पाकिस्तान-१
दरबार-ए-वतन में जब इक दिन सब जाने वाले जाएँगे
कुछ अपनी सज़ा को पहुँचेंगे, कुछ अपनी जज़ा ले जाएँगे
-फ़ैज अहमद फ़ैज
16 ऑक्टोबर 1951. कंपनी बाग, रावळपिंडी.
त्या दिवशी, लियाकात अली खान एक लाखाच्या जनसमुदायाला संबोधित करण्यासाठी मंचावर जात असताना आपल्या समोर संपूर्ण देश जमलेला पाहत होते. जे स्वप्न त्यांनी, मोहम्मद अली जिना, सुहरावर्दी, अल्लामा इक्बाल आणि इतर अनेकांनी एकत्र पाहिले होते. ब्रिटिश भारतातील मुस्लिमांसाठी एक पाकिस्तान.
पण पाकिस्तान हा शब्द कसा अस्तित्वात आला?
हजारो वर्षांपासून मुस्लिम भारतात राहत होते, पण त्यांच्या जिभेवर हा शब्द कधी आला नव्हता. खिलाफवेळीही मुस्लीम जगाची चर्चा झाली तरी पाकिस्तान हा शब्द आला नाही. लंडनमध्ये बसलेल्या चौधरी रहमत अली या तरुणाच्या मनात 1933 मध्ये पाकिस्तान हा शब्द पहिल्यांदा आला. हा शब्द एक पवित्र स्थान सूचित करतो का? पण मग उर्दू आणि संस्कृत शब्दांची ही सरमिसळ कशी झाली?
रहमत अलीनेही 'पवित्र स्थळा'चा विचार केला नव्हता. त्याच्या मते ते एक संक्षिप्त रूप होते. पंजाबमधून पी, अफगाणमधून ए (खैबर-पख्तून), काश्मीरमधून के, सिंधमधून एस आणि बलुचिस्तानमधून स्टॅन. नंतर लोकांना वाटले की बोलण्यासाठी मध्यभागी 'i’ टाकणे आवश्यक आहे, म्हणून पाकिस्तान शब्दाची निर्मिती झाली. पण बंगालचे काय? त्यांच्यासाठी कोणताही शब्द नव्हता. रहमत अली म्हणाले होते की बंगिस्तान (बंगाल) आणि उस्मानिस्तान (हैदराबाद) आणखी दोन मुस्लिम देश होतील.
मुस्लिम लीगने हे स्वीकारलं पण रहमत अलीला विशेष महत्त्व दिले नाही. नंतर फाळणीनंतर तो लवाजमा घेऊन नव्या पाकिस्तानात आला, तेव्हा त्याचं model स्वीकारलं गेलं नाही याचा त्याला राग आला. रागाच्या भरात त्याने कायदा-ए-आझम यांना ‘क्विसलिंग-ए-आझम’ म्हटले. (क्विसलिंग हा नॉर्वेजियन देशद्रोही होता जो नाझींमध्ये सामील झाला होता. हा शब्द नंतर लियाकत अली खान यांनी शेख अब्दुल्लासाठी वापरला होता.)
जाहीर आहे, रहमत अलीचं संपुर्ण बाडा बिस्तर हिसकावून घेण्यात आले आणि त्याला हद्दपार करण्यात आले. काही वर्षांनी लंडनमध्ये त्याचे निधन झाले. पाकिस्तान हा शब्द देणाऱ्याचे हे हाल झाले. आजारी असूनही कायदे आझम यांनी शक्य तितकी प्रशासनाची जबाबदारी पेलली. पण 1948 मध्येच त्यांचा मृत्यू झाला.लियाकत अली खान हे आता पाकिस्तानचे सर्वोच्च नेते होते. फाळणीनंतर पंजाबचे दोन तुकडे झालेल्या पाकिस्तानात पख्तून आणि बलुच लोकांना आपले स्वातंत्र्य हवे होते. बंगालींचा त्यांच्यावर लादलेल्या उर्दूशी काहीही संबंध नव्हता. आणि काश्मीर? नेहरूंवर जसा काश्मीर भारतात गमावल्याचा आरोप केला गेला, तसाच आरोप पाकिस्तानमध्ये लियाकत अली खान यांच्यावर नेहमीच केला जाईल.
त्यादिवशी कंपनीबागेत त्यांच्यासमोर बसलेल्या एका व्यक्तीने त्यांच्या छातीत दोन गोळ्या झाडल्या. पाकिस्तानच्या पहिल्या पंतप्रधानाचा अंतं अशा प्रकारे खुलेआम झाला. देशाच्या संस्थापकाला देशवासियांना का मारावेसे वाटेल? होय! काश्मीर गमावल्याबद्दल लोकांमध्ये नक्कीच नाराजी होती. अगदी काही महिन्यांपूर्वी त्याच रावळपिंडीत एक कट रचला गेला, जिथे सत्तापालटाची योजना आखण्यात आली होती. मेजर जनरल अकबर खान, त्यांचे इतर काही लष्करी सहकारी, कम्युनिस्ट पार्टी ऑफ पाकिस्तानचे सरचिटणीस सय्यद सज्जाद झहीर आणि प्रसिद्ध कवी फैज अहमद फैज यांच्यासह सर्व कटकारस्थान करनार्यांना अटक करण्यात आली.
क्रमशः
मूळ लेखक - प्रविण झा.
पुस्तक - दास्तान- ए- पाकिस्तान.
https://esamaadprakashan.com/books/dastan-e-pakistan/
प्रतिक्रिया
खुप महत्वाचे आहे हे
पाकिस्तानच्या निर्मितीचे श्रेय मुस्लिम लीगला असले आणि म्हणून स्वातंत्र्यानंतर तिच्या हाती सत्ता सोपविण्यात आली तरीही लीगची संघटना अतिशय कमजोर होती. तिची पाळेमुळे विधायक कार्यातून खोलवर जनतेत रुजलेली नव्हती. १९४० पूर्वी तिचा प्रसार शहरी व सुशिक्षित मुसलमानांपुरता मर्यादित होता. १९४० नंतर लीगने मुस्लिम बहुजन समाजाला राजकारणात ओढले, ते त्यांच्या धार्मिक भावनेला आवाहन करून. धर्मश्रद्धेवर आधारलेली लीगची प्रासंगिक लोकप्रियता ही विधायक कार्यातून व जनजागरण करून भक्कम पायावर उभी न केल्यामुळे मुसलमानांचे स्वतंत्र राज्य झाल्यावर तिची सत्ता फार काळ टिकणे शक्य झाले नाही. शिवाय हिंदुस्थानात, मुसलमान अल्पसंख्य असलेल्या भागातच लीगची सत्तास्थाने होती लीगचे बहुतेक नेते हे या भागांतूनच आलेले होते. फाळणीनंतर हा सर्व भाग भारताच्या वाट्याला आला. पाकिस्तानमध्ये समाविष्ट झालेल्या प्रांतांपैकी वायव्य प्रांतात काँग्रेसला १९३७ व १९४५ च्या निवडणुकांत बहुमत मिळाले होते. १९३७ च्या निवडणुकांत लीगला पंजाबमध्ये ८६ मुस्लिम जागांपैका एक, बंगालमध्ये ११९ पैकी ३७ जागा मिळाल्या, तर सिंध व वायव्य प्रांतांत एकही जागा मिळाली नाही. पाकिस्तानी लीगच्या या दुर्बलतेमुळे पाकिस्तानच्या निर्मितीनंतर ती त्या देशास स्थिर नेतृत्व देऊ शकली नाही आणि राष्ट्रबांधणीचे अनेक प्रश्न निर्माण झाले..
वरील para Marathi विश्वकोश मधून copy pest
विधायक कार्य झीरो असले आणि फक्त धार्मिक भावना भडकावून लोक मूर्ख बनू शकतात.
सत्ता काय देश पण वेगळा मिळू शकतो ह्याचे हे पाकिस्तान निर्मिती उदाहरण आहे.
पण देश कसा चालवायचा असतो ,देशाची प्रगती साठी काय धोरणे हवीत ह्याचे ज्ञान झीरो असल्या मुळे असे निर्माण झालेले देश संकटात सापडतात.
कारण नेते त्या लायकीचे नसतात.
लष्कराने अनेक वेळा राजकीय सत्ता हस्तगत करण्याची कामगिरी पाकिस्तान मध्येच केली आहे.
कारण राजकीय नेतृत्व ची पाळेमुळे विधायक कार्यातून जनमानसात रुजलेली च नसतात.
ओ काका!...
याच किंवा थोड्या नंतरच्या काळात कधीतरी, निवडणुकांत पुरेश्या जागा मिळवण्याची दोन्ही पक्षांची ताकद नसल्याकारणाने, हिंदुमहासभा (सावरकरांची हिंदुमहासभा!) आणि (जीनांच्या) मुस्लिम लीगने (सावरकरांच्या आशीर्वादाने!!!) युती करून निवडणुका लढवल्या होत्या, नि काही प्रांतात मंत्रिमंडळेसुद्धा स्थापिली होती, असे कायसेसे आम्ही कुठेशीक वरवर वाचले होते, त्याबद्दलसुद्धा जर काही माहिती असेल तर जरा तपशिलात सांगा ना!
(Politics makes strange bedfellows म्हणतात, ते खोटे नाही.)
युती करून सत्ता तर स्थापन केली होती
हिंदू महासभा आणि मुस्लीम लीग ह्यांनी युती करून काही प्रांतात सत्ता स्थापन केली होती हे खरेच आहे.
पण ह्या दोन पक्षांनी ही युती का केली असावी ते सांगता येणार नाही.
देश हित हा हेतू तर नक्की नसावा.
१)काँग्रेस ल शह देणे हा हेतू त्या मध्ये स्पष्ट होता .
२) दोन्ही पक्षांची पण (मुस्लिम लीग,हिंदू महासभा) एक राष्ट्र एक भाषा एक संस्कृती अशी समान विचारधारा नक्की होती.
३)काँग्रेस ल धर्मनिरपेक्ष राष्ट्र हवं होते.ह्याला शह देण्यासाठी त्यांनी युती केली असावी.
ह्या पेक्षा जास्त तर्क करू शकत नाही
काॅंग्रेसने सत्तेचा राज्नामा
काॅंग्रेसने सत्तेचा राज्नामा दिल्यावर ह्या दोघांच्या तोंडाला पाणी सूटले नी एकत्र सत्ता स्थापन केली होती. दुसरा काही हेतू नव्हता.
नेमके, नि थोडक्यात!
.
(अवांतर)
ते तर उघड आहे.
ही युती संधीसाधू होती, हे तर उघड आहे. परंतु, काँग्रेसला शह देणे हा त्यामागील हेतू असावा, याबद्दल मला थोडी शंका आहे. का, ते सांगतो.
माझ्या अर्धवट माहितीप्रमाणे, त्याअगोदरच्या निवडणुकांत काँग्रेस देशभर मोठ्या प्रमाणावर निवडून आली होती, नि या दोन्हीं पक्षांची धूळधाण उडाली होती. निवडून आल्यावर काँग्रेसने सरकारे स्थापन केली होती, परंतु, हिंदुस्थानी नेतृत्वाला विश्वासात न घेता परस्पर हिंदुस्थानच्या वतीने युद्ध घोषित करून ब्रिटिशांनी हिंदुस्थानला दुसऱ्या महायुद्धात खेचल्याच्या निषेधार्थ, या निवडून आलेल्या तमाम काँंग्रेस सरकारांनी घाऊक भावात राजीनामा दिला. ती पोकळी भरून काढण्यासाठी हे दोन्ही पक्ष सरसावले. आणि, काँग्रेस वाटेतून अनायासे दूर झालेली असतानासुद्धा पुरेश्या जागा मिळविण्याची ताकद या दोन्हीं पक्षांमध्ये नसल्याकारणाने त्यांनी युती केली.
थोडक्यात, युतीचा हेतू अनायासे आलेल्या संधीचा फायदा घेणे हा होता, हे उघड आहे. मात्र, काँग्रेस स्वत:च मार्गातून दूर झालेली असताना, काँग्रेसला शह देण्याचा प्रश्न कोठे उद्भवतो, हे लक्षात येत नाही.
हो, होती खरी. (किंबहुना, द्विराष्ट्रवादाचे प्रतिपादन जीनांनी जितके केले, तितकेच ते सावरकरांनीसुद्धा केले. किंबहुना, कदाचित जीनांच्या थोडे अगोदरच केले असू शकेल.)
परंतु, एक मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे. विचारधारा समान असली, तरी, परस्परांच्या विरोधात होती. त्यामुळे, अशी युती ही, देशाच्या हिताचे सोडून द्या, परंतु, हे दोन पक्ष ज्या दोन जनसमूहांचे प्रतिनिधित्व करण्याचा दावा करीत होते, त्या दोन जनसमूहांच्या हिताची नक्कीच नव्हती. ('तुम्ही तुमच्या जनसमूहाला लुटा, आम्ही आमच्या जनसमूहाला लुटतो; दोन्ही समूहांना आपापसात झुंजवून मस्तपैकी सत्ता उपभोगू या'-छापाच्या पक्षस्वार्थाकरिता, कोण जाणे, हितावह असेलही कदाचित.)
(स्वार्थाकरिता का होईना, परंतु) इतका दूरगामी विचार करण्याची क्षमता किमानपक्षी हिंदुमहासभेच्या नेतृत्वाच्या ठायी असण्याबद्दल मी साशंक आहे. त्यामुळे, 'आली संधी, घेतला फायदा, नि त्याकरिता काय वाटेल ते' याहून अधिक विचारप्रक्रिया त्या निर्णयामागे असेल, असे मला वाटत नाही.
दुसऱ्या बाजूने, मुस्लिम लीगमध्येसुद्धा विचारवंतांचा भरणा होता, अशातला काही भाग नव्हता. तोही रेमेडोक्यांचाच बाजार होता. मात्र, एक फरक होता. त्यांच्यातला महंमद अली जीना नावाचा गृहस्थ डोकेबाज होता. धूर्त होता, कावेबाज होता, स्वार्थीही होता, परंतु डोकेबाज होता. त्याची मूळ विचारसरणी खरे तर मुस्लिम लीगशी अजिबात मिळतीजुळती नव्हती. स्वत:च्या महत्त्वाकांक्षेकरिता त्याने मुस्लिम लीगलासुद्धा जेथे पुरेपूर वापरून घेतले, तेथे हिंदुमहासभेला वापरणे ही त्याच्याकरिता क्षुल्लक गोष्ट असावी. त्याला व्यक्तिश: काँग्रेसला शह द्यायचा असू शकेलही, परंतु तो काँग्रेसला धर्मनिरपेक्ष राष्ट्र हवे होते, म्हणून नव्हे, तर स्वत:च्या महत्त्वाकांक्षेसाठी. ('धर्मनिरपेक्ष राष्ट्र' हे खरे तर त्याच्या वैयक्तिक विचारसरणीच्या विरोधात असण्याचे काहीच कारण नव्हते. किंबहुना, त्याची गांधीजींबद्दलची मूळ अढी 'गांधीजींनी राजकारणात धर्म आणला' यावरूनच तर होती! आणि, 'पाकिस्तान' किंवा 'मुस्लिम राष्ट्र' ही संकल्पना तो निव्वळ स्वत:च्या महत्त्वाकांक्षेकरिता नि वैयक्तिक स्वार्थाकरिता उचलून धरत होता. अन्यथा, वैयक्तिक जीवनात तो केवळ नावापुरताच मुसलमान होता. व्यक्तिश: त्याला इस्लामशी फारसे देणेघेणे नसावे, नि त्याचे वैयक्तिक जीवन इस्लामशी बऱ्यापैकी विपरीत होते.)
उर्वरित मुस्लिम लीगबद्दल बोलायचे, तर त्यांची एकंदर वृत्ती ही 'एकदा आमच्या हातात सत्ता तर येऊ दे, नंतर मग आम्हाला हवे तेच आम्ही करू' अशीच जेथे होती, तेथे त्यांना 'धर्मनिरपेक्ष' काँग्रेसला शह देण्याची फारशी गरज वाटली असावी, असे वाटत नाही. (काँग्रेस? कोण काँग्रेस? असतील समजत स्वत:ला धर्मनिरपेक्ष! विचारतो कोण?)
(आणि, खरेच सांगायचे, तर काँग्रेससुद्धा काही फारशी धर्मनिरपेक्ष वगैरे होती, अशातला भाग नाही. म्हणजे, गांधी-नेहरू-आझाद वगैरे 'उच्च नेतृत्व' व्यक्तिश: धर्मनिरपेक्ष असेलही, आणि त्याबद्दल अत्यंत आदर्शवादीसुद्धा असेल. त्याबद्दल शंका नाही. परंतु, मधली फळी आणि ज्याला 'रँक अँड फाइल' म्हणतात, तो थर, यांना धर्मनिरपेक्षतेशी काहीही घेणेदेणे नसावे. एकदा हातात प्रांतिक सत्ता आल्यावर 'नई तालीम'च्या नावाखाली त्यांनी शिक्षणात जो धुमाकूळ घातला, त्याबद्दल अंधुकसे जरी वाचायला मिळाले, तर वाचा; ते त्यांच्या धर्मनिरपेक्षतेचे द्योतक खासे नव्हते. आणि, 'हिंदुबहुल राष्ट्रात मुसलमानांवर हिंदूंचे वर्चस्व' म्हणून जीना वगैरे मंडळी बोंबलून बोंबलून जे व्यक्त करीत होती, त्यांचा रोख काँग्रेसकडे होता, हिंदुमहासभेकडे नव्हे. एक तर हिंदुमहासभा ही त्या काळात राजकारणात जवळपास non-entity होती, त्यामुळे, (हिंदुमहासभेची) विचारधारा काहीही असली तरी त्याची फारशी दखल घेण्याचे कारण त्यांना वाटत नसावे, नि भीतीही वाटत नसावी. त्यामुळे, हिंदुमहासभेशी त्यांचे थेट असे काही वाकडे नव्हते. (किंबहुना, Useful idiots म्हणून संभावना करण्यापलिकडे ते हिंदुमहासभेचा विचार तरी करत असावेत की नाही, हे शंकास्पद आहे.) त्यांचे वाकडे होते, ते काँग्रेसशी, नि त्यांना भीती वाटत होती, ती काँग्रेसची. कारण तेव्हा त्यांना तोच एक पॉवरबाज प्रतिस्पर्धी होता. असो.)
.
.
लेखाच्या सुरूवातीला फैझच्या
लेखाच्या सुरूवातीला फैझच्या ओळी वाचताना असे वाटते कि फैझ म्हणजे किती महान आत्मा असावा कि जो न्यायाची भाषा करतोय, पण त्याच्या इतका लबाड दुसरा कोणी नसेल. पाकिस्तानी कम्युनिस्ट पक्षाच्या संस्थापकांपैकी एक असणाऱ्या फैझने , पाकिस्तानातील अयुब खान आणि याह्या खान यांच्या लष्करी हुकूमशाहीविरुद्ध एकदाही आवाज उठवला नाही. भुट्टो फैझचा सर्वात खास मित्र, त्यामुळे जेव्हा जनरल झिया उल हकने भुट्टोला फाशीची शिक्षा सुनावली तेव्हा फैजचा आत्मा हळहळला. भुट्टो जेव्हा याह्या खानच्या नेतृत्वाखाली पूर्व पाकिस्तानातील नरसंहाराचे समर्थन करत होता , तेव्हा फैजने नरसंहाराच्या विरोधात कविता लिहिल्या होत्या परंतु त्या कवितांमध्ये बांगलादेश, पाकिस्तान किंवा कोणत्याही व्यक्तीचे नाव घेतले नाही जेणेकरून याह्या खान आणि भुट्टो यांच्यातील संबंध बिघडू नयेत. मार्क्सवाद्यांप्रमाणेच फैझने आंतरराष्ट्रीयवादाचा पुरस्कार केला. पण फैजचा आंतरराष्ट्रीयवाद हा प्रत्यक्षात इस्लामी कट्टरतावादी खिलाफत आंतरराष्ट्रीयवाद होता, जो इस्लामची मूळ विचारधारा आहे - ज्यानुसार जगातील सर्व धर्म संपवले जातील आणि फक्त अल्लाहचा धर्म सर्वांवर लादला जाईल. हेच कारण आहे की जनरल झिया उल हक नंतर पाकिस्तानात फैज अहमद फैज यांच्या समर्थकांचे सरकार स्थापन झाल्यावर फैज अहमद फैज यांना मरणोत्तर पाकिस्तानची सर्वात मोठी पदवी - "निशान-ए-इम्तियाज" देण्यात आली. त्यावेळी पाकिस्तानात फैज यांचे मित्र भुट्टो यांची ‘पाकिस्तान पीपल्स पार्टी’ आणि जातीयवादी ‘इस्लामी जम्हूरी इत्तेहाद’ असे दोन पक्षीय आघाडीचे सरकार होते.
एलिस जॉर्ज या ब्रिटिश बाईबरोबर लग्न करून तिला मुस्लिम धर्म स्वीकारायला लावणारा फैझ हा त्या काळचा लव्ह जिहादी म्हणायला हवा.
फैज इतका लबाड होता माहीत
फैज इतका लबाड होता माहीत नव्हते. धन्यवाद.