताकासमुह हा आकाशात बघण्यासारखा असतो मोठा विंचवासारखाच आकार. तिथे चंद्र आल्यास चंद्राच्या उजेडाने तारे अंधुक होतात पण ठळक शुक्र मात्र विंचवाने नांगी मारल्यासारखा दिसतो. ☹

कासव Thu, 14/03/2019 - 11:26

‛आकाशाशी जडले नाते’तल्या प्रास्ताविकेत डॉ. जयंत नारळीकरांनी सांगितल्याप्रमाणे बाकी काही नाही वाचले तरी प्रकरण 50 (खगोलशास्त्र आणि फलज्योतिष) पुन्हा एकदा वाचून काढले. पण तरीही बार्नम इफेक्ट म्हणा की हा धागा इफेक्ट म्हणा - फलज्योतिषावर असा धागा यायलाच हवा होता. फलज्योतिषाला टाळलं तर उगी निष्कारण एका विषयाला पारखा झाल्याचं फिल छळत राहण्यापेक्षा धागा आला ते बरं झालं. तो तसा आणल्याबद्दल धागाकर्त्यांना धन्यवाद.

बाकी ते राशीचा चंद्र वगैरे कसे आले ते कळाले नाही. म्हणजे मला राशीवरून चंद्र वगैरे ओळखता येत नाही. बहुधा पंचांगात पाहावे लागेल.

घरात जर तिघांची रास (विशेषकरून आईवडील व मुलगा यांची) एकच असेल तर शांती करावी असं बरेच दिवसांपूर्वी घरात ऐकलेलं आठवतंय. त्यावरून शांती भंग करणाऱ्या ग्रहांबद्दल कुतूहल आहे.

कोणत्या तरी कोष्टकाच्या आकड्यावर बोट ठेऊन अमुक वस्तू कुठं पडली असेल वा अमुक व्यक्तीला नेमकं काय झालं असावं हे सांगितलं जातं ते एक भारी वाटतं!

सामो Fri, 15/03/2019 - 20:07

च्र्ट्जी केतू हा १२ व्या घरात उच्चीचा असतो कारण १२ वे घर हे मोक्षाचे घर आहे. तर १२ व्या घराच्या मीन राशीचे कारकत्व नेप्च्युनकडे दिएलेले आहे. मग या दोघांत साम्य काय तर मीनमध्ये बुध हा नीचिचा असतो. मीन लोकं, नेपच्युनिअन लोकं, ही डोक्यापेक्षा, हृदयाने काम घेतात. केतू कसा आहे? डोके उडलेला. बस्स!!! यही है वोह राज.

चिमणराव Sat, 16/03/2019 - 06:09

@कासव, नारळीकरांचे पुस्तक वाचून बराच काळ गेला. आठवत नाही बार्नम इफेक्ट. पण त्यांचा ज्योतिषावर विश्वास नव्हता. काही हरकत नाही. माझा किंवा इतरांचा थोडा आहे. ज्योतिष/भाकित म्हणजे प्राबबिलटि थिअरी म्हटलं तर चूक होणार नाही.
जन्मकाळी-वेळी चंद्र ज्या राशीत ती त्याची रास. प्रत्येक राशीचा एक स्वभाव गुणधर्म धरल्यास तसा स्वभाव असतो. पण स्वभाव, विचार करण्याची पद्धत इतर ग्रहसुद्धा ठरवतात. त्यामध्ये शनि रवि हे ग्रह प्रभावी. एकाचा शनि ज्या स्थानात ( बारा स्थानांपैकी) आहे त्याच स्थानात दुसऱ्याचा रवि असेल तर तर ते विरुद्ध विचारांचे असतात. तसेच मंगळ -बुध, गुरु -शुक्र या जोड्या आहेत.

कासव Sat, 16/03/2019 - 08:50

In reply to by चिमणराव

नारळीकरांचे पुस्तक वाचून बराच काळ गेला. आठवत नाही बार्नम इफेक्ट.

तोच तो बार्नम इफेक्ट - जो बार्नम (बार्नम अँड बेली सर्कसचा मालक) सांगतो की, त्याच्या सर्कशीत वेगवेगळ्या प्रकारचे खेळ असतात व त्यातला कुठला ना कुठला तरी खेळ प्रेक्षकाच्या आवडीचा असल्याने खेळ लोकप्रिय बनतो. त्याप्रमाणे फलज्योतिषाचे निदानही असेच असते, असे डॉ. नारळीकर त्यांच्या पुस्तकात सांगतात.

बाकी सविस्तर माहितीबद्दल धन्यवाद. शंका आल्यास अजून विचारेनच...

सामो Wed, 03/04/2019 - 19:48

असं उदाहरण द्यायला संकोच वाटतो कारण ते कोणीही एका फटक्यासरशी नाक मुरडून उडवुन टाकेल की ह्या! ही काय टेलिपथी झाली. असो.

च्रट्जी, काल त्याला अर्धी इमेल लिहून डेलीट केली आज अक्षरक्ष: आज (४ महीन्यांनंतर) त्याची इमेल आली, 'न्यु जर्सी ला कधी जातेयस?' .................... एक तर तो तरी ह्या साईटवर आहे किंवा प्युअर टेलिपथीचा हा २० वा प्रसंग.

चिमणराव Wed, 03/04/2019 - 20:24

नोकरी ,धंधा, व्यवसाय यासाठी लागणारे ग्रहयोग तसेच दरवर्षीची परिस्थिति यावर नवीन ज्योतिषात अभ्यास व्हायला पाहिजे. ही काळाची गरज आहे.
स्वभाव विशेष आणि राशी यात करमणूक मूल्याशिवाय काही नाही.
(( सध्या गुरु दशमेशाशी चांगला आस्पेक्ट करत आहे काय? किंवा चतुर्थ स्थानास पाहात आहे काय?))

सामो Wed, 03/04/2019 - 21:14

In reply to by चिमणराव

गुरू - लकी ग्रह, सध्या (हा वर्षभर तरी) माझ्या विवाह स्थानात आहे :) अर्थातच याचा अर्थ दशमाशी आणि चतुर्थाशी सुद्धा आस्पेक्ट करतो आहे.

चिमणराव Wed, 03/04/2019 - 20:32

दुसऱ्याला दुखावून बोलण्याचा स्वभाव नसल्याने (( absence of STING theory )) हितचिंतक जास्ती आहेत.
------
प्रवासाला निघताना ( उदाहरणार्थ ), काही सूचक गोष्टी आपल्याला आश्वस्त करतात की सर्व छान होणार तीसुद्धा टेलिपथी असावी. मी हळूहळू हे मानायला लागलो आहे.

GaneshaSpeaks Mon, 12/04/2021 - 09:53

वैशिष्ट्य आहे मेष मेषातील सर्वात सुंदर पोशाख चिन्ह आहे. हा बडबडलेला राम एक मुख्य चिन्ह आहे, ज्याचा अर्थ असा आहे की ते पदभार स्वीकारण्यास नेहमीच पुढे असतात. जर आपल्याला कधीही मेष म्हणून ओळखले जात असेल तर, ते त्यांच्या सामर्थ्यशाली चुंबकीय शब्दांसह कोणासही मोहित करु शकतात आणि आपल्याला फक्त धूळफेक्यासारखे वाटू शकतात https://ganeshaspeaks.com/talk-to-astrologer . मेष त्यांच्या “चला करू द्या” म्हणून ओळखले जातात! वृत्ती, तसेच "एक ट्रॅक मना" आव्हानांना स्वीकारणे आणि त्यावर मात करणे ही त्यांच्यासाठी तथाकथित क्रिया करण्यासारखे आहे. मेष थ्रिल शोधणारे असतात आणि अन्वेषण करण्यासाठी एखादे गंतव्य शोधण्याची वेळ येते तेव्हा ते त्यांचे हृदय व आत्मा ठेवतात

sonaliverma Fri, 28/06/2024 - 17:45

मेष स्वतःच्या पद्धतीने कामे करतात. ते संघर्षाला घाबरत नाहीत, अत्यंत स्पर्धात्मक आणि प्रामाणिक असतात. ते न घाबरता जगतात.

मेष राशीच्या लोकांना स्वतःला आणि त्यांची ताकद सिद्ध करायला आवडते. त्यांच्याकडे चांगली ऊर्जा आहे आणि ते स्पर्धात्मक आणि महत्त्वाकांक्षी आहेत. ते कोणत्याही प्रकल्पाची जबाबदारी घेऊ शकतात कारण ते सुरू करण्यात चांगले आहेत. ते अधीर आहेत, नैसर्गिकरित्या सक्रिय आहेत आणि वेळ वाया घालवायला आवडत नाहीत.

मेष राशीला स्पर्धा आवडत असली तरी त्यांना खेळ खेळायला आवडत नाही. ते अत्यंत आत्म-जागरूक आहेत, त्यांची ठाम मते आहेत आणि त्यांचे रक्षण करण्यासाठी ते नेहमी तयार असतात.