“कसाई”

माझ्या डेस्क वरचा फोन वाजला . मी फोन उचलला . " विकास मेरे केबिन मे आओ ". आमच्या एच आर मॅनेजर फरीदाने मला बोलावलं . मी तिच्या केबिन मध्ये गेलो . तिने मला विचारलं स्टोर मॅनेजर दिलीप कैसे है ? तुम्हे कुछ पता है उनके बारे मे . मी एक दीर्घ श्वास घेतला आणि तिच्या समोरच्या खुर्चीवर बसलो . "हां " आय सी यू में है ". " तब्बेत खालावलीय आहे थोडी ". त्यांच्या डिपार्टमेंटची मुलं जाऊन आली त्या दिवशी . "बेशुदी मध्ये ओरडत आणि बडबडत असतात मोठ्याने ." " त्रास होतोय त्यांना खूप ".
"अल्लाह त्यांच्या तब्बेतीला आराम पडू देत ". ती म्हणाली .
थोडावेळ आम्ही दोघे गप बसलो . मग ती म्हणाली “बेचारा अच्छा बंदा है” .” वो साला हरामी जनरल मॅनेजर अडवाणी आणि ती प्रोडकशन मॅनेजर ह्या दोघान मुळे त्याची हि अशी अवस्था झाली आहे . मला माहीत आहे सगळे . पण काय बोलणार आपण. मालकाचा या दोघांवर जास्त विश्वास . डोक्यावर चढवून ठेवलंय त्यांना . त्या मुळे ऑफिस मधल्या इतर लोकांशी हवे तसे वागून त्यांना हॅरीसमेन्ट करतात हरामी साले.”
मी बॉस शी बोलले आहे आपण दोघे दुपारी हॉस्पिटल ला जाऊन बघून येऊ त्याला . बॉस ला रिपोर्ट द्यायचा आहे कसा आहे तो म्हणून . लंच करून घेऊया मग निघूया आपण . मी हो म्हणालो आणि खुर्चीत येऊन बसलो . डाव्या बाजूला दिलीपच्या रिकाम्या खुर्ची कडे लक्ष गेल. आठवड्याभरापूर्वी ते तिथे बसून काम करत होते . आणि आता हॉस्पिटल मध्ये आई सी यू मध्ये . वेळ माणसाची कधी पटकन बदलेल होत्याच न्हवतं कधी होईल सांगता येत नाही .
मी एक फार्मसी कंपनीत असिस्टंट एच आर मॅनेजर म्हणून काम करतोय . दिलीप यांची तीन वर्षा पूर्वी इंटरव्हू मीच घेतली होती स्टोरमॅनेजर साठी . स्वभाव वागणुकीने माणूस खूप चांगला . हसत मुख स्वभाव . फार छान बोलायचे गप्पा मारायचे . माझ्या जवळ च्या गावातले असल्या मुळे आमची बऱ्यापैकी ओळख झाली . घरी त्यांच्या तीन माणसे . म्हातारे वडील , बायको आणि ते . मुलं न्हवती . त्यांचं वय जवळपास ४८ च्या आसपास . त्यांनी आधी च्या दोन कंपन्यांत स्टोर डिपार्टमेंट मध्ये काम केलेलं . दोन्ही कंपन्या चांगल्या होत्या . पण एक कंपनी अचानक बंद झाली आणि दुसरी कंपनी मुंबई बाहेर शिफ्ट झाली . ते मुंबई बाहेर जाऊ शकत न्हवते म्हणून ती नोकरी त्यांनी सोडली होती . एका मित्राच्या ओळखीने आमच्या कंपनीतल्या जागे बद्दल त्यांना समजलं होत .
त्यांची नेमणूक आमच्या कंपनीतल्या स्टोर डिपार्टमेंट मध्ये झाली . त्यांच्या हाता खाली ४ माणसे कामाला होती . प्रत्येक डिपार्टमेंट ची सामानाची यादी घेणे . त्या त्या माला च्या दर्जानुसार ते सामान वेळेत आणून त्या डिपार्टमेंट ला देणे . त्याची नोंद ठेवणे . पैश्याचा हिशोब ठेवणे . अकाउंट डिपार्टमेंट ला हिशोब देणे हि सगळी काम ते एकटे करत ,सुरवातीला वर्षभर त्यांचं चांगलं चाललं . ते वेळेवर येत काम संपवून वेळेवर निघत .
पण नंतर हळू हळू त्यांचं काम वाढू लागलं . कंपनीचं उत्पादन वाढू लागलं तस मार्केट मधून सामानाची ऑर्डर उत्पादन विभागातून वाढू लागली . उत्पादन विभागातले वरिष्ठ आणि त्यांच्या असिस्टंट लोकांचा दबाव दिलीप यांच्यावर वाढू लागला . त्यांना सामान चांगल्या दर्जाचे आणि ताबडतोब हवे लागू लागले . सुरवातीला दिलीप तो दबाव सहन करत होते . त्यांच्या विभागातल्या कमी लोकांन मध्ये ते काम लवकर आणि वेळेवर करण्याचा प्रयत्न करत होते .
पण जस जसा उत्पादन विभागातल्या लोकांचा आणि कामाचा दबाव वाढू लागल्यावर दिलीप यांच्या डिपार्टमेंट मधील माणसे तितकंसं काम करू शकत न्हवती . त्या मुळे दिलीप यांच्या वरचा दबाव अजूनच वाढू लागला . आपल्या डिपार्टमेंटच्या लोकांना सांभाळणे . उत्पादन विभागाला वेळेवर योग्य माल उपलब्ध करून देण्यावरची त्यांची तारेवरची कसरत सुरु झाली .
उत्पादन विभागातले अधिकारी त्यांना वेळेवर योग्य माल मिळत नसून त्याबद्दल कंपनीच्या व्यवस्थापनाला आणि मालकांना त्यांच्या आणि त्यांच्या सहकारांच्या कामाबद्दल तक्रार करणार असल्याबद्दलची धमकी उठसुठ रोज देऊ लागले . दिलीप यांनी मालकांना आणि वरिष्ठांना बऱ्याचदा सांगितले कि काम पूर्वी पेक्षा वाढले असून कमी लोकांन मध्ये ते कामाची पूर्तता वेळेवर करू शकत नाही . तेव्हा त्यांना ३-४ माणसे त्यांच्या विभागात वाढवून देण्यात यावी जेणे करून ते वेळेत काम पूर्ण करू शकतील आणि उत्पादन विभागाला वेळेत मालाचा पुरवठा करू शकतील .
या बद्दल ते जनरल मॅनेजर आडवाणी शी बोलले त्यांना ४ अतिरिक्त नवीन माणसांची त्या साठी गरज होती . पण आडवाणी ने फक्त एक माणूस घेऊन त्याच्या कडून सगळ्या प्रकारची कामे करवून घेण्यास दिलीपणा सांगितले . आणि दिलीप आणि दिलीपच्या माणसांची कामाची कार्यतत्परता कशी कमी आहे . काम कस झटपट करावं या बद्दल एक दोनदा त्याने त्यांना प्रवचन पण दिले .
दिलीप यांच्यावर अडवाणीचा आणि उत्पादन विभागातल्या प्रोडक्शन मॅनेजर बाईचा दबाव खूप वाढला . त्यांना व त्यांच्या बरोबरच्या लोकांना नोकरीवरुन काढण्याच्या धमक्या मिळू लागल्या . त्या मुळे आणि कामाच्या दबावामुळे दिलीप खूपच थकू लागले .
त्यांना गणेशोत्सवात ४ दिवसाची सुट्टी हवी होती . त्यांनी जनरल मॅनेजर आडवाणी ला खूप विनंती केली सुट्टी देण्यासाठी . ते सगळं काम म्यानेज करून सुट्टीवर जाणार होते . पण आडवाणी ने त्यांना सुट्टी दिली नाही . त्या मुळे ते खूप निराश झाले .
एके दिवशी मी काही कामानिमित्त त्यांच्या केबिन मध्ये गेलो . तेव्हा अतिशय निराश होऊन त्यांनी माझ्या समोर आपलं मन मोकळं केलं . मला म्हणाले मला फक्त पोस्ट दिली आहे त्या मानाने पगार नाही . पूर्वी काम फारसे न्हवते तेव्हा काही वाटत न्हवते वेळेवर येऊन वेळेत जात होतो . कामाची दगदग न्हवती . पण मागील एक दीड वर्षा पासून कामाचा व्याप खूप वाढला आहे . सकाळी उठलो कि माझा फोन ऑफिस च्या कामासाठी वाजू लागतो . ऑफिस मधून घरी गेल्या नंतर हि रात्री ११ वाजेपर्यंत कामासाठी फोन येत राहतात . सुट्टीच्या दिवशी हि फोन येतात . आराम असा करायला मिळत नाही .सुट्टी घेता येत नाही . माणसे डिपार्टमेंट मध्ये वाढवत नाही आहे . हाताखालचा एखादा माणूस आला नाही कि त्याचे पण काम मला करावे लागते आहे .
एखादा माणूस घ्यायचं नक्की होत आलं की आडवानी त्या माणसाला इंटरवी घेताना इतकी काम करावी लागतील सांगतो कि कमी पगारात तो माणूस इतकं काम करायला तयार होत नाही . चुकून एखादा आला कि त्याला इतकं काम द्यायला सांगतात कि तो एक दोन दिवसातच नोकरी सोडून जातो .
माणसे नवीन घेत नाहीत . घ्यायला देत नाही . घेतली तर टिकायला देत नाहीत . जी जुनी माणसे आहेत ती पण नोकरी सोडायचं बोलतात . ते लोक पूर्वी सारखं काम करत नाहीत . आणि मग मला काम होत नाही सांगून नोकरीवरून काढून टाकण्याची धमकी दिली जाते .
मला सगळं ऐकून खूप वाईट वाटलं . मी त्यांचा त्रास रोज बघत होतो . मी त्यांना म्हणालो दुसरी कडे कुठे नोकरी असेल तर ताबडतोब बघा आणि हि नोकरी सोडून द्या . भले थोडा कमी पगार असला तरी चालेल . ते मला म्हणाले मी तोही प्रयत्न करतोय पण हवी तशी नोकरी मिळत नाही आहे . परत घाईत हि नोकरी सोडून दुसरी कडे गेलो तर या पेक्षा परिस्तिथी खराब असली तर काय करणार ? म्हणून थोडं थांबलो आहे . त्यांना कामाचा एक फोन आला म्हणून मी तिथून निघालो .
असेच दोन तीन महिने गेले . दिलीप कामामध्ये प्रचंड गुंतलेले असायचे . त्यांचं ते निर्मळ हास्य कुठे तरी गायब झालं होत .
शुक्रवार होता . दुसऱ्यादिवशी कंपनीला ईद ची सुट्टी होती आणि लागूनच रविवारची सुट्टी . त्यामुळे बरेच जण खुशीत होते आणि काम लवकर आटपून घरी पळत होते . बराचसा स्टाफ घरी गेला होता रात्री चे आठ वाजलेले मी घरी जायला निघालो . माझ लक्ष दिलीप कडे गेलं . त्यांचा चेहरा उतरल्या सारखा दिसत होता . खूप थकलेले दिसले . मी निघताना त्यांना विचारलं तब्बेत ठीक नाही का ? मला म्हणाले हो . बरेच दिवस माझं डोकं दुखतंय, डॉक्टरला दाखवलं . पण बर वाटत नाही आहे . कदाचित चष्मा लागला असावा . मी डोळ्यांच्या डॉक्टरांना दाखवलं त्यांनी मला एका डोळ्याचं ऑपेरेशन करायला सांगितलं आहे . दोन दिवसाची रविवारी लागून सुट्टी घेतली आहे आडवाणी ला सांगून . सुट्टी देत न्हवता . डॉक्टरचे पेपर्स दाखवल्यावर तयार झाला . तरी हि ऑपेरेशन पुढे ढकल बोलत होता . पण पुढे काम जास्त येईल सुट्टी घेता येणार नाही सांगितल्यावर तयार झाला .
मी त्यांना आराम करायला सांगितलं . आणि निघालो .
सोमवारी मी ऑफिस ला आलो . कोणी तरी बोलताना मी ऐकलं दिलीपची तब्बेत ठीक नाही आहे आणि ते हॉस्पिटल मध्ये आहेत. मला वाटले ते डोळ्यांच्या ऑपेरेशन साठी ऍडमिट झाले त्या बद्दल कोणी तरी बोलत असतील . पण नंतर दोन दिवसांनी दिलीप आले नाहीत म्हणून चौकशी केल्यावर मला कळाले कि रविवारी संध्याकाळी त्यांची तब्बेत अचानक खूप बिघडली . त्यांच्या डोक्यात खूप कळा येऊ लागल्या ज्या त्यांना सहन होईना . आधी फॅमिली डॉक्टर ला दाखवले नंतर एका नर्सिंग होम मध्ये त्यांना ठेवले . पण त्यांना प्रचंड वेदना डोक्यात होऊ लागल्या म्हणून त्यांना जवळच्याच एका मोठ्या हॉस्पिटल मध्ये भरती करण्यात आले . ते वेदनेने अक्षरक्षा मोठ्या आवाजात ओरडत होते . शेवटी त्यांना बेडला हातपाय बांधून ठेवून गुंगीचं औषध देण्यात आलं तरी ते वेदनेने कळवळत होते .
असेच ५-६ दिवस गेले दिलीप ऑफिस ला आले नाहीत म्हणून चौकशी केली तेव्हा कळाले कि अजून त्यांना खूप वेदना होत आहेत आणि ते खूप जोरात हातपाय झाडत ओरडत असतात . त्यांना आय सि यु मध्ये दाखल करण्यात आले होते . त्यांच्या आजाराचं निदान होत न्हवतं . ब्रेन ट्युमर असावं म्हणून टेस्ट करायचं ठरलं . पण ते नॉर्मल होत न्हवते म्हणून टेस्ट रखडत होती . शेवटी टेस्ट झाली . ब्रेन ट्युमर न्हवता पण त्यांना निमोनिया व टायफॉईड वगैरे असे काही झाल्याचे मला समजले .

अजून एक आठवडा गेला . दिलीप आई सि यु मधून बाहेर आले . हे ऐकून मला आणि ऑफिस मधील बऱ्याच स्टाफ ला बरे वाटले . मला त्यांना बघायचे होते पण कामाच्या गडबडीत जाता येत न्हवते . त्यांची तब्बेत परत दोन दिवसांनी बिघडली . त्यांना आई सि यु मध्ये नेण्यात आले . त्यांना बघायला त्यांच्या डिपार्टमेंटची आणि ऑफिस मधील काही माणसे गेलेली . त्यांच्या कडून कळाले ते अर्ध्या शुद्धीत असतात . त्यांना डोक्यात खूप वेदना होतात . मोठं मोठ्याने किंचाळतात ओरडतात . त्यांच्या डिपार्टमेंटच्या लोकांची नावे घेतात . ऑफिस च्या कामा बद्दल बोलतात . त्यांच्या डोक्यात नुसतं तेच आहे . ऑफिस च्या कामाचा त्यांच्या मनावर खूप ताण पडला होता. त्यांची अशी परिस्तिथी झालेली ऐकून मग उत्पादन डिपार्टमेंट मधले आणि आडवानी हे लोकं घाबरले . ऑफिस स्टाफ पैकी काही जण उघड पणे आणि काही दबक्या आवाजात दिलीप यांच्या परिस्तिथी बद्दल या लोकांना दोष देऊ लागले . त्या मुळे त्यांना लोकांना तोंड दाखवण्याची नामुष्की आली .
मी आणि आमची एच आर मॅनेजर हॉस्पिटल मध्ये त्यांना बघायला गेलो . ते आई सि यु मध्ये होते . त्यांच्या बायकोला आम्ही भेटलो . त्या खूप थकल्या होत्या . महिनाभर त्या हॉस्पिटल मध्येच जास्त वेळ होत्या . त्यांनी दिलीपला सांगितलं ऑफिस मधून एच आर मॅनेजर आल्या आहेत . त्या बरोबर ते एकदम किंचाळले . “मला कामावर जायचं नाही आहे . मी कामावर जाणार नाही आहे . मी नाही जाणार” . ते अर्ध बेशुद्धीच्या अवस्थेंत डोळे बंद करून बोलत होते . आमच्या एच आर मॅनेजर ने त्यांचा हात हातात घेतला आणि त्यांना ती म्हणाली दिलीप “आप काम पे नही आणा चाहते हो तो कोई बात नही . मत आणा पर अब जल्दी से ठीक हो जाओ . घर जाणा है तुम्हे . ऐसे हॉस्पिटल में मत रहो .हमे अच्छा नही लग रहा है . बॉस ने भी बोला है जल्दी ठीक होणे के लिये” .
दिलीप अर्ध बेशुद्ध डोळे बंद असलेल्या परिस्तिथीत बोलले ” बॉस इतना सोचते है मेरे लिये?” . शबाना बोलली “हां . वो आणे वाले थे पर अर्जंट काम आणे के वजह से आये नही” .
मी दिलीप ना हाक मारली . त्यांना म्हणालो लवकर बरे व्हा . ते शांत पणे त्याच अवस्थेत हो म्हणाले . तितक्यात तिथे नर्स आल्या त्यांना त्यांचे स्पंजिंग करायचे होते . त्यांनी आम्हाला बाहेर जायला सांगितले . इतक्यात दिलीप परत हातपाय झाडत थोडे ओरडू लागले . माझं डोकं दुखतंय . मला त्रास होतोय . नर्सनी आम्हाला बाहेर जायला सांगितलं . आम्ही बाहेर आलो . त्यांची पत्नी हि बाहेर आली . त्यांची अशी अवस्था बघून मन खिन्न झालं . आम्ही त्यांच्या पत्नी ला विचारलं ट्रेंटमेन्ट कशी चालू आहे ? डॉक्टर काय म्हणत आहेत . त्यांची पत्नी उदास अवस्थेत म्हणाली त्यांना खूप त्रास होतो . हातपाय जोरात झाडत असतात . ओरडत असतात . ऑफिस मधल्या लोकांची नावे घेतात . कामा बद्दल बडबडत बसतात . सगळं अर्ध बेशुद्ध अवस्थेत डोळे बंद असलेल्या स्थितीत चालू असते . आज थोडी परिस्थिती बरी आहे .
आम्ही त्यांना थोडा धीर दिला . त्यांना घाबरु नका काळजी घ्या म्हणालो . पैश्याची काही मदत हवी का विचारलं . त्या म्हणाल्या सध्या पैशाची गरज नाही आहे . माझे दोन भाऊ आहेत ते थोडी मदत करत आहेत .
दिलीपची अशी कशी अचानक तब्बेत बिघड्ली म्हणून मी त्यांच्या पत्नी ला विचारलं . त्या म्हणाल्या बरेच दिवस त्यांचं डोकं थोडं थोडं दुखत होत . कदाचित चष्मा चा नंबर वाढला असावा असं त्यांना वाटत होत . डॉक्टर कडे त्यांना जायला वेळ मिळत न्हवता . सकाळी जे जायचे ते उशिरा कामावरून यायचे . घरी आले तरी ते फोन वर रात्री अकरा वाजेपर्यंत ऑफिस मधील त्यांच्या लोकांशी कामाबद्दल बोलत असायचे . सध्या ते कामाचाच जास्त विचार करायचे . मी त्यांना म्हणाले होते . जास्त काम पडत असेल तर सोडा नोकरी . आपण अर्धी भाकरी खाऊन राहू पण कामाचा त्रास करून घेऊ नका . पण तुला नाही समजणार . काम झाली पाहिजेत . जवाबदारी आहे असं म्हणून कामाला लागायचे .
आम्ही त्यांचा निरोप घेऊन निघालो . आमच्या दोघांचं मन उदास झालं होत .
ऑफिस ला आलो . कंपनीच्या “सीइओ” ला भेटलो त्यांना सगळी परिस्थिती सांगितली . तो तर आडवाणी पेक्षा हरामी . त्याने आम्हाला विचारलं "कितना दिन जिंदा रहेगा ?". आम्ही दोघे हि त्यांच्या अशा बोलण्याने सर्द होऊन एकमेकांन कडे बघितलं . शेवटी शबाना त्याला म्हणाली " सर आप ऐसे क्या पूछ रहे हो ?" . आमच्या गंभीर चेहऱ्यानं कडे बघून तो थोडा नरमला पण स्वतःला कमी पणा येऊ नये म्हणून आम्हाला म्हणाला " मै स्टेट फॉरवर्ड हूं . मै आप लोगो कि तरह ज्यादा इमोशनल नही हूं ". " दिलीप बहोत दिनो से बिमार है . उसका प्रॉब्लेम डॉक्टर लोगों के समझ मे नही आ रहा है . वो कमजोर दिलका निकला . काम का ज्यादा टेन्शन ले लिया उसने . ठीक भी हुआ तो काम प्रेशर मे नही कर पायेगा . बच गया तो ठीक है” .
“सीइओ” चे बोलणे आम्हाला आवडले नाही . पण आम्ही पुढे जास्त काही बोललो नाही .
दिलीप ची तब्बेत दिवसें न दिवस जास्त खराब झाली . त्यांच्या खालावलेल्या तब्बेतीबद्दल ऐकून मी खूप दुःखी होत होतो . आणि एके दिवशी ती बातमी आलीच दिलीप गेल्याची . तब्बल चाळीस दिवसाची मृत्यू बरोबर चाललेली त्यांची झुंज संपली होती .
ऑफिस मध्ये सगळ्यांनी दिलीपणा श्रद्धांजली वाहिली . एमडी ने मोठी घोषणा केली . दरवर्षी त्यांच्या नावाने बेस्ट एम्प्लॉयी पुरस्कार त्यांच्या डिपार्टमेंट मधील एकाला द्यायचा . मला माहीत होते हि फक्त नावाला आता केलेली घोषणा आहे . पुढे असं काहीही पुरस्कार वगैरे दिला जाणार नाही आहे .
दिलीपणा जाऊन एक आठवडा झाला अडवाणींने घाबरून जाऊन ताबडतोब काही माणसे भरली . मी मनात म्हटलं जेव्हा दिलीप माणसे वाढवायला सांगत होते तेव्हा वाढवली नाहीत आणि आता जेव्हा त्यांचा जीव गेला तेव्हा हा माणूस माणसे वाढवतोय .
काही दिवसांनी मला फरीदा ने नवीन स्टोअर मॅनेजर साठी ची जाहिरात देण्यास सांगितले . माझ्या मनात एक विचार आला "आम्ही पण एच आर वाले साले शेवटी कसाईच. आमचे कामच कंपनीला नवीन नवीन बकरे शोधून देण्याचे आहे . मागणी तसा पुरवठा करणारे आम्ही ."
मी दिलीपच्या रिकाम्या असलेल्या खुर्ची कडे बघितले आणि जड अंतः करणाने कंपनी साठी नवीन बकरा शोधायला सुरवात केली .......

……समाप्त…..

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
1
Your rating: None Average: 1 (1 vote)

प्रतिक्रिया

शेवटी टेस्ट झाली . ब्रेन ट्युमर न्हवता पण त्यांच्या डोक्यात निमोनिया होउन टायफॉईड वगैरे असे काही झाल्याचे मला समजले .

१. हा नक्की काय प्रकार असतो?
२. डोक्यात न्यूमोनिया होऊन टायफॉईड जर होऊ शकतो, तर काखेत डायरिया होऊन कंजक्टिव्हायटिस होऊ शकतो काय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ऐसीने संपादनाची सोय ठेवली आहे. तेवढ्या त्या शुद्धलेखनाच्या आणि भाषेच्या चुका सुधारु शकता.
गोष्ट टचिंग आहे पण तपशीलात जरा घोळ वाटतोय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.