वेगळे आवाज

'ए हं आली हं, आता हे यडं बघ जाईल तिच्या मागे!', आमच्या कॉलेजात, नेहमीच्या बस स्टॉपवर, चैतन्यकांडीचा आस्वाद घेत असताना बरेचदा बोलला जाणारा हा डायलॉग. यातला 'हे यडं' म्हणजे आस्मादिक आणि हं म्हणजे निलम बाळ. हा डायलॉग मारला जावो अथवा न जावो, आपसूकच मी तिच्या मागे जात असे. हं नितांत सुंदर होती हे तर सत्यच पण मी तिच्या मागे जाण्याचे कारण तिचे दिसणे नव्हते, ते होते तिचा आवाज, 'वेगळा आवाज'.

तिचा आवाज अगदी वेगळा होता. थोडासा रफ, घोगरा म्हणावा असा पण नेमका घोगरा नाही. त्या आवाजामुळेच तिला हं हे नाव पडले होते. काहीतरी वेगळेपण होते त्या आवाजात. तो आवाज ऐकल्यावर काहीतरी वेगळेच फिलींग यायचे. मंजुळ आवाज ऐकल्यावर जसे 'अंगावर मोरपीस फिरल्यासारखे' वाटते त्याप्रमाणेच पण एकदम वेगळेच काहीतरी फिलींग असायचे ते. शब्दात वर्णन करता येणार नाही असे म्हणता येणार नाही कारण माझी एक व्याख्या होती त्या फिलींगचे वर्णन करण्यासाठी. (पण ती अशी जाहिर लिहीण्यासारखी नाहीयेय ) तर त्या आवाजाच्या मोहात पडल्यामुळे तो आवाज कानावर पडावा म्हणून मी हं च्या मागे फिरायचो. 'काय मंजुळ आवाज आहे नाही तिचा', 'किती बाई तो गोsssड आवाज', 'आवाजात काय मार्दव आणून बोलते ती', 'लताचा आवाज कसा तर कोकिळेसारखा' अश्या प्रकारच्या विषेशणांनी सजलेल्या, पुस्तकी व्याख्यांनी केलेल्या स्त्रियांच्या आवाजाचे गुणगान ऐकून आपापली समज बनवलेल्या त्या मित्रांना त्या आवाजातली मादकता कधी कळलीच नाही.

अतिशय मंजुळ आणि घोगरा ह्या दोन्हीच्या बरोबर मध्ये असणारी आवाजाची एक रेंज आहे जी मला खूप मादक वाटते. त्या आवाजाला एक वेगळाच खर्ज असतो, खोली असते. एक वेगळे Texture असते. तो आवाज ऐकल्यावर लगेच तो आवाज 'वेगळा आवाज' आहे ह्याची जाणीव होते. हे असे आवाज ऐकले की एकदम मादक पेय प्यायल्याचा फील येतो आणि जोडीला खुसखुशीत आणि खमंग चकली खाल्ल्याचा आनंद मिळतो.

त्या वेगळ्या आवाजातली मादकता म्हणजे नेमके काय हे समजावून घेण्यासाठी काही 'वेगळे आवाज' बघूयात (खरंतर ऐकूयात असे म्हणायला हवे). ते आवाज आठवले की मग मला नेमके काय म्हणायचे आहे.. ह्म्म्म.. किंबहुना मला काय एवढे मादक वाटते ते कळेल Smile

डेमी मूर
हीची आणि माझी भेट घोस्ट ह्या सिनेमात झाली. त्यावेळेच्या वयानुसार जे बघायला सगळेजण इंग्रजी सिनेमे बघत त्यासाठीच हा सिनेमा बघायला गेलो होतो. पण त्यात डेमीचा आवाज ऐकला आणि बास्स! 'हे यडं' ह्या माझ्या मित्रांचे माझ्यासाठीचे संबोधन सार्थ ठरले.

त्यानंतर तो सिनेमा ढीगभरवेळा बघितला पण फक्त डेमीच्या आवाजाकरिता, आवाजातला तो मादक वेगळेपणा मला प्रचंड मोहवून टाकतो, आजही. त्यात पुन्हा त्या वेगळ्या आवाजाला सौदर्याची जी जोड आहे तो बोनस Wink

लिलीट दुबे
लिलीटला मी पहिल्यांदा पाहिले किंवा ऐकले गदर सिनेमात. पण त्या सिनेमात सनी देओलचा गदारोळ, आरडाओरडा इतका होता की त्या आवाजात तिचे वेगळेपण दडपून गेले होते पण त्या वेगळेपणाची जाणिव मात्र झाली होती. त्यानंतर झुबेदा पाहिला फक्त तिच्या आवाजासाठी (त्या करिश्मासाठी कोण वेळ फुकट घालवेल).

मग कळले की ती इंग्रजी नाटकातून पण कामे करते. एका मित्राकडे तिच्या नाटकाची सिडी आहे कळल्यावर त्याला अक्षरश: पाणी लावून लावून ती CD त्याच्याकडून घेऊन बघितली. अजुनही ती बर्‍याच सिनेमांतुन तिच्या जादुई आवाजाची भुरळ घालतच आहे.

रानी मुखर्जी
रानी मुखर्जीला खास सावळ्या रुपड्याबरोबर एका खास आवाजाचेही देणं लाभले आहे.

'राजा की आयेगी बारात' ह्या तिच्या पहिल्या सिनेमात (हो.. हो... ह्या नावाचा एक सिनेमा आला होता तिचा) तिच्या ह्या खास आवाजाच्या प्रेमात पडलो मी. तीचे कामही खास होते त्या सिनेमात पण अमजद खानच्या मुलाने त्यात अभिनय(?) करण्याचा प्रयत्न करून पाहिला होता जो सपशेल अयशस्वी ठरला होता आणि तो सिनेमा डब्यात गेला.

त्यामुळे पुढे गुलाम ह्या सिनेमात तिचा आवाज डब केला गेला. त्यात रानीच्या आवाजाचा चार्म नव्हता. पुढे करन जोहरलाही कुछ कुछ होता है साठी तिचा आवाज डब करण्याची अवदसा सुचली होती पण माझ्या सुदैवाने त्याने तसे केले नाही Smile

रेखा
हीला 'लेडी अमिताभ' म्हटले जाते ते कशामुळेही असो, मी तिला लेडी अमिताभ मानतो ते फक्त तिच्या कमावलेल्या, खर्जातल्या आवाजामुळेच!

अनेक थोराड दक्षिणी अभिनेत्रींच्या गर्दीतली एक अशीच हिची ओळख होती सुरुवातीला. तिने करीयरला आकार येण्यासाठी विनोद मेहेराला हाताशी घरून ठेवले होते पण काही झाले नाही.
पुढे अमिताभच्या 'परीसस्पर्शाने' तिच्यात जो अंतर्बाह्य बदल घडून आला, त्यात तिचा आवाजही होता. खास खर्जातल्या कमावलेल्या आवाजासाठी तिने खूप मेहेनत घेतली आणि त्याचे फळ सर्वांनी ऐकलेच. आजही तिच्यासारखा दमदार आणि वेगळा आवाज असणारी तिच्या वयाची अभिनेत्री विरळाच.

तर हे आहेत मला मादक वाटणारे वेगळे आवाज! तुमचेही आवडते असे काही 'वेगळे आवाज' असतील तर जरुर कळवा Smile

१: ईच्छुकांनी व्यनितुन संपर्क साधावा Wink

field_vote: 
4.333335
Your rating: None Average: 4.3 (3 votes)

प्रतिक्रिया

डेमी मूरचा आवाजच काय ती एकूणच आवडते.
१९४७ अर्थ चित्रपटात शबाना आझमीचा आवाज सूत्रधारासारखा वापरला आहे तो मला आवडला. अलिकडेच कोणत्याश्या माहितीपटात मेरील स्ट्रीपचा आवाज वापरला होता, ते ही आवडलं.

पण या यादीत रानी मुखर्जी काय पटली नाही ब्वॉ. तिचा आवाज मला थोडा भसाडाच वाटतो. अजिबात काही संगीत नाही असं वाटतं. चिरक्या आवाजाच्या, लाडं-लाडं बोलणार्‍यांपेक्षा बरा एवढंच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

राणी मुखर्जीचा आवाज मला चक्क फाटलेला वाटतो. काटा येतो अंगावर Sad

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कमलहासनच्या आवाजातली खरखर तो ज्या पद्धतीने वापरतो ते आवडते.
मोहन गोखलेचा घोगरा आवाजदेखील त्याला चाङ्गलाच साजेसा होता. त्यातही त्याच्या कण्ठाची हालचाल प्रकर्षाने जाणवणारी पण तरीही न टोचणारी होती.
विशेष आवाज असलेली आणखी एक व्यक्ती म्हणजे कुमार गन्धर्व. बोलताना थोडा 'किनरा' या पट्टीकडे जाणारा होता पण त्याचा सर्वात सुन्दर वापर त्यान्नी माझ्या मते 'लहानपण दे गा देवा' या गाण्यात केला आहे. इतका गोड आवाज ते कसा काय लावू शकले हे माझ्यासाठी नेहमीचेच कोडे आहे. अगदी लहान होऊन गायले आहे असे वाटते.
तूर्तास एवढेच. आणखी आठवतील तसे लिहीन नन्तर.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वेगळा विषय म्हणून.

लता मंगेशकर आणि आशा भोसलेचा गोडगोड आवाज ऐकून कंटाळा येतो. किशोर कुमार, रफी यांच्या भारदस्त पण पठडीतल्या आवाजांबाबतही तेच. त्याऐवजी 'मोरे घर अंगन आना भूलो ना' म्हणणारा प्रीती सागरचा गावरान आवाज मोहवतो. 'बेशक मंदिर मस्जिद तोडो' मधला चंचलचा टिपेतला आवाज, आणि 'चोली के पीछे क्या है' म्हणणाऱ्या राजस्थानी गायिकेचा (तिचं नाव लक्षात नाही), 'फजा भी है जवॉं जवॉं' मधला सलमा आगाचा आवाज, 'एस. डी. बर्मन चा 'मेरे साजन है उस पार' मधला आवाज आणि आर. डी. बर्मनचा 'मेहबूबा' मध्ये लागलेला आवाज... हेही आपलं एक स्वतंत्र अस्तित्व मनात ठेवून जातात.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

राजस्थानी गायिकेचा (तिचं नाव लक्षात नाही)
........इला अरूण.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वरील प्रतिसाद घासकडवींसाठी होता तो इथे अदितींसाठी कसा आला कळेना. असो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आजच्या काळातले मोहित चौहान आणि कैलाश खेर यांचे आवाजही असेच आवडतात. सुनिधी चौहानचं नाव वेगळं घेण्याची गरज नाहीच. पण रेखा भारद्वाजचाही उल्लेख करावासा वाटतो. सुनिधी आणि रेखा भारद्वाजचा आवाज 'रात के ढाई बजे'मधे एकत्र काय मस्त वाटतो. तसंच काही 'भुमरो'मधे सुनिधी चौहान आणि जसपिंदर नरूलाच्या बाबतीत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

एक मस्त , अ‍ॅफ्रोडिझिअ‍ॅक परीणाम करणारं तेलुगु गाणं आहे, या गाण्याचा अर्थ माझ्या मैत्रिणींनी सांगीतलेला असा की - नायिका म्हणते - मी अनेक देश विदेश फिरले, खूप शोधला पण मला मनाजोगा पुरुष काही मिळाला नाही. आता मी भारतात आले आहे वगैरे.

या गाण्याला साजेसा उफाड्याचा आवाज गायिकेचा लगलेला आहे अर्थात आवाज न चोरता मोकळा सोडला आहे.

http://www.youtube.com/watch?v=WLAY-mTjp-w
___________________________________________________________

ज्युली लंडन चे "यु गो टू माय हेड" गाणे जरुर ऐका. या स्लो गाण्यातील तिचा आवाज ऐकताना अक्षरक्षः, वारुणी पीत आहोत असा भास होतो.

http://www.youtube.com/watch?v=YmV5oThSwK4
_____________________________________________________________________________

केरोल अ‍ॅल्स्ट्न चा "कुम्बायाह माय लॉर्ड कुम्बायाह" मधील आवाज अप्रतिम!!
http://www.youtube.com/watch?v=eYZwoodmAhw
_____________________________________________________________________________

"ब्युटी अँड द बीस्ट' मधील बीस्ट चा आवाज काय भारदस्त, आणि बीस्ट चा मूळातला चांगुलपणा आणि राजपुत्राची प्रतिष्ठादेखील प्रतिबिंबीत करणारा आहे. रॉबी बेन्सन या कलाकाराने हा आवाज दिलेला आहे. या चित्रपटास त्या वर्षीचे ऑस्कर मिळण्यात रॉबीचा सिंहाचा वाटा आहे असे म्हटले जाते. असे वाचनात आले की रॉबी चे रेकॉर्डींग पूर्ण होईपर्यंत त्याला बीस्ट कसा दिसतो हे दाखविले नव्हते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आर्काइव्ह वरती सापडलं - https://www.youtube.com/watch?v=pgAXU1-y7cA (Allu Arjun's - Ringa Ringa)
___________
इला अरुणचा आवाजही सॉलीडे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बिल्ली आई एक कलूटी, छींके ऊपर देखी मटकी।
कूदी, लपकी उछली, लटकी, यहाँ चढ़ी वहाँ से टपकी।
ऊपर नीचे उलझी-अटकी, मगर मिली ना घी की मटकी।
अम्माँ की फिर टूटी झपकी, गई बेचारी मारी डपटी।
पछताती फिर भागी सटकी, भाग्य कहाँ जो छींका टूटे,
या फिर फूटे-घी की मटकी!

एक प्रकारचे मार्दव असलेला खालच्या पट्टीतला आवाज बॉम्बे जयश्रीने लावला आहे - 'जरा जरा बहकता हैं' या 'रहना हैं तेरे दिल में' चित्रपटातील गाण्यात. सङ्गीत : हॅरीस जयराज. दुवा : http://www.youtube.com/watch?v=1-5L_yUL8xs&feature=related

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तिचं 'खुल के मुस्कुराले' हे गाणं मला अधिक भावलं. (http://www.youtube.com/watch?v=Y2rvSn4vsVE)

वरचा तुमचा प्रतिसाद राजेशच्या प्रतिसादाखालीच दिसतो आहे. डिस्प्ले: थ्रेडेड करून पहा एकदा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

गायिकांमधे मला वेगळा आवाज म्हटलं की 'फरिदा खानुम' आणि 'शुभा मुद्गल' आठवतात. दोघींच्याही आवाजाचा मी प्रचंड पंखा आहे! मला 'कोंकणा सेन' भुमिकेनुसार आवाजात जो बदल घडवून आणतो तो लाजबाब वाटतो. मि.&मि. अय्यर मधला आवाज आणि ओंकारा मधल्या भय्याणीचा स्वर इतका वेगळा तरीही बेमालूम होता की तेव्हापासून तिच्या 'वॉईस मॉड्युलेशन' कडे आवर्जून लक्ष देतो.

मेजवानी: फरीदा खानुम यांच्या आवाजातील आज जाने की जीद ना करो!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

आवाज की दुनिया के दोस्तों....
अमीन सयानींना कसे काय विसरलात?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आठवण देखील नको ! मला अजिबात नावडलेला आवाज. काही लोकाञ्चे बेगडी आवाज ऐकून हे प्रत्यक्ष रोजच्या जीवनात असेच बोलत असतील तर त्याञ्च्या बायको / मुलाबाळाञ्चे कल्याण असो, असे म्हणावेसे वाटते. (हे थोडे जास्तच कडू बोलतो आहे याची जाणीव आहे पण अगदी राहवत नाही आणि 'मौजमजा' सदर आहे म्हणून..). आपले बातम्यावाले प्रदीप भिडे याञ्चा दगडी आवाज देखील बघा. बातम्यांसाठी योग्य पण रोज रोज ऐकायचा तर... ! नको.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बेनेडिक्ट कंबरबाच.
जॉर्ज क्लूनी.
तरुणपणीचा अमिताभ बच्चन.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

मला अलीकडे सापडलेले हे दोन जबरदस्त आवाज-
रोहिणी रवाडा (तिच्या आडनावाचा नक्की उच्चार काय आहे ते माहीत नाही)- http://www.youtube.com/watch?v=m3ZyU98N3Fk
आणि बेनेडिक्ट कंबरबाच- http://www.youtube.com/watch?v=eLgCwVRWJB8&feature=related

याखेरीज आरती अंकलीकर यांचासुद्धा आवाज वेगळा आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

राधिका

आरती अंकलीकर

काय छान आठवून करून दिलीत! मस्त, मी जबरदस्त चाहता आहे त्यांच्या आवाजाचा...

- ('घीर घीर आये बदरिया कारी' हे गाणे आठवलेला) सोकाजी

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बेनेडिक्ट +१
एखाद्याचे व्यक्तीमत्त्व बघितले की त्याचा आवाज कसा असावा असा अंदाज मन बहुदा आपोआपच करत असावे. बेनेडिक्टला पाहिल्यावर मग त्याचा आवाज ऐकताना मला आश्चर्य वाटले होते (म्हंजे अश्या व्यक्तीचा इतका जड आवाज!!). पुढे सवय झाल्यावर तो आवाज आवडू लागला

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

जॉन व्येन
अमिताभ

सुश्मिता सेन
रेखा
तब्बु

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

काही वर्षांमागे लता आणि आशा नावाच्या दोन बहिणी गात होत्या. कुणाला आठवतात का त्या ? मला तर बॉ फार आवडायचे त्यांचे आवाज Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

मुराद (गवाहोंके बयानात...), रझा मुराद, जयंत, अमजद खान, सुरेश ओबेरॉय.....
'दिल का दिया' मधल्या लताबाई, 'मंझिल वोही है' मधला सुबीर सेन, 'कई बार यूंही देखा है' मधला मुकेश, 'फिर छिडी बात' मधला तलत अझीज, 'मितवा' मधला तलत महमूद, 'ऐ दिल कहां तेरी मंझिल' मधला द्विजेन मुखर्जी... वगैरे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

सुमन श्रीधर या नव्या गायिकेने एका विशिष्ट प्रकारे हेल काढत 'खोया खोया चाँद' हे गाणे 'शैतान' चित्रपटात म्हटले आहे. (तिचा मूळ आवाज तसाच आहे की नाही माहीत नाही) चित्रपट बघितला तेंव्हा त्या प्रसङ्गाला एका वेगळ्याच उञ्चीवर नेउन ठेवण्याचे काम या गाण्याने केले आहे. तो अनुभव शब्दान्त साङ्गणे कठीण आहे. कदाचित, नुसते ऐकायला नाही आवडणार पण ते प्रसङ्गाला एकरूप झाले असल्याने प्रसङ्गाबरोबर पाहणेच योग्य ठरेल. दिग्दर्शक बिजोय नाम्बियारने ज्या पद्धतीने हे गाणे चित्रित केले आहे त्याला तोड नाही. http://www.youtube.com/watch?v=BfgxuZmNaC8

लगे क्लिक, हे 'हवा हवाई' देखील http://www.youtube.com/watch?v=V0FotIwYhMw&feature=fvwrel पाहून टाका.

--------------

'ये बिजली राख कर जाएगी तेरी प्यार की दुनिया' हे शब्द प्रथम ऐकले तेंव्हा अक्षरशः ती बिजली काळजाला घरे पाडून गेली. इतकेच म्हणून ती थाम्बत नाही तर पुढे 'न फिर तू जी सकेगा और न तुझको मौत आएगी' असा जळजळीत शाप देते. मुबारक बेगमला या आवाजासाठी सलाम. (गाण्याचे चित्रीकरण पाहून मात्र विरस झाला कारण तनुजा गोड गोड हसर्‍या चेहर्‍याने आकाशातून हे गाणे म्हणत राहते. http://www.youtube.com/watch?v=9-FuMAFtw9o&feature=related)

--------------------

http://www.youtube.com/watch?v=CgObiMbmBaE राजकुमारी याञ्चा खूप उपेक्षित राहिलेला आवाज. 'महल' चित्रपटातले हे गाणे बघा. खरे तर त्या काळातल्या बर्‍याच गायक - गायिकाञ्चे आवाज गेङ्गाणे वाटतात. पण का कुणास ठाऊक पण हा आवाज लक्षात राहिला.
राजकुमारी याञ्चे 'सुन बैरी बलम सच बोल रे, इप क्या होगा' हे आणखी एक लक्षात राहणारे गाणे, केवळ त्या 'इप' शब्दाची हवीहवीशी वाटणारी पुनरावृती ऐकण्यासाठी http://www.youtube.com/watch?v=gcgFV5GR8sc ( आणि गीता बालीसाठीदेखील ! )

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तसे आमचे कर्णेंद्रिय बहुतेक फॉल्टीच असावे, विशेष कोणाचे आवाज आम्हाला ओळखता येत नाहीत. पण तरीही झोपेत सुद्धा ओळखता येतील असे एकदोन आवाज आहेत. १. मॉर्गन फ्रीमनः शॉशँक रिडेम्पशन् मधले त्याचे मोनोलॉग्स हे एक उत्तम उदाहरण असावे. २. डेविड अटेनबरोह: सॉफ्ट ब्रिटीश उच्चार(?) आणि माहिती देण्याची खास लकब असलेला आवाज विसरणे अवघडच आहे.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मला सुदेश भोसले, विक्रम साठ्ये, राजू श्रीवास्तव वगैरे अनेक वेगवेगळे आवाज काढणार्‍यांचं नेहमीच कौतुक वाटत आलेलं आहे. तसंच अलीकडे कुठल्याशा कार्यक्रमात वैभव मांगलेनं लताच्या आवाजात गाणं म्हटलं होतं! तेही प्रचंड कौतुकास्पद. अगदी तंतोतंत नव्हे तरी बराच सारखा आवाज लागला होता.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सर्वच प्रतिसाद रोचक, मस्त.

ह्या सर्व आवाजांसकट, पंतांचा(प्रभाकर पणशीकर) आवाजपण विलक्षण होता.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

चंचल, शुभा मुद्गल, छाया गांगुली, मुबारक बेगम हे सारे आवाज वेगळे म्हणून आवडतातच, पण मला सगळ्यात जास्त आवडणारा वेगळा आवाज आहे, तो जगजीत कौरचा. तिने गायलेली अत्यंत आवडती दोन गाणी म्हणजे, 'तुम अपना रंजो गम'
http://www.youtube.com/watch?v=A8Yr1OOeOT8
आणि 'बाजार' मधले 'देख लो आज हमको जी भर के'
http://www.youtube.com/watch?v=hYqH2i0MC60.
'बाजार' मधले वेगळ्या बाजाचे 'चले आओ सैया' सुद्धा आवडते.
http://www.youtube.com/watch?v=qgXDytMnow4

टिपीकल आवाजांमधे, आशा भोसले, तलत आणि सोनू निगम आवडतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बर्‍याच जणांना माहिती नसावे, टुणटुण हीने तीच्या फिल्मी दुनियेची सुरुवात पार्श्वगायिका म्हणून केली होती. तीचे त्यावेळचे नाव उमा देवी.
अफसाना लिख रही हू दिले बेकरार का आंखो मे रंग भरके... एकदम खास वेगळ्या आवाजातले गाणे

- (ह्या गाण्याचा पंखा) सोकाजी

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आबिदा परवीनचा आवाज आवडतो. सूफी गायिका रिचा शर्माचा आवाज कधीमधी आवडतो. त्या दोघींनीही आपापल्या पद्धतीने गायलेला, आमीर खुस्रोचा कलाम, छाप तिलक सब छीनी, आवडतो.

आबिदा परवीन: http://www.youtube.com/watch?v=aLg8MyF4p-k (आबिदाच्या आवाजातलीही वेगवेगळी व्हर्जन्स उपलब्ध आहेत.)
रिचा शर्मा: http://www.youtube.com/watch?feature=endscreen&NR=1&v=zgLEe2KNwN4 (फक्त गाणं बघू नका. फ्लॅश लाईट्स मारले आहेत.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अप्रतिम आवाज.

इथे स्वतंत्र : १:५७ पासून
http://www.youtube.com/watch?v=6LET1eHhsOA

इथे लेडी सेहगल :
http://www.youtube.com/watch?v=QdxSLZI9-oE

(या आवाजाची ओळख करून दिल्याबद्दल श्री. चित्तरंजन भटांचे आभार)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

श्रद्धा पंडित
शारदा
नाजिया हसन
चित्रा
भाई भगत
अमिन सयानी
तबस्सुम

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

चेतन सुभाष गुगळे
भ्रमणध्वनी - ०९५५२०७७६१५
Electronic Mail Address :- chetangugale@gmail.com

वेगळाच - खरखरीत म्हणावा असा - आवाज असलेली बिली हॉलिडे भुरळ घालते.
यूटुब दुवा - समरटाईम
यूट्यूब दुवा - स्ट्रेंज फ्रूट (या खरचटणार्‍या शब्दांना आवाजाने खरवडले, की अंगावर शहारा येतो.)

लहानपणी मला शोभा गुर्टूंचा आवाज घोगरा वाटत असे. आता तसा मुळीच वाटत नाही. ध्वनिफितींतील त्यांचा आवाज बदलला नाही Smile ... तर माझा कान बदलला आहे. ("घोगरा" आणि "खालच्या पट्टीतला" यांच्यातला फरक जाणवू लागला आहे.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

चित्राचा ये हसी वादिया मधे छान सूर लागलाय

तसच हरिहरनचा देखील आवाज आवडतो

मोहित चौहानने देखील जब वी मेट मधल तुमसेही तनू वेडस मनू मधल कितने दफे छान गायलय

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

.

पण तलत महमूदच्या मखमली आवाजाला तोड नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बिल्ली आई एक कलूटी, छींके ऊपर देखी मटकी।
कूदी, लपकी उछली, लटकी, यहाँ चढ़ी वहाँ से टपकी।
ऊपर नीचे उलझी-अटकी, मगर मिली ना घी की मटकी।
अम्माँ की फिर टूटी झपकी, गई बेचारी मारी डपटी।
पछताती फिर भागी सटकी, भाग्य कहाँ जो छींका टूटे,
या फिर फूटे-घी की मटकी!

कोक स्टुडिओच्या पाकिस्तानी आवृत्तीत कुरतुलेन बलोचचा आवाज ऐकला. गायिका म्हणून खूप थोर नाहीये, पण आवाज आवडला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

आवाज एकदम मस्त आहेच गायकीही चांगली आहे. अखियां नू रेन दे, कोक स्टुडियो मधले सब जग सोये, वगैरे, हमसफर. तिची समीना पीरजादा बरोबरची मुलाखत पण चांगली आहे. पाकिस्तानातील कुटुंबपद्धतींबद्दल असणाऱ्या भारतीय ठोकताळ्यांना धक्का देणारी.

हमसफर
सब जग सोये
मुलाखत

बाकी नंदिनी श्रीकर चा आवाज देखील एकदम वेगळा आहे. पुण्याची आहे. पण दुर्दैवाने फार गाणी मिळत नाहीत तिला.

हे सगळ्यात गाजलेले - दुवा ( शांघाय चित्रपटातले) पण ते अर्जित सिंग चे म्हणून ज्यास्त गाजले.

बाणेरच्या मुझिक्ल्ब मध्ये नंदिनी श्रीकर दुवा गाताना

दुसरे मराठी.

- ओंकार.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जगजीत सिंग यांचा आवाजही वैशिष्ट्यपूर्ण होता.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0