उगाचच
जुने संस्थान, जुना वाडा
दारे सोळा खिडक्या सतरा
तीन अजब चिजा दिसल्या -
त्यांना लागू एकच मात्रा
शिकारीच्या खुणा नव्हत्या
नव्हते भाले, नव्हते फासे
भल्याथोरल्या फिशटँकमधे
सुस्त पोहत होते मासे
करकरणाऱ्या झोपाळ्याची
अवस्था होती अगदीच सो-सो
पितळी कड्यांस काळवंडलेल्या
कधीच लागला नव्हता ब्रासो
शून्य काना, एक काना,
दोन काना, (यमक फसो)
मासे बघत झोपाळ्यावर
पहुडले होते पद्माकरसाो
(ऑगडेन नॅशच्या 'द लामा' या कवितेपासून प्रेरित)
[टीप: कोल्हापूर आणि आसपासच्या परिसरात नावानंतर लावलेलं साहेब हे संबोधन साो असं लिहितात. उदा. अण्णासाो]
?
(ऑगडेन नॅशच्या 'द लामा' या कवितेपासून प्रेरित)
??????
The one-l lama,
He's a priest;
The two-l llama,
He's a beast.
And I will bet
A silk pajama
There isn't any
Three-l lllama.
या कवितेपासून?
या कवितेत नि प्रस्तुत कवितेत नक्की काय साधर्म्य आहे? (ठीक आहे, हे भाषांतर/रूपांतर नव्हे, निव्वळ प्रेरणा आहे, असे स्पष्टपणे म्हटलेले आहे, हे मान्य; परंतु, तरीसुद्धा?)
.
ह्या कवितेपासून अनेकांना प्रेरणा मिळाली आहे: https://aisiakshare.com/node/264
----
‘साो’ नव्हे.
‘साो’ नव्हे.
‘सोा’.
(मात्रा मधल्या कान्यावर; शेवटच्या कान्यावर नव्हे.)