"जित्या डी एन ए चा "

जित्या डी एन ए चा / करावा आदर
थोडीशी भाकर/ सर्वां द्यावी
भुकेलेले माऊ/ थंडीतला ससा
पाळलेला मासा /टॅंकातला
किंवा पसरे जो / देहाची चादर
फूटपाथवर / पोरगेला
डी एन ए सतत/ बने नव्याने ते
आणि बनविते/ विश्वालाही
नवी सुव्यवस्था / रोज नवी भेट
रिऍक्शन रेट/ रसायनी
नवी त्वचा पाही/ उब साठवाया
टिकून ठेवाया / उर्जा थोडी
आपणही त्यासी/ मदत करावी
हाताने हारावी / आपत्ती ती
सर्व डी एन ए चे/ मानू एक गोत्र
आपणच छत्र / आपणांचे
xxx

field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (1 vote)

प्रतिक्रिया

उदात्त

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************