मराठीत आलेले व आता मराठीच झालेले शब्द
वेगवेगळ्या भाषांमधून मराठीने शब्द घेतले व त्यांना सामावून घेऊन मराठी अधिक शैलीदार झाली, ही बातमी आता जुनी झाली. सदर टिपणात कोणकोणत्या भाषांमधून मराठीत कोणते प्रमुख शब्द आले, ते पाहू. परकीयांचा संबंध व्यापार व युध्दामुळे आल्याने साधारण या क्षेत्रांशी संबंधित शब्दच परकीयांकडून मराठीत बरेच आले,हे लक्षात येते. महाराष्ट्राच्या निकटवर्ती राज्यांमधून मराठीत शेजारसंबंधांमुळे शब्द आले.
वास्को द गामा हा पोर्तुगीज व्यापारी १४९८साली भारताच्या खालच्या बाजूला व्यापारानिमित्ताने आला. कोचीनमध्ये त्याने आपले बस्तान बसवले. १४९८ ते १९६१ पर्यंत पोर्तुगीजांचा येथीलहिंदू राजे, मुसलमान राजे, इंग्रज यांच्याशी व्यापारी संबंध येत गेला तसेच, यासर्वांशी प्रसंगोपात संघर्षही होत गेले. सुमारे दीडशे वर्षे कोचीन, दमण दीव, गोवा याभागांवर पोर्तुगीजांचा प्रभाव राहिला. पोर्दुगीज भाषेतून मराठीत आलेल्या वसुंदरपैकी वसलेल्या शब्दांची काही उदाहरणे अशी - पगार, चावी, काडतूस, खमीस, पिस्तूल, बिजागरी, तंबाखू,बटाटा, साबण, हापूस, लोणचे, पायरी, कोबी.
पेशवाई बुडाल्यापासून म्हणजेच सन १८१८पासून सन १९४७ पर्यंत इंग्रजांचे राज्य हिंदुस्थानवर होते. अनेक हिंदुस्थानी लोक गरजम्हणून इंग्रजी शिकू लागले. त्यामुळे, आपोआपच इंग्रजी शब्द मराठीत पसरले व सहजपणेरुळले. सायकल, डॉक्टर, रेडिओ, स्टेशन, सिनेमा, सर्कल, टेबल ही काही उदाहरणे.डॉक्टर हा शब्द ग्रामीण भागात इतक्या खोलवर रुजला की काही काही ग्रामीण लोक त्याचा उच्चार डागदर असा करीत. तशा पध्दतीचे संवाद साहित्यात दिसतात. इंग्रजी भाषेतले अनेक शब्द इंग्रजांनी फ्रेंचमधून घेतले, ही एक उपमाहिती.
बाराव्या-तेराव्या शतकात तुर्क व मोगलांची सत्ता भारतात प्रस्थापित झाली. या वेळेपासून मुसलमानांच्या देशव्यापी सत्तेचा आपल्या महाराष्ट्राशी निकट संबंध येऊ लागला, मुसलमानांची राज्यकारभाराची भाषा फार्सी असल्याने अर्थातच फार्सीचा व मराठीचा संबंध आला. राज्यकारभारविषयक व्यवहारासाठी फार्सीचा उपयोग होऊ लागला, महाराष्ट्राचे राजकीय व सामाजिक जीवनही काही अंशी फार्सीमय झाले. जवळजवळ आठशे वर्षांचा हा संबंध असल्याने फारसी भाषेतील अनेक शब्द मराठीत रुळले तर काहीही आश्चर्य नाही. अशा शब्दांचे काही नमुने असे – हेजीब, दफ्तरदार, फडणवीस, कारखानीस, खातरजमा, दिलासा,रिवाज, दस्तूर, शिरस्ता, दौलतजादा करणे, शह देणे, नेस्तनाबूत करणे हेवाक्र्प्रचारही फारसीची दमदार भेट होय. असे म्हणतात की, फारसीतील बरेच शब्द अरबीआहेत.
उर्दू ही अलीकडची म्हणजे दोनशे ते तीनशे वर्षांत विकसित झालेली भाषा होय. तुर्की, अरबी, फार्सी या भाषांमध्ये उर्दूची मुळेसापडतात. हिंदी, दख्खनी, रेख्ता या नावांनी उर्दू ओळखली गेली. उत्तर प्रदेश,जम्मू या भागात अधिक प्रमाणात उर्दूसमाजात संवादली जाते. उर्दूतून मराठीत बातचीत, मुद्दा, जरा, चर्चा हे शब्द आले आहेत.
कर्नाटक, आंध्रप्रदेश, गुजरात हे तर आपल्या राज्याचे शेजारी. त्यांच्याकडूनही मराठीने काही शब्द घेऊन स्वतःला समृध्द केले.
कानडी भाषेतून आलेल्या शब्दांपैकी काही वानोळे असे - आक्का, अण्णा, गाजर, अडकित्ता, खलबत्ता, किल्ली,चिंधी, खोली, कोथिंबीर,चिरगुट, मुंडासे.
गुजरातीतून मराठीत हे शब्द आले असावेत - जेमतेम, चरखा, ढोकळा, दामदुप्पट, अफरातफर, पथारी.
तेलगू भाषेतू मराठीत गदारोळ, अनारसा,किडूकमिडूक हे शब्द आल्याचे सांगतात.
तमीळनाड महाराष्ट्राला तसे दूरचे राज्य पण चिल्लीपिल्ली, मठ्ठा हे शब्द तमीळ भाषेतून मराठीत पोचते झाले.
समीक्षेचा विषय निवडा
लेख आवडला, काही वर्षांपूर्वी
लेख आवडला, काही वर्षांपूर्वी हा यूट्यूब व्हिडीओ पाहण्यात आला - त्यातील काही शब्द - परात ( पोर्तुगीज उच्चार - प्रातो - प्लेट, आपण मोठा रुंद थाळा या अर्थी वापरतो ); फीत ( रिबीन, फीत ); पसार ( पोर्तुगीज अर्थ - spend, वेळ घालवणे means something that has passed )
वास्को द गामा हा पोर्तुगीज
वास्को द गामा हा पोर्तुगीज व्यापारी १४९८साली भारताच्या खालच्या बाजूला व्यापारानिमित्ताने आला. कोचीनमध्ये त्याने आपले बस्तान बसवले. १४९८ ते १९६१ पर्यंत पोर्तुगीजांचा येथीलहिंदू राजे, मुसलमान राजे, इंग्रज यांच्याशी व्यापारी संबंध येत गेला तसेच, यासर्वांशी प्रसंगोपात संघर्षही होत गेले. सुमारे दीडशे वर्षे कोचीन, दमण दीव, गोवा याभागांवर पोर्तुगीजांचा प्रभाव राहिला. पोर्दुगीज भाषेतून मराठीत आलेल्या वसुंदरपैकी वसलेल्या शब्दांची काही उदाहरणे अशी - पगार, चावी, काडतूस, खमीस, पिस्तूल, बिजागरी, तंबाखू,बटाटा, साबण, हापूस, लोणचे, पायरी, कोबी.
गंमत म्हणजे, पूर्वीच्या पिढ्यांमध्ये इंग्रजीतून मराठीत घुसलेल्या/घुसू पाहणाऱ्या शब्दांना मराठी पर्याय म्हणून असे रुळलेले मराठी शब्द अनेकदा वापरले जात. (हे 'पर्यायी' शब्दसुद्धा परकीय/बाटगेच आहेत, हे बहुधा ते चांगलेच रुळल्यामुळे/अंगवळणी पडल्यामुळे लोकांच्या लक्षात येत नसावे. And there lies a solid argument against your so-called भाषाशुद्धी!)
उदा.: ('टेबल'करिता) मेज, ('ख्रिसमस'करिता) नाताळ, इ.
--------------------
याच्या उलट प्रकार म्हणजे. मुंबईतील Santa Cruz या उपनगराचा आंग्लाळलेल्या मराठीजनांकडून 'सँटा क्रूज़' असा उच्चार. पूर्वीच्या पिढीतील मंडळी त्याचा उच्चार छानपैकी (आणि, न लाजता) 'सांताक्रूझ' असा करीत. वास्तविक, त्या भागास ते नाव पोर्तुगीज भाषेतून पडले. 'सांताक्रूझ' हाच उच्चार त्या नावाच्या मूळ पोर्तुगीज उच्चाराशी अधिक मिळताजुळता असावा. पण लक्षात कोण घेतो?
शीव या उपनगराचे स्पेलिंग
शीव या उपनगराचे स्पेलिंग SION असे इंग्रजानी केले. त्याचा उच्चार आता सरसकट सायन असा केला जातो.
वान्द्रा या उपनगराच्या नावातील "व" हे अक्शर उत्तरभारतीय लोकाना उच्चारता येत नसल्यामुळे ते लोक त्याला बान्दरा असे म्हणून लागले. नवमुंबईकरानी त्याचे बांद्रा असे करून स्पेलिंग प्रमाणे बँड्रा असे उच्चारायला सुरवात केली.
बऱ्याच वेळा उत्तरभारतीय आणि वंग बंधूनी ड या अकशराचे स्पेलिंग आर + एच असे करतात. त्यामुळे पुण्यातल्या घोरपडी या स्थानकाचे स्पेलिंग GHORPURI असे करून ट्Zहेवले आहे प्रतापगडचे नाव देखील Pratapgharh असे केले आहे.
याच धर्तीवर... (काहीसे अवांतर)
मुंबईतील स्थानकांच्या नावांतील साहेबाची नावे हटवून त्यांचे 'मराठीकरण' करण्याचा जो प्रकार सांप्रतकाळी चालू होता (जसे, 'एल्फिन्स्टन रोड'ऐवजी 'प्रभादेवी', वगैरे), त्या नादात चर्नीरोडचेदेखील नाव बदल्ण्याचा घाट घातला होतानीत्, म्हणे.
वस्तुत:, 'चर्नी' हे कोणा साहेबाचे नाव नसून, 'चरणी' या मराठी शब्दाचा तो अपभ्रंश आहे, असे कळते. पण लक्षात कोण घेतो?
चालायचेच.
.
> पेशवाई बुडाल्यापासून म्हणजेच सन १८१८पासून सन १९४७ पर्यंत इंग्रजांचे राज्य हिंदुस्थानवर होते.
हे नीटसं खरं नाही, पण लेखातल्या सर्वसाधारण आशयाला त्यामुळे धक्का पोहोचत नाही. असो. ‘मेस्त्री/मिस्त्री’ हा शब्द पोर्तुगीजमधून आला असण्याची दाट शक्यता आहे. अर्थात अनेकदा स्पॅनिश, पोर्तुगीज, फ्रेंच, लॅटिन शब्द इतके जवळजवळचे असतात की त्यांपैकी नक्की कुठल्या भाषेतून तो आला ह्या प्रश्नाला अर्थ उरत नाही.
-----
थोडं अवांतर...
मराठीमध्ये आजकाल विशेषतः समाजमाध्यममे आल्यानंतर बरेचशे शब्द बोलीभाषेतून लिखित स्वरूपात सर्रास वापरले जातात. काही शिव्या किंवा अश्लील शब्द तर अक्षरांची अदलाबदल करून बरेचदा लिहिले गेलेल्या आहेत.
परवडेबल, मॅटर, गेमाडपंथी, फुरोगामी, फुर्रोगामी, सेक्युलर, फेक्युलर, फेकू, कुत्रकार, चाटुकार, गुलाम, सतरंज्या उचले, शेणिक, फेकसत्ता, लोकमूत, वामपंथी, अंडभक्त, चाळीस पैसेवाला, हग्रलेख, आयटीसेल, चुस्लिम, चिंधू, पाववाले असे कितीतरी शब्द कित्येकदा वाचायला मिळतात.
जाताजाता...
गिरीश कुबेर यांच्या अग्रलेखात येणारा 'नरपुंगव' हा शब्द खास मोशा (मोदी शहा) यांनाच उद्देशाने वापरला जातो. :-) :-)
…
काही शिव्या किंवा अश्लील शब्द तर अक्षरांची अदलाबदल करून बरेचदा लिहिले गेलेल्या आहेत.
परवडेबल, मॅटर, गेमाडपंथी, फुरोगामी, फुर्रोगामी, सेक्युलर, फेक्युलर, फेकू, कुत्रकार, चाटुकार, गुलाम, सतरंज्या उचले, शेणिक, फेकसत्ता, लोकमूत, वामपंथी, अंडभक्त, चाळीस पैसेवाला, हग्रलेख, आयटीसेल, चुस्लिम, चिंधू, पाववाले असे कितीतरी शब्द कित्येकदा वाचायला मिळतात.
उपरोल्लेखित इतर शब्दांचे ठीक आहे, परंतु, चाटुकार हा शब्द त्या पठडीतला खासा नसावा. किंबहुना, ही सरळसरळ हिंदीतून आयात असावी.
(‘चाटुकारिता’ हा शब्दप्रयोग हिंदीत सामान्य आहे.)
इतर भाषांतले शब्द?
"ग्रेट गेम"चा निकाल निराळा लागला असता तर मराठीत बाबुष्का, करंदाश, स्पसिबा असे रशियन शब्द प्रचलित झाले असते. पोर्तुगीज गोव्यात तग धरून राहिले तसे डच वेंगुर्ल्याला राहिले असते तर डच भाषेतले शब्द मराठीत प्रचलित झाले असते. प्लासीच्या लढाईत मीर जाफर फितूर झाला नसता तर कदाचित प्लासीची लढाई ब्रिटिश हरले असते आणि भारतात फ्रेंचांचा प्रभाव अधिक असता. तसे झाले असते तर फ्रेंच शब्दांचा भरणा मराठीत झाला असता.
…
फक्त मनवणे, मचवणे असली हिंदीतून आलेली उपरी क्रियापदेमात्र मला लज्जास्पद वाटतात.
Depends.
१. विदर्भ किंवा मध्यप्रदेशाच्या बाजूचे मराठीभाषक लोक अनेकदा मराठीत बोलताना सवयीने अशी रूपे वापरताना आढळतात. त्याबद्दल मला काहीही आक्षेप नाही. कारण, त्यांच्याकरिता तशीच भाषा नैसर्गिक आहे; त्यांची भाषा तशीच आहे, तिच्यावर तसेच संस्कार झालेले आहेत. त्यामुळे, ‘भाषेचे एक प्रादेशिक रूप’ म्हणून ते स्वीकारायला मी तयार आहे.
२. दुसरा प्रकार म्हणजे, श्री. विवेक पटाईत यांच्या लेखांतल्यासारखी भाषा. तेथे असली रूपे पाहावयास मिळाल्यास मला आश्चर्य वाटणार नाही. मात्र, श्री. विवेक पटाईत हे महाराष्ट्रवंशोद्भव जरी निःसंशय असले, तरीही, त्यांना मराठीभाषकांत गणावे, किंवा कसे, याबद्दल मी साशंक आहे. (अशीच काहीशी शंका — नव्हे, खात्री! — मला माझ्या स्वतःच्या मुलासंबंधात आहे; त्यामुळे, या विधानात derogatory असे काहीही नाही; किमानपक्षी, तसा माझा हेतू नाही. फरक इतकाच, की माझ्या मुलाचे मराठीचे ज्ञान समजा जर ५% असेल, तर त्याचे हिंदीचे ज्ञान शून्य आहे; त्यामुळे, मराठीत बोलण्याचा प्रामाणिक प्रयत्न करताना त्याने मराठी भाषेचे कितीही खून जरी पाडले (आणि, ते ऐकून, ते ‘श्री चावुण्डराजे करवियले’ किंवा ‘हे शासन जो भंग करी तेहाची माय गाढवे…’ वगैरे लिहिणारे जे कोणी असतील ते, त्यांच्यापासून ते पार अगदी परवापरवाचे अत्याधुनिक मराठी लेखक जे कोणी असतील ते (उदाहरणाच्या सोयीकरिता, श्री. प्रवीण दवणे म्हणू या का?), त्यांच्यापर्यंत एकूण एक मराठी दिग्गजांना एकजात फेफरे येऊन त्याउपरांत जीव जरी द्यावासा वाटला), तरीसुद्धा, त्याच्या मराठीच्या आविष्कारात हिंदी रूपांची भेसळ होणे कदापि शक्य नाही! (कारण, आडातच जे नाही, ते पोहऱ्यात कोठून येणार, वगैरे वगैरे.) तर ते एक असो.)
तर, सांगण्याचा मतलब, श्री. विवेक पटाईत यांना मराठीभाषकांत गणावे, किंवा कसे, याबद्दल मी काहीसा साशंक असल्याकारणाने, त्यांच्या मराठी बोलण्यालिहिण्यातून जर का अशी रूपे आढळली, तर त्यांना मी (‘ती त्यांची भाषा नव्हे’ या पळवाटेखाली) क्षमा करू शकेन; किंबहुना, मराठीत बोलण्यालिहिण्याचा आपण होऊन प्रयत्न केल्याबद्दल त्यांचे आभार मानून, असेच प्रयत्नशील राहण्याबद्दल त्यांना मी कदाचित प्रोत्साहनसुद्धा देईन! (आणि, नाही! मराठीचे मुडदे पाडलेले ऐकून मला आनंदाच्या उकळ्या फुटतात, म्हणून खचितच नव्हे; तर, प्रामाणिकपणे!)
३. मात्र, (उदाहरणादाखल) पुण्यामुंबईच्या मराठी माणसाच्या तोंडी असली रूपे (किंवा, ‘मी त्याची मदत केली’-छाप भाषा) ऐकून, तसे बोलणाऱ्याच्या कानफटात मारावीशी वाटते.
असो चालायचेच.
कैफियत अरबी मधून आलेला आहे
कैफियत आता मराठीत बऱ्यापैकी रुजला आहे.
फरासखाना
जुलूम (डोळे हे जुलुमी गडे रोखुनी मज पाहू नका )
जिन्दगी हा शब्द प्रॉपर्टी किंवा अकाउंट या दोन पैकी एका ठिकाणी वापरला जातो बहुधा मिळकत या अर्थाने.
मिळकत, मिळख(ग)त—स्त्री. प्राप्ति; नियमित मिळणारें द्रव्य. २ फायदा; नफा. ३ मालमत्ता; जिंदगी.[मिळणें; अर. मिल्कत्]
मिळकत सुद्धा मिल्कियत वरून
…
साबण: हा शब्द पोर्तुगीजमधून मराठीत आला, अशी तुमच्याप्रमाणेच माझीसुद्धा अनेक वर्षे समजूत होती. (मराठीतील ‘साबण’ तथा पोर्तुगीजमधील ‘sabão’ या शब्दांच्या साधर्म्यामधून ती समजूत बळावण्यास मदत होते.) मात्र, ही समजूत चुकीची असल्याचे निदर्शनास येते.
मोरेश्वरभटाच्या दाखल्यानुसार, हा शब्द अरबी भाषेतून मराठीत आयात झाल्याचे कळते.
(कदाचित, पोर्तुगीजांचा हिंदुस्थानशी थेट संपर्क येण्याअगोदरसुद्धा, रोमन साम्राज्याच्या संपर्कातून अरबांकडे आणि अरबी व्यापाऱ्यांच्या संपर्कातून हिंदुस्थानात/मराठी मुलुखात या चिजेची तथा शब्दाची आयात झालेली असणे अगदीच अशक्य नाही.)
लोणचे: हे पोर्तुगीज नक्की कसे? मोरेश्वरभट याची व्युत्पत्ती संस्कृत ‘लवण’पासून असल्याचा दावा करतो.
(बाकी, त्या यादीत ‘पाव’ विसरलात.)
(अतिअवांतर: मराठी ‘बेवडा’चा पोर्तुगीज ‘bebida’ (‘drink’, ‘पेय’)शी काही संबंध असू शकेल काय?)
——————————
(आणखी एक योगायोग: ‘माता’ अथवा ‘जननी’ अशा अर्थी मराठीत जो ‘आई’ असा शब्द आहे, तसाच तो असमीया भाषेतसुद्धा आहे. मात्र, अधल्यामधल्या कोठल्याही भाषेत (बहुधा) नाही. हा निव्वळ योगायोग म्हणावा, की कोठल्या प्रकारची देवाणघेवाण? (देवाणघेवाणीचे कारण अथवा मार्ग सकृद्दर्शनी तरी दिसत नाही.))