खायला कोंडा , निजेला......

आज सुखाच्या अपेक्षा अक्षरश: गळून पडल्या
एवढी गाढ झोप तर कुठल्याही गुबगुबीत ,मखमली पलंगावरही कोणाला लागणार नाही

हा कामगार किती आरामात झोपलाय, (हा बेवडा नाही Wink रोज बघतो याला स्टेशन वर काम करताना )
बाजूला एवढ पब्लिक आहे, दर मिनटाला गाड्यांचा गोंधळ, स्टेशन वरची कर्कश उद्घोषणा.
बर हे परवडल.. पण झोपायला.........
अक्षरश: धोंडाच आहे हो

हा खरा सुखी Smile

adsd

नाहीतर लोक आजकाल झोप येत नाही म्हणून लाखो रुपये खर्च करतात.
अंगमेहनत कमी झाल्याचे हे परिणाम
तुम्हाला काय वाटत ?

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

नाहीतर लोक आजकाल झोप येत नाही म्हणून लाखो रुपये खर्च करतात.

हे बाकि खरे....

अवान्तरः ठाकुर्ली चा platform बघून पूर्वीच्या कल्याण ते बोरीवली प्रवासाची आठवण झाली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अंगमेहनतीचा मुद्दा पटला. रोज पुरेसा व्यायाम केला तर अनेक व्याधी दूर पळतात.

पण निजेला धोंडा घेण्याची पाळी यावी ही परिस्थितीही चांगली नाही. सगळ्यांना लाखो रुपये खर्च करण्याची ऐपत येवो, आणि तरीही अंगमेहनत करण्याची सवय अंगी बाणो... (दुरितांचे तिमिर जावो स्टाइलमध्ये वाचावं)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

घासकडवींशी सहमत. बिचारा इतका प्रचंड दमलाय की फक्त आणि फक्त झोपच हवीये..(बर्‍याचश्या गृहींना ही अवस्था माहीत असते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

फोटो आवडला. हाच फोटो काही बदल करून विषयाला अधिक परिणामकारक करता आला असता का असा विचार मनात आला. हे प्रत्येक वेळेला शक्य होईलच असे नाही.

बाकी, झोपेला माणसाने अवास्तव महत्त्व दिलेले आहे असे मला अनेकदा वाटते. माणसाने म्हणजे सामान्य माणसाने. अत्यंत प्रिय असणार्‍या गोष्टी करताना मला दोन दोन दिवस झोप येत नाही. यात चिंता करण्यासारखं काही आहे असं मला वाटत नाही. मला झोपही अत्यंत प्रिय आहे आणि कधी कधी मी १५-१८ तासही निश्चिंत झोपतो. हा एक मुद्दा.

दुसरा मुद्दा मेहनतीचा. तो मनुष्य सुखाने झोपला आहे हा बहुदा गुबगुबीत गादीवरही झोप न येणार्‍याचा दृष्टीकोन असावा. परिस्थितीनुसार माणूस आपले पर्याय निवडतो, कित्येकांना पर्यायच नसतात. दिवसभर काबाडकष्ट केल्यानंतर आणि त्यानंतरही पुरेसे पोषण शरीराला मिळाले नाही तर कोठे झोपलो आहोत या त्रासाची जाणिव आपोआपच कमी होत असावी. त्याउलट झोप न येण्याची अनेक कारणं आहेत.

थोडंस क्रूर होऊन, वास्तववादी विचार केला. वरील उदाहरणातील व्यक्ती लग्न न केलेला आहे, अनाथ आहे. त्याच्या मुख्य गरजा वैयक्तिक आहेत. त्याउलट तीच व्यक्ती लग्न केलेली आहे, मुलाबाळांची किंवा म्हातार्‍या आईवडिलांची काळजी त्याला भेडसावत आहे. दोघांपैकी दुसरा जास्त कष्ट करत असेल, पण त्याला पहिल्याच्या इतकी निश्चिंत झोप लागेल का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बाकी, झोपेला माणसाने अवास्तव महत्त्व दिलेले आहे असे मला अनेकदा वाटते. माणसाने म्हणजे सामान्य माणसाने. अत्यंत प्रिय असणार्‍या गोष्टी करताना मला दोन दोन दिवस झोप येत नाही. यात चिंता करण्यासारखं काही आहे असं मला वाटत नाही. मला झोपही अत्यंत प्रिय आहे आणि कधी कधी मी १५-१८ तासही निश्चिंत झोपतो.

सेम हिअर!! मला आवडते काम सुरु असले की ते पूर्ण होईपर्यंत झोप येत नाही..
मग एकदा झोपलो की १२ - १८ तास निवांत.

बाकी स्पावड्यो सॅमसंगनं फटू बरे येतात रे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कोणाला कधी काय आठवते हे वाचुन अंमळ मौज वाटली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तुमचीच भीत्री