सुशांतसिंग राजपूतच्या प्रकरणाच्या तपासासाठी प्लॅन्चेटवाल्यांची मदत घेणे गरजेचे आहे!

सुशांतसिंग राजपूत या हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्याच्या तथाकथित हत्याची (की आत्महत्याची(?)) तपास करणारी यंत्रणा कामाला लागलेली असून ती रोज नवनवीन विधानं करत आहे; पुरावे सिद्ध करत आहे; खुलासे मांडत आहे. तरीसुद्धा चौकशीत आकंठ बुडालेल्या या तपास यंत्रणेला एक अनाहूत सूचनेवजा सल्ला द्याविशी वाटते. xxx
ज्या प्रकारे या प्रकरणातील जिवंत व/वा मृत अशा अनेक व्यक्तींच्या खाजगी जीवनाची चिरफाड होत आहे त्यावरून या प्रकरणाचे धागे दोरे सापडण्याची शक्यता दुरावत असून कदाचित तपास यंत्रणा शेवटी वैतागून यातून अंग काढून घेईल की काय असे वाटत आहे. त्यानंतर न्यायालयाच्या देखरेखीखाली तपासाचा फार्स होईल व बंद लिफाफ्यामधून चौकशीचे अहवाल सादर केले जातील.परंतु यात वृथा कालहरण होईल. यातून या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी आटोकाट प्रयत्न करणाऱ्या वृत्तवाहिन्यांच्या हाती काही लागणार नाही अशी भीतीही वाटत आहे.
त्यामुळे ‘निश्चित काही हाती लागत नसेल तर याची-त्याची चौकशी करण्यात वेळ दवडू नका. सरळ त्या प्लॅन्चेटवाल्याला बोलवा आणि थेट अभिनेत्याच्या आत्म्याशी संवाद साधा.’ ( जमल्यास इतर मृत व/वा जिवंत व्यक्तींच्या ‘आत्म्या’शीही संपर्क साधा. त्या आत्म्यांचा पुनर्जन्म झालेला असल्यास त्याच्याशीही बोलून शहानिशा करून घ्या. तत्पूर्वी हे प्लॅन्चेटवाले मृत व्यक्तींच्या बरोबर जिवंत आत्म्यांनासुद्धा बोलावून सत्य वदवून घेतात की नाही याची खात्री करून घ्या. आपल्या देशातील प्लॅन्चेटवाले योग्य वाटत नसल्यास स्कॉटलंड यार्ड, केजीबी, सीआयए वा इस्रायलचे मोसाद यांची मदत घ्या. काहीही करा परंतु याचे एकदा सोक्षमोक्ष करून प्रेक्षकांची सुटका करा.)
कदाचित यासाठी मिडियावाल्यांनीच प्लॅन्चेटच्या ‘माध्यमां’ना बोलते केल्यास नक्कीच टीआरपी वाढण्यास मदत होईल. म्हणून वृत्तवाहिन्यानीच पुढाकार घेतल्यास या प्रकरणाचा लवकरात लवकर निकाल लागेल.

आपल्याला काय वाटते?

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

त्या आत्म्यांचा पुनर्जन्म झालेला असल्यास त्याच्याशीही बोलून शहानिशा करून घ्या.

हल्ली, पहिला आत्मा एका शरीरात असतानाच त्याचा दुसऱ्या देहात पुनर्जन्म झालेला असतो. उदा.- वसंत कानिटकर आणि संदीप खरे!
रेफरन्स देण्याची जरुर वाटत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उरलो स्मायली पुरता|

जगातील एकमेव बालिश मीडिया च्या reporting चा aadhar घेवून पूर्ण भारतीय समाज,भारतीय तपास यंत्रणा ,भारतीय न्याय व्यवस्था ह्यांच्या विषयी विकृत कमेंट धाग्या च्या रुपात करू नका.
समाजातील 1 टक्के हिस्सा पण त्या फालतुगिरी मध्ये सहभागी नाही.
Planchet हा तुमचा आवडता विषय असेल तर त्या वर वेगळा धागा काढा.
Planchet नी केस सोडवा असला बालिश पणाचा सल्ला देवून स्वतः च्या बुद्धिमत्तेचा बाजार मांडू नका.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी2
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

काय दिवस आलेत!

(ऑफ ऑल द पीपल) Rajesh188शी तत्त्वतः (on broader principles) का होईना, परंतु सहमत व्हावे लागत आहे.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मौजमजा सदरात लिहिलेलं असताना सुद्धा बुद्धिमत्तेचा बाजार वगैरे टीका अति होतेय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अति होतय

+१००
शिवाय नानावटी पक्के नास्तिक, अंधश्रद्धाविरोधी, विद्न्यानप्रवण आहेत. संदर्भाकरता - त्यांचे अन्य लेख वाचा की.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आपल्याला काय वाटते?

भिकार लेख आहे.

(विचारलेत, म्हणून सांगितले.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नबा अन् विसंगती ही काही (माझ्यासाठी) ‛न’वी बाजू नाही. पण तरीही विचारलेय म्हणून नबांनी असेही
सांगावे ह्याचे आश्चर्य.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

डबक्यातला दीर्घ ‘वि’चारी…

ओके. हा लेख भिकार वाटला. आता हा लेख कसा वाटतो.
हॅमर कल्चर

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

हॅमर कल्चर नानावटींचा मस्त मस्त लेख आहे. खूप विचार करायला लावणारा. खूप.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

पण सुशांत चा एक आत्मा दोन्ही बाजूंच्या चॅनेलवर बोलावला गेला तर एकाच वेळी तो दोन्ही ठिकाणी उपस्थित राहील का? अर्थात सुशांत देवमाणूस होता तर त्याचा आत्मा देव असेल मग तो अत्र तत्र सर्वत्र एकाच वेळी उपस्थित राहू शकेल म्हणा. पण मग त्याला जिव्हा किंवा प्लांचेट वर व्यक्त होण्याचे जे काही साधन असेल ते, अनेक असायला हव्यात. कारण वेगवेगळ्या चॅनल वर वेगवेगळे बोलावे लागेल. आत्मा विरुद्ध बाजूने बोलतोय असे दिसले की चॅनल वाले त्या आत्म्याला ग्लास किंवा मेणबत्ती जे काही प्लॅनचेट साठी वापरत असतील त्यात कैद करून ठेवू शकतील. असे होते म्हणे. कधी कधी आत्मा पुन्हा आपल्याघरी स्वर्गनरकाकडे ढुंकूनही बघत नाही. पृथ्वीवरच गरगरत राहातो.
आणि मग चॅनलवाले ब्लॅकमेल ही करू शकतील की सुटका हवी असेल तर आम्ही सांगू तेच बोलले पाहिजे. पूरी दुनिया जानना चाहती है... कि सच क्या है!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0