ॲलोपथी आणि पर्यायी वैद्यकीय प्रणाली - भाग १०

प्रकरण १० – युनानी आणि सिद्ध

सुधीर भिडे

विषयाची मांडणी

 • युनानी वैद्यकाचा विकास
 • युनानीचे मूलभूत सिद्धांत
 • रोग निदानाच्या चाचण्या
 • उपचार
 • युनानी औषधे
 • युनानीचे शिक्षण
 • समालोचन
 • युनानी वैद्यकाला शास्त्रीय वैद्यक म्हणता येईल का?

***

युनानीचा विकास

युनानी वैद्यक अरेबियन अथवा इस्लामिक वैद्यक म्हणूनही जाणले जाते. युनानी वैद्यकाचे मूळ ग्रीक वैद्यकात सापडते. अविसेन्ना या हकिमाने त्याचा विकास दहाव्या / अकराव्या शतकात केला. ('ऐसी अक्षरे'चे वाचक जयदीप चिपलकट्टी यांनी चूक दाखवून दिल्याबद्दल आभार.) या ग्रीक ज्ञानभांडारात नंतर आखाती देशांतील आणि दक्षिण आशियातील ज्ञानाची भर घालण्यात आली. हे ज्ञान मुसलमानांच्या बरोबर भारतात पोहोचले. पुढे सातशे वर्षे हे वैद्यक भारतात विकसित होत राहिले. साहजिकच या वैद्यकावर पाश्चिमात्य वैद्यक आणि भारतातील आयुर्वेद या दोन्हींचे प्रभाव दिसतात.

युनानीचे मूलभूत सिद्धांत

व्यक्तीच्या शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्थितीचा समतोल हे तत्त्व युनानी वैद्यकात महत्त्वाचे मानले जाते. पृथ्वी, पाणी, वायू आणि अग्नि ही मूलतत्त्वे आहेत. त्यांच्या संयोगातून जीवाचा विकास होतो. शरीरातील द्रव पदार्थ, रक्त, फ्लेम (phlegm), पिवळा बाईल आणि काळा बाईल हे असतात. प्रत्येक व्यक्तीत याचे प्रमाण निरनिराळे असते.

उष्ण, थंड, कोरडे आणि आर्द्र हे व्यक्तित्वाचे प्रकार आहेत. या चार घटकांच्या समतोलाने व्यक्तित्व बनते. प्रत्येक व्यक्तीत यांचे प्रमाण निरनिराळे असते. व्यक्तित्वाचे उष्ण-कोरडे, उष्ण-आर्द्र, थंड-कोरडे आणि थंड-आर्द्र असे प्रकार असतात.

प्रत्येक व्यक्तीत रोगाशी लढण्याची एक आंतरिक शक्ती असते. हकिमाला इलाज करताना या शक्तीला मदत करायची असते.

रोग निदानाच्या चाचण्या

आयुर्वेद आणि युनानीत रोगनिदानाच्या चाचण्यांत पुष्कळ साम्य आहे. आपण दोन उदाहरणे पाहू.
मूत्रचाचणीसाठी सकाळी अन्शपोटी मूत्र एका काचेच्या भांड्यात घेतले जाते. मूत्राचा रंग, पारदर्शकता, वास, खाली बसणारे कण यांचे निरीक्षण केले जाते. (माहिती International Journal of Health Sciences and Research www.ijhsr.org ISSN: 2249-9571 Review Article Urinalysis: A Diagnostic Tool in Unani System of Medicine Shaista Bano, Mohd Zulkifle, Tariq Nadeem Khan, Mohammed Mubeen या शोधनिबंधातून)

नाडीचे खालील गुणधर्म पाहिले जातात –

 • Quality of expansion (length, width, depth)
 • Quality of impact (strong, weak, moderate)
 • Duration of cycle (fast, slow, moderate)
 • Duration of pause (successive, different, moderate)
 • Between beats (full, empty, moderate)
 • Compressibility (hard, soft, moderate)
 • Pulse perspiration (full, empty, moderate)
 • Regularity
 • Order and disorder (ordered, irregular, irregularly disordered)
 • Rhythm (similar, different, out of rhythm)

माहिती Yaser Abdelhamid ND, LAc, MS, BS, BA, in Textbook of Natural Medicine (Fifth Edition), 2020

नाडीचे असेच वर्ण आयुर्वेदाच्या एका शोधनिबंधात दिसते. Traditional practices and recent advances in Nadi Pariksha: A comprehensive review, P. Venkata Giri Kumar, H. R. Nagendra Journal of Ayurveda and Integrative Medicine, Volume 10, Issue 4, October–December 2019, Pages 308-315

उपचार

हवा, अन्न, व्यायाम, मानसिक अवस्था, झोप, पचनसंस्थेची स्थिती, या सर्वांचा प्रकृतीवर परिणाम होत असतो. युनानी वैद्यकात सर्वप्रथम हे घटक नीट करण्याकडे भर असतो. इलाजाची सुरुवात योग्य आहारापासून होते. यानंतर औषधे देण्यात येतात. औषधे वनस्पतीजन्य, प्राणीजन्य आणि खनिजे असतात. याशिवाय मसाज, आंघोळीचे निरनिराळे प्रकार, व्यायाम, जळवा लावून अशुद्ध रक्त काढणे, अशा तर्‍हेचे उपचार केले जातात.

युनानी औषधे
हमदर्द लॅबोरेटरीज ही कंपनी भारतात १९०६पासून युनानी औषधे बनवत आहे. याशिवाय युनानी औषधे बनविणार्‍या पुष्कळ कंपन्या आहेत. युनानी औषधांविषयीची माहिती 'आयूर टाइम्स' या प्रकाशनामधून घेतली आहे. हे नोंदवण्यासारखे आहे की, आयुर्वेदांच्या औषधाची माहिती देणारे प्रकाशन युनानी औषधांचीही माहिती देते. संदर्भांमधले अनेक उर्दू शब्द इंग्लिशमध्ये लिहिलेले होते. मी त्यांचे परत उर्दूकरण केले. यात काही चुका झालेल्या असण्याची शक्यता आहे. तरीही हा काय प्रकार आहे ते साधारणपणे कळेल.
युनानी औषधांचे अकरा प्रकार असतात.

हब (गोळ्या), इत्रिफल (द्रव), जवारिष (जॅमसारखे), खमिरा, खुष्त (भस्म), लबूब, माजन, मलम, अर्क, सफुफ, शरबत (रूह अफजा सरबत प्रसिद्ध आहे).

काही थोड्या औषधांची माहिती घेऊ.

हब-ए-सुरंजान – हे औषध सांधेदुखीवर वापरले जाते. कोरफड, सोया, टरपेथम, नीळ, सुरंजन शिरीन, गुग्गुळ यांचे मिश्रण करून गोळ्या बनविल्या जातात.

इट्रीफल उस्तूखुद्दुस हे औषध डोकेदुखी, अर्धशिशी यांवर वापरले जाते. हे औषध मेंदूचे टॉनिक आहे. ते हरीतकी, बिभितकी, आवळा, उस्तूखुद्दुस, बेल, मनुका, बदामाचे तेल, आणि मध यांपासून बनविले जाते.

जवारिष जालिनूस हे औषध पचनसंस्थेचे आजार, हृदयाचे आजार, फुप्पुसांचे आजार, मेंदूचे आजार, खोकला, पाइल्स, खरूज, गाऊट,आणि मूतखडे यांवर वापरले जाते. किरातटिक्त, दालचिनी, बडी इलायची, गुग्गुळ, लवंग, खाण्याचा डिंक, मिरी, पिपली, मध यांपासून हे औषध बनवितात.

आयुर्वेदात ज्याला भस्म म्हणतात तशाच प्रकारची औषधे युनानीत वापरली जातात. अशा औषधांना खूष्ठा म्हणतात. पारा, आर्सेनिक, लोह, अशा खनिजांपासून पासून बनविलेली ही भस्मे शरीराला धोकादायक असतात.

युनानीचे शिक्षण

National Commission for Indian System of medicine या संस्थेच्या माहितीनुसार देशात ४६ महाविद्यालये BUMS हा साडेपाच वर्षांचा अभ्यासक्रम शिकवितात. याशिवाय पदव्युत्तर डिप्लोमा आणि एम. डी. ह्या पदव्यांसाठी अभ्यासक्रम आहेत. आयुर्वेद आणि होमिओपाथीच्या अभ्यासक्रमाप्रमाणे युनानीच्या अभ्यासक्रमातही ॲलोपाथीमधील आधुनिक anatomy, physiology, pharmacology, haematology या विषयांचे शिक्षण दिले जाते.

समालोचन

मध्ययुगीन युरोपीय वैद्यक, युनानी आणि आयुर्वेद यांत बरेच साम्य दिसते. युरोपीय वैद्यक आणि युनानी या दोन्ही प्रणाली ग्रीक वैद्यकाच्या कल्पनांपासून उगम पावल्या. त्यामुळे शरीरातील चार ‘ह्युमर’ – रक्त, फ्लेम, पिवळा बाईल आणि काला बाईल ही कल्पना दोन्हींत आहे. या चार ह्युमरांमध्ये असंतुलन झाले की आजार होतो ही कल्पना. आयुर्वेदात वात, पित्त आणि कफ असे त्रिदोष विचारात घेतले आहेत. यांत असंतुलन झाले की आजार होतो.

आयुर्वेदात वात-पित्त, पित्त-कफ आणि कफ-वात अशा प्रकृती असतात असे सांगितले जाते. युनानीत व्यक्तित्वाचे उष्ण-कोरडे, उष्ण-आर्द्र, थंड-कोरडे आणि थंड-आर्द्र असे प्रकृतीचे प्रकार असल्याचे समजले जाते.

आजारचे निदान नाडीपरीक्षा, मूत्रपरीक्षा, स्पर्श, अशा प्रकारे तीनही प्रणालींत केले जाते.

वनस्पतिजन्य, प्राणिजन्य किंवा खनिजे अशा पदार्थांपासून युनानीत आणि आयुर्वेदात औषधे बनविलेली असतात.

जळू लावून रक्त काढणे, मसाज, स्नान पद्धती, उपवास असे इतर उपचार दोन्ही पद्धतींत केले जातात.

युनानी वैद्यकाला शास्त्रीय वैद्यक म्हणता येईल?

युनानी वैद्यकाला शास्त्रीय मानदंड लावून काय दिसते ते पाहू.

ज्या मूळ सिद्धांतांच्या पायावर हे वैद्यक उभे आहे हे सिद्धांत कसे सिद्ध झाले? परत प्रयोग करून हे सिद्धांत पाहिजे तेव्हा सिद्ध करता येतील का? या प्रयोगांतून काय प्रकारचे मोजमाप वापरण्यात आले? सुरुवातीला ग्राह्य धरलेले कोणते सिद्धांत मागून चूक ठरले?

पृथ्वी, पाणी, वायू आणि अग्नी ही मूलतत्त्वे आहेत. त्यांच्या संयोगातून जीवाचा विकास होतो. शरीरातील द्रवपदार्थ – रक्त, फ्लेम, पिवळा बाईल आणि काळा बाईल. प्रत्येक व्यक्तीत याचे प्रमाण निरनिराळे असते. व्यक्तित्वाचे उष्ण-कोरडे, उष्ण-आर्द्र, थंड-कोरडे आणि थंड-आर्द्र असे प्रकार असतात.

हे युनानीचे मूलभूत सिद्धांत आहेत. हे आतापर्यंत कोणत्याही प्रयोगाने सिद्ध झालेले नाहीत.

प्रयोगांचे शोधनिबंध इतर तज्ज्ञांनी तपासल्यानंतर प्रसिद्ध केले जातात का?

प्रयोग करून प्रमेय सिद्ध करणे अशी काही परंपरा नव्हती.

रोगाच्या निदानासाठी काय प्रकारच्या चाचण्या वापरल्या जातात? या चाचण्यांत काय मोजमाप केले जाते? चाचण्यांचे निष्कर्ष मानवी हस्तक्षेपाशिवाय रेकॉर्ड होऊ शकतात का?

रोग निदानाच्या चाचण्या ह्या पूर्णपणे व्यक्तिनिष्ठ (subjective) होत्या, वस्तुनिष्ठ (objective) नव्हत्या. मोजमाप काहीही नव्हते.

औषध देण्याअगोदर RCT केल्या जातात का? RCT कुठल्या संस्थेमार्फत केली जाते? या संस्थेची स्वायत्तता कशी राखली जाते?

RCTही कल्पना अस्तित्वात नव्हती.

यातून आपण म्हणू शकतो की युनानी वैद्यकाला काही शास्त्रीय आधार नाही.

सिद्ध वैद्यकी

आपण पाहिल्याप्रमाणे 'आयुष'मध्ये आयुर्वेद, योग, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथी यांचा समावेश आहे. आपण आयुर्वेद, आणि युनानी या प्रणालींची माहिती घेतली. येथे सिद्ध प्रणालीची थोडक्यात माहिती घेऊ.

असे मानले जाते की सिद्ध वैद्यकी आयुर्वेदापेक्षाही प्राचीन आहे. ऋषि अगस्त्य यांनी या वैद्यकीची सुरुवात इसवी सन पूर्व दहाव्या शतकात केली. सध्या ही वैद्यकी मुख्यत्वेकरून तामिळनाडु आणि केरळ या राज्यांत वापरली जाते.

आयुर्वेदाप्रमाणे रोगनिदानाच्या आठ चाचण्या सांगितल्या आहेत – मूत्रपरीक्षा, मलपरीक्षा, जिव्हापरीक्षा, शब्दपरीक्षा, स्पर्शपरीक्षा, नेत्रपरीक्षा, आकृतीपरीक्षा आणि नाडीपरीक्षा. आयुर्वेदाप्रमाणेच औषधे वनस्पतीजन्य, प्राणिजन्य आणि खनिजजन्य असतात.

समालोचन

सिद्ध आणि आयुर्वेद यांतही खूप साम्य आहे. आयुर्वेदाविषयी आपण जे विचार केले ते सर्व सिद्ध वैद्यकाला लागू पडतात.

क्रमशः

***

भाग १ - शास्त्रीय दृष्टीकोनातून निरनिराळ्या वैद्यकीय प्रणालींचे मूल्यांकन
भाग २ - ॲलोपथीच्या आधीचे पाश्चिमात्य वैद्यक
भाग ३ - आयुर्वेदाचे मूल सिद्धान्त
भाग ४ - आयुर्वेदाचे मूल सिद्धान्त – त्रिदोष
भाग ५ - परीक्षा आणि चिकित्सा
भाग ६ - आयुर्वेदाची औषधे – भाग १
भाग ७ - आयुर्वेदाची औषधे – भाग २
भाग ८ - आयुर्वेदाचे शिक्षण आणि नंतर
भाग ९ - आयुर्वेदाची प्रॅक्टीस

field_vote: 
0
No votes yet

युनानी पद्धती माहीत नव्हती आणि त्याची औषधेही कधी घेतली नव्हती.
रोग निदानाच्या चाचण्या ह्या पूर्णपणे व्यक्तिनिष्ठ (subjective) होत्या,
नाडी परीक्षा त्यातलीच.

प्रयोग करून प्रमेय सिद्ध करणे अशी काही परंपरा नव्हती. मूलभूत सिद्धांत आहेत. हे आतापर्यंत कोणत्याही प्रयोगाने सिद्ध झालेले नाहीत. यातून आपण म्हणू शकतो की युनानी वैद्यकाला काही शास्त्रीय आधार नाही.
मान्य.

- युनानी आणि आयुर्वेदाला लागू. त्या काळी परिणाम दिसेल ती औषधे टिकली.

युनानीचा विकास -युनानी वैद्यक अरेबियन अथवा इस्लामिक वैद्यक म्हणूनही जाणले जाते. युनानी वैद्यकाचे मूळ ग्रीक वैद्यकात सापडते. अविसेन्ना या हकिमाने त्याचा विकास सन ६३०च्या आसपास केला. या ग्रीक ज्ञानभांडारात नंतर आखाती देशांतील आणि दक्षिण आशियातील ज्ञानाची भर घालण्यात आली. हे ज्ञान मुसलमानांच्या बरोबर भारतात पोहोचले. पुढे सातशे वर्षे हे वैद्यक भारतात विकसित होत राहिले. साहजिकच या वैद्यकावर पाश्चिमात्य वैद्यक आणि भारतातील आयुर्वेद या दोन्हींचे प्रभाव दिसतात.
अरब व्यापारी इ.सनापूर्वीही वेताच्या जहाजांतून केरळला येत होते दोरखंड आणि लाकूड नेण्यासाठी. त्यांच्याकडून औषधे आणि शास्त्र यांची देवाणघेवाण झाली असणार.

काही थोड्या औषधांची माहिती घेऊ.
हब-ए-सुरंजान – हे औषध सांधेदुखीवर वापरले जाते.कोरफड, सोया, टरपेथम, नीळ, सुरंजन शिरीन, गुग्गुळ यांचे मिश्रण करून गोळ्या बनविल्या जातात.

इट्रीफल उस्तूखुद्दुस हे औषध डोकेदुखी, अर्धशिशी यांवर वापरले जाते. हे औषध मेंदूचे टॉनिक आहे. ते हरीतकी, बिभितकी, आवळा, उस्तूखुद्दुस, बेल, मनुका, बदामाचे तेल, आणि मध यांपासून बनविले जाते.

जवारिष जालिनूस हे औषध पचनसंस्थेचे आजार, हृदयाचे आजार, फुप्पुसांचे आजार, मेंदूचे आजार, खोकला, पाइल्स, खरूज, गाऊट,आणि मूतखडे यांवर वापरले जाते. किरातटिक्त, दालचिनी, बडी इलायची, गुग्गुळ, लवंग, खाण्याचा डिंक, मिरी, पिपली, मध यांपासून हे औषध बनवितात.

अरब व्यापारी तीन वेगळ्या हवामानाच्या ठिकाणी जात होते.
भूमध्य समुद्री प्रदेश - (थंड कोरडी हवा, हिवाळ्यात पाऊस)
केरळ - खूप पाऊस,खूप गर्मी,खूप दमटपणा.
अफगाणिस्तान. राजस्थानचे व्यापारीही भेटत. - कमी पाऊस खूप विषम हवामान.
वरच्या औषधींत गुग्गुळ,डिंक,बदाम,मनुका. एका भागातले. तर दालचिनी,मिरी,पिंपळी,लवंग दुसऱ्या भागातील आहेत हे दिसतं.
[ निरीक्षणं आणि मतं माझी आहेत. वैद्य नाही. जमवलेल्या, वाचलेल्या माहितीवर आधारित.]

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- युनानी आणि आयुर्वेदाला लागू. त्या काळी परिणाम दिसेल ती औषधे टिकली.

परिणाम दिसणं म्हणजे नक्की काय, यासाठी संख्याशास्त्रात खूप अभ्यास झाला आहे; त्याचा प्रत्यक्षात वापर करण्यासाठीही बऱ्यापैकी शिक्षण आणि अनुभवाची गरज असते. हे सगळं शास्त्रीय आधाराशिवाय करणं अशक्य आहे.

त्यामुळे कावळा बसायला आणि फांदी तुटायला - छापाची औषधंही ह्या पोतड्यांमधून निघाली तरी मला आश्चर्य वाटणार नाही. सर्दी-खोकला-घसादुखी यांवर तात्पुरते उपचार म्हणून हळद, आलं, मध वगैरे उदाहरणं देता येतात. मात्र माणसांना होणारे रोग आणि विकार सर्दी-पडश्यापेक्षा बरेच जास्त गुंतागुंतीचे असतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

त्या काळी प्राधान्य वेगळं होतं
१)कुणी उपचार देतो आहे हेच फार महत्त्वाचं होतं.
२) ते देणारा किती दूर आहे,
३)समजा एकाच गावात दोन किमिटरांत दोन चार वैद्य/हकिम असल्यास मग तुलना.
४)त्यापुढे संख्याशास्त्र आलं - अमुक वैद्याकडे उपचार केले की रुग्ण 'बरे' होतात हे तोंडी पसरतं आणि तिकडे गर्दी वाढते.

आता तुलना करायला आणखी एक नवीन प्रणालीच आली आणि प्रवासाची साधने तसेच लागणारा पैसा अधिक झाल्याने रुग्ण तसे फिरले.

'बरे करणे '/होते यास संख्याशास्त्र लावायला स्त्रोतांची उपलब्धताही नसेल तर लावणार कशावर.

आता कुणी हट्टाने प्रचार करत नाही की तुम्ही अमक्या प्रणालीकडेच उपचार घ्या. 'ही प्रणाली आपली आहे' म्हणून याचेच उपचार घ्या वगैरे. कितीही असे प्रबोधन वाटसपातल्या मंचावर आले तरी ते सकाळी. नंतर रुग्ण जायचे तिकडेच जातोय. टीव्हीवर तर उपचारांच्या
जाहिरातींचे प्रायोजित कार्यक्रमही सतत चालू असतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

काही अंशी, संसर्गजन्य नसणाऱ्या रोगांबाबत आणि विकारांबाबत अगदी भगताकडे जाऊन "उपचार" घेण्याची हौस कुणाला असेल किंवा कोंबडं-बकरं कापूनच रोग बरा होणार असं म्हणायचं असेल तरीही माझी ना नाही. आजही गावखेड्यांमध्ये पुरेशी आरोग्यव्यवस्था नाही म्हणून लोक साप चावल्यावर मरतात, तेव्हा किमान नातेवाईकांच्या समाधानासाठी आपण काही केलं असं वाटायचं असेल तर मी त्याबद्दलही सहानुभूतीने विचार करेन.

यातही मृत्यूचं कार्यकारण म्हणून साप चावणं यापेक्षा घरात वीज नसणं, आणि पुरेशी आरोग्यसेवा नसणं याचा दोष अधिक असं मी म्हणेन; कारण या गोष्टी मनुष्यांच्या अधिपत्याखाली येतात.

मुद्दा तो नाही. परिणाम दिसला म्हणून ते औषध ठरलं, असं म्हणण्याबद्दल माझा आक्षेप आहे. कुणी बाबा-बुवा-म्हाताऱ्या दाढीबाबानं सांगितलं म्हणून त्याचं ऐकायचं असं नसेलच कशावरून, असा माझा प्रश्न आहे. आधुनिक वैद्यकात परिणाम दिसणं म्हणजे नक्की काय, यासाठीही शास्त्रीय कसोट्या वापरल्या जातात. तशा कसोट्या पूर्वी वापरल्या जात नसत.

'बरं करणं' यात कार्यकारणभाव आहे. ('बरं होणं', यात कार्यकारणभाव नाही. कशामुळे बरं झालं, याचा विचारच या वाक्यात नाही.) आज सकाळी मी शिंकत होते; आता शिंका बंद आहेत. त्या नक्की काय कारणामुळे बंद झाल्या, याचा तपास करायचा नसेल तर सदर प्रतिसाद लिहिल्यामुळे शिंका बंद झाल्या असंही म्हणता येईल. मी हे म्हणते, म्हणून सदर प्रतिसाद लिहिणं हे औषध आहे असं मानणार का? तुम्ही मानालही, पण ते काही खरं कारण नाही.

खरं तर, सदर प्रतिसाद तुमच्यासाठी नाहीच; फक्त तुमच्यासाठी नाही. "परिणाम दिसला म्हणून..." हे माझ्या लेखी मोजमाप करण्याचं आणि शास्त्रीय विधान आहे. त्याकडे लक्ष वेधून घेण्यासाठी फक्त निमित्त वापरलं एवढंच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

वैयक्तिक घेत नसतोच आपण.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

> अविसेन्ना या हकिमाने त्याचा विकास सन ६३०च्या आसपास केला.

अविसेन्ना दहाव्या-अकराव्या शतकात होऊन गेला.
----

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- जयदीप चिपलकट्टी

(होमपेज)

Covid नंतर heart अटॅक चे प्रमाण वाढले आहे.
विज्ञान म्हणून जे काही आहे त्याचे नियम follow करून औषध उपचार,आणि लसीकरण केले .
पण तेच लोकांच्या जीवावर उठले.
काय फायदा कथित विज्ञान चे कौतुक करण्याचा.
Antibiotics औषध.
हि विज्ञान म्हणून जे काही कथित शास्त्र आहे त्याची देणं आहे.
पण हीच अँटिबायोटिक्स औषध माणसाची सर्वात मोठी शत्रू होण्याच्या मार्गावर आहेत.
अनेक विषाणू ,जिवाणू ह्या औषध मुळेच strong झाले आहेत.
त्यांचा प्रतिकार करण्याचा कोणताच मार्ग आज माणसाकडे नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हे माणसाचे जग आहे.
जगातील सर्वात स्वार्थी प्राणी हा मानव आहे.
कोणती ही उपचार पद्धती असू ध्या.
स्वार्थ ती उपचार पद्धती ला हायजॅक करतो.
औषध निर्मिती करणारे उद्योग, उपचार करणारे डॉक्टर, संशोधन करणार संशोधक, नियम तयार करणाऱ्या संस्था आणि सरकार ..
आणि ह्या सर्वांचे चालक ..सर्व माणसं आहेत.
आज कोणतेच शास्त्र परिपूर्ण नाही.
सायन्स हे त्याच्या नियमाने चालत नाही तर अधिकार प्राप्त माणसाच्या मनाने चालते.
सायन्स ही व्याख्या आणि त्याचे कार्य ह्याचा मेळ बसणार नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0