बखर....कोरोनाची (भाग १०)

आज आपण सर्व एका महत्त्वाच्या 'ट्रान्झिशन टाइम'मध्ये आहोत.

म्हणजे असं, की आत्ता जे घडत आहे ते आपल्या सगळ्यांकरता एका प्रकारचं 'once in a lifetime' घटना आहेत.

माझ्या वडिलांच्या पिढीने कदाचित दुसऱ्या महायुद्धाच्या परिणाम वाचले, बघितले आणि क्वचित भोगले असतील.
आजोबांच्या पिढीने कदाचित प्लेग बघितला असेल त्याचे परिणाम भोगले असतील.

पण अर्थातच हे सर्व जागतिकीकरणपूर्व काळातील आहे.
आणि त्यामुळे मर्यादित भागात परिणाम करणारं.
पण आज जे घडताना दिसतंय ते सर्वदूर आणि दूरगामी परिणाम करणारं आहे असं वाटतंय.

म्हणजे ही कोरोनाची साथ एक दोन महिन्यात जाईलही (आणि कदाचित तीनचार महिन्यांनी परत येईल अजून जोरात)
पण त्याचा प्रसार ज्या झपाट्याने झालाय त्यामुळे व्यापार उद्योग ते अर्थव्यवस्था ते हेल्थकेअर , सर्व सर्व बाबींमधे वेगाने आणि मूलगामी बदल होताना आपल्याला दिसेल.

ही प्रलयघंटा आहे का ? माहीत नाही , बहुधा नाहीच.
पण एक जाणवतंय की इतिहास घडतोय , आपल्यासमोर...
वेगाने, इतक्या की गेल्या महिन्यात काय होते हे आपण आज कदाचित विसरणार आहोत.

म्हणून या आज घडणारा इतिहास , आपल्याला दिसेल तसा इथे नोंदवत जाऊयात का ?
हिस्टरी ऑफ द प्रेझेंट लिहुयात ? इथेच, या धाग्यावर?
बखर वगैरे म्हणजे काय असतं ? हेच ना?
चला, जशी दिसेल तशी, कळेल तशी ,कुठल्याही विषयावर कोरोना साथीमुळे झालेल्या बदलांची नोंद करूयात आणि लिहुयात

बखर कोरोनाची
(आधीच्या धाग्यावर ~१०० प्रतिसाद झाल्यामुळे नवा धागा काढला आहे.)

Covid-19 Fifth wave in Europe - November 2021

Daily Cases per Million People - 18 Nov 2021

(प्रतिमा आंतरजालावरून साभार)
युरोपात पाचवी लाट चालू झाली आहे असे दिसत आहे. ऑस्ट्रिया, जर्मनी अशा काही देशांत प्रामुख्याने लस न घेतलेल्या लोकांत संसर्ग पसरत आहे.

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
0
No votes yet

हिवाळा संपेपर्यंत जर्मनीतले जवळपास सगळे लोक मेलेले तरी असतील, किंवा त्यांना करोना होऊन तरी गेलेला असेल किंवा त्यांनी लस तरी घेतलेली असेल. - जर्मन आरोग्यमंत्री

The German health minister, Jens Spahn, warned that by the end of this winter, “just about everyone in Germany will probably be either vaccinated, recovered or dead.”
 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

दक्षिण आफ्रिकेत सापडलेल्या करोनाच्या नव्या व्हेरियंटमुळे खळबळ माजली आहे. आधीच्या व्हेरियंट्सपेक्षा त्यात खूप नवी म्यूटेशन्स आहेत आणि त्यातली बरीचशी स्पाईक प्रोटीनवर आहेत. त्यामुळे सध्या उपलब्ध लशींचा त्यावर कितपत उपयोग होईल याविषयी अभ्यास चालू आहे.
New heavily mutated variant B.1.1.529 in South Africa raises concern

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

जगात अनेक साथी चे रोग आले.जेव्हा औषध ,डॉक्टर उपलब्ध नव्हते तेव्हा सुद्धा ..
पण..
1)रोगाची लागण.
२) प्रसार
३) उच्च पातळीवर रोग पोचणे
४) आणि त्या नंतर साथी ल उतरती कळा लागली जाते आणि रोग नष्ट होतो
हेच corona बाबतीत पण नैसर्गिक नियमाने झाले पाहिजे.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पूर्वग्रह सोडून आता आयुर्वेदा कडे नव्या दृष्टीकोणातून पाहणे योग्य. नुकतेच जर्मनीच्या एका मेडिकल जर्नल ने या औषधला कवर पानावर स्थान दिले.
कारोनिल
https://l.facebook.com/l.php?u=https%3A%2F%2Fanalyticalsciencejournals.o...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक1
 • पकाऊ1

नव्या व्हेरियंटविषयी हळू हळू माहिती उपलब्ध होते आहे -
Omicron: everything you need to know about new Covid variant

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

विषयी बातम्या ऐकल्या की मनात धडकी भरते.लसीकरण झाले आता निवांत ही भावना क्षणात पळून जाते आणि परत २०१९ मध्येच आहोत
की काय ह्याची जाणीव टोचत राहते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

थोडक्यात, काम चालू आहे, घाबरू नये, सावधगिरीने वागावे.
3 Questions We Must Answer About the Omicron Variant

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

उदाहरणार्थ विषारी सापांच्या विषासाठी- भारतातले किंवा जिल्हावारी आढळणारे साप आणि त्यांच्या लशी. नाग,फुरसे,घोणस आणि मण्यार चावल्यास जो चावला आहे त्याचीच वापरावी लागते. म्हणजे शास्त्र तसे सांगते. संदर्भ हाफकिन, परळ.

चांगले निरोगी घोडे पाळतात. नाग/विषारी सापाचे विष काढतात. योग्य मात्रेने घोड्याला टोचतात. घोड्याच्या शरिरात ( रक्तात) विरोधी पेशी किंवा द्रव्य तयार होते. ४८ तासात. रक्त काढून ते निरःद्रव करतात आणि फ्रिजरमध्ये ठेवतात लेबल लावून. याच घोड्याला सहा महिन्यांनी पुन्हा विषप्रयोग करून रक्त घेतात. (नंतर गोळी घालतात):(

सांगण्याचा हेतू हा की कोरोनाची लस काढण्यासाठी निरोगी मनुष्य/घोडा काय उपयोगात आणतात माहिती नाही.

कोरोनाबद्दलचे माहिती नाही. किती वेरिअंट आणि कोणते संभाव्य हल्ले आणि कोणती लस. म्हणजे स्पेसिफिक झाल्यास तेवढ्या लशी होऊ शकतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

'करोना विशेष' भागात 'करोना लस' नावाचा विभाग आहे. तिथे लशींबद्दल तज्ज्ञांनी पुरेसं लिहिलं आहे. कशाला उगाच पिंका टाकून त्याला चित्र बनवायचा प्रयत्न करता? हवं तर 'ऐसी रत्न' वगैरे पुरस्कार सुरू करून तुम्हाला देऊ; पण निष्कारण, माहिती नसताना काहीच्या काही का लिहिता?

कधी तरी माहितगार, तज्ज्ञ वगैरे लोकांना, किमान ऐसीवर तरी मोकळेपणानं बागडू द्या. पिंका टाकायला फेसबुक, ट्विटर वगैरे दिलंय ना देवानं!

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.