पाकिस्तान - ११

लाहोर भारतासाठी विशेष महत्त्वाचे नव्हते. लाहोर जिंकणे हा ना कधी अजेंडा होता ना सैन्याने कधी प्रयत्न केले.
सीमेपासून लाहोरपर्यंतचे अंतर तेवढेच आहे जेवढे कॅनॉट प्लेस ते नोएडा. असही नाही की रस्त्यात रणगाड्यांची रांग लागलेली असते नी सैन्य त्याला ओलांडून जाऊ शकत नाही. ग्रँड ट्रंक रोडसारखा उत्कृष्ट रस्ता बनलेला आहे. पाकिस्तानने लाहोरच्या वेशीवर जुन्या पद्धतीची सुरक्षा व्यवस्था केली होती. जसे किल्ल्याच्या बाहेर एक कालवा खणणे, जेणेकरून इतर सैन्य तेथवरच थांबू शकेल. हा देखील पाकिस्तानचा स्वतःचा नदी जोड प्रकल्प आहे, जो त्याने 1948 मध्ये केला होता..
भारतीय सैन्य लाहोर शहरात कधीच पोहोचले नाही. भारताने लाहोर जिंकल्याचा भारतीय सैनिकांचा फोटो त्याच बर्की स्टेशनवर उभे असल्याचा आहे. असे फोटो पाकिस्तान सैनिकांचेही खेमकरन (पंजाब) आणि मुनाबाव (राजस्थान) चौक्यांवर ध्वज फडकावल्याचे दिसतात. याचा अर्थ त्यांनी अमृतसर जिंकले असा होत नाही.
.
लाहोरचे महत्त्व काही जुन्या चित्रपटांमधील लढ्यासारखे होते, जसे एकाने एखाद्याच्या मुलावर बंदूक तानली, तर दुसऱ्याने त्याच्या प्रेमीकेवर बंदूक तानली आणि सांगितले की तू मुलाला सोड, तरच तुला ही मिळेल. अखनूरमधील परिस्थिती गंभीर असल्याने भारतीय लष्कर धमकी देण्यासाठी लाहोर सीमेवर पोहोचले. पाकिस्तानी सैन्यानेच त्या कालव्यावर बांधलेले पूल उडवले, त्यामुळे भारतीय सैन्य अडकले. कालव्याच्या पलीकडे बाटा चप्पलच्या कारखान्यामुळे बाटापूर नावाची घनदाट वस्ती विकसित झाली होती, ही बाब भारतीय सैन्याला माहिती नव्हती. आणी ते ही घनदाट वस्ती पाहून हैरान झाले. सामान्य लोकांवर हल्ला किंवा लाहोरच्या गल्ल्या भटकायचा त्यांचा हेतू नव्हता. ही काही स्टैलीनगडची लढाई नव्हती की मोठे शहर उध्वस्त केले जाईल.

जर एखाद्या भारतीय सैन्यातील व्यक्तीस विचारले गेले की १९६५ च्या युद्धाच सर्वात जास्त दुःख कुठल्या गोष्टीचं आहे तर तो सांगेल की "हाजी पीर परत देणं." हाजीपिर वरील विजय आजही सेना सन्मानाने साजरी करते. नितीन गोखले ज्यांनी आपल्या पुस्तकात १९६५ चं युद्ध भारताने जिंकल अस म्हटलंय त्यांनी हाजीपिर युद्धाला जगातील कठीणतम युद्धात स्थान दिलंय. तर रचना बिष्ट आपल्या पुस्तकात म्हणतात की ज्या दिवशी भारतीय सेनेने हाजिपिर वरून आपला झेंडा काढून आणला तेव्हा त्यांचे डोळे पाणावले होते. ही ह्या युद्धाची एकमेव मिळकत होती जी भारताने ताश्कंद मध्ये गमावली.
. हाच घाट उरी आणी पूछ ला जोडतो आणीं जगाच्या कठीण नी वळणावळणाच्या रस्त्यातील एक आहे. हा तोच रस्ता आहे ज्याच्यातून दिवसा उजेडीही पाकव्याप्त काश्मीरातून घुसखोरी चालू असते. ह्याच्या शिखरावर जेव्हा मेजर रणजित दीनदयाळ पोहोचले होते तेव्हा त्यांना मुजफ्फराबाद (pok) पर्यंतचा भाग दिसत होता. आणी तिथे चाललेल्या सर्व camps वर नजर ठेवली जाऊ शकत होती. हे तेच रणजितसिंह दीनदयाळ आहेत ज्यांनी नंतर ऑपरेशन ब्लू स्टार मध्ये मोठी भूमिका निभावली होती. ज्याची चर्चा मी (ब्लुस्टार: अस्सी के दशक का भारत) मध्ये केलीय.

लाहोर शहर घेऊन सैन्य काय करणार होते? सैन्याला तर हाजीपीर सारखा रणनीतीच्या दृष्टीने महत्वाचा बिंदू हवा होता. ६ सप्टेंबर रोजीच पाकिस्तानी लष्कराने लाहोरची वेश मोठ्या प्रमाणात वाचवली होती. दोन दिवसांनंतर संयुक्त राष्ट्रांचे महासचिव पाकिस्तानात पोहोचले होते. युद्ध थांबेल असे वाटत होते.
पण पाकिस्तान नवा मोर्चा उघडुन होता, नवीन सैनिकी स्कूल पास झालेला परवेझ मुशर्रफ पण खेमकरण मोर्च्यावर पोहोचला होता, खेमकरण वर अमेरिकेची देखील नजर होती की आपल्या पॅटन टँकाची तपासणी होईल. शेवटी इथे शतकातले सगळ्यात मोठे टँक युद्ध होणार होते .
(क्रमश:)
मूळ लेखक - प्रविण झा.

पुस्तक - दास्तान- ए- पाकिस्तान.
प्रकाशक- ई संपदा प्रकाशन.
https://esamaadprakashan.com/books/dastan-e-pakistan/

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

बाकी लेखमाला अतिशय उत्तम आहे त्या वर काहीच व्यक्त होणार नाही.

आणि पुढचे भाग लेखकाने टाकावेत असेच मत व्यक्त करीन.
पण युद्ध ह्या विषयात लिहिताना तिराईत व्यक्ती नी चुका काढणे चूक आहे असे मला वाटते.

लाहोर जिंकणे फायद्याचे नव्हते .
किंवा .

हाज पिर परत देने कसे चूक होते.

असे मत व्यक्त करणे पटत नाही.
युद्धात आकस्मित उद्भवणाऱ्या स्थिती नुसार निर्णय घेतले जातात.
लाहोर वर भारताचा हल्ला ते त्याचेच उदाहरण आहे
हाजी पीर परत दिले .
कारण प्रत्यक्ष,आणि अप्रत्यक्ष अनेक राष्ट्रांचा दबाव युध्य जन्य देशावर असतो सर्व च काही पब्लिक साठी उपलब्ध नसते.

त्या मध्ये भारत आणि पाकिस्तान काही सुपर पॉवर देश नाहीत ..

तेव्हा पण नव्हते
जागतिक दबावात काही निर्णय घेणे. इच्छा नसेल तरी मजबुरी असू शकते.

.त्या मुळे लेखकाने ..
लाहोर जिंकून काय करणार हे मत.
आणि हाजी पीर परत का दिले हे मत .

आगावू पणाचे आहे .
असे मला वाटते

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0