सिलेंडरेला

आटपाट नगर होतं. त्या नगरात गॅस सिलेंडरची एजन्सी लाभलेला एक इसम राहत होता. त्याची पहिली पत्नी आता भूतलावर नव्हती त्यामुळे त्याने दुसरे लग्न केले होते.

द्वितीय पत्नी आपल्या सावत्र मुलीचा छळ करी. आपल्या सख्ख्या मुलींना चुलीवरच्या चांगल्याचुंगल्या चीजवस्तू चारी; आणि सावत्र मुलीला गॅस सिलेंडरची डिलिव्हरी करायला पाठवी. तिचाकी सायकल दामटत नगरभर गॅस सिलेंडर पोहोचवणाऱ्या त्या मुलीला सर्वजण सिलेंडरेला म्हणत.

नगरातील राजपुत्राने एकदा शाही नृत्याचे आयोजन केले. सिंडरेलाची गोष्ट वाचून स्फुरण चढलेली सिलेंडरेला नृत्यासाठी गेली. पण तिचा कायापालट करणारी परीराणी न भेटल्याने, तिला राजपुत्रासोबत नृत्य करायची संधी मिळाली नाही.

सिलेंडरेला तिरीमिरीत घरी आली. "आय ॲम ढ मास्तर ऑफ माय फेटा" असे गुणगुणत तिने एक निश्चय केला. तिचाकी सायकलमधले दोनचार सिलेंडर घरी ठेवून तिने ते प्रज्वलित केले, व ती तेथून पोबारित झाली.

जैसे भडभुंजे लाह्या भाजतात तैसा एकच धमाका जाहला. सर्व कुटुंबीय हवापालटासाठी परगावी गेले असल्याने कोणालाही इजा झाली नाही. यथावकाश घराच्या विम्याचे पैसे मिळाले. असेट माॅनेटाईझ करायचा उत्तम उपाय शोधल्याबद्दल सर्व कुटुंबियांनी सिलेंडरेलाचे कौतुक आणि अभीष्टचिंतन केले.

तोवर पाईप्ड गॅस आल्यामुळे गॅस सिलेंडरची एजन्सी बंद करून सर्वजण गुण्यागोविंदाने राहू लागले.

टीप: घराच्या विम्याचे पैसे: साभार स्फूर्ती - "द फायरी वूईन्ग ऑफ माॅर्ड्रेड" - पे. ग्रॅ. वूडहाऊस

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

थोडं जमलं नाही असं वाटलं मला.
'देवदत्त स्टॅंडर्ड' नी अपेक्षा वाढवून ठेवल्यायत असं म्हणता येईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"ढ मास्तर ऑफ माय फेटा" वाचून मीच पोबारित होते आता!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

घर उध्वस्त करून विम्याचे पैसे मिळवणे हे असेट मोनेटाइझ करणे कसे झाले ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ष्टोरी ठीकठीक आहे. क्लासिक देवदत्तियन ष्ट्याण्डर्ड मात्र नाही म्हणवत.

रा.रा. श्री. पे. ग्रे. वुडहाउस यांजबद्दल अत्यादर, अतीव प्रेम, जिव्हाळा, नतमस्तकता वगैरे वगैरे टोकाच्या पॉझिटिव भावना मनात बाळगूनसुद्धा, त्यांची मि. मलिनर मालिका मला आत्यंतिक कंटाळवाणी वाटते, ही बाब या निमित्ताने येथे नमूद करणे अगदीच अस्थानी ठरेल काय?

तसेही, विम्याच्या पैशांसाठी स्वतःच्या मालमत्तेस आग लावणे ही संकल्पना/थीम ही वुडहाउसची खाशी बहुधा नसावी; इंग्लंडीय वाङ्मयात ही संकल्पना/थीम बहुधा बऱ्यापैकी सामान्य असावी, अशी शंका घेण्यास वाव आहे. (किमानपक्षी एनिड ब्लायटनच्या एका कथेतसुद्धा या थीमेस सामोरे गेल्याचे स्मरते. कदाचित इंग्लंडात हा प्रकार सर्रास घडत असावा काय?)

असो; बाकी चालू द्या.

——————

दुसऱ्या महायुद्धकाळात वुडहाउसच्या जर्मन स्थानबद्धतेवेळी आणि तद्नंतर, काही निखालस गैरसमजांपोटी इंग्लंडने वुडहाउसला जी अत्यंत वाईट वागणूक दिली, ती लक्षात घेता, या पहिल्या रा.बद्दल शंका उपस्थित होते. पुढे वुडहाउसच्या मरणाच्या थोडे अगोदर राणीच्या वाढदिवसाच्या यादीत त्यास सरकी दिल्याने त्या अन्यायाचे परिमार्जन झाले, असे मनापासून वाटत नाही. असो चालायचेच.

ही भावना अगोदर लिहायची विसरलो, ती ताज्या कलमात घुसडली.२अ

२अ ‘जिव्हाळा’ तथा ‘जीव्ह्ज़’ यांच्यातील संबंध बादरायण असून, त्यांतील ध्वनिसाधर्म्य हा निव्वळ योगायोग आहे, हे येथे सूचित करणे प्राप्त आहे.२अ१

२अ१ अवांतर: वुडहाउससाहेबाची जीव्ह्ज़ मालिकासुद्धा मला एका मर्यादेपलिकडे अपील होत नाही. बिगिनरांकरिता ठीकच आहे, परंतु, not connoisseur material. Not among his superlative output. दुर्दैवाने, वुडहाउस आजमितीस (निदान भारतीयांत तरी) जीव्ह्ज़ मालिकेकरिताच अधिकतर ओळखला जातो. चालायचेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अवांतर: वुडहाउससाहेबाची जीव्ह्ज़ मालिकासुद्धा मला एका मर्यादेपलिकडे अपील होत नाही. बिगिनरांकरिता ठीकच आहे, परंतु, not connoisseur material. Not among his superlative output. दुर्दैवाने, वुडहाउस आजमितीस (निदान भारतीयांत तरी) जीव्ह्ज़ मालिकेकरिताच अधिकतर ओळखला जातो.

अतिसहमत. गोल्फ गोष्टी, विलियम टेल वगैरे अतिशय underrated आहेत. असेच अजून काही सुचवू शकाल का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

The Journey Is the Reward...

स्मिथ (Psmith), ब्लँडिंग्ज़ कॅसल, अंकल फ्रेड वगैरे मालिका (आणि त्या मालिकांचे blends) हे तर all-time favorites आहेतच, परंतु, (कोठल्याही मालिकेचा भाग नसलेल्या) काही one-off कथासुद्धा उत्कृष्ट आहेत. (Uneasy Money हे एक उदाहरण चटकन डोळ्यांसमोर उभे राहाते.)

The Man Upstairs किंवा The Man With Two Left Feet यांसारखे काही one-off कथासंग्रहसुद्धा आहेत, ज्यांतील काही (परंतु सर्वच नव्हेत!) कथा उत्कृष्ट आहेत.

गोल्फकथांबाबत: दुर्दैवाने गॉल्फमध्ये यत्किंचितही गम्य नसल्याकारणाने यांच्याशी फारसा relate करू शकलो नाही. परंतु, यात अर्थात दोष सर्वस्वी माझा! (तरीसुद्धा, The Clicking of Cuthbert – हीस गोल्फकथा म्हणता यावे काय? – आवडल्याचे आठवते.) विल्यम टेल टोल्ड अगेन पूर्वी वाचलेली आहे; (किंडलवर) संग्रहीसुद्धा आहे. मात्र, आता तपशील आठवत नाहीत. (वाचली होती, तेव्हा आवडल्याचे आठवते. पुन्हा वाचावी लागेल. (Told Again, Read Again?))

—————

विशेषतः, ब्लँडिंग्ज़सम्राज्ञी आणि/किंवा गॅली ज्यांत आहेत, असे अंक.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खरंय- I get where you're getting from! Uncle fred in the springtime माझी पहिली वूडहाऊस कादंबरी होती- and it was love at first read! Blandings Castle चे व्यक्तिचित्रण (Caricaturisation), वातावरण निर्मिती हे त्याच्या बाकीच्या संग्रहापेक्षा फार वेगळ्या पातळीवर आहे.
Jeeves series फारच underwhelming वाटली होती, खरं!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

The Journey Is the Reward...