बखर....कोरोनाची (भाग ७)

आज आपण सर्व एका महत्त्वाच्या 'ट्रान्झिशन टाइम' मध्ये आहोत.

म्हणजे असं, की आत्ता जे घडत आहे ते आपल्या सगळ्यांकरता एका प्रकारचं 'once in a lifetime' घटना आहेत.

माझ्या वडिलांच्या पिढीने कदाचित दुसऱ्या महायुद्धाच्या परिणाम वाचले, बघितले आणि क्वचित भोगले असतील.
आजोबांच्या पिढीने कदाचित प्लेग बघितला असेल त्याचे परिणाम भोगले असतील.

पण अर्थातच हे सर्व जागतिकीकरणपूर्व काळातील आहे.
आणि त्यामुळे मर्यादित भागात परिणाम करणारं.
पण आज जे घडताना दिसतंय ते सर्वदूर आणि दूरगामी परिणाम करणारं आहे असं वाटतंय.

म्हणजे ही कोरोनाची साथ एक दोन महिन्यात जाईलही (आणि कदाचित तीनचार महिन्यांनी परत येईल अजून जोरात)
पण त्याचा प्रसार ज्या झपाट्याने झालाय त्यामुळे व्यापार उद्योग ते अर्थव्यवस्था ते हेल्थकेअर , सर्व सर्व बाबींमधे वेगाने आणि मूलगामी बदल होताना आपल्याला दिसेल.

ही प्रलयघंटा आहे का ? माहीत नाही , बहुधा नाहीच.
पण एक जाणवतंय की इतिहास घडतोय , आपल्यासमोर...
वेगाने, इतक्या की गेल्या महिन्यात काय होते हे आपण आज कदाचित विसरणार आहोत.

म्हणून या आज घडणारा इतिहास , आपल्याला दिसेल तसा इथे नोंदवत जाऊयात का ?
हिस्टरी ऑफ द प्रेझेंट लिहुयात ? इथेच, या धाग्यावर?
बखर वगैरे म्हणजे काय असतं ? हेच ना?
चला, जशी दिसेल तशी, कळेल तशी ,कुठल्याही विषयावर कोरोना साथीमुळे झालेल्या बदलांची नोंद करूयात आणि लिहुयात

बखर कोरोनाची
(आधीच्या धाग्यावर ~१०० प्रतिसाद झाल्यामुळे नवा धागा काढला आहे.)
---

टेनिसच्या चार ग्रँड स्लॅम स्पर्धांपैकी फ्रेंच ओपन आणि विंबल्डन या वर्षी करोनामुळे रद्द झाल्या. आता यू.एस. ओपन सुरू झाली आहे - प्रेक्षकांशिवाय. मोठ्या पडद्यांवर लांबून पाहणारे प्रेक्षक दाखवले जात आहेत आणि चीअरिंग ध्वनिक्षेपकांवरून प्रक्षेपित केले जाते आहे.

रिकामे मैदान

The Bizarro 2020 U.S. Open Begins

field_vote: 
0
No votes yet

फ्रेंच शास्त्रज्ञांनी कोव्हिडविरोधात उपाय म्हणून एक नाकात मारायचा स्प्रे शोधून काढला आहे -
French scientists unveil nasal spray 'Covid solution'

त्याविषयीचा (पीअर रिव्ह्यू न झालेला) पेपर -
An hACE2 peptide mimic blocks SARS-CoV-2 Pulmonary Cell Infection

The team of researchers has created a peptide, made up of natural amino acids which lures the virus to it by mimicking the ACE2 lock, and so prevents it from entering into human cells.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

जागतिक फिल्म फेस्टिव्हल्समध्ये सर्वात प्रतिष्ठेचं मानलं जाणारं कान फेस्टिव्हल ह्या वर्षी करोनामुळे रद्द झालं. व्हेनिस फिल्म फेस्टिव्हल मात्र आजपासून सुरू होत आहे. टिल्डा स्विंटनला लाइफटाइम अचीव्हमेंट दिलं जाणार आहे.
Venice prepares to welcome guests to Covid-safe film festival

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

१६ दिवसांत १० लाख नवे रुग्ण भारतात आढळले (त्यापैकी ६९,००० गेल्या २४ तासांत) अशी नोंद बखरीत २२ ऑगस्टला केली होती. आज ५ सप्टेंबर म्हणजे त्याला पंधरा दिवस झाले आहेत. काल ८७,११५ नवे रुग्ण सापडले आणि पुढच्या १० लाख रुग्णांचा टप्पा भारतानं ओलांडला आहे. एकूण रुग्णसंख्या ४० लाख २७ हजार ७१८ (स्रोत : वर्ल्डोमीटर)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

म्हणजे आता दुपटीचा* दर वगैरे युक्त्यासुद्धा चालणार नाहीत का?

*होय, होय, कोटीची संधी आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

संधी?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता फक्त देवाची करणी चालणार! आले देवाजीच्या मना तेथे निर्मला ताईंचे चालेना..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता एकदा राहु-केतूंनी वासलेला आ मिटला आणि हेवीवेट ग्रहांनी वक्री होणं सोडलं, की बघा चमत्कार!
मला काळजीच नाय, त्या देवाक काळजी!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.

खरोखरीच काळजी करण्यासारखी परिस्थिती आहे.
पुण्यातले आकडे तर फारच भितीदायक वाटत आहेत. पण यावर रामबाण उपाय काही उपलब्ध होत नाहीये.
भारतातली लोकसंख्या, आणि त्यामुळे न टाळता येणारी गर्दी हे ही एक कारण असू शकेल का?
कारण सामाजिक अंतर ठेवा म्हणतात, पण कस करायचे?
लहान घरे, त्यात रहाणाऱ्यांची संख्या जास्त. त्यामुळे घरातील एकाला संसर्ग झाला, की इतरांना देखिल होण्याची शक्यता खूपच जास्त, अगदी शेजारी आणि आसपासच्या लोकांनासुद्धा.

त्यात अनेक जण सर्व नियम गंभीरतेने पाळत नाहीत. याला ज्येष्ठ नागरिकांचा देखिल अपवाद नाही.

अचानक आलेल्या महाप्रचंड संकटाचा सामना करण्याची अजूनही पुरेशी तयारी नाही. परंतु यासाठी सतत प्रशासनाला दोष देणे योग्य वाटत नाही. साधने, औषधे आणि मनुष्यबळ या सर्वांचाच तुटवडा आहे. आणि दर दिवसागणिक गरज वाढते आहे. पुरवठी कसे पडणार?

स्वयंशिस्त आणि अफवांवर विश्वास न ठेवता, योग्य आणि खात्रीलायक सूत्रांकडून योग्य ती माहिती घेणे (उपचार आणि औषधे या संदर्भात) हा त्यावर एक उपाय आहे. अर्थात पुरेसा नाही. पण तरीही...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*********

टाळ बोले चिपळीला - नाच माझ्या संग ।
देवाजीच्या दारी आज - रंगला अभंग ॥

Covid19 चा रिपोर्ट किती लोकांचा positive आलेला आहे हा आकडा महत्वाचा आहे पण इतका महत्वाचा नाही की त्या वरून काही निष्कर्ष काढले जातील.
साथी चा रोग आहे,हवेतून पसरत आहे ,श्वसन मार्गाने बाधित करत आहे तर त्या पासून स्वतःला वाचवणे तसे अवघड आहे.
जगभरातील देशात covid19 , चे बाधित लोक संख्येने खूप आहेत.
फक्त संख्येनी देशांची तुलना करू नका लोकसंख्येच्या प्रमाणात किती टक्के लोक बाधित आहे अशी टक्केवारी काढली तर भारतात जास्त प्रसार झाला आहे जगाच्या मानाने असे म्हणता येणार नाही.
आणि दुसरी गोष्ट गंभीर लक्षण असलेल्या लोकांची टक्के वारी भारतात किती आहे .
हा आकडा सुध्धा महत्वाचा आहे.
वरवर चे आकडे बघून खरी परिस्थिती कशी माहीत पडेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

६ सप्टेंबर२०२० : वर्ल्डोमीटरनुसार ब्राझीलला मागे टाकून रुग्णसंख्येमध्ये भारत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. एकूण रुग्ण : ४१ लाख ९७ हजार ५६३.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

#ममवबेफिकीरी1

आजी-आजोबा, मुलगा-सून, नातू(9)-नात (4) असे कुटुंब.

सुनेला ताप आला, क्रॉसिन घेतल्यावर उतरायचा, फॅमिली डॉक्टरकडे गेले, त्याने छे छे viral च असे म्हणून सांगितले, या सगळ्यात 3 4 दिवस गेले. अगम्य कारणांनी त्यांनी सुनेला विलग केले नाही, ती घरभर फिरत होती.
पाचव्या दिवशी वास चव गेली तेव्हा खडबडून जाग आली ,तिची टेस्ट केली, पोसिटिव्ह आली, मग विलगिकरण केले.

घरातल्या मोलकरणी बंद केल्या, सासू सगळी कामे करू लागली, कामाची सवय नसल्याने थकवा येत असेल अशी समजून घालून घेण्यात 2 दिवस गेले, नंतर कणकण वाटली तेव्हा परत धावपळ , मात्र यावेळी घरातल्या सगळ्यांच्या टेस्ट केल्या
आजी-आजोबा -नातू पोसिटिव्ह (सून आधीच होती)
आता एका बेडरूम मध्ये सून-नातू, दुसऱ्यात आजी आजोबा असे क्वारान्टीन झाले आहेत. मुलगा आणि नात सध्यातरी निगेटिव्ह आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आजी आजोबा मुलगा सून नातू असे कुटुंब
ऐन गणपती च्या दिवसात सुनेला कणकण डोकेदुखी जाणवायला लागली, ते अंगावर काढून फॅमिली डॉक्टर, होमिओपॅथ वगैरे ची औषधे घेत, पाहिले 3 दिवस रेटले. विलगिकरण वगैर प्रकार गावी ही नव्हते. शेवटी नवरा आणि आजोबांना पण ताप सुरू झाला म्हणून टेस्ट केली ती तिघांची पोसिटिव्ह आली.
आजींना गणपतीच्या आधी पासून घसा दुखणे, अंग दुखणे लक्षणे होती त्या कडे दुर्लक्ष केले, त्यांची टेस्ट केली नाही

2 दिवसांनंतर आजींना ताप आला मग त्यांची आणि नातवाची केली. आजी पोसिटिव्ह, नातू निगेटिव्ह
आजी ना रिपोर्ट आल्याच्या दुसऱ्याच दिवशी धाप लागते म्हणून हॉस्पिटल मध्ये भरती करावे लागले
अजून एक दिवसांनी आजोबा पण हॉस्पिटल मध्ये

सध्या आजोबा नॉन ऑक्सिजन बेड वर आजी ऑक्सिजनबेड वर.
नातू परिचितांकडे, आणि मुलगा सून घरी क्वारान्टीन

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

या वरच्याच कुटुंबात आजी हॉस्पिटल मधून घरी फोन करून सांगतायत जेवण छान असते, ब्रेकफास्ट ला अगदी गरम इडली सांबर होते वगैरे
आजोबा सांगतायत छ्या काही चव नसते,डबा पाठव घरून, सुने बाहेरून मागावलेला डबा हॉस्पिटल ला पाठवला (कारण घरी सुद्धा ते तेच खात होते)तर आजोबांचा उलट फोन इकडे बाकीच्यांच्या डब्यात चिकन फिश असते, जरा तोंडाला चव येईल असे पाठव.
सुन फुल्ल इकडे परिस्थिती काये मोड मध्ये
शेवटी ओळखीच्या डॉक्टर ना मध्ये घालून , नाही तुम्ही साधाच आहार घ्या वगैरे सांगितले सासऱ्यांना

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

खरे तर हे बेफिकीरीचे उदाहरण नाही, पण कॉन्स्टंट लक्ष ठेवायची आणि लौकर निदान करायची गरज यातून दिसते
मुलगा सून एका फ्लॅट मध्ये
सासू खालच्या मजल्यावर दुसऱ्या फ्लॅट मध्ये

सुनेला ताप, फॅमिली डॉक्टर- टेस्ट नाही, पण वेगळा फ्लॅट असल्याने तसे विलगिकरन आपोआप झाले असेल.
रात्री व्हाट्सअप्प वर बोलताना म्हणाली सासू बाईंना आज घसा खवखवत आहे.तिला टेस्ट करू घेच म्हणून आग्रह केला

दुसऱ्या दिवशी सकाळी बोलताना कळले काल रात्री 2 च्या सुमारास त्यांना ऍडमिट करायला लागले, थेट व्हेंटिलेटर्स लावायला लागला, त्यांची टेस्ट केली ती पोसिटिव्ह आलीये.

दरम्यात हिने टेस्ट केली ती निगेटिव्ह आली, पण पुढच्या24 तासात सासूबाई गेल्या.

कदाचित सासूबाईंनी लौकर टेस्ट केली असती तर चित्र वेगळे असते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एक बिल्डिंगीत (जिकडे ऑलरेडी रुग्ण होते) एका माणसाने 4 भटजी आणि 20 25 पाहुणे बोलावून आपल्या सासाऱ्यांचे श्राद्ध घातले. (सासरे करोनानेच गेलेत, जिकडे राहायचे म्हणजे मुलाकडे, तो भाग कंटेन्मेंट झोन आहे, तिकडे लोकांना येता येणार नाही म्हणून जावयाकडे श्राद्ध विधी)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक2
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पांडुरंग रायकर या पत्रकाराचा हॉस्पिटल बेड अभावी करोनामुळे दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर 'आवाज उठवणारे' पत्रकार आणि हे फोटोमधले पत्रकार! अशी दृष्य बघून खरोखर कोणतेही सरकार समाजाचे काहीही भले करू शकणार नाही याविषयी खात्री पटते.
https://epaper.loksatta.com/c/54767904

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अशी प्रजा ज्या राज्यात, देशात असेल तो देश कसा आणि का वर येईल ? आपला देश हे एक प्रचंड मोठे उंबर आहे असे वाटायला लागते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.

कोरोनादेवीचा कोप वाढल्यावर सर्व ममव आणि मउमव प्रजा वात्साप देवाला शरण गेली. तिथल्या पुजार्‍यांचे निरोप वेगाने सर्वदूर पोहोचू लागले. लिंबु, मोसंबी, व्हिटॅमिन सी यांचा एकाचवेळी मारा सुरु झाला. दालचिनी, मिरे, आलं इत्यादी मसाल्याच्या पदार्थांचे काढे घरोघरी उकळु लागले आणि रोजच्या रोज सर्व कुटुंबाच्या नरड्यांत उतरु लागले. काही जण हळदीवरच बसले आणि दिवसभरांत इतकी हळद प्यायले की अनेकांचे डोळे पिवळे झाले. काविळीच्या भीतिने डॉक्टरांकडे धावले आणि कानपिचक्या खाऊन घरी परतले. काढे पिणार्‍यांपैकी बर्‍याच जणांना कोंब फुटले आणि मग 'तसल्ली' क्रीमे करणार्‍या औषधी कंपन्यांचा फायदा वाढला. शेवटी, डॉक्टरांना, आपल्याला रोगाशी लढायचे आहे, घशाशी नाही, असे सांगून त्यांची समजूत काढावी लागली. काही जणांनी सरकार पुरस्कृत भीतिमुळे, स्वतःला घरांत कोंडून घेतले. ऊन मिळत नाही म्हणून डी व्हिटॅमिनचा इतका मारा केला की पुन्हा एकदा डॉक्टरांची बोलणी खावी लागली. घरी आलेले पुडे, भाज्या आणि वर्तमानपत्रेही यातून सुटली नाहीत. साबणाच्या पाण्याने वा व्हिनेगारने भाज्या धुण्याचा कार्यक्रम सुरु झाला. त्या टिकाव्या म्हणून वॉशिंग मशीनमधे वाळवून, फ्रीजमध्ये साठवण्याच्या आयडिया निघाल्या. सर्व पुडे पुसून घेण्याचा उपक्रम सुरु झाला. काहीजण रोजचे वर्तमानपत्र दोन तास उन्हात ठेवून वा इस्त्री करुनच वाचायला लागले. दोरीने बांधलेली पिशवी जवळ -लांब करण्याच्या सुपीक डोक्यातल्या कल्पना आल्या. काही प्रथितयश डॉक्टरांनीच नेती चा पुरस्कार केल्यामुळे घरोघरी नेतीचे प्रयोग सुरु झाले, त्यासाठी बाजारात नेतीपात्रेही मिळायला लागली. कित्येकांना लग्नांत आपण, नेतिचरामि अशीच शपथ घेतली होती की काय, असे वाटू लागले. कोमट पाण्याने विषाणु जात नाहीत असा क्षीण प्रतिवाद केल्यावर, 'असू दे, पण आता नाक अगदी स्वच्छ रहाते', असे समर्थन पुढे आले. निदान त्या निमित्ताने, घरोघरीचे कातगोळ्यांचे कारखाने कमी झाले हे तेवढं चांगलं झालं! वाफार्‍याने रोग हरा, अशीही मोहीम सुरु झाली. आणि नाकातोंडात जाणारी वाफ म्हणजे उकळत्या पाण्याच्या तापमानाची, असा कित्येकांचा समज झाला. एवढं सगळं करुनही ज्यांना कोरोना झाला आणि ज्यांचे डोळे कायमचे मिटले नाहीत, त्यांचे डोळे उघडले. मास्क हा स्वतःसाठी नसून पोलिसांसाठी आहे, अशी ज्यांची धारणा होती ते रोग पसरवतच गेले. अशी ही कोरोनादेवीची कहाणी!

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.

ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या लशीच्या चाचणीत भाग घेणारी एक व्यक्ती अचानक आजारी पडल्यामुळे जगभरात चाचणी स्थगित केली गेली आहे
Oxford University vaccine trial paused after participant falls ill

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

साथीमुळे अमेरिकन समाजाच्या खाण्यापिण्याच्या सवयी कशा बदलल्या आणि वाणसामान आणण्यात त्यामुळे कसा फरक पडला ह्याविषयीचा एक रोचक लेख -
7 Ways the Pandemic Has Changed How We Shop for Food

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

मंदीत संधी म्हणून पेप्सीने एक नवं ड्रिंक लाँच केलंय - Driftwell : an enhanced water beverage. स्ट्रेसबस्टर आणि झोप लागण्यासाठी म्हणून त्यात L-theanine हे amino acid आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

याच धाग्यात ५ सप्टेंबरला चाळीस लाखांची नोंद होती. तेव्हा त्यासाठी सोळा दिवस लागले होते. आता पन्नास लाख झाले आहेत. म्हणजे १०-११ दिवसांत १० लाख रुग्ण वाढले. (स्रोत : वर्ल्डोमीटर)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

आयपीएल आजपासून सुरू, मात्र करोनामुळे भारताबाहेर.
उन्हाळ्यात खेळली जाणारी फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धा करोनामुळे आता २७ सप्टेंबरपासून सुरू. महासाथीमुळे एका सामन्यात केवळ ५,००० प्रेक्षक.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

उमेश कुलकर्णी आणि गिरीश कुलकर्णी हे गेली काही वर्षं अरभाट फिल्म्स या संस्थेमार्फत मराठी चित्रपटनिर्मिती करतात. करोनाविषयी माहिती देणारा 'कोरोनाचा पाहुणचार' हा लघुपट त्यांनी नुकताच केला आहे. त्याचा यूट्यूब दुवा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

हिंदुस्तान टाइम्सने चित्रकार सुधीर पटवर्धन यांना करोना महासाथीदरम्यानच्या मुंबईविषयी चित्र काढण्याची विनंती केली. त्याला मान देऊन त्यांनी काढलेले चित्र -
Sudhir Patwardhan’s exclusive artwork Departure depicts the frailty of Mumbai as home

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

'आई माझी काळूबाई' मालिकेच्या सेटवर मुंबईहून एका गाण्याच्या चित्रीकरणासाठी २२ कलाकार आले होते. त्यांना सेटवर करोनाची लागण झाल्याचं सांगण्यात येत आहे. त्यात सहभागी अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचं निधन झालं आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||