शिकवण्याचा अनुभव

मागे कधी ऐसीच्या खरडफळ्यावर लिहिलेली गंमत अबापटांनी पुन्हा पुढ्यात आणून टाकली. ती जशीच्या तशी इथे डकवत आहे.

---

मी यमेश्शी नंतर एक वर्षं ज्ञानसाधेना कॉलेजात पॉकेटमनी मिळवण्यासाठी वेठबिगारी केली होती. वर्षाच्या सुरुवातीला माझ्या तोंडात ब्रेसेस होत्या; त्या मुलांपेक्षा जरा बुढ्ढी दिसण्यासाठी म्हणून मी कॉलेजात मुद्दाम चष्मा लावून जात असे. एरवी लेन्सेस वापरल्या तरीही. तेव्हा मला कॉलेजात जस्सी असं नाव मिळालं होतं. हे मला समजलं ते समवयस्क केमिस्ट्री शिक्षकाकडून. माझ्या तोंडावर मला ठेवलेलं नाव कसं सांगणार, म्हणून त्याला हे नाव सांगितलं होतं. मी ते मनाला लावून घेतलं नाही; लहानपणापासून मला लोक घाबरून असतात ह्यात आनंद मानून घेतला! पण तो आनंद फार टिकला नाही. वर्ष संपत आलं तशा तिसऱ्या वर्षाच्या मुलांच्या विद्यापीठाच्या परीक्षा आल्या. प्रॅक्टिकलसाठी एक बाहेरचे एक्झामिनर आणि दोन कॉलेजातले अशी शिस्टम होती. तर कॉलेजातल्या दोनांपैकी एक मी असावे अशी विनंती झाली होती; मी पण त्या पोरांना बरीच मदत केली होती.

त्या काळात(ही) मी कॉलेजातल्या मास्तर लोकांशीच जास्त पंगे घेतले होते.

परीक्षेचा पेपर काढायला सांगितला. मी टंकून प्रिंटाऊट दिला आणि वर 'सॉफ्ट कॉपी' हवी तर इमेल करते, म्हटलं. (किंवा फ्लॉपी देईन, असं त्या काळानुसार म्हटलं असेल.) तर म्हणे, हाताने लिहिलेलाच पेपर पाहिजे; कंप्युटरवरून पेपर फुटण्याची शक्यता असते. मी ठीके म्हटलं आणि डाव्या हाताने लिहायला सुरुवात केली. अक्षर काही फार अर्वाच्य नाही, पण लिहायला एवढा वेळ लागत होता की "दे ते प्रिंटाऊट" अशी आज्ञा झाली.

मग परीक्षेच्या सुपरव्हिजनची वेळ आली. मी म्हटलं, "काम करणार नाही. तासाचे २१ रुपये परवडत नाहीत." (शिकवण्याचे ताशी १०० देत होते. २००३-०४ मध्येही ताशी २१ रुपये ही वेठबिगारी होती.) तर केमिस्ट्रीची डिपार्टमेंट हेड म्हणे, "आम्हालाही तेवढेच मिळतात. तुम्ही (क्लॉक अवर बेसिसवर काम करणारे) लोक आला नाहीत तर परीक्षा कशा घेणार आम्ही?" मी तिच्या तोंडावर जोर्दार हसले (ह्या बाई आमच्या तीर्थरूपांच्या समवयस्क) आणि म्हटलं, "तुमचा त्या महिन्याचा पगार मला चेकने देणार का डायरेक्ट डिपॉझिटसाठी माझा अकाउंट नंबर देऊ तुम्हाला?"

तीर्थरूप (जिवंत असेस्तोवर) त्या कॉलेजात शिकवायचे, फिजिक्स डिपार्टमेंटचे प्रमुख तीर्थरूपांचे जवळचे मित्र आणि मी तेवढं वर्षं संपलं की पुढच्या शिक्षणासाठी जाणार हे पक्कं होतं म्हणून तिथे चिक्कार माज केला होता.

---

वाढीव न-गंमत -

मी शिकवत असताना प्रॅक्टिकल परीक्षांसाठी जे एक्स्टर्नल एक्झामिनर आले होते, तेच माझ्या बीएस्सीच्या परीक्षांनाही एक्स्टर्नल एक्झामिनर होते. ते माझ्या आई-बाबांचे जुने मित्र. आता 'विदा-भान' सदरामुळे त्यांचं काही महिन्यांपूर्वी इमेल आलं. त्यांनी ते बरोबर ओळखलं. मग आमच्या थोड्या गप्पाही झाल्या.

गेल्या काही महिन्यांतच बाबांचे ते फिजिक्सवाले मित्र अमेरिकेत आले होते; तेव्हा गप्पांमध्ये तो परीक्षांचा विषय निघाला. तेव्हा हा असा संवाद झाला होता हे त्यांना माहीत नव्हतं. तेही हसले.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

थोडेच दिवस शिकवल्यामुळे आणि तोच आपला व्यवसाय नाही हे आतून वाटत असल्याने गंमत राहीली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

स्फुट आवडले. म्हणजे तेव्हादेखील तू ..... Wink जुनी सवय आहे तर

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अशा गोष्टी शिकून येत नाहीत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अबापटांनी लिहिलेलं दिसतंय म्हणून वाचायला गेलो तर पहिलंच वाक्य स्त्रीलिंगी! आता ही परकी स्त्री कुठली याचा नेहमीप्रमाणे जास्ती विचार न करता सरळ वाचत गेलो. मात्र बुढ्ढी दिसण्यासाठी मुद्दाम चष्मा लावणे इथं जरा अदिती म्याडम असावेत अशी पहिली शंका येईपर्यंत पुढच्या जस्सी शब्दाने ती पक्की झाली. तरीही ऐसीवर अशा अनेक व्यक्ती असू शकतात असं गृहीत धरून पुढचं वाचलं. शिस्टम शब्द जसा दिसला तसा विचार केला की, असं कुणीही नाही लिहू शकणार...तरीही इतर शक्यता गृहीत धरल्याच...मग पुढे मास्तर लोकांशी पंगे घेतले होते याचंही काही वाटलं नाही. इतकंच काय डाव्या हाताने लिहायला सुरुवात केली इथंही काहीच वाटलं नाही. तोंडावर जोर्दार हसले इथं गणित फसले तेही लक्षात नाही आले. पण पुढे माज शब्दाने विचारप्रवृत्त केले...पण सरतेशेवटी विदा-भान शब्द येईपर्यंत जितक्या उत्कटतेने वाचलं गेलं नाही; तितक्या उत्कटतेने माहीत असतं तर वाचलं गेलं असतं. ... न पावेतो आलेली गम्मत मात्र मिस झाली असती...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

डबक्यातला दीर्घ ‘वि’चारी…

बेंचवर, वर्गांच्या भिंतीवर व इतर ठिकाणी आलेले अभिप्राय त्यांचं काही?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तूनळीच्या डबक्यात आमचे चाराणे
तूनळी

बेंचवर, वर्गांच्या भिंतीवर वगैरे ठीक आहे, परंतु 'इतर ठिकाणी' येणारे 'अभिप्राय' (अनेकदा सचित्र) हे सहसा छापनीय नसतात, असा अनुभव आहे, त्यामुळे... नकोच ते!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तेवढा काळ मी तिथे टिकले नाही. लोकांनी ग्राफिट्या काढल्या असल्या तरी माझ्यापर्यंत काहीही पोहोचलं नाही.

पुढच्या वर्षी नोकरी नसेल आणि मी त्या गावात नसेन, हे दोन्ही बाजूंना आधीच माहीत होतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मी शिकवत असताना प्रॅक्टिकल परीक्षांसाठी जे एक्स्टर्नल एक्झामिनर आले होते, तेच माझ्या बीएस्सीच्या परीक्षांनाही एक्स्टर्नल एक्झामिनर होते.

ह्याहून भारी किस्सा. माझा एक अत्यंत 'जिनीअस' गणिती मित्र आहे. आम्हाला बीएशीच्या फायनलला एक्स्टर्नल ज्या आलेल्या त्यांच्या इगोला बुवाने भलताच धक्का पोचवला. त्यांनी फक्त खुन्नसपोटी त्याला १०० पैकी ९० मार्क आणि मला ९९. आमचे एचोडीही ग्रेट. ग्रॅम-श्मिड्ट प्रोसेस आठवत नसणारे पीएचडी. नंतर टीआयएफारच्या परिक्षेला मी आणि मंडळी तीनपैकी दीड तासात बाहेर. बुवा ३ तास पेपर लिहीतोय. मजा म्हणजे, त्याच दोन्ही एक्स्टर्नलही तीच परीक्षा (आमच्याबरोबरच) देऊन बाहेर. आम्ही भंकस करत असताना दीड तास लोटतो आणि बुवा बाहेर. "मजा आली. खूप चॅलेंजींग होता." मी दहापैकी २ प्रश्न सोडवलेले. त्याने १० पैकी २ सोडलेले. माझ्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह.
अख्ख्या भारतातून बुवा एकटा सिलेक्ट झाला. त्या एक्स्टर्नल्सचं माहित नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

किंबहुना माया असोस | ज्ञान जी तुझेनि डोळस |
असो वानणें सायास | श्रुतीसि हे ||

हे प्रकरण खुनशीच होतं म्हणायचं.

माझ्या गोष्टीतले भौतिकशास्त्राचे शिक्षक अतिशय गोड आहेत. मला ओळखायचे म्हणूनच नाही, सगळ्यांशीच अतिशय प्रेमानं बोलतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.