फोनवरच संभाषण (२)

भाग १ - फोनवरच संभाषण

त्यानंतर एक दोन महिने गेले. सुहासबद्दल ती अगदी विसरून गेली होती. आणि एक दिवस तिचा नवऱ्याने तिच्या हातात एक पाकीट दिले. पत्र सुहासकडून होते. तिने उघडून पाहिले आणि तिला धक्काच बसला.
-------------------------------------------------------------------------------------

आत मोरपिसाचे चित्र असलेल्या कागदावर एक कविता प्रिंट केली होती. कविता वाचताना तिच्या लक्षात आलं कि ती तिचीच कविता होती. कॉलेजमध्ये असताना कधी तरी केलेली. त्याच्या खाली त्याने त्या कवितेचं विडंबन ही केले होते. आणि पत्राच्या शेवटी "वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!" असं लिहिलं होतं. तिचा वाढदिवस दोन दिवसांवर आलाय हे तिच्याही लक्षात नव्हतं.

"ओ माय गॉड!" ती उद्गारली
"काय झालं?" तिचे विस्फारलेले डोळे आणि तोंडावरचा हात बघून नवऱ्याने विचारले.
"हे बघ." तिने कागद त्याच्या हातात दिला. त्याने ती कविता मोठ्याने वाचली. "कुणाची कविता ही?" हसत त्याने विचारले.
"माझीच. मी बहुतेक कॉलेजच्या वार्षिक मासिकात दिली होती एका वर्षी. त्याने कुठून उपलब्ध केली कुणास ठाऊक?" ती अजूनही त्या कागदाकडेच बघत होती. "हाऊ नाईस ऑफ हीम. माझ्याही लक्षात नव्हता माझा बर्थ डे!" ती पुटपुटली.
"चांगलाच मित्र दिसतोय तुझा. कॉलेजमध्ये तुझ्यावर क्रश वगैरे नव्हता ना?" तिचा नवरा गमतीने म्हणाला.
"मला नाही वाटत. दुसऱ्या वर्षात असताना, आमची एक जुनिअर त्याला आवडायची. पण ती होती मुस्लीम म्हणून त्याने विचारायचं कधी धाडस केलं नाही. मला वाटत त्या वयातली मैत्रीच अशी असते. आता आपण करायचं म्हटलं तरी असे मित्र मिळत नाहीत." थोडसे भारावून जाऊन ती म्हणाली.

दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी त्याचा फोन आला. तिला गिफ्ट मिळालं का हा त्याचा पहिला प्रश्न होता.
"हो मिळालं. अँड थँक्स फॉर दॅट. इट वॉज द नाईसेष्ट गिफ्ट आय हॅव रिसीव्हड सो फार." प्रामाणिकपणे तिने सांगितलं.
"मला माहित होतं तुला खूप आवडेल ते. तुला आठवतं आपण एकदा कॉलेजमध्ये तुझा बर्थडे कसा साजरा केलेला?" उत्सुकतेने त्याने विचारलं.
"माझ्या बर्थडे च्या निमित्ताने तुम्ही बियर प्यायली होती. आठवतंय ना! आणि आम्हा मुलींना तुम्हा लोकांना झिंगलेल्या अवस्थेत तुमच्या होस्टेल वर सोडून यावं लागलं होतं. त्यानंतर आमच्या रेक्टरचं आम्हाला किती बोलणं ऐकावं लागलं माहित आहे का तुला?" लटक्या रागाने तिने म्हटले. त्यावर दोघांनाही हसू आले.
"काय दिवस होते ना ते? आता किती गोष्टी बदलल्यात. तू तेव्हा दिसायचीस तशी आता तुझी मुलगी दिसायला लागलीय. खूप गोड आहेत तुझी मुलं. खरं तर अजूनही माझा विश्वास बसत नाही कि तुला एवढी मोठी मुलं आहेत! कॉलेज संपल्यानंतर लगेचच लग्न केलंस का?"
मग तिने कॉलेज सोडल्यापासून काय झाले, त्याचा सगळ्याचा पाढा वाचला. त्याने खोदून खोदून तिच्याकडून सगळी माहिती कधी काढून घेतली हे ही तिला कळलं नाही.
"तेव्हा तू किती कविता करायचीस. तुझ्या लग्नानंतरच्या नवीन कविता पाठव ना?"
"मी कविता करणं कधीच सोडून दिलेय." हसत ती म्हणाली.
"का?" आश्चर्याने त्याने विचारलं.
"एकदा संसाराच्या जाळ्यात अडकलं की कुठची कविता आणि कुठचं काय. तुलाही माहीत असेलच ना? पण तू मला तुझ्याबद्दल काहीच सांगितलं नाहीस? माझ्याकडून मात्र सगळं काढून घेतोयस. माझ्या घरी होतास तेव्हाही तू तो विषय टाळलास" खोटं खोटं रागावून तिने विचारलं.
"माझ्याबद्दल काही सांगण्यासारख नाही आहे तर मी काय सांगू? आणि तुझ्याबद्दल ऐकायलाच मला जास्त मजा वाटते." थोड्या आगाऊपणे तो म्हणाला.
"तुझं लग्न झालंय का?" तिने प्रश्न विचारला.
"नाही झालं. लग्नासाठी तुला शोधत होतो पण तूच गायब झालीस, मग कुणाशी करणार लग्न?" खटयाळपणे तो म्हणाला.
"तुझ्याशी काही बोलण्यातच अर्थ नाही." ती वैतागली.
"आणि त्या दिवशी तु पटकन बाजूला का झालीस?"
"कधी?"
"तुझ्या घरी, तु टी व्ही बघत असताना, मी तुझ्या खांद्याला धरले तेव्हा?"
तिचे कान तापले. "तुला माहीत आहे मी का बाजूला झाले ते." कशीबशी ती म्हणाली.
"माझ्या तरी मनात काही नव्हते बाबा." तिला चिडवत तो म्हणाला.

तिला तो प्रसंग आठवला. टी व्ही पाहण्यात ती एवढी गर्क होती की सुहासने पाठीमागून येऊन तिच्या खांद्यावर कधी हात ठेवला हेही तिला कळलं नव्हतं. नंतर "एवढं काय पाहतेस?" म्हणत त्याने तिला सहजच जवळ ओढलं होतं. आपली कशीबशी सुटका करून घेत तिने त्याला त्या सिनेमाची स्टोरी सांगण्याचा प्रयत्न केला होता. पण तेव्हाही तो कसा मिस्कीलपणे हसत तिच्याकडे पाहत होता, हे तिला आठवलं.
"आता तू तुझ्याबद्दल सगळं सांगितल्या शिवाय मी काहीही बोलणार नाही." इरेला पेटून ती म्हणाली.

त्या दिवशी ती घरी आली तेव्हा तिला खूप हलकं हलकं वाटत होतं. का ते तिलाही कळत नव्हतं. ऑफिस मधेही दिवसभर ती त्या संभाषणाचाच विचार करत होती. तो नक्कीच फ्लर्ट करत होता आणि तिला त्याचा रागही येत नव्हता. कॉलेजमधल्या सुहासमध्ये आणि या सुहास मध्ये किती फरक झालाय असं तिला वाटलं. एकेकाळचा अबोल, स्वतःतच रमणारा तो आता चांगलाच बोलघेवडा झाला होता, आत्मविश्वासाने झळकत होता. याचं लग्न तरी झालंय का? झालं नसेल तर का केलं नसेल? आणि त्यात एवढं लपवण्यासारखं काय आहे? तिच्या मनात विचार चालले होते. आपल्याबद्दलच्या भावना त्याने कॉलेजमधेही कधी उघड दर्शवल्या नव्हत्या. आणि इथे आल्यापासून त्याच्या मनात काय आहे हे लपवण्याचा औपचारिकपणाही तो पाळत नव्हता. एवढा धीट हा कधी झाला?

दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याचा फोन आला. तिने फोन उचलला पण ती काही बोलली नाही.
"आहेस का?" त्याने विचारले. तिने फोन नुसताच कानाला लावून ठेवला होता.
"बोलणार नाहीस का?" तिकडून विचारलं.
ती गप्प. तोही थोडावेळ काही बोलला नाही.
"हे बघ मी आता फक्त दहा पर्यंत काऊनट करणार आहे. तोपर्यंत तु बोलली नाहीस तर फोन ठेऊन देईन" घोगऱ्या आवाजात तो म्हणाला.
पुढचे दहा सेकंद तो नंबर मोजत होता आणि इकडे तिचं हृदय जोरजोराने धडधडत होतं. काहीतरी अगम्य, अनोखं तिच्याबाबतीत घडत होतं.

क्रमश:

पूर्वप्रकाशित: http://heteanisagale.blogspot.com/2012/04/2.html

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

पुढे?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मग काय झालं?
जरा मोठे भाग लिहा हो!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

पुढे? तुमच्या ब्लॉगवर पूर्वप्रकाशित असेल तर तिकडे जाऊन वाचते. मला क्रमशः वाचायचा कंटाळा येतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

इंटरेस्टिँग
वाचत आहे. पुढचा भाग लवकर टाका

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

.

जरा मोठे भाग टाका नाहीतर बालाजी टेलिफिल्म्स मध्ये तुम्हाला उज्ज्वल भविष्य आहे असं मी म्हणेन.
वैसे ष्टोरी भी उसी वळण पे जा रही है. Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सास बहु का ड्रामा लग रहा है क्या?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पुढे?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जर मी तुम्हाला disappoint केले असेल तर क्षमस्व. सगळी कथाच टाकायचा विचार होता, पण त्याला किती वेळ लागेल कुणास ठाऊक आणि काही मंडळी खूप उतावीळ झालेली दिसत होती म्हणून हा भाग टाकला. ऐसी अक्षरेवर काहीही खपून जात नाही याचा प्रत्यय आला Wink
लवकर गोष्ट संपवून टाकण्याचा प्रयत्न करेन.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0