ऐसी अक्षरे - २०२० दिवाळी अंकासाठी आवाहन

दोन गुपितं आहेत. पहिलं गुपित आहे, ‘ऐसी’वर ह्या वर्षी दिवाळी अंक निघणार आहे. आणि दुसरं… ओळखा पाहू ह्या वर्षाच्या दिवाळी अंकाची संकल्पना काय असणार आहे?

संपूर्ण जगावर परिणाम करणाऱ्या, जग हादरवून टाकलेल्या करोना विषाणू आणि कोव्हिड-१९चा परिणाम ‘ऐसी’च्या दिवाळी अंकावर न दिसणं शक्य नव्हतं. २०२०च्या दिवाळी अंकाची संकल्पना आहे - संसर्ग किंवा Contagion.

Contagion

चीनच्या हुबेई प्रांतात, वूहान शहरात हा विषाणू पँगोलिनमधून माणसांत आला, असं समजलं जातं. काही महिन्यांतच हा विषाणू जगभर पसरला. ह्याचं मुख्य कारण, जग चीनशी आणि चीन जगाशी जोडला गेलेला आहे. जसा विषाणूचा उगम चीनमध्ये झाला, तशी त्यावर उपचार करण्यासाठीची तयारी - मास्क, व्हेंटिलेटर्स, PPE - हेसुद्धा चीनमधूनच आले. चिनी माल जगभर पसरतो; चिनी माणसं त्यासोबत जगातल्या लोकांच्या संपर्कात येतात; आणि हा विषाणू पसरल्यावर आपण सगळेच एकमेकांशी किती आणि कसे जोडले गेलो आहोत, हे दिसायला लागलं.

संसर्ग म्हणजे फक्त विषाणू, कोव्हिड-१९ किंवा सतत हात धुण्याची ओसीडी असणं इतपत मर्यादित विषय नाही. संसर्ग हा मराठी शब्द इंग्लिशमधली जैव-वैद्यकीय संकल्पना contagionपेक्षा बराच व्यापक आहे. अफवांचाही संसर्ग होतो म्हणून त्या पसरतात. अर्थव्यवस्थेच्या चक्राची गती मंदावत आहे आणि त्याचे हादरेसुद्धा जगभरात सगळ्यांना जाणवणार आहेत. अण्णा हजारेंनी भ्रष्टाचारविरोधी आंदोलन सुरू केलं आणि हा हा म्हणता ‘मैं हूं अण्णा’ लिहिलेल्या टोप्या सगळीकडे दिसायला लागल्या होत्या; काही वर्षांपूर्वी मोठी मोदी लाट आली होती; माऊथ-टू-माऊथ पब्लिसिटीनं सिनेमे हिट होतात; ‘सेपियन्स’सारख्या पुस्तकाची अनेक भाषांत भाषांतरं होतात; चळवळी मोठ्या होतात; इंटरनेटच्या आधीसुद्धा ‘दहा लोकांना पोस्टकार्ड पाठवा’ प्रकार होते; आता मीम, व्हिडिओ, वगैरे ‘व्हायरल’ जातात. रिचर्ड डॉकिन्सनं सगळ्यात आधी ‘सेल्फीश जीन’ ह्या पुस्तकात ‘मीम’ हा शब्द वापरला. तेव्हा तो शब्द फक्त उच्चभ्रू, अतिशिक्षित वर्तुळांत मर्यादित होता; आता इंटरनेटवर चिकार तरुण पोरी-पोरं मीम टाकतात. मीम हा शब्द वापरण्याचीही मीम झाली आहे. (आणि काही लोक ह्याच शब्दाला ‘मेमे’ म्हणतात.) मीम पसरतात ती समाजमाध्यमंसुद्धा संसर्गातून पसरली. आपले परिचित व्हॉट्सॅप, फेसबुक, ट्विटर, टिकटॉक वापरतात म्हणून आपण वापरतो. एकमेकांचे बघून आपण शब्द उचलतो; भाषा शिकतो; बोलताना हातवारे करायला शिकतो; वेगवेगळ्या प्रांतांत बोलण्याचे निरनिराळे हेल असतात. ही सगळी ‘संसर्गा’ची उदाहरणं आहेत.

थोडक्यात, संसर्ग फक्त विषाणूंचा असतो असं नाही. संसर्ग कल्पना, शब्द, विचार, तर्क, मतं, कुजबूज, कसलाही होतो. व्यक्तींमध्ये ज्या-ज्या प्रकारची देवघेव होते, त्या सगळ्यांचा संसर्ग होऊ शकतो. वेगवेगळ्या ठिकाणांच्या संगीताचा परस्परसंसर्ग होऊन फ्यूजन संगीत निर्माण होतं.

काही प्रकारचा संसर्ग आपल्याकडे चालत नाही - उदा. समलिंगी लोकांचा एकमेकांशी किंवा वेगवेगळ्या जातींचा एकमेकांशी असणारा संपर्क. जातींच्या संदर्भात आपल्याकडे सोशल डिस्टन्सिंग किंवा सोवळं होतंच. पण वेगळ्या प्रकारचे, धर्तीचे संसर्ग हवेसे असतात. मित्रमैत्रिणींशी प्रत्यक्ष भेट, एकमेकांबरोबर काम करणं, कौटुंबिक समारंभ ह्यांना व्हॉट्सॅप ग्रूप किंवा झूम मिटींगमुळे नवे अर्थ मिळत आहेत.
मग संसर्ग हा संपूर्ण संस्कृतीकडे पाहण्यासाठीचाच एक ऐसपैस विषय वाटतो का? तुम्हाला निरनिराळ्या प्रकारच्या संसर्गाबद्दल काय वाटतं? तुमचे काय अनुभव आहेत? दिवाळी अंकासाठी लेखन (अभिवाचन, व्हिडिओ, चित्रं, फोटो) पाठवा. अंतिम तारीख १५ ऑक्टोबर २०२०.

ह्याशिवाय इतर कुठल्याही विषयावर चांगलं लेखन, अभिवाचन, व्हिडिओ, आंतरजालावरून प्रकाशित करता येईल असं कुठल्याही प्रकारचं साहित्य पाठवा. ललित असो वा अललित; गद्य असो वा पद्य. पथ्य एकच, साहित्य उत्तम असावं. दिवाळी अंकात साधारणपणे अर्ध्यापेक्षा जास्त भार संकल्पनेव्यतिरिक्त असतो. आकडेवारी असोच, इतर कुठल्याही विषयावर, ॲमेझॉनच्या जंगलातल्या पानांच्या संख्येपासून स्वयंपाकापर्यंत आणि व्यायामापासून घाटावरची धाब्याची घरं अशा कुठल्याही विषयावर हात मोकळा सोडून लिहा, वाचा, गाणं गा.. किंवा आणखी काही.

लेखन ऐसीवर व्यनि करून पाठवा किंवा aisiakshare@gmail.com ह्या इमेल पत्त्यावर पाठवा. त्यासाठी काही पथ्यं -
१. इमेलच्या विषयात - ‘दिवाळी अंक २०२०’ असा उल्लेख करा.
२. लेखन युनिकोड टंकातच पाठवा.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

फार मस्त विषय आहे. जमला (म्हणजे लेख जमला) तर मी लेख देइन.
या आवाहनामध्ये कोणी दिलय ते चित्र? कसलं मस्त आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मस्त विषय!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पथ्य एकच, साहित्य उत्तम असावं.

यही तॉ स्कैम हैं जी! इसकी सीबीआई जांच होनी चाहिए!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ए बुल्ल्या, तुला विचारलं का कोणी?

टॅनोबा, तुम्ही लिहा. मग टोकबिक काढायची गरज असेल तर त्याचीही सोय करता येईल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अनुवादित साहित्य चालेल काय ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रताधिकाराचा प्रश्न नसेल तर जरूर.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

संकल्पना छान आहेच पण कोरोना कोरोना, संसर्ग, काळज्या अती होतांना आपणही त्याच सरधोपट किंवा अजीर्ण होईल त्या मार्गाने जाणे ठिक नाही.
उलट काहीतरी वेगळे, रुचकर असणे आताच्या घडीला आवश्यक आहे.

बाकी इतर जे काय असेल ते सुद्धा तुम्ही मागवलेच आहे. पण मुख्य संकल्पना असली संसर्गाची बदलायला हवी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0


मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही