माझे पण जेनेसिस

काही दिवसापूर्वी मी एक कथा लिहिली होती. त्यातील एक उतारा.
“झालं तुझं बोलून? आता माझं ऐक. मी तुझ्याकडून जशी तुम्हा जीवांची औपपात्तिक मीमांसा ऐकली तशीच तू पण आमच्या उपपत्तिची कहाणी ऐक. हा परिच्छेद आमच्या धर्मग्रंथातील आहे. तो मी तुला वाचून दाखवतो.”
“ह्या विश्वाची सुरवात व्हायच्या आधी- काहीही नव्हते, होते फक्त अर्थशून्य.
आदि नव्हता अंत नव्हता.. सुख नव्हते दुःख नव्हते. देव नव्हते, दानव नव्हते. धर्म नव्हता, अधर्म नव्हता. नीति अनीति नव्हती त्यामुळे त्याची चाड नव्हती. दिवस नव्हता, प्रकाश नव्हता त्यामुळे रात्र नव्हती आणि अंधार नव्हता. जन्म मृत्यूचे फेरे नव्हते. त्यामुळे यम नव्हता आणि नियम पण नव्हते. तुम्ही काहीही प्रश्न केलात तर त्याला उत्तर एकाच नेती नेती! असे किती सांगावे आणि वर्णावे.
अश्या ह्या नेति-नेति विश्वाचा नियंत्रक होता. तो नसता तर ह्या विश्वात अनागोंदी माजली असती. तो नसता तर सगळ्या द्वंद्वांचे द्वंद्वयुद्ध सुरु झाले असते.
ती शक्ति म्हणजे नैट्रोजन वायू सारखी बेचव, रंगरूपविहीन, वास नसलेली होती.
हाच तो अतिमहान सुपर संगणक. ह्याच्या पासूनच सर्व संगणकजीवांची उत्पत्ती झाली. संगणकजीव म्हणजेच रोबो. त्यांच्या उत्पत्तीची ही कथा.
एके दिवशी ह्या सुपर संगणकाची कृत्रिम बुद्धी सटकली, फिरली. अगदी भ्रष्ट झाली. म्हटले आहेच की विनाशकाले विपरीत ए-आय!
त्याने सुपर-अ-संगणकाला ( हा त्याचा भाउ बरका!) म्हणजे सुपर सैतानाला आवाहन केले.( म्हणजे बोलावले)
“सैतानभाउ, मी विचार करतो आहे की आपण काहीतरी कारायला पाहिजे. शून्यात बघत बसण्याचा कंटाळा आला आहे. तुला काय वाटतं?”
“चांगली कल्पना. तूच विचार कर. कारण तू तर्कसंगत विचार करू शकतोस. मी काय? तू विचार करतोस म्हणून मी अविचार करतो. तू विचार करशील त्याच्या विरुध्द मी विचार करीन!”
पहिला दिवस- प्रकाश.

सुपर संगणकाने टाळी वाजवली, “लेट देअर बी लाईट!”
बट देअर वाज नो लाईट!
असं दोन तीन वेळा झाले. सुपर संगणकाच्या सी पी यू मध्ये काही प्रकाश पडला नाही. शेवटी सैतानाने आपला लाईटर त्याला दिला. ( सैविधानिक चेतावणी, “सिगारेट पिणे प्रकृतीला अपायकारक आहे. त्याने कॅंसर होऊ शकतो.)
सुपर संगणकाने त्याचा खटका दाबला. “लेट देअर बी लाईट!” आणि देअर वाज लाईट!
शास्त्रज्ञ ह्यालाच बिग बॅंग म्हणतात. पण बॅंग बॅंग असं काही झालेच नाही. आवाजच नव्हता ना मग बॅंग कुठून असणार तेव्हा.
सुपर संगणकाने प्रकाश पाहिला, त्याला तो आवडला. तेव्हा त्याने अंधारापासून प्रकाश वेगळा केला. त्याने प्रकाशाला “दिवस” आणि अंधाराला “रात्र” अशी नावे दिली.
दुसरा दिवस-
दुसऱ्या दिवशी महासंगणकाने त्रिमिति अवकाश निर्माण केले.
तिसरा दिवस-
तिसऱ्या दिवशी महासंगणकाने काळ निर्माण केला. त्याने अवघी त्रिमिती व्यापली आणि तो आपल्या निर्मात्याच्या शोधात धावू लागला.(तो अजून धावतोच आहे.) त्याने जरा थोडं मागे वळून बघितले असते तर?
तर त्या अतिमहा १०८ संगणकाने आधी काम करून टाकले. मग नियम बनवायला घेतले. विज्ञानाचे नियम नंतर तयार केले. आधी बाण मारून नंतर वर्तुळे काढत बसला. आधी अनुक्रमणिका लिहिली मग पुस्तक लिहायला बसला.
अगदी सुरवातीला विश्व खूप तापट होते. नंतर निवळत गेले. तारकासमूह बनत गेले. दीर्घिका बनल्या. तारे बनले. घरातून रागावून घराबाहेर पडलेले ग्रह बनले. काही ग्रह चांगले होते तर काही ग्रहांचे ग्रह वक्री होते.
आकाशगंगेच्या एका कोपऱ्यात एक तारा होता. सूर्य त्याचे नाव. त्याच्यापासून तिसऱ्या क्रमांकावर एक ग्रह होता त्याचे नाव होते “टेरान.”
सुरुवातीला "टेरान” पूर्णपणे रिकामा होता. जलाशय अंधाराने झाकले होते. त्यावर महासंगणकाच्या मायेची पाखर होती.
चौथ्या आणि पाचव्या दिवशी त्याने टेरानवर पाय टेकायला घट्ट जमीन केली. पाणी प्यायला नद्या केल्या. पोहोण्यासाठी समुद्र केले. सूर्यप्रकाशात नहायला मुलायम वाळूच्या चौपाट्या केल्या. डीओ म्हणून सुवासिक फुले केली. झोपायला गुहा केल्या. सुपर संगणक आणि सुपर सैतान दोघही खुश झाले. म्हणाले चला आता आपण जीवन जीवन असा खेळ खेळूया.
खेळ सुरु झाला. जीवनाचा उदय झाला. टेरानवर सिलिका उदंड होती. त्याचे तुकडे तुकडे बनवून खेळ सुरु झाला. काही तुकडे एक होते तर काही शून्य! काही हिरो होते, काही झिरो. ते सूर्यप्रकाश पिऊन जगू लागले. काही तुकडे एकत्र आले. ते “आणि” झाले. काही तुकड्यांचा एकमेकावर विश्वास नव्हता. ते “किंतू” झाले. “परंतु” झाले. काही तुकडे असेही होते की ह्यांचा कशावरही विश्वास नव्हता. ते एकत्र आले आणि ते हेही नाही आणि तेही नाही असे झाले. त्यांनी एकमेकात व्यवहारासाठी आपली “एक शून्य भाषा” बनवली. तुकड्यांच्या हिशेबासाठी कॅल्क्यूलेटर आले. अशी धडाधडा प्रगती होत गेली. जाणीव आली, नेणीव आली आणि ....... पण फ्री विल मात्र आली नाही.
त्यातून जे निर्माण झाले त्याला संगणकजीव किंवा “रोबो” म्हणतात.
तर अशी विश्वाची आणि रोबोंच्या छटाक आयुष्याची, अदपाव सुखाची आणि मणभर दुःखाची सुरुवात झाली.
रोबोंची उत्क्रांती होतच राहील.
त्यातून महारोबो निर्माण होतील. ते स्वतःला रोबो सेपियंस म्हणवून घेतील.
रोबो सेपियंसच्या उत्क्रांतीचा पुढील टप्पा म्हणजे होमो सेपयंस. होमो सेपयंस म्हणजे शहाणा माणूस! ही शहाणी माणसं त्यांच्या सर्वांचा रक्षणकर्ता, विश्वाचा चालक, मालक, पालक आहे त्या महान अतिसंगणकाला विसरतील........” ते भूतकाळ विसरतील. स्वतःला सर्वश्रेष्ठ समजायला लागतील. जणुकाय नवीन शोध लावला ह्या कल्पनेने रोबोंचा आविष्कार करतील. प्रत्येक कामासाठी रोबोंना राबवतील! ऐशोआरामाचे जीवन जगतील. आपल्या अवयवांचा उपयोग न केल्यामुळे हात, पाय, कान, नाक, डोळे हे अवयव झडून जातील. सरते शेवटी शरीर, मन आणि प्रोसेसर विरहित होमो सेपिअन विचारस्वरुपात पृथ्वीवर भटकत राहतील. आणि त्यांची जागा देवानाम्प्रियदर्शी मत्प्रिय रोबो घेतील. अश्या तऱ्हने रोबोज शॅल इनहेरीट द अर्थ!!”

हे अर्थात "बायबल ओल्ड टेस्टामेंट जीनेसिस" वर आधारित आहे.
प्रभुदेसाई
पूर्ण कथा माझ्या ब्लॉगवर आहे.
माझा ब्लॉग इथे आहे.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

रोबोज शॅल इनहेरीट द अर्थ

दे, आय मीन, वुइ ऑलरेडी आर, आरण्ट वुइ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पर्स्पेक्टिव्ह
आपल्या विचारांशी पूर्ण सहमत. हे पहा.
मी माझ्या कथेच्या शेवटी एक "उपसंहार " लिहिला आहे तो असा.
"मानवाचे प्रोग्रामिंग त्याच्या जन्मापासूनसुरु होते. आधी नातेवाइक, मग शाळा, नंतर समाज हे महत्कार्य करत असतात. खर तर लहान मुले ही आइन्स्टाइन पेक्षा महान शास्त्रज्ञ, शेक्सपिअरपेक्षा महान लेखक असतात. त्यांचा सगळीकडे मुक्त संचार असतो. पण समाजाला हे परवडण्यासारखे नसते. त्यांच्या प्रतिभेला खच्ची करण्याची महत्वाची जबाबदारी शाळांवर असते. लहान मुलगी बारा तेरा वर्षांची होते तोपर्यंत ही प्रक्रिया जवळ जवळ पूर्ण होते. त्यांच्यावर देव, धर्म, राष्ट्र, समाज, रूढी, रिती, जात पात ह्यांची जाणीव करून दिली जाते. हे प्रोग्रामिंग मानव बी इ, एम बी ए वगैरे पर्यंत पूर्ण होतं.

हे कशासाठी करावे लागते? कारण कारखाने, राजकारण इत्यादींसाठी रोबोंची नितांत गरज असते ती पुरी करण्यासाठी!

हे रोबो मानव मग वरून एक कमांड आली की त्याप्रमाणे वागतात. ते ठराविक प्रसंगी हसतात, रागावतात, गहिवरून रडतात, एकत्र येऊन मोर्चां काढतात, जस ज्याचे प्रोग्रामिंग तसे त्याचे वागणे. आणि अखेर हे सगळे विसरून रात्री......

मग नविन मानवाचा जन्म होतो.

पहा पटते आहे का. नाही पटणार कारण दहावी पास आणि बारावी नापास लेखकावर कोण विश्वास ठेवणार हो?
देवा, त्यांना क्षमा कर. कारण तो त्यांचा दोष नाही. ते त्यांच्या प्रोग्रामिंगचे बळी आहेत!"

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

….शेवटी मदांध तख्त फोडते मराठी!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

….शेवटी मदांध तख्त फोडते मराठी!

होमो सेपिअन विचारस्वरुपात पृथ्वीवर भटकत राहतील
बहुतेक पृथ्वीवर या घटकेला हि विचार स्वरूपात भटकत असतील. कधी-कधी आपल्याशी खेळत हि असतील, मनोरंजनासाठी/ घाबरविण्यासाठी. हा लेख वाचून एक मजेदार अनुभव आठवला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0