खट्टरकाकांचे ‘रामायण’
( प्रो. हरी मोहन झा (1908 – 1984) यांच्या ‘खट्टर काका’ पुस्तकातील रामायण या मूळ हिंदी लेखाचे स्वैर रूपांतर ऐसी अक्षरेच्या वाचकांसाठी देत आहे. या पुस्तकातील लेख 1950च्या दशकात लिहिलेले असले तरी आजही त्यातील विनोद, विडंबन व आशय आपल्याला अंतर्मुख करणारे आहेत.
'खट्टर काका' हे त्यांचे विनोदी अंगाने लिहिलेले हिंदी भाषेतील पुस्तक भरपूर गाजले. परंतु प्रो. हरीमोहन झा यांना केवळ विनोदी लेखक म्हणून ओळखणे त्यांच्यावर अन्याय केल्यासारखे होईल. ते मुळात तत्वज्ञानाचे अभ्यासक होते व संस्कृत, इंग्रजी भाषेवर त्यांचे प्रभुत्व होते. पाटणा विद्यापीठाचे मैथिली भाषेचे ते तज्ञ होते. मैथिली भाषेतील सौंदर्य फुलवून सांगणाऱ्या त्यांच्या पुस्तकांना भरपूर प्रसिद्धी मिळाली. )
डिस्क्लेमरः हा लेख कुणाच्याही भावना दुखवण्यासाठी लिहिलेला नसून रामायणाच्या संबंधातील एक (गंमतीशीर) विचार एवढाच त्यामागचा हेतू आहे याची कृपया नोंद घ्यावी.
खट्टरकाका कट्ट्यावर बसून बेदाणे निवडत होते. गल्ली-बोळात रामनवमी उत्सवाचा माहोल पसरला होता.
“काका, आज रात्री रामायणातील रामकथा ऐकण्यासाठी मैदानातील कार्यक्रमाला येणार आहात का?” माझा प्रश्न
“कुठला भाग?”
“सीतेच्या वनवासाची कथा. तिच्या अरण्यवासाबद्दलची.”
“मग मी नाही येणार.”
“का हो काका? राम हा अत्यंत नीतिमान, मानव वंशातील थोर व जगातील असामान्य असा पुण्यपुरुष होता ना?”
“हो, खरोखरच तसा होता. म्हणूनच एका असहाय अबलेला त्यानी दुःखात लोटले. आपल्या पत्नीला घराबाहेर ढकलून दिला. एका महिलेचे नाक कापले. एका प्रकारे त्याचे शौर्य म्हणजे महिलांना रडविणे व त्यांचा अंत पाहणे.” काका म्हणाले.
“काका, परमेश्वराला मानव जन्म घेतल्यानंतर हे सगळे करावेच लागतात!”
“इतक्या क्रूरपणे ती करायची गरज होती का? खरे पाहता त्याच्या या प्रकारच्या वागण्याला मी त्याला दोष देत नाही. लहानपणी त्याला विश्वामित्रासारखा गुरु भेटला व त्यानी ताटकेला मारून टाकण्याचे शिक्षण दिले. हे त्याचे दुर्दैवच ठरले. नाहीतर त्याचा पहिला बाण एका स्त्रीच्या छातीत घुसला असता का? विश्वामित्राचे मार्ग औरच होते. त्याला जगाचे मित्र व्हावेसे वाटत होते म्हणून त्या नावाचा हट्ट धरला. खरे पाहता त्या काळचे व्याकरणच त्यानी बदलून टाकले. इतर सर्व ऋषी-मुनी राजर्षी वा ब्रह्मर्षी या नावाने ओळखले जात होते. त्यानी ती वर्णव्यवस्थाच बदलून टाकली. वसिष्ठाच्या विरुद्धच्या वैरत्वासाठी नैतिकतेला नदीत बुडवून टाकले. असा माणूस रामाला काय शिकवू शकतो? ज्याच्याजवळ नाही ते दुसऱ्याना कसे काय देऊ शकतो?” काकांचा प्रश्न
“काका, राम म्हणजे न्यायाचा मूर्तीमंत पुतळा. न्यायासाठी आपल्या बायकोचासुद्धा त्यानी त्याग केला. खरे की नाही?”
“नाही बेटा, तसं काही दिसत नाही. मुळात त्याच्या घराण्याचीच ही परंपरा होती. त्याच्या वडिलानी त्याला वनवासात पाठविले. रामानी सीतेबद्दल तेच केले. तू न्याय म्हणत होतास ना. हा कसला न्याय? कुणीतरी काहीतरी म्हटले म्हणून कुणाला तरी शिक्षा देतात का? खरोखरच त्याला न्याय द्यायचे असते तर राजदरबारी दोन्ही पक्षाना समोरासमोर बोलवून साक्षी-पुरावे तपासून न्याय दिला असता. परंतु त्यानी तसे काही केले नाही. तडकाफडकी सीतेला जंगलात सोडून देण्याची आज्ञा दिली. याला न्याय म्हणतात का? एका सामान्य प्रजेइतका सुद्धा या राणीला हक्क नव्हता का?”
“परंतु आपण जनतेच्या मतांना किंमत देतो, हे रामाला सिद्ध करायचे होते.”
“असे काही नसावे. अयोध्येच्या जनतेला सीतेला राज्यातून हकलून द्यावे असे कधीच वाटले नाही. म्णूनच रात्री-बेरात्री एका रथात बसवून तिला जंगलात सोडण्यात आले. याला लक्ष्मण तर तयारच होता. तो काय शूर्पणखेचे नाक कापण्यासही तयार होताच! ऱथ सज्ज करून सीतेला जंगलात सोडून यायला हजर! जेव्हा सकाळी बातमी कळाली, तेव्हा अयोध्येत हाहाकार उडाला. परंतु राम अडून बसलेला. अयोध्येतील प्रजेंच्या प्रार्थनेला त्यानी किंमत दिली का? स्वतः वनवासात जातानासुद्धा तो कुणाच्याही शब्दांना किंमत देत नाही. आता सीतेच्या बाबतीत कसे काय देईल?”
“काका, तो वडिलांच्या वचनपूर्तीसाठी वनवासात गेला होता…”
“जरा तर्कशुद्ध विचार कर. वनवास म्हणजे काय अनेक जंगलात राहायचे की एकाच जंगलात राहायचे? त्यानी पहिला मार्ग पत्करला. दुसरा मार्ग पत्करला असता तर अयोध्येजवळच्या एखाद्या जंगलात चौदा वर्षे राहिला असता. निदान चित्रकूटजवळ राहिला असता तरी वडिलांचे वचन पाळल्यासारखे झाले असते. हजारो मैल भटकंती करण्याचे काही कारण होते का? तेही सीतेसारखी कोमल पत्नीला घेऊन पायी पायी चालत? मिथिलेचा सल्लागार गौतम यानी हा प्रश्न विचारल्यानंतर रामाकडे त्याचे उत्तर नव्हते. एवढेच नव्हे तर त्यानी त्याला शाप दिले. गौतमाच्या तर्काप्रमाणे विचार करणारे पुढील जन्मी कोल्हा म्हणून जन्म घेतील असा तो शाप होता. हा काय प्रतिवाद होऊ शकतो का? तार्किक चर्चा म्हणजे कोल्ह्यासारखे आरडा-ओरड करणे नव्हे. कोल्हेकुई नव्हे. जर रामाने मिथिलानगरीच्या कायदा-नियमांचा थोडासा अभ्यास केला असता तरी अशा प्रकारे तो वागला नसता.”
नारळाचे तुकडे करत काकानी आपले बोलणे पुढे चालू ठेवले
“खरोखरच जनतेनी एकमताने सीतेला सोडून देण्यास सांगितले असते तर त्यानी काय केले असते? अग्नी परीक्षेतून बाहेर पडलेली सीता पवित्र असल्याची त्याला खात्री होती. मग लोक काय म्हणतील याची त्यानी का म्हणून काळजी करावी? जर लोक बंड करतील अशी भीती वाटत असल्यास भरताच्या हातात राज्य देऊन बायकोबरोबर पुन्हा एकदा जंगलात जाऊन राहिला असता. असे केले असते तर राम खरोखरच आदर्श पुरुष झाला असता. रामाला राज्य कसे करावे हे माहित असेल, परंतु पत्नीचे प्रेम काय असते याची कल्पना नव्हती. राणी सीता सिंहासनाचा त्याग करून पातीव्रत्य संभाळली. परंतु रामाने सिंहासनाचा त्याग केला नाही. इंग्लंडचा राजा, आठवा एड्वर्ड यानी सिंप्सन या प्रेमिकाशी लग्न करता यावे म्हणून सिंहासनाचा त्याग केला.”
“काका. सीतेला जंगलात सोडून दिल्याबद्दल तुम्ही फारच मनाला लावून घेतलेले दिसते.”
“का नाही? सीतेचे पूर्ण आयुष्यच दुःखात गेले आहे. ती कधीही सुखात नव्हती. पहिल्यांदा नवऱ्याबरोबर जंगलात राहू लागली. थोडीशी उसंत मिळाल्यावर राजमहलात चार सुखाचे दिवस काढायचे असे वाटत असतानाच एका निराश्रितासारखे रानावनात तिची रवाना करण्यात आली. जेव्हा ती वनवासात असताना हरवली तेव्हा तो बायकोसाठी धाय मोकलून रडत होता. त्यासाठी समुद्रावर पूल बांधला. परंतु लंकेहून परतल्यानंतर सीतेला घरदार परके झाले. म्हणूनच मिथिलावासी पश्चिमेकडील लोकांना मुलगी देण्यास तयार नसत.”
काकांच्या डोळ्यात अश्रू दिसू लागले.
“सीतेसारख्या राणीची किती हेळसांड? काया, वाचा मनसा ती रामाची आराधना करत असे. पावलोपावली ती त्याच्या मागेमागे राहिली. दाट जंगलातील खाच खळगे तुडविली. अग्नी परीक्षेच्या वेळी त्याच्या शब्दासाठी आगीत उडी मारली. आगीत उडी मारण्यापूर्वी तिने अग्नीची प्रार्थना केली. “हे अग्नीदेवा, मी काया, वाचा मनसा रामाची पूजा केली आहे. देवा, मी किती पवित्र आहे हे तुला माहित आहे. माझ्यासाठी तू चंदनासारखा थंड हो.” तिच्या मनासारखेच झाले. ज्वाळा थंडगार झाले. सोन्यासारखी चमकत ती त्या दिव्यातून पार पडली. अशा पवित्र स्त्रीशी त्याचे असे वागणे...तेही ती आठ महिन्याची गरोदर असताना.. या क्रूरपणाला सीमा नाही. सीता ही खरी मैथिलीची पुत्री. तशी हार मानणारी नाही. म्हणूनच तिने हे सर्व सहन केले. दुसऱ्या कुठल्या राज्याची असती तर तिने तिचा इंगा दाखविला असता. मला सांग, रामाला तिचे संबंधच तोडायचे असते तर तिला माहेरी पाठवून द्यायला हवे होते. पाठवता आले नसता का? तसे न करता तिला दाट जंगलात पाठवून दिला. तिला न्याय मिळण्याची शक्यता दिसली नाही. म्हणूनच ती जन्माला आलेल्या भूमातेच्या उदरात नाहिशी झाली. इतक्या पवित्र महिलेची अशी का दशा व्हावी? म्हणूनच तिला पोटात घेताना भूमातेचे दोन तुकडे झाले.”
मी त्याना समाधान करण्याचा प्रयत्न करत होतो. “हे सर्व त्या परीटामुळे घडले..”
काका रागाने लालबुंद झाले. “मला सांग. तो परीट गाढवावरून खाली पडल्यास मी तुझ्या काकूला बाहेर काढेन का? काढणार नाही. रामाचा भरपूर वेळ निषाद, केवट, भिल्लिणी, गरुड पक्षी, अस्वल, माकडं यांच्या संगतीत गेला होता. हो की नाही? मंथरेसारख्या एका यःकश्चित दासीचे सहा शब्द ऐकून बापाने मुलाला अरण्यात धाडले. व हा माणूस एका मूर्ख परिटांचे ऐकून आपल्या गरोदर बायकोला जंगलात पिटाळतो. घरात मंथरा तर बाहेरचा रामाचा गुप्तहेर दुर्मुख.. “
“काका, हे सर्व नैतिकतेच्या रक्षणासाठी केली असेल..”
“कसली डोंबलाची नैतिकता.. सगळे अनैतिक. नैतिकतेची एवढी चाड असती तर झाडाच्या मागे लपून वालीवर बाण सोडला असता का? त्याला समोर बोलवून मारू शकला असता. रघुवंशातील लोक यमालासुद्धा घाबरत नाहीत या प्रौढीचे काय झाले? म्हणूनच मरते वेळा वालीने “महात्मा, तू धर्मरक्षणासाठी, धार्मिकतेसाठी जन्म घेतलास. परंतु तू एका शिकाऱ्यासारखे विश्वासघात करत मला मारलास.” सुग्रीवाची पत्नी, तारा हिला पळवून नेल्याबद्दलच्या वालीच्या दुष्कृत्याला शिक्षा म्हणून वालीला मारत असल्यास त्या प्रकारचाच अपराध करणाऱ्या सुग्रीवाला तोच न्याय का लावला नाहीस? रामायण लिहिणाऱ्या लेखकानी ही चूक कबूल करयाला हवे होते. सुग्रीवाचा अपराधही वालीसारखाच होता. परंतु रामाने वालीची शिकार करून मारून टाकले. रावणाच्या मृत्युनंतर विभीषणाने मंडोदरीशी विवाह करून अशाच प्रकारचा अपराध केला. परंतु त्याच्या स्वप्नातसुद्धा हे अपराध आहेत असे आले नसेल. शेवटी मृत्युची शिक्षा कुणाला मिळाली तर शंभूकाला. बिचारा तो तर तपश्चर्या करत होता.”
“परंतु त्याच्या न्यायबुद्धीमुळे रामाला पुरुषोत्तम म्हटले जाते...”
“तू म्हणू शकतोस. मला तर तो बालिश वाटतो. लहान मुलासारखे जंगलातील सोनेरी हरिणाच्या मागे त्यानी का पळत जावे? सुग्रीव त्याचा मित्र असूनसुद्धा सीतेला शोधण्यात उशीर झाला म्हणून त्याच्यावर बाणांचा वर्षाव का करावा? समुद्रावर बाण सोडण्यात का घाई केली? युद्धभूमीवरील लक्ष्मणाचा पराजय बघून हा का शोकाकुल झाला? आपल्या मनाचा समतोल नियंत्रण करू न शकणारा हा राम खरोखरच शूर होता का?”
काका बदामाचे तुकडे तोंडात टाकत होते. व पुढे म्हणाले,
“जास्त विचार केल्यानंतर रामाची यात काही चूक नाही, असे मला वाटत आहे. कारण त्याचे वडील, दशरथही अशीच घाई करत होते. ते शिकारीला गेले. नदीकाठचा आवाज ऐकला. धनुष्याला बाण लावला व जिथून आवाज ऐकू आला तेथे बाण सोडले. आपण एखाद्या माणसावर बाण सोडला याचा विचारही त्यानी केला नाही. बिचाऱ्या श्रवणबाळाला जीव गमावले लागले व श्रवणबाळाच्या अंध वडिलांना मुलाच्या मृत्युमुळे हृदयाघाताचा धक्का बसला. जवळ आलेल्या दशरथाला पुत्रशोकाचा शाप देत त्यानी मृत्युला कवटाळले. अगोदरच दोन राण्या असताना या वृद्ध दशरथानी अजून एका तरुणी, कैकेयीशी विवाह केला. स्वतःच्या जिवापेक्षा तरुण पत्नी जवळची वाटली. युद्धाला जाताना रथात तरुण कैकेयीला स्वतःच्या शेजारी बसवले. कसला मोडका-तुटका रथ होता कोण जाणे. ऐनवेळी रथ मोडला. नाव जरी दशरथ असले तरी त्याच्या जवळ एकच रथ होता! रथ उलटू नये म्हणून त्या तरुण कैकेयीने आपले मनगट चाकात घुसवून रथ उलटण्यापासून वाचविले. तिचे मनगट खरेच मजबूत असावेत! चाकाच्या धुऱ्यात (axle) हात घातला तरी हात तुटला नाही. तिच्या पराक्रमामुळे दशरथचा जीव वाचला. मागचा पुढचा विचार न करता ‘काय हवे ते माग’ म्हणून त्यानी तिला विचारले. तिने जर आकाशातील तारे तोडून आणण्यास सांगितले असते तर कसली फजीती झाली असती! काही वेळाने तिने ज्येष्ठ पुत्र रामाला वनवासाला पाठविण्याची मागणी केली. त्याला फार वाईट वाटले. तरी बरे समंजस कैकेयीने दशरथाचे काळीज मागितले असते तर हा नीतीमान राजा काय केला असता? एवढेच नव्हे तर, एकदा शब्द दिल्यानंतर धाय मोकलून रडण्याला काही अर्थ नाही. चौदा वर्षाच्या वनवासानंतर रामाला राज्य परत मिळाले असतेच की! थोडीशी सहिष्णुता दाखवायला हवी होती. रामाचा वनवास संपेपर्यत वाट बघणे शक्य होते. एवढे जर पुत्रप्रेम असल्यास रामाबरोबर दशरथही जंगलात जाऊ शकला असता. हे काहीही न करता ‘हाय रामा, हाय रामा’ करत रडत रडत प्राण सोडला. खरा क्षत्रिय मनाने एवढा कमकुवत असूच शकत नाही...”
काका एकदा मागे लागले की काहीही अर्धवट सोडतच नाही. आज त्यांच्या तावडीत दशरथ सापडला होता.
“काका! रामायणात प्रत्येकाला शिकण्यासारखे काहीना काही तरी आहेच...” मी म्हणालो
“मलाही यातून भरपूर काही शिकायला मिळाले. प्रत्यक्ष वस्तू न बघता धनुष्यातून बाण सोडू नये; विचार न करता कुणालाही वचन देऊ नये; व नंतर वचन दिल्याबद्दल पश्चात्तापाने छाती आपटून घेऊ नये...”
“काका, तुम्ही फक्त त्याच्या कमजोरपणावर बोट ठेवत आहात...”
“बर, तू मला त्याची एक तरी चांगली बाजू दाखव बघू.”
“राजा दशरथ सत्यवचनी होता..”
“हो. तो इतका सत्यवचनी होता की श्रावणबाळच्या आंधळ्या आई-बाबांना आपणच श्रावणबाळ आहोत, अशी नक्कल केली.”
“राम तर आज्ञाधारक पुत्र होता..”
“हो, म्हणून तर वडील गेल्याची बातमी ऐकल्यानंतर तो वडिलांचे मृतदेह पाहण्यासाठी परतसुद्धा आला नाही. थोरला मुलगा असूनसुद्धा वडिलांच्या मृत्यु पश्चात कुठलेही विधी केले नाहीत. काहीही न झाल्यासारखे दक्षिण दिशेकडे निघून गेला.”
“... लक्ष्मणाचे अवर्णनीय बंधुप्रेम...”
“बरोबर एका भावासाठी दुसऱ्या भावावर, भरत वर, त्यानी बाण उगारला...”
“भरताची असाधारण त्यागवृत्ती...”
“चौदा वर्षे भाऊ वनवासात असताना एकादाही भरत त्यांना भेटला नाही की साधी विचारपूस केली नाही. राजधानीतील कामे इतके होते की बिचाऱ्याला फुरसतच मिळाली नाही. बरोबर? जर याचे सैन्य मदतीला असते तर रामाला वानरसेनेची गरजच पडली असती का?”
“मारुती त्याचा निःसीम भक्त होता...”
“हो, तो अगोदरच्या, सुग्रीवाची चाकरी सोडून नवीन मालक, रामाचा तो भक्त झाला.”
“विभीषणाइतका आदर्श ....”
“या माणसाच्याबद्दल अनेक मतप्रवाह आहेत. लंकेच्या विनाशासाठीचा घरातला तो गुप्तहेर होता. त्यामुळेच ‘अशा विभीषणापासून देशाला वाचव’ अशी नंतरच्या काळात प्रार्थना करत होते.”
“तुमच्या मते रामायणातील एकही व्य्क्ती आदर्श नव्हती की काय?...”
“का नाही, संपूर्ण रामायणात माझ्या दृष्टीने एकच व्यक्ती आदर्श होती.”
“कोण?”
काका हसत म्हणाले, “रावण”
“काका! तुम्ही कायमच सगळ्या गोष्टींची चेष्टा करता.”
“चेष्टा नव्हे. तू त्याच्यातील एक तरी दोष दाखवू शकतोस का?”
“काका, तुम्ही फारच ग्रेट आहात! सगळ जग रावणाला शिव्या घालते. तुम्हाला मात्र त्याच्यात एकही दोष सापडत नाही. कमाल आहे!...”
“……”
“बोला. मनातले बाहेर येऊ दे. त्यानी सीतेचे अपहरण करून लंकेत नेले, हे तरी मान्य करता की नाही?”
“या नीतीमान पुरुषोत्तमाला पाठ शिकविण्यासाठी त्यानी तसे केले. दुसऱ्याच्या बहिणीचे नाक कापू नये म्हणून; परक्या देशात राहिल्यानंतर इतराशी वैर करू नये म्हणून; मृगजळाच्या मागे धाऊ नये म्हणून; परस्त्रीचा अपमान करू नये म्हणून. जरा लक्ष देऊन ऐक. रावणानी सीतेला लंकेला पळवून नेले तरी त्याने तिला अपमानित केले नाही. राजमहलात घेऊन न जाता अशोक वनात तिची बरदास्त ठेवली. सर्व जण त्याला राक्षस व असुर म्हणत असले तरी कुठल्याही माणसापेक्षा त्याचे वर्तन नक्कीच चांगले होते!”
“काका! तुम्ही नेहमीच लोकांच्या विरोधातील बाजू घेता. ज्याने घोर अपराध केला त्याची बाजू घेता व करुणासागर सीतापतीवर दोषारोप करता.”
“कसला करुणासागर...? तो तर दगडाच्या काळजाचा. मिथिलेची राजकुमारी लग्नानंतर आयोध्येला आलेली पुन्हा एकदा कधी तरी माहेरी गेली का? तिच्या नशीबातच माहेरचे सुख नव्हते. म्हणूनच आम्ही पश्चिमेकडे मुली देत नाही.
“काका! सीतेच्या पतीकडील सर्व नातलगाविषयी तुमच्या मनात अढी आहे. म्हणूनच तुम्ही त्यांची एवढी निंदा करता. परंतु रामाकडे तुम्ही पाहिल्यास तुम्हालासुद्धा त्याच्यापुढे हात जोडावेसे वाटतील, नतमस्तक व्हावेसे वाटेल. खरे की नाही?”
“मी कसे काय असे करू शकेन? मी ब्राम्हण, तो क्षत्रिय. फार फार तर मी त्याला आशिर्वाद देईन. तुझ्या मनात चांगले विचार येऊ देत. यानंतर कुणी रामराज्याविषयी बोलत असल्यास ‘छी, छी, रामा’ असे म्हणण्यास आस्पद देऊ नये. माझ्यासारख्या एका ब्राह्मणाला त्याचा मंत्री नेमण्याचा सल्ला मी त्याला देईन.”
“पण काका! रामराज्य म्हणजे एक आदर्श राज्य. बरोबर?”
“खर आहे. तुलसीदासानीच एका ठिकाणी लिहून ठेवलेले आहे की रामराज्यात गरीब, वंचित, दुःखी असे कुणी असणार नाही. मी फक्त यात अपवाद म्हणून दुर्दैवी सीता असे लिहीन. आपल्या गावाचे प्रशासन रामराज्यासारखे असते तर आपल्या येथील अनेक सीताना भूमातेच्या पोटात जावून समाधी घ्यावे लागले असते.”
“काका! तुम्ही रामनवमीचा सण साजरा करत असल्यास तुमच्या मनात नक्कीच भक्ती असेलच”
“आहे की! परंतु सीतेबद्दल आहे. सीता जर नसती तर फक्त रघुपती राघव राजाराम असे भजन करावे लागले असते. त्याला कुणीही पतित पावन सीताराम असे म्हटले नसते. प्रत्येक क्षत्रिय राजा ज्या सहजपणाने दोन-तीन विवाह करतो त्याला अपवाद म्हणून रामाकडे पहायला हवे. त्यानी दुसरे लग्न केले नाही. जानकीची सोन्याची मूर्ती करून उर्वरित आयुष्यभर शोक करत राहिला. यासाठी मी त्याचे सर्व गुन्हे माफ करतो.”
“रामाचा थोरपणा सीतेमुळे होता. म्हणूनच प्रथम सीता व नंतर राम. तुलसीदास ‘मी हात जोडून प्रार्थना करतो की हे संपूर्ण जग राम व सीतामय होवो’ असे म्हणत होते. वाल्मिकीने सुद्धा सीता व तिच्या पतीची प्रार्थना करा असे म्हटले होते.”
“काका! तुम्ही एवढे सीतेबद्दल भरभरून भक्तीभावाने बोलता तर रामावर एवढी टीका का करता तुम्ही त्याच्या वडिलालाही सोडत नाही.”
काका हसत हसत म्हणाले, “एवढी लहान गोष्टसुद्धा तुला कळत नाही की काय? अरे मी सीतेच्या माहेरकडचा माणूस. एखाद्या नाव्ह्याने सासरची निंदा केली तरी मला ते मान्य होणार. वर मी ब्राह्मणसुद्धा मला कुणीही बोलण्यापासून थांबवू शकतील का? मिथिलेची माणसं अयोध्येच्या लोकावर टीका करणारच. प्रत्यक्ष परमेश्वरसुद्धा त्यांना थांबवू शकणार नाही.”
मी मुकाट्याने काकांच्या तावडीतून निसटून मैदानाकडे गेलो.
प्रतिक्रिया
डेडली आहे हे. आवडलंय.
डेडली आहे हे. आवडलंय.
इतके क्रांतिकारी विचार १९५०
इतके क्रांतिकारी विचार १९५० च्या दशकात स्विकारले गेले? (म्हणजे त्यापायी दंगल, तोडफोड किमान लेखकावर भावना दुखावल्या म्हणुन आरोप असे काही झाले नाही?).
एकुण खट्टर काका आणि त्यांचे विचार आवडले. ह्या लेखकांचे विनोदी साहित्य इतके तर्कशुद्ध असेल तर तत्वज्ञानावरचे लिखाण किती भारी असेल असा विचार केला. वाचायला हवे.
...
एकंदरीतच १९५०च्या दशकात हिंदू मनुष्य (तुलनेने का होईना, परंतु) बराच टॉलरंट असावा, असे म्हणावे लागते. (म्हणजे, रॅडिकल एलेमेंट्स तेव्हाही होतेच, परंतु, त्यांच्यात तेव्हा तेवढा जोर नसावा, नि त्यांना तितकाही जनाधार तेव्हा नसावा, असे वाटते.) हे असे विचार तर सोडाच, परंतु देवादिकांच्या नावाने विनोद (प्रसंगी अश्लील विनोदसुद्धा) हिंदूंनी हिंदूंना सांगितलेले चालू शकत; नव्हे, सर्रास चालत. हिंदूंचे (बिनडोकीकरण तथा) रॅडिकलायझेशन हे मला वाटते १९८०च्या दशकाच्या अखेरीकडे हळूहळू सुरू झाले असावे; नव्हे, पद्धतशीरपणे करण्यास सुरू झाले असावे. आणि मग भावना दुखावणे, त्यावरून तोडफोड, वगैरे प्रकार बोकाळू लागले असावेत. असो.
.
मराठी भाषांतर करताना मराठीची माताभगिनी (व्याकरणदृष्ट्या) ठिकठिकाणी असह्यरीत्या एक झाली आहे. याबद्दल अनुवादकाने काळजी घ्यायला हवी.
बाकी, कथाबीज रोचक आहे. जुनेच (अत एव प्रेडिक्टेबल) असले, तरीही.
आणि, नाही. भावना दुखावल्या वगैरे नाहीत. ('चित्रकूट के घाट पे'च्या रतिबावर वाढलेले आम्ही... आमच्या भावना कसल्या दुखावताहेत?) किंबहुना, मुद्दे बहुतांशी लॉजिकल वाटले. मात्र, काही मुद्दे पटले नाहीत, हेही तितकेच खरे.
एक आख्यायिका आहे. एकदा म्हणे दूरदर्शनवर 'रामायण' चालू असते. लंकादहनाचा एपिसोड असतो. प्रेक्षक तिघेजण: एक मुसलमान, एक अमेरिकन, नि एक सरदारजी.
तिघांनाही एपिसोड खूपच आवडतो. आणि मग, 'हनुमान नक्की कोणाचा?', या विषयावरून, 'हनुमान आपलाच!' हे दाखविण्यासाठी तिघांत अहमहमिका सुरू होते.
मुसलमान म्हणतो, "वो उस्मान, सुलेमान, रहमान, वैसेइच अपना हनुमान. मुसलमानइच था वो."
यावर अमेरिकनाचे म्हणणे असे पडते, की, नाही. ते सुपरमॅन, स्पायडरमॅन, ही-मॅन, तसाच हॅनू-मॅन. अर्थात, अमेरिकन.
यावर सरदारजी फक्त हसतो. का रे बुवा, काय झाले?
"दूसरे की बीवी के लिए तीसरे की लंका जलाने वाला, और उस के लिए खुद ही की पूँछ को आग लगवाने वाला, एक सरदार छोड़ के और कौन हो सकता है?"
मात्र, इथे रावण हा हनुमानाच्याही वरचढ निघाला, असेच म्हणायला पाहिजे. म्हणजे, केवळ रामाला नीतिपाठ शिकवण्यासाठी म्हणून अगोदर सीतेला किडनॅप करून आणलीनीत्, मग तिला ओलीस ठेवून तिच्या खाण्यापिण्याराहण्यासंरक्षणाचा खर्च उचललानीत्, नंतर मग हनुमान आला तर त्याच्या शेपटाला आग लावून दिलीनीत्, नि परिणामी आपलीच लंका जाळून घेतलीनीत्... तुम्हीच सांगा मला, Was it really worth it? आँ?
आणि, कसली आदर्श व्यक्ती? आधी एक तर सीतेला पळवून आणलीनीत्, हा एक मुद्दा आहेच, परंतु तो घिसापिटा म्हणून तूर्तास बाजूस ठेवू. परंतु, एका माकडाच्या (सॉरी वानराच्या) शेपटीला पेटवून दिलीनीत् – Cruelty to animals! – हे शोभते का त्याला? 'पेटा'वाले काय म्हणतील? (नाही, पण सीरियसली!)
नाही, राम आदर्श होता, असे म्हणायचा हेतू नाही. पण राम आदर्श नव्हता, म्हणून रावण ऑपॉप आदर्श? लॉजिक पटले नाही!
प्रो. झा यांचा परिचय आवडला
प्रो. हरी मोहन झा यांचा परिचय आवडला.
अवांतर
सुधीर भिडे यांच्या लेखमालेनंतर मी एनसीआरटीची इतिहासाची पुस्तके चाळली. तरीही महाकाव्यांचा ऐतिहासिक संदर्भ काही लागत नव्हता. गेल्या महिन्यात कुरुंदकरांची दोन पुस्तके वाचली, "मनुस्मृती काही विचार" आणि "व्यासांचे शिल्प". दोनही पुस्तकांमुळे ऐतिहासिक पुराव्यांअभावी निखळलेले दुवे काय असू शकतात याची फार उत्तम कल्पना आली. खास करून महाभारताच्या बाबतीत. महाभारताच्या कथेत दर शतकामध्ये प्रक्षेप येत गेले. महाभारताच्या बाबतीत एक अशी प्रमाण चिकित्सक आवृत्ती बनविण्यासाठी, जी फार नाही, १७ व्या शतकातल्या नीळकंठी आवृत्तीच्या फक्त काही शतके अगोदरची असेल, अशी आवृत्ती बनविण्यासाठी, भांडारकर संस्थेच्या तज्ञांना १९२४ ते १९६६ हा तब्बल ४२ वर्षाचा कालावधी संशोधनासाठी लागला. (त्यात काही पिढ्या गेल्या, पहिल्या पिढीत डॉ. सुखटणकर नंतर डॉ. बेलवलकर. कुरुंदकरांच्या मते भांडारकर संस्थेची चिकित्सक आवृत्ती साधारण इ.स.१००० च्या आसपासची असावी). व्यासांचे शिल्प मधून हेही कळले की, खरा ययाती स्त्रीलंपट राजा नाही (जी खांडेकरांची ययाती वाचून माझ्याही मनात प्रतिमा निर्माण झाली होती). कुरुंदकर म्हणतात खांडेकर भाबडे होते, स्त्रीलंपटपणा त्यांच्यासारख्या साध्यासरळ माणसाला समजणे अशक्य. दशरथ, शंतनू यांना तुम्ही स्त्रीलंपट म्हणू शकता. अजून एक म्हणजे इ.स. १००० पूर्वी राधा अस्तित्वात नाही. राधेचे पात्र १००० नंतर घुसडवलेले आहे. अर्थात पण त्यामुळे भारतीय साहित्याने सत्यभामा, रुक्मिणी आणि राधा यांच्या रूपाने जगाला प्रेमाच्या वेगवेगळ्या पातळ्यांची ओळख करून दिलेली आहे. महाभारताच्या कथेत, भगवतगीता कृष्णाचे (कुरुंदकरांच्या मते एका राजकीय नेत्याचे) दैवतीकरण झाल्यानंतर आलेली असावी असे काही संशोधकांना वाटते. हा पाठ म्हणजे त्यांचे एक भाषण आहे जे यूट्यूबवर उपलब्ध आहे. https://www.youtube.com/watch?v=pHUVfklmoVg. या पुस्तकात कुरुंदकरांनी इरावती कर्वे यांच्या युगांतची (जे मलाही १० वर्षापूर्वी आवडले होते) चिकित्सा केली आहे. इरावतींनी महाभारताच्या पात्रांची ऐतिहासिक चिकित्सा आणि सांस्कृतिक चिकित्सा यात सरमिसळ केलेली आहे असे त्यांचे म्हणणे आहे. कदाचित इरावती समकालीन होत्या म्हणून ज्या कठोरपणे युगांतची चिकित्सा कुरुंदकरांनी केलेली आहे त्या प्रमाणात त्यांनी गीतारहस्याची करायला हवी होती असे मला वाटले. गीतारहस्यावरचा लेख फारच त्रोटक वाटला.
महाभारतााच्या बाबतीत निदान असे प्रयत्न (प्रक्षेप काढून मूळ आवृत्ती काय असू शकेल याचे शास्त्रशुद्ध संशोधन) करणे शक्य तरी झाले. पण रामायणाच्या बाबतीत ते बिलकूल शक्य झाले नाही. कारण रामायणाच्या कथेत एकसंघपणाचा बिलकूल अभाव आहे. (काही महिन्यांपूर्वी नेमांडेंचे वक्तव्य ऐकले होते रामायणा बद्दल. ते नेमके काय म्हणत आहेत हे 'व्यासांचे शिल्प' वाचून कळले). बुद्धाच्या जातक कथेमधली रामकथा वेगळी, जैनांचे रामायण वेगळे, दक्षिण भारतातले अजून वेगळे. उत्तर भारतात, रावणाचे देऊळ आहे आणि तिथल्या गावचे लोक रावणाला मानतात हे तर माझ्यासाठी नवीन होते.
सुधीर जी, तुमचा प्रतिसाद मला
सुधीर जी, तुमचा प्रतिसाद मला चर्चा योग्य वाटला म्हणून लिहितो.
रामयण आणि महाभारतावर 'प्रक्षेप' हा जर्मन भारतविद्या (Indology) शास्त्रातून आलेला दोष आहे. भारतीय परंपरेला न मानता केवळ शब्दांच्या साहाय्याने अभ्यास करण्याची पद्धत (higher criticism) युरोपियन विचारवंतांनी स्वीकारली. त्याआधी ही पद्धतीचे प्रयोग बायबल वर झाले आणि जशी बायबल मधल्या श्रद्धेचे धिंडवडे काढून सामान्य ख्रिष्चन मनुष्याचा बुद्धीभेद केला तोच प्रयोग हिंदू ग्रंथांवर केला गेला. याचा महाभारताच्या चिकित्सक आवृत्तीचे पहिले संपादक डॉ. सुखटणकर यांनी त्यांच्या ' On the Meaning of the Mahabharata' या पुस्तकारूपाने प्रसिद्ध झालेल्या व्याख्यानांद्वारे चांगलाच समाचार घेतला आहे. 'कृष्ण दैवतीकरण' हाही असाच बुद्धीभेद करणारा मुद्दा जर्मन भारतविद्यावितांनी निर्माण केला. अशा थापांना हिंदू रिफॉर्म च्या नावाखाली भारतीय विचारवंतांनी स्वीकारले. याचे कारण त्यातून हिंदू धर्म कसा चुकीचा आहे हे सांगता येते. प्रो. नानावटी हे याच परंपरेतले आहेत.
'प्रक्षिप्त-प्रक्षिप्त म्हणणाऱ्यांनी 'भारतीय परंपरेने हे बदल का स्वीकाराले' याचा विचार कधीच केलेला नाही. हजारो वर्षे महाभारत विविध स्वरूपात टिकले, ते का याचा विचार भारतीय परंपरेतून निर्माण होणाऱ्या दृष्टीने केला तरच समजू शकेल. नाहीतर श्रद्धाहीनत्व, शंका आणि तामसिक सुख याचीच निर्मिती होते हे या नानावटी यांच्या 'गंमतीदार' भाषांतराने सिद्ध होतच आहे.
डॉ. सुखटणकर
केवळ कुरुंदकरांनीच सुखटणकरांची स्तुती केली आहे असे नाही, सुखटणकर यांच्यानंतर द्रोणपर्व आणि उद्योगपर्व यांचे संपादन करणार्या पुढच्या पिढीतल्या डॉ. सुशीलकुमार डे यांनी म्हटले आहे की, "सुखटणकरांनी आखून दिलेली कामाची पद्धत इतकी तपशीलवार आणि निर्दोष आहे की, इतर संशोधकांना फारसे वेगळे निर्णय घ्यावेच लागत नाहीत."
कुरुंदकरांच्या पुस्तकातून मला समजलेला इतिहास असा की, १७९४ मध्ये सर विल्यम जोन्सने व्यावहारिक शहाणपण म्हणून बंगाल प्रांतात धर्मात हस्तक्षेप न करण्याचे धोरण पत्करले. आणि भारतीय परंपरेचा कायदा शक्यतो चालू ठेवायचा या विचाराने प्रथम मनुस्मृतीचे इंग्रजी भाषांतर करून घेतले. त्यावेळी महाराष्ट्रात पेशवाई चालू होती. सवाई माधवराव पेशवे, नाना फडणवीस राज्यकारभार करत होते. जोन्सची महाभारताचे भाषांतर करण्याचीही इच्छा होती. पण ही इच्छा पूर्ण झाली ती १०० वर्षांनी जेव्हा पी. सी. रॉय यांनी महाभारताचे भाषांतर केले. तिथेच उत्तरी आणि दक्षिणी प्रत परंपरांमधला फरक ठळकपणे सर्वांसमोर आला आणि चिकित्सक आवृत्तीची गरज निर्माण झाली. १९१९ साली मग हे कार्य भांडारकर संस्थेने अंगावर घेतले. पण तो पहिला प्रयत्न यशस्वी ठरला नाही. शेवटी, सुखटणकरांनी १९२४ मध्ये नव्या पद्धतीने कार्यारंभ केला. कुरुंदकर म्हणतात, "आरंभी ही पद्धत पुष्कळच विवाद्य ठरली. पण हळूहळू या पद्धतीची मर्यादित उपयुक्तता आणि या मर्यादेत तिचे सामर्थ्य पटल्यामुळे या पद्धतीचे समर्थक क्रमाक्रमाने वाढत गेले. आज ही पद्धत सर्वमान्य ठरलेली आहे. या पद्धतीचा तपशीलवार व काटेकोर परिचय करून देणे, हे त्या क्षेत्रातील तज्ञांचे काम आहे."
त्यामुळे या पद्धतीवर सुखटणकर यांचे म्हणणे वाचायला नक्कीच आवडेल. या पुस्तकात जी. सी. झाला यांनी लिहिलेली इंट्रोडक्टरी नोट्स वाचली. पुस्तक फार मोठे नाही १६० पानांचे आहे वेळ मिळाला की, नजरेखालून घालेन.
तुमचे नक्की म्हणणे काय आहे ?
तुमचे नक्की म्हणणे काय आहे ?
Higher critical method भारतीय धर्मग्रंथांना लावायची नाही काय ? स्वताला इतिहास म्हणून घेणाऱ्या ग्रंथांना सुद्धा नाही ?
गुमसुम गुमसुम हैं क्यूँ आज तू, बोलना बोलना
भारतीय धर्म ग्रंथ कोण कोणते आहेत
रामायण,महाभारत हे भारतीय धर्म ग्रंथ आहेत ठीक आहे आणि बरोबर पण आहे .
पण हे दोन च भारतीय धर्म ग्रंथ आहेत का?
तुम्ही फक्त हो म्हणा महाभारत ,रामायण हेच फक्त भारतीय धर्म ग्रंथ आहेत.
म्हणजे मग पुढे काय काय लिहिता येईल.
आणि ते अवघड जागेचे दुखणे ठरेल
.
तुमचे म्हणणे काय, त्याचा वरील
तुमचे म्हणणे काय, त्याचा वरील प्रतिसादाशी संबंध काय, हे समजले नाही.
गुमसुम गुमसुम हैं क्यूँ आज तू, बोलना बोलना
Higher and Lower Criticism
Higher and Lower Criticism Methods जर्मन प्राच्यविदयेची खास देन आहेत. भारतीय संदर्भात याचा उद्देश ‘मूळ’ महाभारत, भगवद्गीता वगैरे भारतीय ग्रंथ शोधून काढणे असा आहे. ‘जे महाभारत किंवा रामायण समोर आहे त्यापेक्षा ‘मूळ’ काहीतरी बेगळेच होते, आणि ते शोधले पाहिजे’ असा आव आणून जर्मन आणि - त्यांच्या मुशीत तयार झालेल्या व परंपरेशी फारकत घेतलेल्या भारतीय - प्राच्यविद्याविशारदांनी ज्या पद्धतीने मोडतोड केली आहे त्याचे दोनेकशे वर्षात अतिशय वाईट परिणाम भारतीय मनांवर झाले आहेत. वरवर जरी हे फार शास्त्रशुद्ध काम वाटत असले तरी ज्या परंपरेने हे ग्रंथ प्रमाणभूत मानले आणि शेकडो-हजारो वर्षे जपले, त्या परंपरेच्या विचाराला फाटा देऊन ‘भारतीय लोकांपेक्षा आपल्यालाच कसे या ग्रंथांचे मर्म कळले आहे’ हा अहंगंड भाव यात आहे.
भारतीय इतिहास हा ‘हिस्ट्री’ या युरोपियन विषयाप्रमाणे नाही. ‘हिस्ट्री’ म्हणजे भूतकाळातील विविध घटना स्थळ-काळातील बिंदूंवर बसवणे आणि या घटनांना एक विशिष्ट ‘अर्थ’ देणे. याला उगम ‘Christian Eschatology’ च्या तत्वामध्ये आहे. ‘हिस्ट्री’ मध्ये काळाचा प्रवास एकरेषीय (linear) आहे. भारतीय इतिहासात भगवंताने ‘प्रवृत्ती आणि निवृत्ती’ या ज्या दोन जीवन निष्ठा सृष्टीच्या धारणेपासून निर्माण केल्या त्यांचा प्रवास, त्यात कर्तव्ये आणि अधिकार (obligations/duties and privileges) यातील झगडा आणि मानवी मनासमोर भगवंताचे यश-ऐश्वर्य-कीर्ती यांचे दर्शन व श्रद्धेचे बळ मिळते. भारतीय इतिहासात काळाचे भान एकरेषीय नसून निर्मिती-वृद्धी-प्रलय या चक्राचे आहे. ‘हिस्ट्री’च्या एकरेषीय परिमाणात हे काळचक्र बसू शकत नाही. ‘हिस्ट्री’ एकीकडे जीजस आणि मोहम्मद यांचे ऐतिहासिकीकरण (historicization) करते परंतू भारतीय परंपरेतील ‘revelations’ मिथक म्हणून बाजूला टाकते.
Higher and Lower Criticism Methods ही एक प्रकारे ऐतिहासिकीकरण करण्याची साधने आहेत आणि यातून आपल्या इतिहासाचे साध्य – भगवंतांचे दर्शन – न होता, विकृतीकरण होते म्हणून श्रुति-स्मृति-पुराणे-इतिहास शिकताना ही पद्धत नाकारलीच पाहिजे. निर्भयावर जो हत्यार वापरुन जो विकृत हल्ला झाला त्यातून ती वाचणे शक्यच नव्हते. Higher and Lower Criticism Methods आपल्या पारंपारिक ग्रंथांवर जीवघेणा हल्ला करण्यासाठी असलेली हत्यारे आहेत.
भारतीय परंपरेत अधिकारी गुरू पूर्वपक्ष वगैरे करीत ‘भाष्ये’ लिहून विविध वाद-प्रतिवाद करतात. यातून विविध दर्शने आणि पंथांचा उदय आणि विस्तार झाला आणि होत आहे. उदाहरणार्थ बौद्ध आणि वैदिक मतांमधला वाद दीडेक हजार वर्षे चालला आणि त्यात न्याय-वैशेषिक दर्शनाचा विकास होत पुढे औपनिषदिक अद्वैत मत प्रस्थापित झाले व बौद्ध मतांचा पाडाव झाला. पुढे अद्वैत मताला समांतर विशिष्ट अद्वैत, द्वैत व इतर मते निर्माण झाली. ही केवळ वैचारिक नसून भारतीय समाज विकसित होत राहिला. गीतेत भगवंताने म्हणल्याप्रमाणे ‘लोकसंग्रह’ हे साध्य समोर ठेवून, समन्वय करीत भारतीय परंपरा पुढे वाटचाल करते. हे युरोपियन विचारात होत नाही.
.
तुमच्या विचारांची बैठक माझ्यापेक्षा पूर्णच वेगळी असल्यामुळे वाद घालण्यात अर्थ नाही. (उदाहरणार्थ, ‘भगवंत’ किंवा ‘काळाचं चक्राकार भान’ ह्या प्रकारांत मला तथ्य दिसत नाही.) इतकंच म्हणतो की इतिहासाची ‘युरोपियन’ कल्पना ज्यांना मान्य आहे त्यांना भारतीय (किंवा अभारतीय) ग्रंथांचा अभ्यास त्याप्रमाणे करू द्यावा. त्या अभ्यासाची दिशा चुकलेली आहे असं मानण्याची मुभा तुम्हाला आहेच.
युरोपियन इतिहासकारांपैकी कित्येक मोठी नावं (हिरोडोटस, थ्युसीडिडीस, पॉलिबियस) ख्रिस्तजन्मापूर्वीची आहेत. त्यामुळे युरोपियन इतिहासाचा उगम Christian Eschatology मध्ये आहे असं वाटत नाही. तो त्याच्या किमान चारपाचशे वर्षं आधीचा आहे.
- जयदीप चिपलकट्टी
(होमपेज)
इतिहासाची ‘युरोपियन’ कल्पना
इतिहासाची ‘युरोपियन’ कल्पना ज्यांना मान्य आहे त्यांना भारतीय (किंवा अभारतीय) ग्रंथांचा अभ्यास त्याप्रमाणे करू द्यावा.
- युरोपियन विद्वानांनी त्यांचे अभ्यासाचे स्वातंत्र्य घेतले आहे यावर वाद नसावा. खरा प्रश्न असा आहे की, ज्या भारतीय परंपरेत हे ग्रंथ निर्माण झाले त्या लोकांना त्यांच्या श्रद्धे प्रमाणे अभ्यासाचे स्वातंत्र्य युरोपियन विद्वानांना मान्य आहे का?
'हिस्ट्री' चा युरोपियन Enlightenment काळात जो बदल झाला तो बदल सध्या महत्वाचा आहे. कांटच्या विचाराने प्रभावित होवून हेगेलने जर्मनीत 'वर्ल्ड हिस्ट्री' चा एकहाती शोध लावला आणि हेगेलियन स्कूलचा परिणाम शेवटी कार्ल मार्क्स पर्यंत झाला. Geist, Reason in World History, Progress narrative यातून 'हिस्ट्री' चे वेपनायजेशन झाले. पुढे प्राच्यविद्या आणि हिस्ट्री यांच्यात सरमिसळ होवून भारतीय ग्रंथांची मोडतोड करीत आपलाच बुद्धिभेद या विद्वानांनी करुन ठेवला आहे.
हे भारी आहे बुवा. महाभारत,
हे भारी आहे बुवा. महाभारत, रामायण हा खराखुरा इतिहास आहे म्हणायचे. निलेश ओक वैगर मंडळी ग्रह ताऱ्यावरून ह्या घटनांचे डेटिंग करायला जातात.
पण त्याच वेळी ऐतिहासिक दृष्टिकोनातून ह्या ग्रंथांना बघू नका असेही सांगायचे.
गुमसुम गुमसुम हैं क्यूँ आज तू, बोलना बोलना
प्रश्न
हे काका आज असते तर सध्याच्या, स्वत:ला लोकोत्तर पुरुष मानणाऱ्या एका नेत्याबद्दल मत विचारले असते.
.
> महाभारतााच्या बाबतीत निदान असे प्रयत्न (प्रक्षेप काढून मूळ आवृत्ती काय असू शकेल याचे शास्त्रशुद्ध संशोधन) करणे शक्य तरी झाले. पण रामायणाच्या बाबतीत ते बिलकूल शक्य झाले नाही.
रामायणाची चिकित्सक आवृत्ती बरोडा युनिव्हर्सिटीने तयार केलेली आहे. ही १९६० च्या आसपासची गोष्ट. तो प्रयत्न अयशस्वी झाला असं मत मी इतर कुठे ऐकलेलं नाही. अर्थात कुठल्याही प्राचीन ग्रंथाची चिकित्सक आवृत्ती काढणं हे काम शंभर टक्के यशस्वी होण्यातलं नसतंच.
https://archive.org/details/RmyaaCriticalEdition1EDGHBhatt1960/page/n1/m...
------
- जयदीप चिपलकट्टी
(होमपेज)
थॅक्स.
थॅक्स. नोटेड!
कुरुंदकरांचे थोडक्यात मत असे आहे की, महाभारत हे जसे इतिहास म्हणून प्रसिद्ध आहे तसे रामायणाचे नाही. रामायण आकाराने पुष्कळच लहान असूनही बर्याचप्रमाणात विस्कळीत आहे. त्यामानाने महाभारत अस्ताव्यस्त पसरलेला ग्रंथ असूनही कमी विस्कळीत आहे. मुद्दा अधिक स्पष्ट करण्यासाठी त्यांनी दक्षिणी, उत्तरी आणि शारदा या तीन परंपरांचा उल्लेख केलेला आहे. महाभारताची पर्व संख्या या तीनही परंपरात समान आहे. प्रत्येक पर्वातल्या मूळ कथेत एकसारखेपणा आहे, पण तसे रामायणाचे नाही. 'भरतमंजिरी' जरी काश्मिरातली असली तरी, भरतमंजिरीत उल्लेखलेली कथा दक्षिण भारताच्या टोकाला आढळणार्या महाभारतात असते. "रामायणातील एक-तृतीयांश भाग दर प्रत-परंपरेत निराळा आढत असल्यामुळे क्षेमेंद्राची 'रामायणमंजिरी' एका परंपरेच्या रामायणाचे सार जसे देते, त्याप्रमाणे सर्व परंपरांना समान असणार्या रामायणाचे सार देईलच, याची खात्री नसते." हा त्यांचा मुद्दा आहे.
हिंदू हा एकमेव धार्मिक ग्रुप आहे ,धर्म आहे
हिंदू धर्म म्हणा किंवा हिंदू जीवन पद्धती म्हणा अशी जगात एकमेव संस्कृती त्या मध्ये प्राचीन काळात विविध विषयावर लेखन झाले आहे.
1) महाभारत .
मानवी जीवनातील सर्व प्रश्नांना त्या मध्ये स्पर्श केला आहे.
विविध अस्त्र, शस्त्र ह्यांचे वर्णन केलेले आहे ती शस्त्र काय विनाश करतात ते सांगितले आहे .
युद्धाचे परिणाम सांगितले आहेत.
नीतिमत्ता सांगितली आहे.
भले ती कल्पना असली तरी महाभारत लेखन काळात कोणत्याच धर्माचा लोकांना तशा त्या दर्जा च्या कल्पना करण्याची पण बुध्दी नव्हती.
२) रामायण विषयी पण तेच म्हणता येईल.
३) कामशास्त्र.
४) आरोग्य शास्त्र.
५) वास्तू शास्त्र..
६)अवकाश निरीक्षण.
७)गणित शास्त्र.
खूप मोठी यादी आहे.
सर्व विषयात हिंदू धर्मात लिखाण झाले आहे.
खजुराव सारखे कामशास्त्र चे धडे देणारी शिल्प असणारे जगातील एक मेव मंदिर हिंदू न च्या बुध्दीमत्ते ची साक्ष देते.
बाकी जगातील कोणत्याच धर्मात इतक्या विषयावर लेखन झालेले नाही.
भारतातील आताचे इतिहास अभ्यासक ढोंगी आहेत कोणत्या तरी धर्माचे आहेत किंवा ठराविक विचारधारेचे गुलाम आहेत.
रामायण वाला खट्टर पण त्याच लायकीचा.
भारत सरकार नी जागतिक लेव्हल ल निविदा मागवून जगातील अती हुशार लोकांना आमंत्रित करावे जे कोणत्याच विचार धारेचे गुलाम नसतील पण तीव्र बुध्दीमान असतील .
आणि हिंदू प्राचीन सर्व ग्रंथ प्राचीन ज्ञान ह्याचा सविस्तर अभ्यास करण्याचे काम त्यांना द्यावे.
भारतीय विचारवंत बिलकुल विश्वास ठेवण्या लायक नाहीत .
ते कोणत्या तरी विचार धारे चे गुलाम असतात.
सत्य ते मांडू च शकत नाहीत.
140 कोटी भारताची लोकसंख्या आहे .
पण एका पण न्यूज चॅनल च पत्रकार निःपक्ष, कोणत्या च प्रभावाखाली नसलेला.
कोणत्याच स्वार्थ मध्ये न अडकलेले फक्त सत्य तेच सांगणार नाही.
भारतात गल्लोगल्ली विचारवंत , विज्ञान वादी,समाज सुधारक ,इतिहासकार आहेत पण अगदी प्रसिद्ध असणाऱ्या पासून नवखे असणाऱ्या लोकात एक पण.
निःपक्ष,कोणत्याच विचारधारेच्या प्रभाव खाली नसणारा.
कोणत्याच स्वार्थात न अडकलेला फक्त सत्य तेच मांडणारा एक पण नसावा.
आपल्या कडे संख्या खूप आहे पण दर्जा झीरो
भारताच्या आज च्या राजकीय ,सामाजिक आर्थिक दुरवस्थेची हीच कारणे आहेत ..quality पेक्षा quantity ल जास्त किंमत आपल्या यंत्रणेत दिली गेली आहे
नाही हो तसे..
नाही हो तसे..
तसे लिखाण जवळजवळ सर्वच प्राचीन संस्कृतींमध्ये. आपण एकमेव नाहीत.
*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल!!
हाकुना मटाटा!!
*****************
पुंबा
जगातील सर्व प्रमुख धर्मात .
हिंदू संस्कृती,धर्म काही ही म्हणा ह्यांच्या गटात जे विविध विषयावर लिखाण आहे.
आरोग्य.
कामशास्त्र.
समाज शास्त्र.
नीतिमत्ता.
Etcहे ह्या विषयात लिखाण आहे तुम्ही म्हणता बाकी धर्मात पण आहे
तर भारतातील कोणत्या ही मीडिया मध्ये किंवा सामाजिक माध्यमात ( मी फक्त bharata विषयी बोलत आहे जगात अनेक राष्ट्र हिंदू संस्कृती चे विविध ग्रंथ आहेत त्याचा अभ्यास करतात.)
चर्चा का होत नाही.
ऐसी अक्षरे वर.
जेव्हा पासून हे वेब पेज तयार झाले त्या पासून जगातील हिंदू सोडून बाकी धर्माचे .
धर्म ग्रंथ.
रीती रिवाज.
अंध श्रद्धा.
श्रद्धा.
वास्तू शास्त्र.
कामशास्त्र .
नीती शास्त्र .
ह्या वर एका लेख लिहला नाही
समजा लिहिला हिंदू संस्कृती,धर्म ह्याच्या विषयी तर .
पहिली नापास पासून उच्च शिक्षित कथित धर्म सुधारक .
कोणतेच पुरावे न देता त्या व्यक्ती ल trol करतात.
तपासा .भारतात जे स्वतः ल विज्ञान वादी समजतात त्या भारतातील काही समाज घटकांना विज्ञान मधील A पण माहीत नसतो फक्त द्वेष,राजकीय कारण ह्या मुळे टीका करत असतात
सत्य आहे हे.
बाकी धर्मात .
समाज शास्त्र.
नीती शास्त्र.
अवकाश शास्त्र.
गणित शास्त्र.
काम शास्त्र .
Etc .
ह्या वर जगात लिखाण आहे असे तुम्ही ठोकून दिले आहे तर एक लेख लिहाच ह्या सर्व विषयावर
रोम ,आणि माया संस्कृती सोडून
हिंदू, भारतीय संस्कृती,
हिंदू, भारतीय संस्कृती, चालीरीती विरोधी नवफुरोगामीवाममार्गीवमनप्रवीणबद्धकोष्टीहिंदूद्वेष्टेश्मश्रूप्रेमीवराहवंशीश्वानवृत्तीविचारवंतांकडून भलत्या अपेक्षा ब्वा तुम्हाला !!
- अहिरावण
काय सांगता? असेल असेल!! तुम्ही म्हणता म्हणून तुम्ही नक्कीच पुरोगामी, उदारमतवादी वगैरे जे म्हणाल ते असाल. मग प्रत्यक्षात तुम्ही कितीका कुपमंडूक असा... तुम्ही महानच आहात. केवळ तुम्ही म्हणता म्हणून...
.
"नवफुरोगामीवाममार्गीवमनप्रवीणबद्धकोष्टीहिंदूद्वेष्टेश्मश्रूप्रेमीवराहवंशीश्वानवृत्तीविचारवंत" हा कित्ती अवघड शब्द आहे... पण या शब्दाचा विरुद्धअर्थी शब्द खूप सोपा आहे --- तो म्हणजे "भक्त"
खरे आहे. भक्ती ही एकदम सोपी
खरे आहे. भक्ती ही एकदम सोपी गोष्ट आहे. तुकोबा ज्ञानोबा एकनाथांनी सुद्धा हेच सांगितले आहे. गोंदवल्याचे महाराज तर म्हणतात काही करु नका फक्त भक्तीपूर्ण रामाचे नाव घ्या ! भक्त असणे ही फार चांगली आणि साधी गोष्ट आहे. पण काही राक्षस वृत्तीचे लोकांना ते समजत नाही.
श्रीराम जय राम जय जय राम !!
- अहिरावण
काय सांगता? असेल असेल!! तुम्ही म्हणता म्हणून तुम्ही नक्कीच पुरोगामी, उदारमतवादी वगैरे जे म्हणाल ते असाल. मग प्रत्यक्षात तुम्ही कितीका कुपमंडूक असा... तुम्ही महानच आहात. केवळ तुम्ही म्हणता म्हणून...
आणि
'भक्त' शब्दाचा विरुद्धअर्थी शब्द आणखीच खूप सोपा आहे --- तो म्हणजे "त्रस्त"
नीट माणसासारखं विचारलं असतं
नीट माणसासारखं विचारलं असतं तर लिहिलं असतं. पण तुम्हाला स्वतःचा मुद्दा रेटायचा आहे असं दिसतं. त्यामुळे पास!
*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल!!
हाकुना मटाटा!!
*****************
डिसक्लेमर टाकून रामाविरुद्ध
डिसक्लेमर टाकून रामाविरुद्ध लिहायची खाज भागवून घेतली तर नानावटींनी... छान छान !!
आयुष्यात फक्त एकदाच हिंदू सोडून दुस-या धर्मावर लिहून पहा हो,... निदान तुमच्या कबरीवर सर्वधर्मांचे यथायोग्य मुल्यमापन करणारा विचारवंत असे लिहीता तरी येईल... नुसते हिंदूविरोधी असे विशेषण लिहीले तर काय मजा !!
करा विचार !!
- अहिरावण
काय सांगता? असेल असेल!! तुम्ही म्हणता म्हणून तुम्ही नक्कीच पुरोगामी, उदारमतवादी वगैरे जे म्हणाल ते असाल. मग प्रत्यक्षात तुम्ही कितीका कुपमंडूक असा... तुम्ही महानच आहात. केवळ तुम्ही म्हणता म्हणून...
तुम्ही सगळीकडे बोंब मारत
तुम्ही सगळीकडे बोंब मारत फिरता. दुसऱ्यांना चॅलेंज देण्यापेक्षा स्वतः हवे ते लिहा कसे.
गुमसुम गुमसुम हैं क्यूँ आज तू, बोलना बोलना
सगळीकडे नाही.. हिंदू विरोधी
सगळीकडे नाही.. हिंदू विरोधी भगेंद्रांच्या विरोधात असतो आम्ही.
- अहिरावण
काय सांगता? असेल असेल!! तुम्ही म्हणता म्हणून तुम्ही नक्कीच पुरोगामी, उदारमतवादी वगैरे जे म्हणाल ते असाल. मग प्रत्यक्षात तुम्ही कितीका कुपमंडूक असा... तुम्ही महानच आहात. केवळ तुम्ही म्हणता म्हणून...
मार्मिक!
मार्मिक!
हायला काका शेवटी एकदम
हायला काका शेवटी एकदम ब्राम्हणवादी झाले की. आधी बरा माणूस वाटत होता.
गुमसुम गुमसुम हैं क्यूँ आज तू, बोलना बोलना
"वादी". असणारे सर्व लोक फक्त प्रोपोगोंडा चालवतात
" वादी" असणारे सर्व फक्त विशिष्ठ दृष्टिकोन पसरवण्याचे काम करतात .
हे काही कामाचे नाहीत.
जसे, ब्राह्मण "वादी", धर्म " वादी, ". . हिंदू "वादी".
मुस्लिम " वादी,".
आस्तिक " वादी".
नास्तिक " वादी".
इत्यादी सर्व .
सर्व ढोंगी सत्य लपवून असत्य. सांगून स्व फायदा आणि propogonda सत्ताधारी लोकांसाठी चालवणे हा .
स्वार्थी हेतू असणारी ही सर्व लोक आहेत.
इत्यादी मध्ये बाकी सर्व आहेत फक्त त्याचा उल्लेख केलेला नाही..
"वादी " च व्हायचे असेल तर सत्यवादी व्ह्या जे सत्य आहे तेच बोला,लिहा ,ऐका, किंवा वाचा.
अपेक्षेप्रमाणे 'राम नवमी' जवळ
अपेक्षेप्रमाणे 'राम नवमी' जवळ येत आहे हे पाहून सरांनी गंमत म्हणत म्हणत आपले रामयाणाबद्दलचे अज्ञान आणि द्वेष प्रदर्शीत केलेच.
बाकी 'नेहेमीचे यशस्वी' आहेतच 'आपण कित्ती कित्ती लॉजीकल आणि कित्ती कित्ती मोठे टोमणेश्वर आहोत' याच्याच प्रेमात असलेले...
सर खरे 'भक्त' आहेत, सतत हिंदू धर्माचा विचार करतात आणि द्वेषाचे का असेना पण भगवंतचे नाव घेतात.
यालाच 'विद्वेष भक्ती' म्हणतात.
.
१. ‘विरोधी भक्ती’, नव्हे काय?
२. अरेच्या! असे आहे होय? गंमतच आहे, म्हणायची!
तरीच! विविध धर्मांची चिन्हे कचऱ्याच्या टोपलीत टाकल्याचे एक चित्र सरांनी या ठिकाणी डकविले आहे. परंतु, त्या (कचऱ्याच्या टोपलीत टाकलेल्या) धर्मचिन्हांत हिंदुधर्माचे एकही चिन्ह नव्हते! आता, ही गोष्ट आमच्या तेव्हासुद्धा लक्षात आली होती खरी, परंतु, तेव्हा त्याचा अर्थ आम्ही सरांना फार फार तर हिंदुधर्माप्रति छुपी सहानुभूती असावी, इतपतच लावला होता. प्रकरण इतक्या थराला गेले असेल, नि हा विरोधी भक्तीचा प्रकार असेल, अशी पुसटशी शंकासुद्धा आली नव्हती.
असो चालायचेच.
पण काय हो? या हिशेबाने, उद्या जर का कोणी तुम्हाला (किंवा, देव न करो, परंतु, मलासुद्धा) सरांचे विरोधी भक्त म्हटले, तर कसे वाटेल हो? आँ? आँ? आँ?
(तरीसुद्धा, माझे एक वेळ ठीक आहे. ‘मी नास्तिक आहे, नि एकसमयावच्छेदेकरून परमेश्वर आहे. सबब, मी नाहीच; तेव्हा मी सरांचा (किंवा कोणाचाही) विरोधी (किंवा कोणत्याही प्रकारचा) भक्त असूच शकत नाही’ असा काहीबाही दावा करून मी त्या आरोपातून सुटण्याचा निदान प्रयत्न तरी करू शकतो. (प्रयत्नांती परमेश्वर — म्हणजे मीच!) परंतु, तुमचे काय होईल?)
आम्ही सरांचे पंखा आहोत यात
आम्ही सरांचे पंखा आहोत यात शंका नसावी.
तुम्ही मात्र ‘मी कधीकधी नास्तिक आहे वा कधीकधी परमेश्वर आहे’, याचे ‘सिलेक्टीव अंधभक्त आहात.
सिलेक्टीव यासाठी की कुणी काही लिहिले आणि तुम्ही त्रस्त झालात की कधीकधी सकाळी, कधीकधी संध्याकाळी, कधीकधी काहीबाही पिताना अथवा न पिताही, कधी कांट चावल्यासारखे तर कधी डेकार्ट चावल्यासारखे enlightened नास्तिकबिस्तिक बनता तर कधीकधी तुम्हाला परमेश्वर आठवतो.
‘अंधभक्त’ यासाठी कारण आपला आपल्यावरचा विश्वास fluidity टाइप आहे, त्यात enquiry नाही, त्यामुळे प्रचितीची शक्यता नाही.
बोले तो, रावण, हिरण्यकशिपू आणि शिशुपालाला सुद्धा ज्या भगवंताने अवतार घेऊन मुक्ती दिली, तुम्ही-आम्ही सगळेच त्याचे केवळ नाम-रूप. शेवटी आपल्याला तोच तारणार, मग आपण कितीही पकाऊ, खवचट, ‘मार्मिक’ टिपा, उपटीपा, उपउपटीपा लिहिल्या किंवा सरांसारखे ‘गंमतीदार’ लेख लिहिले तरी!
मानो ना मानो, सबही राम
.
‘प्रोपोगोंडा’ हा शब्द मस्त आहे. लॅटिन आणि द्रविड अशा दोन अभिजात भाषासरितांचा मनोहर संगम त्यामध्ये झालेला आहे. तो तत्सम किंवा तद्भव शब्द नव्हे हे उघडच आहे, पण लॅटिन अंश असल्यामुळे देशी म्हणवत नाही आणि द्रविड अंश असल्यामुळे परदेशी म्हणवत नाही. असो. ‘प्रोपोगोंडा घोळवणे’ असा शब्दप्रयोग लवकरच रूढ व्हावा अशी वाग्देवीकडे प्रार्थना करतो.
जाता जाता: प्राच्यविद्याकारांचं आडनाव माझ्या समजुतीप्रमाणे ‘सुकथनकर’ होतं. (मराठी विश्वकोशात असंच लिहिलेलं आहे.) ‘सुखटणकर’ नव्हे.
------
- जयदीप चिपलकट्टी
(होमपेज)
पोस्ट वरील प्रश्न ना
पोस्ट वरील प्रश्न ,आक्षेप ह्यांना पोस्ट चे लेखक नानावटी ह्या व्यक्ती नी उत्तर देणे गरजेचे आहे.
बाकी लोक च का उत्तर देत आहेत हे कळत नाही.
बाकी लोक आणि पोस्ट लेखक ह्यांची संघटना आहे काय!
लबाडी चालू आहे
जे राम ल मानतात आणि जे रामायण हे सत्य आहे ते मानतात.
महाभारत विषयी पण तेच .
ते जसे आहे तसे दोन्ही ग्रंथ स्वीकारतात.
आणि प्रत्येक घटना सत्य च मानतात.
पण जे हिंदू विरोधी आहेत,हिंदू संस्कृतीचे विरोधी आहेत ते लबाड्या करत असतात.
त्यांचा फक्त हेतू एक च असतो लोकांच्या श्रधे वर आघात करणे .
हिंदू संस्कृतीचे महत्त्व कमी करणे..
मग सुरू होते.
१)रामायण ,महाभारत हे काल्पनिक आहे ,ते घडलेच नाही.
२)एकदा रामायण,महाभारत हे काल्पनिक आहे असे जाहीर करून झाले तरी हे गप्प बसत नाहीत.
३) जगात अनेक रामायण,महाभारत कथा लिहल्या आहेत.
राम व्यसनी होता ,रावण मोठा पवित्र होता असे अमक्या ,तमक्या रामायणात लीहले आहेत.
हे रामायण है काल्पनिक आहे असे जाहीर केल्या वर .
त्या ग्रंथा मधील पात्रांचा अभ्यास करण्याचा फुकट च व्यवसाय बुद्धी प्रमाण वादी ( कथित आणि स्वयं घोषित)लोक करतात च का.
कोणत्या हेतू नी करतात.